Dec 01, 2023
नारीवादी

नवरात्र उत्सव

Read Later
नवरात्र उत्सव


या देवी सर्व भूतेषु शक्ती रुपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।


हिंदू धर्मात नवरात्र हा खुप महत्त्वाचा उत्सव ! वर्षातून दोनदा नवरात्र उत्सव असतो.चैत्र नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी पर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची आराधना करतात. शरद ऋतुच्या प्रारंभी येणारा नवरात्र म्हणजे शारदीय नवरात्र.
आश्विन महिन्यात शुद्ध प्रतिपदेला घटामध्ये देवीची स्थापना ,रोज फुलांची माळ,अखंड नंदादीप प्रज्वलन करून मनोभावे देवीची पूजा करणे म्हणजेचं घटस्थापना किंवा शारदीय नवरात्रोत्सव !
घटस्थापना केल्यानंतर पुढील नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांचे पूजन होते.महिषासुरमर्दिनी च्या शक्ती रूपाची पूजा केली जाते.
नवरात्र म्हणजे आदिशक्ती देवीचा जागर!
सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तीचे दैवतीकरण होऊन नवीन शक्तीरुपी मुर्ती ला देवी नाव मिळाले. देवीला आदिमाया, आदिशक्ती, जगदंबा म्हणून गौरविले.
देवीची दोन रूपे असतात. सौम्य रूपात उमा,गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी तर उग्र रूपात दुर्गा, काळी,चंडी,भैरवी, चामुंडा असते.
शैलपुत्री,ब्रम्हचारिणी,चंद्रघंटा,कुष्मांडी,स्कंदमाता,कात्यायनी, कालरात्री,महागौरी,सिद्धीदात्री.
अशा नऊ रूपे देवीची आहेत.
नवरात्रात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांची पूजा केली जाते.
नऊ दिवसांत प्रत्येक जण आपल्या परीने देवीची सेवा करीत असतो. उपवास,सप्तशतीचे पाठ, जप ,देवीदर्शन करतात.
सार्वजनिक मंडळ देवीची मूर्ती बसवून पुजा,आरती,होम,महाप्रसाद याबरोबरच गरबा,दांडिया यांचे आयोजन करतात.काही ठिकाणी स्त्रिया भोंडला करतात. देवीची गाणी,भजन,आरती यातून देवीला प्रसन्न करतात. काही ठिकाणी देवीचा जोगवा मागितला जातो तर काही ठिकाणी देवीच्या नावाचा गोंधळ केला जातो.
नऊ दिवस रोज देवीला दिवसाप्रमाणे ठरलेल्या रंगाची साडी परिधान केली जाते.त्यामुळे आता स्त्रिया ही त्या दिवशी त्या रंगाची साडी नेसतात .
नवमीला महानवमी म्हणतात ,या दिवशी कुमारी पूजन केले जाते.
दहाव्या दिवशी विजयादशमी अर्थात दसरा हा सण साजरा केला जातो.
नवरात्रीत देवी ला पूजले जाते.प्रत्येक स्त्री ही सुद्धा देवीचे एक रूप असते.म्हणून देवीरूपी स्त्री ला देखील महत्त्वाचे स्थान आहे.घरोघरी जेव्हा प्रत्येक स्त्री आनंदी, समाधानी असेल तेव्हा खऱ्या अर्थाने देवीची पुजा करण्याचे फळ मिळेल.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//