नवी आशा जगण्याची... भाग 51

तस होणार नाही मी नाही करणार कंप्लेंट, माझ्या कडे वेळ कमी आहे, घरी पाहुणे आहेत बोला लवकर नाही तर मी निघतो


नवी आशा जगण्याची... भाग 51

©️®️शिल्पा सुतार
........

दुपारच जेवण झाल, आदित्य सीमा रूम मध्ये आले,.." सीमा इकडे ये मला बोलायच आहे तुझ्याशी" ,

सीमाला धड धड झाल, पण आता मी आदित्यला आणखी नकार नाही देवू शकत, मलाही त्याच्या सोबत आवडत, आता होकार देणार मी, बघु काय म्हणतोय तो ,.."बोल काय झालं आदित्य? ",..

चेहेरा का असा करून घेतला सीमा, काय विचार करतेस? ... "आज संध्याकाळी आपण बाहेर जेवायला जायच का दोघ? ",..

" अरे पण दोघ कस? घरचे बाकीचे? सगळे जावू या सोबत ",.. सीमा

" नाही फक्त तू आणि मी, आबा आक्कांना काही प्रॉब्लेम नाही ,मी सांगतो चहाच्या वेळी त्यांना ",.. आदित्य

" पण कस वाटत अस? ",.. सीमा

" आता हो नाही नको, मला तुझ्यासोबत राहायच आहे सीमा ",.. आदित्य

"चालेल जावू या",.. सीमा

"छान साडी नेस, मस्त तयार हो, तू आहेच सुंदर सीमा, तुला काय घ्यायच आज? ",.. आदित्य

" अरे आज काय विशेष आदित्य ?, माझे फारच लाड होता आहेत ",.. सीमा खुश होती, तिला आदित्य सदोदित तिच्या मागे पुढे असायला हवा होता

" काही नाही ग आपल्याला एकमेकांसोबत वेळ नव्हता या आठवडय़ात, मला तुझ्या सोबत राहायच आहे, एन्जॉय करायची तुझी कंपनी ",... आदित्य

मी हे आपल नात पुढे न्यायच्या दृष्टीने करतो आहे सीमा, बघु आज तरी तू होकार देतेस का?, नको राहू अशी दूर माझ्यापासून... आदित्य विचार करत होता

सीमा खूप खुश होती, जावू या मस्त बाहेर, आज सांगू का आदित्यला की मला ही तू आवडतो, तू खूप छान आहेस, हो आज बोलूच, सीमा विचार करून लाजली होती, तिला कालचा प्रसंग आठवला, अंगावर काटा आला तिच्या... विक्रमच बोलू का आदित्यशी, कसा बघत होता तो माझ्या कडे ,.. नको आत्ता, आदित्य खूप छान मूड मध्ये आहे, उगीच चीडायचा तो भांडण केल त्याने शेजारी जावून तर

आदित्य थोड्या ईमेल चेक करत होता आणि मेसेज करत होता

"कोणाशी बोलतो तू आदित्य, बिझी आहेस का? ",... सीमा

सचिन शी... ऑफिस बद्दल

"तू बॉस आहेस का आदित्य? की आबा आहेत बॉस? , तुला छान वाटत असेल ना बॉस म्हणून",.. सीमा

आदित्य हसत होता,... " मी नाही आबा आहेत बॉस, आणि घरी ही नाही मी बॉस, घरचा बॉस तू आहेस सीमा",

काहीही,.. सीमा हसत होती

आदित्य तिच्याकडे बघत होता, गोड दिसते ही

"हो ना आता पर्यंत तू म्हणतेस ते होत या बेडरूम मध्ये, मला हिम्मत नाही तुझा शब्द मोडायची, घाबरतो मी खूप",.. आदित्य

" एकदम अति होत हे, कोणाला वाटेल खर आहे हे ",.. सीमा

" खरं नाही का मग हे ",.. आदित्य

मला माझ्या मनाच करायच असत तर केव्हा केल असत, एवढी साधी भोळी आहे ही दिवस रात्र सोबत असते माझ्या, पण मला अस वाटत मनापासून हे नात सीमा स्विकारेल तर बर होईल

किती गोड आहे हा आदित्य, पण आता आदित्य बिझी होत चालला आहे, माझ नाव नाही घेत नाही तो, नुसत ऑफिसच काम करतो, किती बोर,... सीमा आदित्य कडे बघत होती

" आदित्य तू माझ्याशी का नाही बोलत आधी सारखा? ",.. सीमा

"बोलतो आहे की, आणि आधी सारखा म्हणजे काय? फक्त दहा दिवस झाले आपल्या लग्नाला, त्याच्या आधी तू बोलायची का माझ्याशी? , एकदम लांब पळत होती ",.. आदित्य

