नेहमी चूक माझीच!!!(भाग २)

संसार म्हटलं की भांडणे आलीच पण दरवेळी तीच चुकते का?
" थांबा ताईसाहेब करते मी चहा आल घालून मस्त आणि तुमच्या आवडीचे उडीद वडे पण करणार आहे."

" शांताबाई खरचं कधी कधी वाटते माझ्या आईची  कमी तुम्ही भरून काढत आहात. माझी आई असती तर अशीच काळजी घेतली असती.\"

" ताईसाहेब.... अहो त्या अंगठी चोरीच्या वेळी तुम्ही माझ्या पाठीशी खंबीर उभा होत्या ते कसं विसरेल मी! त्या वेळी तुम्ही नसता तर ह्या सगळ्या लोकांनी मला पोलिसांच्या हवाली  केलं असतं."


"तुम्ही चुकीच्या नव्हता आणि मी माणसं ओळखायला चूक करत नाही ."


तेवढ्यात महेश बाहेर आला..


" खरचं शांता मावशी....निर्मला फार चांगल्या प्रकारे ओळखते म्हणून आमच्या सारखी साधी माणसं जाळ्यात अडकली."


" साहेब काही काय बोलता?...  हिऱ्यासारखी बायको मिळाली तुम्हाला.आता लग्नापासून बघत आहे मी त्यांना. किती अडचणी आल्या  तुमच्या आयुष्य  पण एवढी खंबीर बाई मी नाही बघतली अजून तरी."


" खंबीर ! आणि ती !!! जरा खोकला आला तर किंवा आजारी पडलं की डोळ्यातून पाणी आलच समजा."

" हो तुला फक्त चिडवता येत. मला माहित आहे ना...कुणी काहीही करू दे इथे चूक माझीच असते. दुसरं कुणी चुका करत नाही."


" साहेब लहान तोंडी मोठा घास होईल पण तुम्ही आज जे उभे आहात ना ते केवळ ताई  साहेबांमुळे. मला अजून आठवत आहे नऊ महिन्याच्या गरोदर होत्या त्या आणि  तुमचा अपघात झाला. तेव्हा सगळं किती बरोबर हाताळलं त्यांनी तुम्हाला बघितल्यावर आई साहेब चक्कर येऊन पडल्या..त्यांना उचलून ठेवलं होत त्यांनी. तुमचं ऑपरेशन झालं तेव्हा डॉक्टर  म्हणाले दुसरं कुणी असेल तर बघा तुम्हाला एवढी सहन  नाही होणार ... उगाच त्रास घेऊ नका."

" हो आठवते ना! मी म्हणाले होते, अहो नवरा आहे माझा तो, त्याच्या साठी नाही तर कुणासाठी तर सहन करू मी. तो क्षण आठवलं की अंगावर शहारे येतात माझ्या."

" साहेब  त्यावेळी सर्वजण रक्तासाठी किती फिरले मग कुठे रक्त मिळाले आणि मग कुठे पंधरा दिवसांनी तुम्ही डोळे उघडले तेव्हा रडणं  थांबत नव्हत ताईचं आणि तेवढ्यात त्याच्या पोटात दुखायला लागलं आणि मग केतकी झाली. साधा सव्वा महिना पण आराम नाही केला ताई तुम्ही. नाही तर बायका खाटेच्या खाली पाय नाही ठेवत."

तेवढं बोलून शांताबाई चहा करायला गेल्या.

" खरचं निर्मला खूप काही केलंस माझ्यासाठी."

" हो ना तरीही तुला किंमत नाही माझी."

" अगं तुझी कशी किंमत असेल तू तर अनमोल आहेस माझ्यासाठी."


" ह्मम...फक्त शब्द फेक मस्त जमते तुला."

" आणि प्रेम?"

" चल... आवर पटकन आज जरा किराणा भरायचा आहे. उद्या केतकी आणि आई येणार आहे त्याचं होईल सुरू हे नाही ते नाही."


"बघ त्यांच्या मागे किती बोलतेस आणि त्यांची काळजीपण करतेस म्हणून तू मला आवडतेस बघ."

" नाही तर काय आल्याबरोबर सुरू होतील आणि तुला माहित आहे मला बोललेलं आवडत नाही आणि घरात काहीही होऊ दे, चूक माझीच असते नाही का?"

" चला... घ्या चहा मस्त आल घालून आणला आहे आणि आता  मस्त वडे करते."

पुढे काय होईल बघू पुढच्या भागात.... धन्यवाद!
क्रमशः....
©®कल्पना सावळे

🎭 Series Post

View all