नववर्षाच्या उंबरठ्यावर.. ( कविता )

Navvarshachya umbarthyavar

नववर्षाच्या उंबरठ्यावर  पहाट आली सजून
नवी ध्येय, नवी स्वप्न ,उराशी आली धरून
        टीमटीमत्या चांदण्यानी
         प्रकाशमान झाले जग
         सर्वांना आनंद मिळो 
        ईश्वरचरणी करते नमन
       नव्या दिशा, नवीन रस्ते
      तरुणांच्या मनात असते
घेतली शपथ उंच भरारी घेण्याची
      क्षितीजाला पार करण्याची
     मनात इच्छा आहे
    हे जग बदलवण्याची
    नववर्षाच्या उंबरठ्यावर
नवीन वर्षाच स्वागत करूया
जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया
सरला तो वर्ष, गेला तो काळ
नवा आनंद घेऊन आला नवा हा काळ
येणाऱ्या या नवीन वर्षात
नव्या उमेदीने ऋणानुबंध जपुया
नवीन वर्षांचे आनंदाने स्वागत करूया

©®ऋतुजा वैरागडकर