दिसते मजला सुखचित्र नवे....

नवे स्वप्नं मिळालेल्या गृहिणीची गोष्ट
॥ गण गण गणात बोते ॥

गोष्ट छोटी डोंगराऐवढी

विषय : नवे स्वप्न नवी आशा....



, "तुम्हाला म्हणून सांगते दादा,

माझे वडील दवाखान्यात शेवटच्या घटका मोजत होते. सासूबाईच्या आधीआम्हला जेवायला वाढ आणि दवाखान्यात या आदेशामुळे माझीआणि माझ्या बाबांची शेवटची भेट झाली नाही बघा.
रसिका शेजारच्या बाकावर बसलेल्या एका मनुष्याला सांगत होती. तिच्या मुलाला स्वरुपला शहरातील एका नामवंत आयुर्वेदिक चिकीत्सालयात आली होती.
रिसेप्शन वर असणाऱ्या दादांनी निचे नकार नाव दिला होता. त्यांचा - नियमाप्रमाणे २०. पेशंटची नावे नोंदवली गेली होती.
आणि इतरांना डॉक्टर आज तपासू शकणार नव्हते.
ते रिसेप्शनिस्ट विनंतीपूर्वक रसिकाला सांगत होते कि. आज तुम्ही डॉक्टरांना भेटू शकणार नाही.
स्वभावाने चिडचिडी, तापट असणारी रसिका आपला हेका सोडायला तयार नव्हती. त्यांच्यामधील संवादात न राहवून तिथे डॉक्टरांना भेटण्यासाठी आलेल्या सुरेशने भाग घेतला आणि म्हणाला

मॅडम तर कधीकधी नाही होत मनासारखं बेटर लक नेक्स्ट टाईम. झालं... रसिकाला तर आता आयतं कोलितच सापडलं होतं. आपली "दुःख भरी कहानी" ऐकवायला. स्वरूपला आता जाणीव झाली कि आईला आता परत त्रागा एकदा त्याच त्या नकारात्मक आपण किती भोगलेलं आहे आईला "हे चर्चा करायला गा-हाणे ऐकण्यासाठी एका श्रोता मिळाला त्याने आपसुकच काढता पाय घेतला आणि रसिकांचं गु-हाळ सुरू झालं. सासू किती वाईट आहे, किती अन्याय करते, नवरादेखील मनासारखा वागत नाही. सगळं कसं हिलाच करावं लागतं.
जगातील सर्वात जास्त अन्यायग्रस्त स्त्री आपल्या समोर बसल्याचा भास सुरेश ला झाला. रासिका तर अगदी डोळ्यात आसवांचा महापूर आणून आपली. कर्मकहाणी सांगत होती.
गृहीणींनीप्रमाणे रसिका उच्चशिक्षित होती. परंतु तीला सासरच्या मंडळींनी नौकरी करू दिली नाही -ती सल,आपल्या स्वप्नांना घालावी लागलेली मुरड सर्वाच्या बाबतीत तिच्या मनात असलेला कडवटपण या सगळ्यांचं ओझं घेऊन रसिका जगत होती. तिच्या या सततच्या त्राग्यामुळे, चिडचिडमुळे घरातील मंडळींनादेखील तिचा सहवास नकोसा वाटायचा आणि तिच्या वाटायचं मैत्रीणींनादेखील हे सगळं नकोस वाटत होतं.

पण आज कदाचित रसिकाच्या भविष्यात काहीतरी वेगळं लिहीलेलं असावं कारण रसिका ज्या अनोळखी व्यक्तीसोबत आपल्या भावना व्यक्त करत होती; ते व शहरातील एक नामवंत समुपदेशक सुरेश पटवर्धन होते त्यांनी आजपर्यंत रसि कासारख्या नैराश्येच्या गर्तेत चाललेल्या अनेक गृहिणींना जगण्याची नवी आशा नवी उमेद दिली होती. त्यांनी आज रसिकाला ठरविले. नवे स्वप्न नवी आशा देण्याचे....

पटवर्धन यांनी रसिकाला विचारले, कि. ज्यावेळी तुमची सासू सर्वांसाठी जेवण वाढ म्हणाली त्यावेळी तुम्हालाही जेवायला सांगीतले होते का ?\" आणि रसीकाला आठवलं कि, ती मागील दोन दिवसान वडीलांच्या काळजीपोटी अन्नाचग कण घेतला नव्हता सासूबाई तिलाही आणि आता रागे भरून जेवण्यास सांगत होत्या. या क्षणी रसिकाला त्यांच्या त्या वेळेच्या रागामागील खरे कारण कळले चुकीचा निष्कर्ष काढला आणि आपण किती याबद्दल ओशाळल्यासारखे झाले. असेच तिच्या बाबतीत घडलेल्या प्रत्येक घटनेमधील सकारात्मकतेची करून जाणीव पटवर्धन यांनी तिला दिली
विचार बदला आयुष्य आपोआप बदलेल हा मंत्रच तिला मिळाला होता.कावीळ झालेल्या मनुष्याला सगळीकडे पिवळेच दिसते, तसेच रसिकाला सुद्धा प्रत्येक बाबतीत नकारात्मकता दिसत होती. पण आज पटवर्धन यांच्या संवादामुळे तिचा हरवलेला आनंद परत मिळाला होता . जगण्याकडे बघण्याची नवी दृष्टी

तिला मिळाली होती मानून सुरेश पटवर्धन यांचे आभार आणि रिसेप्शन काउंटरवरील दादांचीमाफी मागून

रसिका तिचे आवडते कधीकाळचे आवडते गीत...

"आज मैं उपर आसमां निचे

आज मैं आगे जमाना हैं पिछे"

गुणगुणत बाहेर पडली.

स्वरूप मात्र आपल्या माऊलीतील झालेल्या बदलाच्या धक्क्यातून सावरत नव्हता....

गितांजली सचिन