नयन - आणि तिचा गर्व ( भाग - 6 )

Nayan

         

           असेच दिवस जातं असतात. अमित - सुमित दोन वर्षाचे होत आलेले असतात, आई -आणि भाऊ अजूनही नयन कडे च असतात. नयन च्या भावाचे मौज - मजा  करणे  चालूच असते, नयन भावाला - बँकेत भरायला दर  महिन्याला काही रक्कम देत असे. रमेश म्हणत असे हे पैसे वेगळे असूदेत तुझ्या अकाउंट ला. तू मुलांना घेऊन राहतेस, लहान मुलं आहेत घरात , अडीअडचणी ला पैसे जास्ती चे असावेत,  ते पैसे नयन दर महिन्याला आपल्या भावाकडे बँकेत भरायला देत असे.

        अमित - सुमित चा दुसरा वाढदिवस जवळ  आलेला असतो, म्हणून ह्या वेळी रमेश जास्त सुट्टी टाकून दापोली ला येणार असतो, ह्यावेळी रमेश लग्नानंतर पहिल्यांदा च एक महिन्याची सुट्टी टाकून दापोलीत येतो.

         आल्यावर दोन च दिवसात रमेश च्या लक्षात येत, कि नयन च्या भावाचे रंग - ढंग काही बरोबर नाहीत, तो कॉलेज मधून पण खूप उशिरा येत असे.  रोज रोज महागातले  कपडे घालत असे. मित्रानं बरोबर संध्याकाळी रोज फिरायला जात असे. रमेश त्याच्या कॉलेज मध्ये जाऊन त्याच्या बद्दल चौकशी करायचं ठरवतो.

      रमेश  दुसऱ्या दिवशी कॉलेज ला जातो, त्याला तिथे समजत कि हा मुलगा रोज कॉलेज ला येतच नाही, मित्रांनबरोबर टवाळक्या करत इथे तिथे फ़िरत राहतो, त्याची अ्टेण्डन्स कॉलेज ला खूप च कमी असते. कॉलेज मध्ये नीट अभ्यास करत नाही. तासिकेला बसतच नाही. कॉलेज च्या कॅन्टीन ला मित्रांबरोबर बसून असतो.

       रमेश, अजूनही त्याने ह्या केलेल्या चौकशी बद्दल काहीच बोलत नाही घरी, दुसऱ्या दिवशी रमेश नयन ला बोलतो मी तुला पाठवतो ते पैसे तू दर महिन्याला बँकेत नीट भरत होतीस ना, तर नयन बोलते ते भाऊ जाऊन भरत होता.

       रमेश मनातल्या मनात बोलतो तरी मला वाटत च होत कि हिच्या भावाकडे एवढे मौज - मजे  साठी पैसे कुठून येतात, रमेश  नयन  कडे तिचं पासबुक मागतो आणि तीला बोलतो कि मी आज एका कामा निम्मित बँकेत जाणार आहे तर तुझं पासबुक पण अपडेट् करून आणतो.

            रमेश बँकेत जातो, नयन च्या पासबुक वर एंट्री करून घेतो, ते बघून तर तो आश्चर्य चकित होतो, खूपच कमी पैसे असतात त्यात आणि दर 8,10 दिवसाआड  पैसे काढले गेले होते त्यातून. रमेश खूप चिडतो. घरी आल्यावर नयन ला बोलतो तू दर महिन्याला मी सांगत होतो तेवढे च पैसे बँकेत ठेवत होतीस ना तर नयन  हो बोलते.

           रमेश  नयन च्या भावाला खूप बडबडतो, रमेश बोलतो माझ्या कष्टाचे पैसे होते ते, मी तिकडे परदेशीं बायको - मुलांपासून दूर राहून पैसे कमावतोय आणि तू ते अशे उधळलेस. नयन  ची आई बोलते - जावई बापू त्याला माफ करा तो परत असं करणार नाही, पण ह्यावेळी रमेश कोणाचं ऐकत नाही आणि सरळ बोलतो, तुम्ही दोघं ही माय - लेक आताच्या आता माझ्या घरातून निघून जा.

       नयन बोलते - अहो माफ करा त्याला पण रमेश कोणाचं हि ऐकून घेत नाही सरळ बोलतो सामान भरायचं, आणि निघायचं इथून......... नयन ची आई आणि भाऊ निघून जातात. मुलांचा वाढदिवस जवळ  आलेला असतो. रमेश त्याच्या आई - वडिलांना बोलावतो त्यासाठी दोन दिवस, दादा - वाहिनी ला पण सांगतो, पण वाहिनी सरळ बोलते, कि आई - बाबा येतील पण मी येणार नाही मला ते नयन च वागणं पटत नाही. 

       मुलांचा वाढदिवस थाटात साजरा करण्यात येतो,  आई - वडिल वाढदिवसाच्या दुसऱ्या च दिवशी सकाळीच निघून जातात आणि त्यानंतर आठ  दिवसांनी रमेश पण पुन्हा त्याच्या कामाच्या ठिकाणी निघून जातो. आता घरात चार नोकर (नयन आणि अमित - सुमित )  एवढीच माणसं उरतात.

 ( पुढच्या भागात आपण बघणार आहोत कि नयन मुलांना वाढवण्यात काय काय चुका  करते ते )......

         


            

🎭 Series Post

View all