नयन ला ह्यावेळी दापोलीत सोडल्यावर पहिल्यांदा खूप एकटं एकटं वाटत होत, इकडे अमित - सुमित, सारिका - अस्मिता पुन्हा चांगले मिळून - मिसळून राहू लागतात, मुलं कधीतरी नयन ला आठ - दहा दिवसांनी फोन करत असत, जास्त न बोलता फोन ठेवत असत, आधीच त्यांच्या नजरेत आई चं स्थान तसं फार मोठं नव्हतच त्यात आता सारिका आणि अस्मिता मध्ये भांडण लावून नयन ने अजूनच त्यांच्या मनातलं तीच स्थान कमी केलं.
इकडे, लग्नानंतर एक वर्षांनी अस्मिता गरोदर राहते,सर्व सुरळीत चाललेलं असत मुलांचं, सारिका अस्मिता नयन गेल्यापासून कधीच भांडल्या नाहीत, अस्मिता नऊ महिन्यानी गोंडस मुलाला जन्म देते. नयन ला मुलं कळवतात, पण बारशाचं आमंत्रण देत नाहीत, नयन ला बोलतात - अस्मिता च्या माहेरच्यांनी सीझरियन झाल्यामुळे आणि अस्मिता तशी अजून बरी नसल्याने घरच्या घरीच बारस केलं. जास्त लोकांना बोलावलं नाही, बाळाचं नाव ( पारस ) ठेवलं जातं.
नयन ला खूप वाईट वाटत कि आपल्या नातवाच्या बारशाचं आपल्याला चं मुलांनी सांगितलं पण नाही. अस्मिता बाळ झाल्यावर सहा महिन्यानी पुन्हा ऑफिस ला जाऊ लागते, घरी सारिका च्या मदतीला एक बाई ठेवली जाते कामासाठी. तेजस्वी पण आता बालवाडी मध्ये जाऊ लागलेली असते, त्यामुळे सारिका अस्मिता ला बोलते तू जा ऑफिस ला मी आहे बाळाजवळ. सारिका पारस चं सगळं छान करत असे, आणि कामवाल्या काकीं च्या मदतीने जेवण वैगरे पण पटापट उरकत असे.
इकडे नयन आता थकत चालली होती, आता तीला टीव्ही बघण्याचा पण कंटाळा येऊ लागला होता. तिला एकटी साठी जेवण करायला पण नको वाटे, ती कधीतरी चहा - बिस्कीट खाऊन तशीच झोपून घेत असे. आणि त्यात नयन चं आजूबाजूला कोणाशी चांगलं नसल्यामुळे बोलायला पण कोणीच नसे तिथे. नयन ला आता आपल्या वागण्याचा पच्छाताप होत असतो.
मुलं दर महिन्याला आठवणीने पैसे पाठवत असत, पण दापोलीत जातं मात्र नसत. नयन आता मुलांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असे सतत, मग कधीतरी फोन करून त्यांना एक दिवसासाठी तरी या असं सांगत असे. पैसे हातात होते पण सामान दुकानातुन आणायला नयन ला आता जास्त जमत नसे.
गणपती जवळ येत असतात नयन मुलांना बोलते सर्वांनी या दोन दिवस इकडे नातवंडाना पण मला बघावंसं वाटतय. अमित - सुमित पण सारिका आणि अस्मिता ला बोलतात कि जाऊया दोन दिवस आणि मग सगळेच दोन दिवस दापोलीत जातात, नयन ला पण बरं वाटत, घरं भरलेलं वाटत होत, नयन ला वाटत होत कि मुलं निघताना बोलतील आई तू पण चल आमच्याकडे इथे एकटीच राहू नकोस पण मुलांना नयन बद्दल माया चं उरलेली नसते. त्यामुळे मुलं, सुना कोणीच काहीच बोलत नाही.
सगळीजण दोन दिवसांनी निघून जातात. ह्यावेळी जाताना मुलं सगळा जिन्नस, किराणा घरात भरून जातात. नयन आल्यापासून त्यांना सांगत असते कि मला आता सामान आणायला बाजारात जायला नको वाटत, दम लागतो, नयन ला मनातून वाटत होत कि मुलं मी हे बोलल्यावर बोलतील आई तुला जमत नाही ना इथे तू चल आमच्याकडे पण तसं होत नाही, नयन बोलते तुम्ही मला सर्व तीन - चार महिने पुरेल असं सामान भरून द्या. म्हणून मुलं सगळं भरून जातात.
आता नयन दिवसभर एकटीच विचार करत बसलेली असे, तीला सर्व चं आठवत असे कि माझ्या सासू - सासर्यांना मी कधीच आपलं मानलं नाही, दीर - जावू ह्यांच्याशी पण कधीच पटवून घेतलं नाही. तेव्हा जर मी चांगली वागली असती तर आता निदान दीर - जावं तरी माझ्यासोबत असती. पण तेव्हा मला वाटत असे कि पैसे चं सर्व काही आहे पैसा आहे माझ्याकडे तर सर्वच मला विचारतील, आता पण मुलं पाठवतात तो पैसा आहे पण कोणच नाही दिवस दिवस बोलायला.
नयन रात्र - रात्र पच्छाताप करून, विचार करून रडतं जागी राहात असे, मुलांना फोन केला तरी मुलं नीट बोलत नसतं, आई काळजी घे, काय लागलं तर कळव, असे मोजकेच बोलून फोन ठेवत असत.
नयन ला आताशा आजूबाजूच्या कोणाकडे नातवंड बघितली कि तेजस्वी आणि पारस ची आठवण येत असे. पण मुलांना सांगितलं कि ती बोलत असत कि सुट्टीत येऊ पण येत नसतं मुलांना घेऊन. तीला सगळं आठवत असे आपण मुलांना कसं दूर केलं नोकरांना चं त्यांचं सगळं करायला लावल. त्यांना कधीच प्रेम दिल नाही, रमेश ची पण काळजी केली नाही त्याला फक्त पैसे पाठवणारी मशीन समजलो, मुलं म्हणत असूनही घरचं जेवण खाऊ घातलं नाही. नयन रडून दिवस घालवत होती.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - नयन च्या ह्या रात्र - रात्र विचार करण्याचे आणि उपाशी राहण्याचे तिच्या शरीरावर काय दुष्परिणाम होतात आणि त्यामुळे काय होत ....)
( सौ. सोनल गुरुनाथ शिंदे )
(राहणार - देवरुख - रत्नागिरी )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा