Feb 29, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

नवी आशा

Read Later
नवी आशा

© स्मिता भोस्कर चिद्रवार.

नवी आशा .
ऋता आणि गिरीष नुकतेच त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले होते . अगदी सुंदर , हवेशीर फ्लॅट आणि मोठी छान सोसायटी मोक्याच्या ठिकाणी होती . छोटा अद्वैतसुद्धा अगदी खुश होता.
नवीन शाळेत जायला पिल्लू अगदी उत्सुक होतं.
ऋता अद्वैतला शाळेत सोडायला आणि आणायला जाऊ लागली . हळूहळू मुलांच्या आयांशी ओळख होऊ लागली . आजूबाजूच्या मुलांच्या आयांशि ऋताची मैत्री होऊ लागली होती .
सूची म्हणाली , " अग ऋता , रोज रोज तू कशाला येतेस ? उगीच त्रास होईल तुला . आम्ही आमच्या बरोबर घेऊन येत जाऊ ना अद्वैतला. "
रीमा म्हणाली , " हो ग खरंच . तू काळजी करू नकोस त्याची . आम्ही लक्ष देऊ त्याच्याकडे . "
वैशाली म्हणाली , " बरोबर आहे ग सगळ्यांचं . आणि तुलाही काहीही गरज लागली तर हक्काने सांग आम्हाला . "
ऋताला काहीच कळेना . या सगळ्या हे काय आणि का बोलतात आहे याचा उलगडा तिला होतंच नव्हता .
तितक्यात सीमा म्हणाली , " अगं ऋता तुझी डेट कधीची आहे ? इथेच करणार आहेस का डिलिवरी की माहेरी जाणार आहेस ? डोहाळजेवण आपण करूया हीचं इथे . "
" हो हो मज्जा येईल . " सगळ्या एकसुरात म्हणाल्या .
आता ऋताची ट्यूब पेटली . पण तसं खरंच काहीही नसतांना सगळ्यांना असं वाटतंय त्याचं कारण म्हणजे आपलं वाढलेलं वजन हे तिच्या लक्षात यायला वेळ लागला नाही .
तिला मेल्याहून मेल्यासारख झालं . धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरं असं वाटून गेलं.
पण शेवटी धीर एकवटून ती चाचरत म्हणाली , " काहीतरीच काय तुमचं ? तसं खरंच काही नाहीये . हल्ली वजन जरा वाढलंय इतकंच . "
सगळ्यांच्या चेहेऱ्यावर दिसणारं आश्चर्य , नाराजी आणि स्पष्ट दिसत होती . ऋताने कोणाला काहीही बोलायची संधी न देता तिथून काढता पाय घेतला . तिच्या डोळ्यातलं पाणी तिने प्रयत्न करूनही सगळ्यांना दिसलंच .
घरी पोचताच ऋताने थोपवून धरलेले अश्रू बाहेर पडले . तिला खूप वाईट वाटत होतं. आपल्या वजनामुळे ती थट्टेचा विषय होऊन बसली होती . जुन्या बिल्डिंगमध्ये आपल्या स्वभावामुळे तिने सगळ्यांची मने जिंकली होती . पण या नवीन जागेत आपल्याला बघून कोणीच आपल्याशी मैत्री करणार नाही , अद्वैतला सुद्धा चीडवतील का सगळे ? त्यालाही कसं वाटेल असं ऐकून ? बिचारा एवढासा जीव , त्याला काय कळणार ?
आणि गिरीष ? त्याचं काय ? त्याचंही प्रेम कमी होईल आपल्यावरचं ? त्यालाही हसत असतील ना आपल्यामुळे ?
खरंच काय झालंय आपलं ? आता आरशात बघायची सुद्धा लाज वाटते .
ऋता कितीतरी वेळ रडत होती . स्वतःबद्दल तिला चीड येत होती .
एकेकाळी चवळीची शेंग असलेली ऋता आता मात्र अगदी अगडबंब झाली होती .

