Aug 05, 2021
प्रेम

नवी सुरुवात

Read Later
नवी सुरुवात
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

नवी सुरुवात....

ती एकदम साधी सरळ संस्कारी, सुस्वाभावि मुलगी. नाव तिचे प्रिया. नावाप्रमानेच  सर्वाना प्रिय होती. आतच पदवीच शिक्षण पूर्ण होउन नोकरीला लागली होती.  तिचा प्रियकर वैगरे असे कोणिही नव्हता. पण तिचा भावी जोडीदार बद्दल तीने खुप स्वप्न बगितली होती. घरातून आता तिला स्थळ येत होती. त्यापैकी एका चांगल्या मुलाला होकार देऊन तिचे लग्न लावून दिले. तिलाही तो खुप आवडला होता. माहेर आणि सासर एकाच गावात होते त्यामुळे तिला जरा हायसे वाटत होते.लग्न,पुजा वैगरे सगळ एकदम निट पार पडले होते. सगळेच खुप आनंदी होते. सासरची मंडळी ही खुप समजदार होती. मुख्य म्हणजे प्रियाचा नवरा अमित तो ही खुप चांगला आणि प्रिया वर खुप प्रेम करत होता. हळूहळू दोघांचे रूटीन सुरू झाले. प्रिया ला अमित बरोबर कुठे बाहेर फिरायला जावे. बाहेर जेवायला जावे. एक सन्ध्याकाळी समुद्राच्या किनारी बसावे आसे वाटायचे. पण अमित मात्र जरा वेगळा होता. तिला बाहेर फिरायला नेण्यापेक्षा तिला माहेरी सोडायचं की जेणेकरून तिला आई वडीलां बरोबर जरा वेळ घालवता येइल. प्रिया ला पण आवडेल असे वाटायचे पण प्रिया ला कंटाळा यायचा. अमितच्या अंगाखांद्यावर लहानपणी पासुन घरची जबाबदारी होती. म्हणून तो नेहमी त्याच काम आणि ते वाढवण्याकरिता दिवसरात्र मेहनत करत असायचा. पुढे तिला दिवस गेले अमितने खुप काळजी घेतली. खुप प्रेम करत होता तो प्रियावर पण प्रियाच लाही ना काही तरी रुसणं फुगण असायचं तरिही तो तिला खुप समजून घ्यायचा. तिचे सगळे रुसवे फुगवे तो मनवायचा. प्रियाच काही ना काही नाटक असायचीच.
असेच एका दिवशी ती घरात एकटीच होती. सकाळी जरा बाहेर जाऊन दुपारी घरी परतली होती. बाहेरच्या तापलेल्या  उनामुळ ती दमुन गेली होती. दुपारचे 3 वाजले होते. सोफ्यावर टेकून बसलेली. डोक्यात अमितचाच विचार चालू होता. इतक्यात अचानक तिला अमितचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी तिला कळते. आणि ती खुप खुप रडते. अमितचे प्रेम तिला आता समजायला लागते. तो तिची किती काळजी घ्यायचा ह्याची तिला आता जाणीव होते. तिला तिची चुक कळते. ती ला त्याचा सहवास त्याचे प्रेम अजुनही पाहिजे होते. पण आता फक्त तिच्याकडे रडल्या शिवाय काहीच पर्याय नव्हता. ती खुप खुप रडत होती. 
अन अचानक तिला अमितचाच आवज ऐकायला येतो. तो तिला हळुहळू हलवून जोपेतुन ऊठवत  होता. होय तिला मगाशी सोफ्यावर बसलेली असताना डोळा लागला होता. ती दार उघडत नव्हती म्हणुन अमित ने चावी ने दार उघडल होते. त्याला अगदि सुखरुप घरी बघुन प्रिया ने त्याला मिठीच मारली. अन रडू लागली. 
तिच्या एका वाईट स्वप्नांने तिला खुप काही शिकवले होते. माणूस जेव्हा आपल्या जवळ असतो तेव्हा त्याच्याशी प्रेमा ने वागा. त्याला समजून घ्या. नवरा बायकोच नात हे रबरा सारखं असतेे. जास्त ओढले तर तुटून जाऊ शकते. छोटे  मोठे राग  रुसवे दिवस मावळल्यावर रात्रीचा गडध  अंधारात विसरुंन जायचे अन येणारया नविन पहाटे बरोबर नात्यांची एक नविन सुरुवात करायची हे प्रिया ला आता  ऊमजले होते. अन अमितच्या प्रेमात ती आता नव्याने पडली होती. संसाराची एक नवीन सुरुवात तिने केली. 

"नात्याची नवी सुरुवात 
आज तिने केली, 
आयुष्य किती सुंदर आहे 
ह्याची जाणीव आता तिला झाली".

लेखिका: सौ . राजेश्री मराठे.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Rajeshri Anand Marathe

House wife

Hobbies reading n writing,, cooking,, teaching children's.