"आणि आता कशी आहे मी आदित्य?, आता बोलते का तुझ्याशी मी? ",.. सीमा

"थांब ग सीमा एक मिनिट ",.. आदित्य

"हे बघ हेच बोलते मी, तू तुझा बिझी आहेस, माझ्याशी बोलत नाहीस ",.. सीमा

"काम आटोपून घेतो, आपल्याला जायच ना फिरायला उशीर नको व्हायला, आणि आता कशी आहे मी ?.. च उत्तर आता देवू की नंतर, माझी गोड बायको ",.. आदित्य सीमा कडे बघत होता, सीमा पटकन उठली तिथून, लाजली होती ती

" सीमा इकडे ये ",.. आदित्य

" उशीर नाही का होत आता? आदित्य लवकर कर ऑफिस काम ",... सीमा

हे अस आहे सीमा च, आज विचारणार आहे मी तिला फिरायला गेल्यावर होकार कधी देणार ते? , मी ऐकणार नाही आता

सीमा विचार करत होती.. कोणती साडी नेसू?

संध्याकाळी चहा झाला,..." आई आज मी सीमा बाहेर जेवायला जावू का",..

"चालेल जावून या",.. आक्का

"तुम्ही ही चला ना आक्का आबा आजी",.. सीमा

नाही तुम्ही जावून या आम्ही काय करू तुमच्या सोबत ",.. आक्का

सीमा रूम मध्ये आली, आदित्य खाली आबां बरोबर बोलत होता

सीमा तयार झाली, अतिशय सुंदर अशी गुलाबी साडी ती नेसली होती, साधी सुंदर दिसत होती ती, वेगळ तेज होत चेहर्‍यावर, मंगळसूत्र, बांगड्या मस्त शोभत होत्या तिला , आदित्य आत आला, तो बघत राहिला तिच्या कडे, किती सुंदर दिसते आहे ही, बापरे हिला बाहेर घेवून जायच म्हणजे काय, जरा चिडवू तिला

"झाली का तयारी, किती तो वेळ आवरायला, नवरा काही बोलत नाही म्हणून फावत तुझ",.. आदित्य

"अरे पंधरा मिनिटात तयार झाली मी, अस काय करतोस?, आणि तू झाला का तयार? , मला एवढ बोलतोस" ,... सीमा

आटोप आता सीमा ...

"तू तयार हो आदित्य" ,... सीमा वेणी घालत होती, आत्ताशी सहा वाजले एवढ्यात जेवणार का? , आदित्य अति करतो, स्वतः तयार नाही, मी तयार असून मला बोलतो तो, काय घाई आहे?

" आधी राजाला भेटू मग जावू बाहेर, चालेल का? ",.. आदित्य

" काय आई कडे जायच? खरच आदित्य? सीमा खूप खुश होती, चल चल लवकर आदित्य, तू खूप छान आहेस",.. सीमा

आता का?...

"तू काहीही बोल, मी भांडणार नाही आता तुझ्याशी",... सीमा खुश होती

आदित्य तयार झाला, दोघ खाली आले, आक्का आबा आजी सीमा कडे बघत बसले, छान दिसते आहेस बेटा, साडी छान दिसते तुला

सीमा लाजली होती

" आई, आबा, आजी आम्ही जावून येतो ",.. आदित्य

लवकर या....

दोघ बाहेर आले, सीमा प्रेमाने आदित्य कडे बघत होती

"जायच ना बाहेर? की आत जायच? अशी का बघतेस सीमा",.. आदित्य

"माझा नवरा आहे तू, मी कशी ही बघेन",.. सीमा

"बापरे बरीच हिम्मत वाढली तुझी, मला भिती वाटते आहे, कार मध्ये आपण दोघच",.. आदित्य

चल लवकर, सीमा हसत होती

विक्रम घराबाहेर निघत होता, पवार साहेबांना भेटायला जात होता तो, आदित्य सीमाला बघून तो झाडा मागे लपला, आदित्य काहीतरी बोलत होता, सीमा हसत होती, काय सुरु आहे यांच? , कुठे बाहेर चालले का हे दोघ?, सीमा खूप सुंदर दिसते आहे, साडी छान दिसते तिला, गुलाबी रंग सुंदर आहे, त्याने मोबाईल मध्ये तिचे एक दोन फोटो हळूच काढून घेतले, आदित्य बरोबर ती फिरायला निघून गेली,

