नेहा विक्रम आणि वेताळ आजोबा. भाग१.

माहितीपर कथा...
*नेहा विक्रम आणि वेताळ आजोबा*....

आमच्या विक्रमादित्य सोसायटीत ... मोहन आजोबा राहत.... रिटायर्ड क्लासवन ऑफिसर... मी नेहा यंदा बारावीला........


आमची सोसायटी उच्च मध्यमवर्गिय लोकांची .... त्यामुळे सोसायटी समोर मोठी गार्डन ... ..त्या गार्डन मध्ये मोहन आजोबा रोज सकाळ संध्याकाळ व्यायाम करत.... मी देखिल त्यांच्या सोबत रोज सकाळी जॉगिंगला व संध्याकाळी चालायला जात असे.....मोहन आजोबांचा मुलगा अमेरीकेत नोकरीला होता... व मुलीचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते.... त्यामुळे मोहन आजोबा आणि आणि आजी घरी दोघंच .....मला ते त्यांच्या मुली प्रमाणे वागवतात... आणि मी देखिल त्यांचे घर म्हणजे माझच घर समजते....... कारण त्या घरात मला पुर्ण अधिकार ...

मोहन आजोबा अतिशय हुशार .. ज्ञानी ...एकदम विनोदी आणि हौशी स्वभावाचे.....


माझ बऱ्यापैकी वाचन... माझ ज्ञान म्हणजे त्यांच्या ज्ञानापुढे अगदी शूल्लक...जस हत्ती समोर उंदीर.....पण का कोणास ठाऊक ते माझ्या सेन्स ऑफ हुमर चाहते होते...


आमच्या वयात प्रचंड अंतर तरी आमची दोघांची छानपैकी मैत्री होती....आम्ही दोघांना अरे.. तुरे..करून हाक मारयची ही आमच्या मैत्रीची पाहिली अटच होती.......


आजोबा मला नेहा विक्रम असे लाडाने हाक मारीत..तर मी त्यांना वेताळ आजोबा अशी हाक मारत असे.... आमच्या दोघांची मैत्री म्हणजे साऱ्या सोसायटीत एक चर्चेचा विषय होता......

वेताळ आजोबा थोडेसे धर्मवेडे.. ..मी देवधर्म मानत नाहीँ त्या मुळे देव.- धर्म हा विषय निघाला की, आमची नेहमीच खड़ाजंगी मात्र ही... खडाजंगी फक्त वाद आणि चर्चा पुरती मर्यादित ...म्हणूनच तर आमच्या वयामधे इतकी तफावत असून आमची जिवलग मैत्री........

आज सकाळीच त्यानी जॉगिंग करतांना मला प्रश्न विचारला म्हणाले नेहा -विक्रम तु ज्ञानी आहेस महापंडित आहेस ...तुझ्या पासुन या जगात काहीच लपुन राहिलेले नाहीँ ....मी म्हंटले . बस s बस s s आधी ... प्रश्न काय तो विचार ? कारण मला माहिती होते की आजोबांचा प्रश्न काहीतरी विचित्रच असेल.... ..

आजोबांनी प्रश्न केला
विक्रम!.... शिर्डी चे साईबाबा हे हिंदू होते की मुस्लिम ? ..आता आली का पंचायत? .परत..लगेचच ते म्हणाले बोल! विक्रम बोल!! जवाब दे मुझे ? ?
मी म्हणाले ..वेताळ!...खरं तर असा प्रश्न विचारूच नये कोणी! कारण साईबाबा म्हणजे सर्व धर्म समभाव याच प्रतीक......
*सबका मालिक एक* हेच त्यांचे तत्व होते ...त्यामुळे ते कोणत्या धर्माचे होते.... या प्रश्नाला फारसा अर्थच नाही....तरीही ....साईबाबा हिंदू होते की मुस्लिम याच उतर आहे माझ्या कडे... .बघ तुला पटतय का?.... बघ!.....साईबाबांच्या निधनानंतर जर साईबाबांना दफन केल असेल तर ते मुस्लिम.... आणि जर त्यांच्यावर अग्नि संस्कार केले असतील तर ते हिंदू..... काय वेताळ तुला काय वाटते ? ....वेताळ माझ्याकडे पाहुन जोरजोरात हसू लागला.... व वेगात जॉगिंग करु लागला......

लेखन : चंद्रकांत घाटाळ..