नयन - आणि तिचा गर्व - ( भाग - 12 )

Nayan


      अमित - सुमित पुन्हा पुण्याला निघून जातात, नयन  पुन्हा दापोलीला एकटीच पडते. अमित चं त्याच्या कॉलेज मधल्या  एका मुलीवर प्रेम असत. ( सारिका - नाव तीच ) सारिका चं लग्नाचं वय झाल्यावर तिच्या घरातले  तिच्यासाठी स्थळ शोधू लागतात. तेव्हा सारिका अमित ला बोलते तू माझ्या घरी येऊन माझ्या आई - वडिलांशी बोल, ते तशे  पुढारलेल्या विचारांचे आहेत, तुला नोकरी चांगली आहे, सर्व ठिक आहे मग ते नाही म्हणणार नाहीत.

       अमित दुसऱ्या दिवशी सुमित ला घेऊन सारिका च्या घरी जातो, तिच्या घरचे बोलतात, आता तुम्ही मुलांनी लग्न करायचं ठरवलं आहे मग आम्ही आता आडकाठी करणार नाही. आणि लग्न ठरत.

         पंधरा दिवसांनी साखरपुडा आणि त्या नंतर एक महिन्यांनी लग्न असं सगळं ठरत, अमित आणि सारिका पण खुश होतात. अमित नयन  ला कळवतो तर नयन  बोलते अरे असं सगळं अचानक चं ठरवलंस परस्पर, मला विचारलेस पण नाही, तर अमित बोलतो मी चार दिवसांनी दापोलीला येतोयं तुला साखरपुड्यासाठी न्यायला तेव्हा सगळं सांगतो, नयन मनातून खट्टू होते.

       अमित चार दिवसांनी दापोलीला जातो आणि नयन  ला सगळं सांगतो आणि दुसऱ्या दिवशी तीला घेऊन पुण्याला येतो. नयन  आता मुलांशी बरी वागत असते, घरातलं  काम पडत असत म्हणून थोडी कुरबुरत असते पण मुलं लक्ष देत नाहीत.

       साखरपुडा व्यवस्थित होतो, एक महिन्यानी लग्न असत म्हणून मग मुलं म्हणतात आई तू तयारीला इथेच रहा, नयन मनोमन सुखावते, तीला पण तेच हवं असत. लग्नघर असल्यामुळे काम भरपूर असतात,  अमित एक महिन्यासाठी एक बाई  कामाला ठेवतो, घराची साफसफाई, लग्नाची तयारी नयन  ला एकटीला जमणार नाही म्हणून, नयन ला बरं चं वाटत, नयन  आता मुलं कामावर गेल्यावर त्याला बाई कडून सर्व काम करून घेत असे.

       लग्न छान पार पडत, दुसऱ्या दिवशी पूजा होते, नवीन जोडपं चार दिवस बाहेर  फिरून येत, आणि मग आठ  दिवसांनी अमित - सुमित कामावर जाऊ लागतात, घरात फक्त सारिका आणि नयन  चं उरतात. सारिका हुशार, मनमिळाऊ, आणि कामात चलाख  अशी मुलगी असते, ती दोन चं दिवसात पूर्ण घराचा ताबा घेते, सकाळी लवकर उठून दिराला, नवऱ्याला डब्बा बनवून देत असे, काम पटापट आवरत असे. अमित - सुमित ला पण खूप बरं वाटत, त्यांना पहिल्यांदा कोणीतरी टिफिन बनवून देत होत . दिरा बरोबर पण सारिका छान  हसून - खेळून राहत असते.

     नयन  नुसती बसून तीला हे कर ते कर अशा ऑर्डर सोडत असते, पण ती कधीच उलटून बोलत नसे, हो आई करते बोलून विषय लगेचच संपवत असे. अमित  - सारिका ला विचारत असतो दोन दिवसाआड  कि आई तुला त्रास देत नाही नाही तर ती बोलते नाही त्या दिवसभर बसून टीव्ही बघत असतात. नाहीतर पुस्तकं वैगरे वाचत असतात. मला त्रास देत नाहीत तसा काही. अमित ला पण बरं वाटत. घरात आता सारिका आल्यापासून खेळीमेळीच् वातावरण असत.

       आणि सहा महिन्यांनीच सारिका प्रेग्नेंट राहते, घरात आनंदी आनंद असतो, सर्व ठिक चाललेलं असत, असे करत करत सात महिने निघून जातात, ओटभरणी करून सारिका ला डिलिव्हरी साठी माहेरी पाठवलं जातं, आता मात्र नयन वर सर्व काम पडतात. मुलं बोलतात आई तू आम्हाला टिफिन वैगरे देऊ नकोस,आम्ही जेवू बाहेर दुपारी, पण रात्री चं जेवण तेवढं घरी बनवत  जा, नयन  हो बोलते. नयन संध्याकाळ च्या जेवणाला एकच काहीतरी बनवत असे, पण मुलं काही न बोलता जेवत असत.

       दोन महिन्यानी सारिका एका गोड मुलीला जन्म देते, बाळ अगदी छान, गोर असत. बारा दिवसांनी बाळाचं बारस करण्यात येत. ( तेजस्वी ) नाव ठेवण्यात येत. एक महिन्यानी सारिका बाळाला घेऊन घरी येते.  सारिका आल्यावर पुन्हा नयन  तिला काम सांगायला सुरवात करते, ह्यावेळी मात्र सारिका चिडते  आणि बोलते आई तुम्ही नुसत्या टीव्ही बघता दिवसभर तेजस्वी कडे पण लक्ष देत नाही, मला छोट्या बाळाला घेऊन सर्व काम टाइम मध्ये करायला गडबड होतेय.

     तुम्ही निदान तेजस्वी ला तरी बघत जा. नयन  वेळ मारून नेण्यासाठी हो बोलते, नयन ने स्वतः च्या मुलांना तरी कुठे तेव्हा बघितलं होत त्यावेळी तिच्या हाताखाली नोकर होते ना...मुलांचं सगळं करायला. नयन  टीव्ही बघण्यात चं गुंग असे, मग सारिका वाट बघून अमित ला सांगते, अमित पण नयन  ला ओरडतो आणि बोलतो इथे राहून सारिका चं काम अजून वाढवून ठेवणार असशील तर तू दापोली ला चं जा, नयन  बोलते इथे राहते मी मला आता तुमच्यात बरं वाटतंय.

( पुढच्या भागात आपण सुमित चं लग्न आणि त्या नंतर नयन  चं वागणं बघणार आहोत )....

      

🎭 Series Post

View all