काय करू पाठलाग करू का यांचा, सीमाला बघितल की काही सुचत नाही, आजच काम काढायच होत का या प्रशांत ला? , बोर मीटिंग नुसती,

विक्रमच्या होणार्‍या बायकोचा परत फोन वाजत होता, त्याने परत फोन कट केला, काय ही फोन करते सारखी,

पवार साहेबांना भेटायला जायला हव, इच्छा तर नाहिये पण जाव लागेल,.. विक्रम निघाला

आदित्य सीमा निघाले, सीमा खुश दिसत होती, आदित्य thank you

"काय आता",.. आदित्य

"काही नाही ,.. सीमा

" ही साडी कधी घेतीलीस? ",.. आदित्य

" अनघा ताईंनी दिली ",... सीमा

" छान दिसतेस तू आज खूप, अजून घे अश्या साड्या ",..आदित्य

" आईला सांगू का मी आम्ही येतोय ते",.. सीमा

"नको आता जातो आहोत ना आपण तिकडे, उगीच ते खूप धावपळ करतात, फराळ वगैरे बनवतील",.. आदित्य

"हो बरोबर आहे",.. सीमा

"सीमा तू खुश आहेस ना ",.. आदित्य

"हो आई कडे जायच बाहेर फिरायला जायच मजा आहे माझी",.. सीमा

"तुझ्या साठी नाही हे मी माझ्या साठी करतो आहे",.. आदित्य

"ते कस काय",.. सीमा

"नंतर सांगेन तुला ",.. आदित्य

" तू चांगला आहेस आदित्य, मला समजून घेतो ",.. सीमा

" पुरे आता माझ कौतुक",.. आदित्य

आदित्यने गाडी चालवताना सीमाचा हात हातात घेतला, सीमाने आदित्य कडे बघितल, आदित्य सोड ना हात,

" काय झालं?",.. आदित्य

" अरे आदित्य पुढे लक्ष दे ",.. सीमा

"आहे माझ लक्ष ",.. आदित्य

" सीमा तू लाजली की छान दिसतेस, तू अशी जाणार का शाळेत रोज ",.. आदित्य

"म्हणजे कशी? ",.. सीमा

" अशी सुंदर सुंदर बनुन",.. आदित्य

" काहीही काय? मी फक्त साडी वेगळी नेसली आहे आदित्य, तयारी रोजची आहे माझी, आता तु माझ उगीच कौतुक करू नकोस",... सीमा

"नाही म्हणजे मी स्कूल जॉईन करतो",.. आदित्य

सीमा खूप हसत होती, आदित्य पुरे आता...

दोघ मीना ताईं कडे आले, राजा मीना ताई टीव्ही बघत होते, अचानक सीमा आदित्य आले, ते गडबडले, पटकन उठले, राजा टी शर्ट घालून आला, सीमा जावून आईला भेटली, राजा येवून भेटला, खूप खुश होते ते,

" सांगितल का नाही येणार आहेस ते, काही तरी केल असत खायला",.. मीना ताई

"आई आम्हाला बाहेर जायच आहे फिरायला, जाता जाता इकडे आलो आधी ",.. सीमा

" किती सुंदर दिसते तू गुलाबी साडीत, आज नजर काढते तुझी ",.. मीना ताई

" हो ना मी केव्हाच हेच बोलतो आहे सीमाला ",.. आदित्य

"आदित्य चूप ",.. सीमा लाजली होती

आदित्य राजा मीना ताई हसत होते,

चला मुलगी रूळते आहे संसारात, मीना ताई खुश होत्या

मीना ताईंनी चहा ठेवला, सीमा पूर्ण घर फिरून आली,

" आई माझ्या साड्या कुठे आहेत? त्या दे ना उद्या पासून शाळेत जाते मी ",.. सीमाने तीच सामान घेतल,

"तू नाही ना जात आज तिकडे, पवार साहेब जाणार आहेत प्रशांतला भेटायला",.. आदित्य ने हळूच सांगितल

"नाही मी नाही जाणार",.. राजा

ठीक आहे..

