नवी आशा...
आयुष्यात पाहिजे ते मिळविण्यासाठी आवश्यक आहेत ते म्हणजे आपली मेहनत, कारण जगात अशक्य काहीही नाही आहे. आपण फक्त एखादी गोष्ट ठरवावी लागते आणि त्यानंतर त्या गोष्टीचा पाठलाग करावा लागतो, आणि एक दिवस ती गोष्ट आपल्याजवळ आलेली असते. म्हणतात ना “प्रयत्नांती परमेश्वर” तसेच काहीतरी.
नीताचही असंच होतं, लग्न ठरलं त्यावेळी मनाशी गाठ बांधली होती. सगळ्यांना आपलंस करेल, आणि सगळ्यांच्या मनात स्वतःच स्थान निर्माण करेल. कुणालाही काहीही कमी पडू देणार नाही. पण सगळं एवढं सोपं नसतं. सगळं सांभाळून घ्यायला संयम असावा लागतो, सहन करण्याची ताकद असावी लागते. आणि जे सगळं करून नीता आज इथवर आली होती. एकदा अशीच एक घटना घडली,
नीताच्या सासू- सासऱ्यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सासूबाई व सासरेबुवांची सर्व मित्रमंडळी व त्यांचे काही नातेवाईक कार्यक्रमास उपस्थित होते. एकूण काय तर चाळीस पन्नास लोकांची जेवणाची व संपूर्ण सजावटीची जबाबदारी नीताने स्वीकारली होती.
नीताने सर्व काही एकटीनेच केलं होतं, स्वयंपाक खूपच चविष्ट झाला असल्याने आलेल्या पाहुण्यांकडून निताचे कौतुक होत होते. सगळे नीताचं कौतुक करत होते.
व्यासपीठावर विराजमान झालेल्या नीताच्या सासू-सासऱ्यांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. त्यांनी पन्नास वर्षे सुख-समृद्धी व आनंदात घालवली होती.
मित्र परिवारामध्ये ते \"यशस्वी जोडपे\" म्हणून ओळखले जायचे. त्यांना मुला-मुलींनी व भावा-बहिणींनी भेटवस्तू दिल्या. नीताने पण सासुबाईसाठी छानस गिफ्ट आणलं होतं, सासू-सासऱ्यांनी ती भेटवस्तू स्वीकारून आपल्या मुलाला व सुनेला आशीर्वाद दिले.
नीताने एक एक वस्तू व्यवस्थित ठेवूया या विचाराने ती एक एक वस्तू घेऊन जायला लागली.
आणि अचानक तिचा पाय साडीच्या पदरात अडकून ती वस्तुसह पडली. जोरदार आवाज झाला आणि काही काचेच्या वस्तूचे तुकडे तुकडे झाले.
आणि अचानक तिचा पाय साडीच्या पदरात अडकून ती वस्तुसह पडली. जोरदार आवाज झाला आणि काही काचेच्या वस्तूचे तुकडे तुकडे झाले.
तो प्रसंग पाहून सगळे नीताला बोलायला लागले. नीताचा पतीही तिच्याकडे रागाने पाहू लागला. नीताला रडू आवरले नाही. नीताला पाहून तिची सासू मात्र तिच्याकडे धावतच गेली.
तिने तिची समजूत घालत सांगितले, की वस्तू फुटल्या ना. काळजी करू नको. तो पुन्हा आणता येईल.
सगळ्यांकडे बघून त्या म्हणाल्या, मी सून असताना जे भोगले ते माझ्या सुनेसोबत होऊ देणार नाही. निताच्या सासूनं एवढे म्हटल्याने वातावरण बऱ्यापैकी थंड झाले. ताण सैलावला. नीताची सासू पाहुण्यासमोर नीताचे गुण गात होती.
सासुच्या तोंडून अस कौतुक ऐकून नीतालाही बरं वाटलं. तिच्या मनात नवी आशा निर्माण झाली
नंतर नीता तिच्या कामात व्यस्त झाली आणि मनात विचार करू लागली, अशी सासू सगळ्यांना मिळाली तर...ती तिच्या नव्या स्वप्नात रंगली..