गिरीष आणि ऋताचं अरेंज मॅरेज . दोघेही एकमेकांना अनुरूप होते म्हणुच पहिल्या भेटीतच एकमेकांची पसंती झाली आणि थाटात शुभमंगल झाले . वर्षभरातच गोड बातमी मिळाली आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला . गिरीषचे बाबा त्यांना अर्ध्यातच सोडून गेले होते पण आईकडून मात्र नेहेमीच ऋताला खूप प्रेम मिळाले होते . अचानक ऋताची तब्येत बिघडली आणि डॉक्टरांनी तिला बेड रेस्ट घ्यायला सांगितली .
गिरीश आणि आई ऋताची खूप काळजी घेऊ लागले . थाटात डोहाळजेवण झालं आणि ऋताला पुन्हा त्रास झाला. आई आणि गिरीश ऋताची अगदी डोळ्यात तेल घालून काळजी घेऊ लागले . काही दिवसातच गिरिषणे ऋताच्या आई बाबांनाही बोलावून घेतले .
अवघड परिस्थितीत अद्वैतचा जन्म झाला . सगळं छान होतं . अद्वैतच्या बाळलीला सगळ्यांना सुखावत होत्या . अद्वैत हळूहळू मोठा होत होता पण ऋताला मात्र अशक्तपणा जाणवत असायचा . त्यामुळे व्यायाम करणे कधी शक्य झाले नाही .
दिवस जात होते आणि आईंची तब्येत बिघडली . ऋताने अगदी मान लावून आईंची सेवा केली . तिला स्वतःकडे लक्ष द्यायला आजिबात वेळ मिळायचा नाही .
या सगळ्यांचा परिणाम व्हायचा तोच झाला . ऋताचं वजन तिच्याही नकळत हळूहळू वाढत गेलं आणि आता मात्र ती अगदी \" अगडबंब \" या आकाराची झाली .
नंतर मात्र तिला या वजनाची सवय झाल्यासारखी झाली . ती तशी फिट होती . फिरायला , ट्रेकिंगला जायची ती आणि त्याचा तिला त्रास असा झाला नाही त्यामुळे \" वजन कमी करायचं \" असं तिच्या मनाने कधी घेतलंच नाही .
आताशा मात्र लोक तोंडावर बोलू लागले होते , हसू लागले होते . तिला खूपच वाईट वाटू लागलं होतं . तसा तिने प्रयत्न केला होता अनेकदा वजन कमी करायचा पण आता वयामुळे आणि हर्मोनाल इमंब्यालेन्समुळे वजन काही उतरत नव्हतं .
ऋता डिप्रेशन मध्ये जाण्याच्या मार्गावर होती . अगदी नैराश्य येऊ लागलं होतं तिला .
आज असाच तिचा बांध फुटला होता . गिरीष ऑफिसमधून आला तेव्हा ऋताची अवस्था बघून गहिवरला.त्याने ऋताला मिठीत घेतलं . ती अनावर होऊन ओक्साबोक्षि रडू लागली .
गिरीष काहीही न बोलता तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिला . तिला शांत होऊ दिलं .
" आज फार वाईट वाटलं मला . माझ्या वजनामुळे पून्हा एकदा अपमान झाला . आता नाही सहन होत मला . तू सुद्धा सोडून जाशील ना मला आता ? आणि आपला आदू ? त्यालाही माझी लाज वाटत असेल . पण काय करू काही कमी प्रयत्न केले का मी वजन कमी करण्याचे ? आता नैराश्य येतंय रे . मी जाते तुम्हाला सोडून . उगीच माझ्यामुळे लोक हसतात तुम्हाला . तसा तर जगण्याचा सुद्धा अधिकार नाही मला . मी ...." ऋता नैराश्यात बोलत होती .
तिचं बोलणं अर्धवट तोडत गिरीषने तिच्या तोंडावर हात ठेवला .
" अग काय बोलतेस हे तू ? असं बोलण्याआधी आमचा कोणाचाही जराही विचार आला नाही का तुझ्या मनात ?
आणि मी तुझ्यावर प्रेम करतो तुझ्या शरीरावर नाही . त्यामुळे तू कशीही दिसलीस तरी मला त्याचं काही घेणं देणं नाहीये .
तू इतके प्रयत्न केलेस ना मग अजून कर . अद्वैतच्या वेळी किती त्रास झाला तुला . मग त्याचं सगळं करणं , आईचं आजारपण .कधी लक्ष देणार होतीस स्वतःकडे ? आणि खरं सांगू मला तुझा अभिमान आहे . माझ्यासाठी इतकं केलंस तू , अगदी स्वतःचा विचार न करता आणि मी तुला सोडून जाईन असं कसं म्हणू शकतेस तू ? आधी या नैराश्यातून बाहेर ये बरं . आणि तुला हसणाऱ्या लोकांना मागच्याच महिन्यात तू दहा हजार फुटांवर केलेल्या ट्रेकचे फोटो दाखव .
डॉक्टरसुद्धा म्हणालेत ना तुला तुझा हार्मोन प्रोब्लेम दूर झाला की येईल वजन आटोक्यात मग कशाला काळजी करतेस ?
फक्त छान हसत रहा नाहीतर रडत राहिलीस तर नक्कीच सोडून जाईन समजलं का ? " गिरीष म्हणाला आणि ऋता गोड हसली .
तिने आनंदाने जीवन जगत तिचा प्रयत्न सुरूच ठेवला . हळूहळू तिचे प्रॉब्लेम्स दूर होत गेले आणि ती \" अगडबंब \" मधून \" स्लिम अँड ब्युटीफूल \" दिसू लागली .
तिने तिच्यासारख्या नैराश्यात जगणाऱ्या मैत्रिणींसाठी \" नवी आशा \" सुरू केली आणि अनेकांची स्वप्ने सत्यात उतरली .

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Smita Bhoskar Chidrawar

Home maker

Like to Be Positive And Make Others Happy With My Writing

//