नयनरम्य निसर्ग

नयनरम्य निसर्ग

चित्रकव्य

*नयनरम्य निसर्ग*

शुभ्र पांढरे पांगले ढग
निळ्या नभात नक्षीदार
दऱ्या खोऱ्यातून डोलते
दाट झाडी हिरवीगार.

डोकावती घरे झाडीतून
वाहते नदी नागमोडी,
डोंगर कडे कपारीतून
खट्याळ वारा करी खोडी.

बहरुनी फुलले शिवार
पहाडाच्या पायथ्याला,
नेसला शालू निसर्ग हिरवा
साज निळसर माथ्याला.

दाट हिरव्या वृक्षवेलींचा
निसर्गाला चढला रंग,
नयनरम्य पाहता सौंदर्य
भुलूनी मन हे होई दंग.
--------------------------
सौ वनिता गणेश शिंदे ©®

🎭 Series Post

View all