नेहमी चूक माझीच!!!(भाग ३) अंतिम भाग

संसार म्हटलं की भांडणे आली पण दरवेळी तूच चुकते का?


" शांताबाई तुमच्यासाठी काय आणायचं का?"


"आता मी नाही म्हटलं तरीही तुम्ही आणल्याशिवाय राहता का?
बघा ना साहेब. माझा नवरा म्हणतो तू माझ्या पेक्षा त्यांना जीव लावते."

" हो  मग खरचं आहे. जरा नवऱ्याची काळजी करत जा. "

" साहेब... अहो संसार आहे तर नवरा बायकोची काळजी तर असणारच ना ..आणि तुमच्यासारखी देव माणसं फार कमी आहेत हो."


" आता तुम्ही पण नका सुरू होऊ...बस झालं तुम्ही चांगले आहात म्हणून आम्ही चांगले आहोत."


" बाई साहेब अहो तसं नाही नवीन होते तेव्हा नवऱ्याचा दारू सोडवायला तुम्ही पैसा दिला त्यात तुमचा काहीही स्वार्थ नव्हता माझ्या लेकाला शिकवलं आज तो नोकरीवर तुमच्यामुळे आहे.तो बऱ्याचदा म्हणतो... काम सोड, पण बाई साहेब या घराने मला खूप काही दिले आहे. म्हणून सोडून नाही जावं वाटत तुम्हा सगळ्यांना. अहो बाकी कामावर एक दिवस नाही गेलं किंवा थोड जरी उशिरा गेलं तर ओरडुन ओरडुन जीव नकोसा करून टाकतात. तुम्ही माझ्या वयाचा देखील विचार करता. मला कामवाली आहे म्हणून लहान मोठे सगळं शांता म्हणून हाक मारता पण इथे मला तुम्ही कधी नावाने हाक मारत नाही, आजी सुद्धा नाही. एवढी प्रेमळ माणसं आहेत या घरात."

"दोघांनी एकमेकांकडे बघितलं. शांताबाई काम करायला आत निघून गेल्या.


\"निर्मला...अगं खरचं तुझं कौतुक वाटतं मला. ऑफिसमधून आल्यावर कितीही थकलेली आली तरी प्रेमाने चौकशी करते सगळ्याची. कुणाचं जेवण बाकी आहे का काही त्रास आहे. मात्र मी सांगतो तुलाक्ष दिवस खूप हेक्टिक होता आणि मी  राग राग करतो घरी आलो की. काहीही कारण नसतांना केतकी आणि कधी कधी तुझ्यावर तो राग  निघतो."


" कधी कधी!  महेश कधी कधी नाही रोजच."


" नाही गं.. बाई..काही पण नको बोलू."

" बघ इथे पण मी चुकीची ...तू बरोबर."

" बरं मी चुकीचा बस!!! खुश!!! बट यार मानावं लागेल तुम्हा स्त्रियांना. तुम्हाला कसं काय जमत गं एवढं सगळं. कितीतरी गोष्टी तुम्ही फार सहज हॅण्डल करता आणि कितीही थकलेल्या असल्या तरीही ते दाखवत नाही कधीच."

"अरे संसार आहे तो दोघांनी भांडत बसलं तर तो गाडा कसा पुढे जाईल? आणि खरं तर माझ्या लेकीने माझ्या सारखं व्हावं हीच इच्छा आहे म्हणजे  माझ्या सारखं  सगळ्यांना सोबत घेऊंन चालनारी."

"बरोबर बोलली निर्मला तू आणि संसार म्हटलं की हे सगळं चालायचं संसार ओढून ताणून नाही तर प्रेमाने, समजूतदारपणे करायचा असतो. कधी एकाने रागवलं तर दुसऱ्याने शांत राहायचं भांडण्यात काय आर्थ आहे,सांग ना!"


" अगदी बरोबर पण खरचं मला तुझ्या सारखं व्हायला आवडेल खरचं."

"हो का!  मग आधी चूक मान्य करायला शिक."


"हो...यापुढे नाही विसरणार मी तुझा वाढदिवस ... खरचं."

निर्मला हसत...
"हे दर वर्षी म्हणतो तू.."


"हो पण या वर्षी नक्की नाही विसरणार."

"ताई साहेब माझं झालं आवरून सगळं आता मी जाते आज रविवार आहे म्हणून नाही संध्याकाळी  येणार आहे."


"हो... हो या तुम्ही. "

दुसऱ्या दिवशी सासूबाई आल्या. सासूबाईंनी निर्मला साठी मस्त साडी आणली.

" सूनबाई... हे घे साडी तू मागच्या वेळी बोलली होती ना तुला या रंगाची साडी हवी आहे म्हणून."

" अय्या!!! आई किती मस्त!!...तुमच्या लक्षात राहील होतं."

सासूबाई हसत...

" अगं मी बोलते, चिडते ,रागावते पण तू काहीच बोलत नाही गं...हे कळत नाही का मला.तू खूप चांगली आहेस गं...कधी कधी माझ्याकडुन सुद्धा चुका होतात पण माफी मागायला खूप मोठं मन लागतं जे माझ्याकडे नाही. पण आता पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे ना तुझा त्याच गिफ्ट समज हे."


निर्मलाला खूप आनंद झाला.

" सासूबाई ....खरचं असं नातं असावं ... भांडावं, चीडावं, रागवावं हक्काने मात्र  प्रेमाने एकत्र येऊन  हक्क ही गाजवावा."

" चला आता उतू जाऊ देऊ नका तुमचं प्रेम उशीर होतोय ऑफिसला..."
दोघी हसल्या आणि निर्मला आणि महेश ऑफिसला निघून गेले.

तर सासूबाई आणि केतकीने बॅग आवरायला घेतली.

खरचं खरं नात तर हेच ना जे सकाळी भांडल्यावर संध्याकाळी एकत्र येत आणि खरा संसार तोच जो भांडण झाली तरी अडचणीत, दुःखात साथ देतो.
धन्यवाद!
समाप्त...
©®कल्पना सावळे.


🎭 Series Post

View all