नयन - आणि तिचा गर्व ( भाग - 4 )

Nayan

      

         नयन जोरजोरात रडून खूप कांगावा करते, सारखी रडून रडून नवऱ्याला सांगत असते, सासूबाई खोटं बोलतायत, ह्या दोघी ( जावं आणि सासूबाई ) मिळून मला त्रास देतात, मी काही किचन मध्ये आणायला गेली कि ओरडतात मला. सासू - सासरे, आणि दीर - जावं तर तिचा तो गोंधळ बघूनच अवाक होतात. सासू आणि जावं मध्ये बोलतात कि अरे ( रमेश - नयन  चा नवरा ) ही खोटं बोलतेय.

      पण रमेश च्या डोळ्यावर तर नयन च्या रूपाची, प्रेमाची धुंदी चढली होती, तो बोलायला लागला, ती रडून सांगतेय म्हणजे खरं आहे हे, तो नयन  ची बाजू घेत बोलू लागला. नयन  कायम चं नवऱ्याशी गोडी - गुलाबीने राहत असे, लाजून, अशी शांत राहत असे, त्यामुळे रमेश ला पण वाटले ही खरं बोलतेय.

       खूप जोरात भांडण होत -  मग ह्यातून तोडगा म्हणून मग रमेश बोलतो कि तुझ्यासाठी दोन नोकर वेगळेच देतो, त्यांना तुझी सर्व काम सांगत जा. जावं खूप रागावते.आणि निघून जाते तिच्या खोलीत, सासू - सासरे पण आपला मुलगा आपलं काहीच खरं मानत नाही अस समजून गप्प बसतात. दोन दिवस घरात शांततेत जातात आणि मग नयन चा नवरा दहा दिवसांनी पुन्हा नोकरीच्या ठिकाणी निघायचा दिवस येतो.

         निघायच्या आदल्या दिवशी रमेश -  नयन ला सांगतो कि मला पैश्याची कमी नाही, तुझ्या साठी दर महिन्याला मी ह्यापुढे वेगळे  मनीऑर्डर पाठवत जाईन, तुला काही खायला किंवा काही वस्तू घ्यायच्या असतील तर तू नोकरांना सांगून आणतं जा किंवा तू जाऊन घेत जा. नयन  तर मनातून अजूनच खुश होते, तीला वाटत ह्या सगळ्या खोटं बोलण्याचा उपयोग तरी झाला.

      घरी बसल्या बसल्या माझ्यासाठी पैसे पाठवणार हे ऐकून -  नयन अजूनच फोफावली, रमेश  पैसे पाठवू लागला दर महिन्याला , मग नयन - रोज रोज शॉपिंग ला काय जाऊ लागली, वेगवेगळा नाश्ता, जेवन नोकरांना करायला सांगू लागली. काजू - बदाम चे डब्बे आपल्यासाठी वेगळे भरू लागली.

        नयन अगदी आरामात राहू लागली, जावेला हे सगळंबघून खूप राग येत असे, मग तिने तिच्या नवऱ्याच्या पाठी लागून  त्याच्या सरकारी नोकरीची दुसऱ्या शहरात बदली करायला सांगितली दोन महिन्यात बदली झाली आणि जावं आणि दीर दुसरीकडे राहायला गेले. आता सासू - सासरे, आणि नयन एवढीच माणसं घरात उरली होती. नयन  ला वाटल सासू सासरे जातील दि्रांबरोबर त्यांच्या ठिकाणी, पण सासू सरळ बोलली दिराला कि आम्ही येणार नाही.

      नयन  च्या मनात  चालू होत कि सगळेच गेले कि मी ह्या सगळ्या बंगल्याची मालकीण होणार आणि अजून दोन नोकर दिमतीला ठेवून त्यांच्या कडून सेवा करून घेणार. पण सासू - सासरे गेले नाहीत. नयन  च्या हातात आता पैसा  चांगलाच खूळ खुळत असे. त्यामुळे तिने अजूनच सासू - सासर्यांना त्रास द्यायला सुरवात केली. सर्व नोकरांना भरपूर पैसे देऊन आपल्या बाजूने वळवून घेतले. आणि सासू - सासर्यांना रोज त्रास देऊ लागली. नोकरांना सांगून त्यांच्यासाठी साधं स जेवन करायला सांगू लागली. आणि नयन साठी पंच पकवान्न बनू लागली. सासू बिचारी साधी होती. ती देवाला चं कोसे आणि म्हणे कुठल्या जन्माचे हे पाप फेडायला लावतो आहेस देवा.

       सासू ने रमेशला कळवले तर  तो नयन च्या चं बाजूने होता, त्याने नयन चं ऐकून सांगितलं कि वेगळं कर मग जेवण, नयनच आणि तुमचं, खालच्या किचन मध्ये आई - वडिलांचे जेवण करुदेत, आणि वरती नोकरांना तुझ्यासाठी करायला सांगतो. नयन  ने नोकरांना सांगून ठेवले कि सर्वात आधी माझी काम करायची मग त्यांची. सासू - सासरे बिचारे  दिवस दिवस टीप गाळू लागले. 

         आणि मग सहा महिन्यात मोठ्या मुलाकडे निघून गेले. नयन ची आता मज्जा चं झाली, तीला तर काय करू काय नको असं झाले होते, ती स्वतः ला आता ह्या सगळ्या इस्टेटी ची महाराणी समजू लागली. 

        सहा महिन्यांनी मग नवरा पुन्हा येतो, नयन  त्याच्याशी अशी वागत असे कि मी त्यातली नाहीच. रमेश ला आई - वडिल, भाऊ - वाहिनी घरात नाहीत हे बघून वाईट वाटत असते. पण तो नयन च्या प्रेमाच्या पूर्ण आहारी गेलेला असतो. नयन  त्याच्याबरोबर छान  वागत असते. आणि नयन ला दिवस जातात. नयन - रमेश  ला बोलतें कि मी माझ्या आई कडे सातव्या महिन्यात जाण्यापेक्षा मी आई ला इथे बोलवून घेते. नाहीतरी इथे नोकर - चाकर आहेत.

        ( पुढच्या भागात आपण बघणार आहोत नयन च्या गरोदरपणात ती - अजून काय काय नाटक करते ते )

🎭 Series Post

View all