Feb 24, 2024
अलक

तिची नवरात्र

Read Later
तिची नवरात्र

१. घटस्थापनेची तयारी करताना देवघराची स्वच्छता करता करता तिनं ठरवलं ,यावेळी थोडी मनाची मरगळ ही झटकू या आणि सगळ्यांना नात्यांना नव्याने जगुया.२. देवीची अखंड ज्योत प्रज्वलित करताकरता तिच्या मनान ठरवलं शहरातल्या "फूटपाथ स्कूल ला" आठवड्यातून किमान तीन दिवस तरी जाऊन शिकवू या आणि गरीब मुलांच्या घरातही ज्ञानाचा दिवा लावूया.३. देवीची खणानारळाने ओटी भरताना ती आता तिच्या घरचा कचरा उचलणाऱ्या "सखूची", तिच्या बाळाला सांभाळणाऱ्या "मंदाची", आणि तिला घरकामात मदत करणाऱ्या "मावशींची" पण ओटी भरणार आहे.४. देवीजवळ रोज सप्तशतीचे पाठ वाचण्या बरोबरच ती सावित्रीबाई फुले, कॅप्टन लक्ष्मी, झाशीची राणी, राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे चरित्रही वाचणार आहे.५. यावर्षीच्या नवरात्रात ती कन्या भोजन तर करणारच आहे पण त्या सोबतच शेजारच्या गरीब वस्तीतल्या गरीब , गरजू मुलींना शैक्षणिक साहित्य ही भेटवस्तू म्हणून देणार आहे.६. तिच्या घरातल्या वृद्ध सासू-सासर्‍यांची काळजी तर ती नेहमीच घेते , आणि घेणार ही आहे, पण या नवरात्रात तीनं महिन्यातून एकदा तरी जवळच्या वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या आजी-आजोबांसोबत थोडा वेळ घालवून, त्यांच्याशी गप्पा मारण्याचा  आणि त्यांना त्यांच्या आवडीची पुस्तकही वाचून दाखवण्याचा तिचा मानस आहे.७. नवरात्रात रोज देवी स्तोत्र, देवीची आरती आणि जोगवा म्हणताना आता ती इंग्रजीचा ही सराव करणार आहे शिवाय कॉम्प्युटर आणि इंटरनेट ही हट्टाने शिकणार आहे.८. या नवरात्रात तिचा संकल्प आहे की, देवीला पुरणावरणाचा नैवेद्य करतानाच घरातल्या आबालवृद्धांच्या सकस आहार आकडेही अधिक लक्ष द्यायचं याशिवाय, अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून तिच्या मैत्रिणींना ती त्या संबंधात सांगणार ही आहे.९. या नवरात्रात देवी चे होम-हवन करताना ती तिच्या चिंता , काळज्या, अकारण वाटणारी भीती आणि भय-व्याकुळताही ती त्या  पवित्र अग्निकुंडात टाकून, रोज थोडा वेळ तरी ध्यान, योगासने आणि व्यायाम करण्याचा तिने संकल्प केला आहे.

(मंडळी माझं लिखाण जर आपल्याला आवडत असेल तर मला फॉलो करा आणि माझ्या लिखाणावर आपले मतही प्रदर्शित करा)


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//