नवीन वर्ष,नवीन वर्ष, नवीन वर्ष !
या नेहमीच येणाऱ्या वर्षाचे वेध दोन चार दिवस आधीच लागायला सुरुवात होते. सगळे जण सजग होऊन बसतात. काहीजण काळाच्या पुढे धावणारे असतात. नवीन वर्षाच्या दिवशी हजारो मेसेज येण्याची शक्यता असते, त्यात आपण त्यांना विसरण्याची शक्यता असते, म्हणून ते दोन तीन दिवस आधीच शुभेच्छा पाठवून देतात. काहीजण पश्चात्तापदग्ध होऊन त्यांच्या कडून कोणी जाणता-अजाणता दुखावलं गेलं असल्यास माफी मागून, उदार मनाने क्षमा मागून, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. काही कवितात देतात, काही गद्यात देतात , तर काही चित्रमय शुभेच्छा देतात. काहीजण आपल्याला ज्ञानाच्या दोन गोष्टी सुनावून शुभेच्छा देतात, काहीजण संपूर्ण कुटुंबा तर्फे शुभेच्छा देतात. या व्यतिरिक्त कॉपी पेस्ट करून कर्तव्य पार पाडण्याऱ्यांचा एक वेगळा वर्ग असतो. असा हा नवीन वर्षाचा एक पारंपरिक रिवाज असतो. मला तर वाटतं जगात ज्याला कोणाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा आल्या नसतील अशा व्यक्तीची गिनीज बुकात नोंद करायला हवी.

नव वर्ष म्हणजे अनेक गोष्टींची सुरुवात असते.
एक म्हणजे पार्टीची व्यवस्था करायची असते. मग बऱ्याचश्या अपारंपरिक गोष्टी असतात. त्या पाळाव्याच लागतात. हा एक (अ)सांस्कृतिक प्रोग्राम असतो. आता यालाही काही सनातनी आणि संस्कृतीचे रक्षक असण्याची जबाबदारी असणारे विरोध करतात. पण ते करणाऱ्यांची ही पण एक संस्कृतीच बनली आहे , हे ते विसरून जातात. आता मनात असूनही हिम्मत नसल्याने त्यांच्यात सामील न होणारे बरेच लोक असतात. ते देखील सहकुटुंब हा दिवस साजरा करतात. टीव्ही वरचे कार्यक्रम बघत बरोबर बाराच्या ठोक्याला धडाधड फटाके फोडतात आणि स्वतःच्या बायको सोबत गोड धोड खातात आणि यांचं नवीन वर्ष सुरु होतं.

आता या सगळ्या लोकांमध्ये एक फार बुद्धिजीवी, प्रत्येक क्षणाचा विचार करणारी. जीवनाचं साफल्य करणारी एक जमात असते. ती येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा उपयोग करून जीवन सफल करण्याचं ठरवते.
अशा लोकांमध्ये संकल्प करणारे लोक येतात. संकल्पा मध्ये बरेच प्रकार येतात. त्यात कोणी वाईट व्यसन सोडायचा संकल्प करतो तर कोणी काही ठरवतो तर कोणी काही. जेणेकरून मनुष्य जन्माची इतीकर्तव्यता सफल व्हावी.

म्हणून मी पण या वर्षी संकल्प करायचा ठरवलं. संकल्प करणं खूप सोपं असतं पण शेवट पर्यंत तडीस नेणं फार अवघड असतं हे मला आतापर्यंतच्या अनुभवावरून चांगलंच समजलं होतं. म्हणून मी अगदी विचार पूर्वक संकल्प करायचं आणि शेवट पर्यंत तडीस नेण्याच ठरवलं. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला जमणारच नाही त्या उगाच आव आणून ठरवायच्या आणि उगाचच स्वतःच हसं करून घ्यायचं असं व्हायला नको म्हणून मी ठरवलं, की या वर्षीचा संकल्प करायचा तो म्हणजे स्वावलंबन.
स्वावलंबन म्हणजे काय हे माझ्या पेक्षा तुम्ही लोक जास्त चांगल्या प्रकारे जाणता. स्वावलंबन म्हणजे स्वतःची कामं स्वतः करायची. त्या साठी कोणावर अवलंबुन राहायचं नाही.
येणाऱ्या या वर्षात, अगदी काहीही झालं तरी सकाळी उठून दात घासणे, तोंड धुणे, अंघोळ करणे, कपडे घालणे, स्वतः फिरायला जाणे वगैरे गोष्टी मी अगदी जातीने करणार आहे. त्या साठी कोणाचीही मदत कोणत्याही परिस्थितीत घेणारं नाही ही अगदी काळ्या दगडावरची रेष आहे.
आता एकदम आतली गोष्ट सांगतो. काय असतं ना एखादं व्यसन एकदम बंद केलं की त्याचे दुष्परिणाम शरीरावर आणि मनावर लगेच दिसायला लागतात. म्हणून डॉक्टर देखील कोणतंही व्यसन हळूहळू कमी करायचा सल्ला देतात. आता तुम्ही म्हणाल मला काय व्यसन आहे. तर मला प्रेक्षणीय वस्तू बघण्याचं व्यसन आहे. म्हणजे थोडक्यात काय तर मी सौंदर्याचा पुजारी आहे. एकदा असाच मी एका सुंदर वस्तू कडे मान मोडेपर्यंत वळून वळून बघत असतांना एका म्हशीवर जाऊन आदळलो होतो. म्हणून मी या वर्षी दिवसातून फक्त दहाच वस्तूंकडे बघणार आहे. नंतर हळूहळू संख्या कमी करत येणार आहे. यांत बायकोला धरायचे की सोडून द्यायचे एव्हढाच तात्विक भेद आहे.
आता ही गोष्ट मी कोणतीही नशा पाणी न करता आणि कोणाच्याही दबावा खाली न येता लिहून देत आहे. प्राणपणाने मी वर्षभर या गोष्टीचं पालन करीन.
तुम्ही देखील असाच झेपेल असा संकल्प करा आणि आपले आयुष्य सफल बनवा. माणसाचा जन्म हा काही पुन्हा पुन्हा मिळत नाही. आणि आलेले वर्ष देखील परत मिळतं नाही. म्हणून संकल्प करा आणि सुखी राहा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा