गोष्ट छोटी डोंगराएवढी विषय:- नवी स्वप्ने नवी आशा . शिर्षक:- नवी स्वप्ने नवी आशा नवी संधी.... येणारे नवीन वर्षे अनेक नव्या आशा, नवीन संधी घेऊन येतं. पण त्या संधीचं सोनं कसं करायचं हे आपल्या हातात असते. नवीन संधी, प्रश्नांशी भिडणं, लढणं हे सारं तरूणाईतच करावं असं नाही तर आयुष्याच्या मध्यावर येऊन तुम्ही नवीन आव्हान स्वीकारू शकता, त्याच्यासाठी परत नव्याने दिवस—रात्र एक करू शकता. फक्त यासाठी गरज आहे ती ऊत्साहाची, परत नव्याने प्रश्नांना भिडण्याची.
यासाठी तुमच्या जवळ भेटलेल्या माणसांच्या विचाराची शिदोरी असेल, जगलेल्या समृध्द अनुभवाच्या जाणिवा असतील, जुन्या पराभवाचे खुप काही शिकवणारे व्रण तुमच्या अंगा—खांद्यावर असतील, ते कदाचित तुम्हाला मागे काय चुकले याची जाणिव करून देतील, जन्माला आलेला आहे तो प्रत्येक जण कधी ना कधी इथला तळ हलवणारच पण आपले जे मार्गदर्शक असतील त्यांचे विचार रात्रं—दिवस तुम्हाला साथ—सोबत करतील, प्रसंगी अंगात बळ देतील. मग अशा बर्या—वाईट शिदोरीच्या अनुभवाच्या जोरावर आपण निवडलेल्या विषयात एक—एक पाऊल टाकत शिखर गाठायचं, म्हणजे शिखर गाठायचं.......! आयुष्यात अशक्य वाटणारी स्वप्न खुशाल बघा कारण.... ज्यांना स्वतःच्या मेहनतीवर आणि कष्टावर विश्र्वास असतो ना ते एक ना एक दिवस आपला यशाचा दिवस नक्कीच खेचून आणतात. प्रत्येक मोठ्या स्वप्नाची सुरवात स्वप्न पाहणाऱ्यापासुन होते. नेहमी लक्षात ठेवा , तुमच्यात सामर्थ्य, संयम आणि जग बदलण्याची ताकद आहे. नवीन वर्षात येणाऱ्या सर्व उपयुक्त संधी जिंकून जीवन यशस्वी करा. प्रत्येक वर्ष कस पुस्तकासारखे असते ना! ३६५ दिवसाच पान जसं उलटू ना तस नवीन मिळत जात ...कधी मनात राहिलेले पुर्ण होऊन जात.. नव पान, नवा दिवस, नवी स्वप्न, नवी ध्येय, नव्या आशा, नव्या दिशा,नवी माणस, नवी नाती,नवा यश, नवा आनंद,कधी अपूर्ण,कधी संपुर्ण, नवा हर्ष, नवे वर्ष.
असं ही वर्ष बदलल्याने दिवस बदलतील ही समजूत चुकीची आहे. बदलते ते फक्त कॅलेंडर आणि त्याची पानं ! दिवस बदलायचे असतील तर रात्रीची झोप उडाली पाहिजे. ही रात्रीची झोप तेव्हाच उडते जेव्हा आपण चिंतन, आत्मपरीक्षण करायला सुरुवात करतो. एखादा विचार, एखादे स्वप्न, एखादे ध्येय आपल्याला झोपून देत नसेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा...
अपमान स्वाभिमानाला जागे करतो, तसेच ध्येय तुमची झोप उडवून तुम्हाला जागे ठेवण्याचा प्रयत्न करते. त्या ध्येयाला जोपर्यंत गाठत नाही, तोपर्यंत चैन पडत नसेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहे असे समजा...
उगवत्या सूर्याने रोज रोज येऊन आपल्याला एक संदेश दिलाय,,,,,!!!
काल चा मावळलेला मी कदाचित स्वप्न अर्धी,,,इच्छा अपूर्ण,,,नैराश्य होतं थोडं,,,तर काय झालं,,,,,आज पुन्हा मी नवीन उमेद घेऊन उगवतोय,,आज पुन्हा नवीन स्वप्न बघेन,,,नवीन उत्साह आणि नवीन आशा उमेद घेऊन पुढच्या प्रवासाची वाटचाल चालु च ठेवेन,,,,!!
काय माहित आज माझं स्वप्न पूर्णत्वास योग्य ठरेल,,,,,,!!!सरत्या वर्षांला निरोप
....नवीन वर्षांचे स्वागत
मागील वर्ष गेले अनेक अनुभव, आठवणी देवून..
तर..
नवीन वर्ष नक्कीच येतंय नवीन स्वप्न ,आशा घेऊन..
...जाणाऱ्याला निरोप देताना डोळे पाणावतात..
पण...
येणाऱ्याचे स्वागत करताना..
ओठांवर हसू फुलवतात...
अनुभवाची झोळी थोडी जडंच असते प्रत्येकाची सरत्या वर्षांत..
आशेची दोरी थोडी लांबच असते येणाऱ्या नवीन वर्षांत
.. .
...
माझंही काहीसं तसंच आहे..
2022.....अनेक आठवणी, कटू, गोड अनुभवांनी तुडूंब भरून गेलेले..
2023 ..."मॄगजळ "..असेलही कदाचित..
पण
आशावादी मी नक्कीच आहे..
स्वतःला दिलासा देत आहे...
आयुष्याच्या पुस्तकाची पाने चाळताना जाणवते..अधिक सामर्थ्यवान बनते आहे...
संकटे झेलण्यासाठी सिद्ध होते आहे..
...
...
हे रविकरा...
मावळतीला घेऊन जा..दुःख साऱ्यांच्या आयुष्यातले..
उद्या घेऊन ये..
नवीन किरण शलाका
...स्वप्न साकार करण्या प्रत्येकाचे...
वैभवी...आशावादी...आजही....उद्याही... सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.... ॲड श्रद्धा मगर.