नयन - आणि तिचा गर्व ( भाग - 3 )

Nayan

  

        नयन च्या लग्नाची पूजा होते, आणि दुसऱ्या दिवशी आई - वडिल आणि आलेली सर्व पाहुणेमंडळी मुंबईला जायला निघतात. नयन च्या आई - वडिलांचे डोळे सारखे पाण्याने भरून येत असतात. नयन च्या बहिण आणि भावाला पण वाईट वाटत असत. पण नयन च्या डोळ्यात एक टिपूस नसतो पाण्याचा, नयन  अगदी खुश असते. नयन तिच्याच धुंदीत असते. नयन  ला त्या सगळ्या वातावरणाची भूल पडलेली असते.

       नयन च्या डोक्यात वेगळंच चाललेलं असत, मी उदया पासून सर्व नोकरांना ऑर्डर सोडणार आणि मी इथे बेडरूम मध्ये बसून आरामात मासिक वाचणार. असं सर्व तिचं मनात चाललेलं असत. माहेरची सर्व माणसं  निघतात, आई नयन ला सांगत असते, नीट रहा, सर्वांशी मिळून मिसळून वाग, वडिल पण बोलतात नयन नीट रहा. नयन हा हा बोलून वेळ मारून नेत असते.

       नयन चा नवरा पण खूप प्रेमळ असतो, तॊ सर्वांना बोलतो तुम्ही काहीच काळजी करून नका. नयन चा नवरा 15 दिवसांनी पुन्हा त्या च्या नोकरीं च्या ठिकाणी जाणार असतो. म्हणून मग जोडप्याला कोल्हापूर ला दोन दिवसासाठी देव दर्शन ला पाठवल जातं. नयन  तर ऐकून चं खुश  होते, चांगल्या मोठ्या हॉटेल मध्ये त्यांची उतरण्याची व्यवस्था केलेली असते. नयन पोचल्यावर हॉटेल बघून चं खुश होते, फ्रेश झाल्यावर जोडपं देव - दर्शन करून येत, मग एक दिवस अजून कोल्हापूर फिरून मग घरी दापोली ला येतात दोघं.

               नयन ला पहिल्या दिवशी तिची सासू स्वयंपाक घरात काहीतरी गोड कर असं सांगते. नयन  सर्वांसाठी शिरा करतें असं म्हणते, शिरा करण्यासाठी सासू  ( साहित्य ) आणून देते, नयन त्यात दिलेले सुका मेवा चं वेगळं ताट बघून चं म्हणते ( एवढे - काजू - बदाम - मनुके ) सगळेच घालायचे का ह्या शिऱ्यात, जावं हो बोलते. नयन जावेशी पन नीट वागत नसते. 

      नयन शिरा करून सर्वांना आणून देते आणि नवरा  चव घेतल्यावर पटकन बोलतो अग गोड कमी आहे, आणि एवढ्याच शब्दाने नयन  त्याच्याकडे लगेचच रागाने बघते, सगळे तिच्याकडे बघतच राहतात, तिच्या लक्षात आल्यावर ती पटकन बोलतें, हो का पहिल्यांदा चं एवढ्या माणसांसाठी केला आहे ना, त्यामुळे अंदाज चुकला असेल. नयन चा स्वभाव जावे च्या लक्षात येत होता पण ती नवीन चं आहे होत असं तीला वाटत असत.

       नयन  चा नवरा अतिशय चांगला माणूस होता. तॊ नयन च्या त्या गोर्या गोमट्या रूपावर तर खूप चं भाळला होता, नयन  स्वयंपाक घरात जायला चं बघत नसे, तिचं म्हणणं असे, नोकर आहेत ना......करतायत ना सर्व मग कशाला तिथे बघायला जायचं, तिच्या सासूने तिच्या नवऱ्याला पण सांगून बघितलं पण नयन च्या नवऱ्याचं म्हणणं असे कि ती नवीन आहे, रूळली कि येईल स्वतः चं किचन मध्ये.

        नयन नुसती दिवसभर टी व्ही तरी बघत असे किंवा काहीतरी मासिक, नाहीतर वर्तमानपत्र घेऊन वाचत असे. नयन ला त्या सगळ्या परिस्थिती चा माज चढला होता. नयन  नोकरांना तर खूप चं अगदी कमी प्रतीच  लेखत असे.

               ती नवऱ्याशी मात्र अगदी गोडी गुलाबीने राहत असे, बाकीच्या घरातल्या माणसांशी जास्त बोलत सुद्धा नसे, नवरा जाण्याचा दिवस उजाडला. आता गेल्यानंतर तॊ डायरेक्ट तीन महिन्यांनी येणार होता.

         नयन चा नवरा तीला तू हळू हळू स्वयंपाक घरात जातं जा, सर्वांमध्ये बसत जा, वाहिनीशी नीट बोलत जा असं सर्व सांगून निघाला. पण नयन चं ती कोणाचं ऐकणार थोडी चं होती. नयन  चं अजून चं फावलं, ती नवरा गेल्यावर तर अजूनच नाटक  करू लागली, नोकरांना नुसते बेडरूम मधून उपदेश करू लागली.

       नवरा बाहेर गावी असल्यामुळे घरात काजू, बदाम, भरलेले असत सतत, नयन तें आणून आत बसून खात असे. सासू ला खूप वाटे कि गरीब घरची मुलगी म्हणून आपण सून करून आणली पण ही अशी का वागते.    नयन ची सासू - सासर्यांना पण बोलत असे कि आपण हिच्या घरी कळवू या काय. पण सासरे बोलत असत असूदेत गं नवीन आहे पोर, तीला एवढ्या मोठ्या घराची, माणसांची सवय नाही आहे.

       सासू ला खूप वेळा वाटे कि मुलाला बोलावं कि तुझ्या बायकोला समजावं पण तीला वाटे तो एकतर बाहेरगावी एकटाच असतो त्याला तिकडे टेन्शन का द्या. बघता बघता तीन महिने होत आले नयन  चा नवरा येण्याची वेळ होत आली, तेव्हाच सासू ने ठरवलं कि ह्या वेळी आला कि त्याला सांगूयाच कि हिला ओरड......

         नवरा आला आणि दोन दिवसांनी सासू ने नयन  आणि तिच्या नवऱ्याला समोर बसवून हे सगळं तिच्या नवऱ्याला सांगितलं, तर नयन  उलट चं फिरली, वेगळं चं काहीतरी बोलू लागली कि सासू आणि जावं मी गरीब घरची ना - म्हणून माझा छळ करतात,  घालून पाडून बोलतात. म्हणून मी त्यांच्यात जात नाही असं.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत कि नयन च्या नवऱ्याची ह्या सर्व गोष्टींवर रिऍकशन काय असेल तें )

( सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ) ( देवरुख - रत्नागिरी )


🎭 Series Post

View all