नयन - आणि तिचा गर्व ( भाग - 11 )

Nayan

    

      अमित - सुमित रमेश च्या कष्टाची जाणीव ठेवतात, चांगले शिकतात. अमित ग्रॅज्युएट होतो, तर सुमित इंजिनिअर होतो. दोघं ही पुण्याला चं असतात अजून....पाच वर्ष -  इकडे नयन एकटीच राहत असते. कधी वाटल तर जेवण करत असे, नाहीतर बाहेरून आणून काहीतरी खात असे.

        असेच दिवस जातं असतात. मुलं पुण्याला नोकरीं ला लागतात. सुमित इंजिनिअर असल्यामुळे चांगली नोकरीं लागते त्याला, अमित ला पण काही दिवसांनी नोकरीं लागते, आता मुलं एके ठिकाणी रूम  घेऊन राहत असतात.

       रमेश ला पण खूप बरं वाटत असत, तो मनोमन सुखावतो, देवाचे आभार मानतो, मुलं आता नयन बरोबर जास्त बोलत ही नसतात, सुट्टी ला कधी घरी गेली तर नावाला बोलत असत. पण रमेश बरोबर मुलांचं नातं अजूनच घट्ट  होत, मुलं वडिलांना नेहमी आपली खुशाली कळवत असत.

       मुलं रमेश ला सांगत असतात, बाबा तुम्ही आता आराम करा  आम्ही आहोत ना आता नोकरीला, तुम्ही तिथली नोकरीं सोडून या आता भारतात, रमेश बोलतो अरे बाळांनो माझी रिटायरमेंट ची दोन वर्ष तेवढी बाकी आहेत ती पूर्ण झाली कि मी कायम चा दापोलीत चं येणार आहे, मुलं रमेश ला बोलतात बाबा त्यावेळी जर तुम्ही आम्हाला दुसरीकडे शिकायला पाठवलं नसतं तर आज आम्ही बेरोजगार असतो किंवा कमी शिक्षण घेऊन कुठे तरी नोकरीं च्या शोधात  असतो. आज आम्ही जे काही आहोत ते फक्त तुमच्यामुळे च, तुमच्या एका निर्णयाने आमचं आयुष्य बदललं.

       दोन वर्षांनी रमेश रिटायर्ड होऊन कायम चा दापोलीत येतो, मुलं पण बाबा आलेत म्हणून आठ  दिवसांची सुट्टी टाकून घरीच येतात, रमेश ने थोडी फार  सेविंग केलेली असते, रमेश  मुलांना बोलतो मी माझी सेविंग  इथे घरं चालवण्यासाठी वापरेन आता इथे. तुम्ही पैसे तुमच्या भविष्यासाठी ठेवा. अजून लग्न व्हायची आहेत तुमची... तुमचा पगार घरी इतक्यात देऊ नका, ते पैसे अकाउंट ला ठेवत जा, अडी- अडचणीला असूदेत पैसे.

        नयन  अजूनही तशीच असते, भरपूर माज असलेली, रमेश तीला खूप समजावतो कि मुलांना समजून घे, तुझी पन्नाशी होऊन गेली आहे, आता तरी सुधार, मुलं भविष्यात नाहीतर तुला विचारणार नाहीत, म्हतारपणी हालत होईल तुझी. पण नयन चं ती गुर्मी अतिशय असलेली, तीला वाटत असं काहीच होणार नाही, पैसे आहेत ना, आपल्याकडे मग सगळी आपल्याला विचारतील बरोबर.

         रमेश आणि नयन  दोघं चं दापोलीत राहत असतात, नयन  काहीच नीट जेवण बनवत नसते, पण आताशा रमेश ने तीला बोलणं सोडून दिलेलं असत. तो म्हणत असतो एवढा काळ  जाऊन पण ही सुधारली नाही आता अजून किती आणि काय बोलायचं. अशीच मध्ये दोन वर्ष निघून जातात. आणि रमेश ची तबेत दिवसेंदिवस खालावत चाललेली असते, मुलं सुट्टी ला आल्यावर मग सगळ्या टेस्ट करून घेतात, तर घश्याच्या कॅन्सर चं निदान होत.

       मुलं बोलतात बाबा आम्ही आमची सगळी सेविंग वापरू पण तुम्हाला बरं करू, मुलांचा रमेश  वर खूप जीव असतो, सुरवातीला दोन्ही मुलं पंधरा दिवसांची सुट्टी काढून येतात, चांगल्या डॉक्टर कडे नेवून औषधं वैगरे आणतात, पण रमेश च्या तबेती मध्ये पाहीजे तसा सुधार होत नसतो, घश्याचा कॅन्सर असल्यामुळे जेवण जातं नसतं, घशात फूड पाईप टाकून लिकवीड, जुस असं रमेश ला दिल जातं असत.

       अमित - सुमित  आजारपणासाठी  आपल्याकडची सर्व जमा पुंजी वापरतात, रमेश  ची सेविंग्स असते ती पण  औषधं आणि हॉस्पिटल चा खर्च ह्यात संपून जाते.....पण रमेश ची हालत सुधारण्याऐवजी अजूनच खराब होत जाते. आणि मग वर्षभराने रमेश हे जग सोडून जातो.

        मुलांना खूप वाईट वाटत, मुलं खूप रडतात. मुलं नयन  ला बोलतात आम्ही तुला दर महिन्याला तूझ्या खर्चा पुरते पैसे पाठवत जाऊ...नयन  ला मनातून वाटत असत कि मुलं बोलतील कि आई तू आता आमच्याबरोबर  पुण्यात राहायला चल पण मुलांना आधीच  आई बद्दल माया उरलेली नसते त्यामुळे मुलं रमेश चं कार्य वैगरे करून नयन ला काहीच न विचारता  पुन्हा पुण्याला निघून जातात.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत... अमित - सुमित च्या लग्नाबद्दल... )



🎭 Series Post

View all