"मी घेवू का भाग यात",.. राजा

" नको आता पवार साहेब काय म्हणताय ते बघु आधी ",.. आदित्य

चहा झाला

"आम्ही निघतो आता",.. मीना ताई राजा बाहेर पर्यंत आले सोडायला

" कुठे चाललो आहोत आपण आदित्य?",.. सीमा

"माझ्या मित्राच हॉटेल आहे तिथे टेबल बूक केला आहे आपला ",.. आदित्य

दोघ हॉटेल वर आले, खूप छान वातावरण होत फाईव्ह स्टार हॉटेल होत ते , आदित्य सीमा आत आले,

" आदित्य खूप महाग वाटतय हॉटेल",.. सीमा

"तू पैसे आणले ना सीमा सोबत ",.. आदित्य

" नाही आदित्य जास्त नाही माझ्या कडे ",... सीमा

आदित्य हसत होता,.." अग किती भोळी आहेस तू, एन्जॉय कर",

दोघ टेबल वर जावुन बसले

"आदित्य एक विचारू म्हणजे तुला राग येणार नाही ना",..सीमा

"बोल ना तुझा कसला राग येईल ते ही एवढी गोड असतांना",.. आदित्य

"तुला सॅलरी मिळते का दर महिन्याला",.. सीमा

आदित्य खूप हसत होता,

"काय झालं? अरे मला जे वाटलं ते विचारल",...सीमा

"नाही मिळत सॅलरी तुझ्या नवर्‍याला, असतात माझ्या कडे पैसे, मी घेतो आबां कडून म्हणजे आबा न मागता सगळ्यांना देतात पैसे ",.. आदित्य

" तू काय काम करतो ऑफिस मध्ये ",.. सीमा

" Overall sagla, सगळे डिसिजन घेण वगैरे",... आदित्य

" भांडण होत का ऑफिस मध्ये, सप्लायर मध्ये, लोक चिडतात का ",...सीमा

" खुप.. नेहमी सुरू असत काही ना काही ",..आदित्य

"तुला किती आहे सॅलरी सीमा ",..आदित्य

"पंधरा हजार",.. सीमा

"बापरे,.. मला देशील का पैसे थोडे प्लीज",.. आदित्य

" काहीही काय आदित्य कमी आहे मला सॅलरी ",.. सीमा

" तुझी स्व कमाई आहे ती, मला अभिमान आहे",.. आदित्य

सीमा लाजली होती,

" बायको हुशार आहे माझी ",.. आदित्य

" पुरे आता हो देईन मी तुला पैसे ",.. सीमा

प्रॉमीस

हो

" हो सगळ तुझ आहे आदित्य" ,.. सीमा

" खरच का? बघ ह, नंतर नाही म्हणशील ",.आदित्य

"आदित्य इथे काय चिडतोस तू मला ,. सीमा

" ऑर्डर दे,.. काय आवडत तुला? ",.. आदित्य

" मला हेल्प कर आदित्य विशेष माहिती नाही मला ",.. सीमा

दोघांनी मिळून जेवण मागवल

" छान आहे जेवण ",.. आदित्य

......

पवार साहेब हॉटेल वर पोहोचले, प्रशांतला त्यांनी फोन केला, विक्रम प्रशांत आत होते, ते जावून त्यांना भेटले

" बोला का बोलवलं इकडे तुम्ही मला, हे अस भेटण किती धोकादायक आहे माहिती आहे ना? ",.. पवार साहेब

प्रशांत विक्रम एकमेकांना कडे बघत होते, थोड काम होत

"बोला मोकळ बोला, मला पटल तर मी हो बोलेन नाही तर नाही",.. पवार साहेब

"पण तुम्ही आम्ही कंप्लेंट केली तर",... प्रशांत

"तस होणार नाही मी नाही करणार कंप्लेंट, माझ्या कडे वेळ कमी आहे, घरी पाहुणे आहेत बोला लवकर नाही तर मी निघतो",.. पवार साहेब

प्रशांत विक्रम कडे बघत होता तो काही बोलायला तयार नव्हता मग प्रशांतने सुरुवात केली,..." स्क्रॅप रीपोर्ट आला का? ",

" हो आला आहे, काय गोंधळ घातला तुम्ही सगळ्यांनी? का अस केल?",... पवार साहेब

" आता काय करू या? तुम्ही मदत करता का आम्हाला?",.. प्रशांत

"काय करायच मदत म्हणजे?",... पवार साहेब

"रीपोर्ट तसा ठेवा, थोडे आकडे बदला लाखो असतिल तर हजार दाखवा ",... प्रशांत

"अस कस करता येईल? ".. पवार साहेब

" तुम्हाला सगळ शक्य आहे, मनावर घेतल तर होईल आणि आदित्यचा विश्‍वास आहे तुमच्या वर ",.. प्रशांत

"रिस्क आहे यात ",.. पवार साहेब

"तुम्हाला मोबदला मिळाले याचा",.. विक्रम आता बोलला

किती??

"तुम्ही किती रक्कम कमी करताय त्यावर आहे हे",.. विक्रम

"ठीक आहे मी सांगतो तुम्हाला",.. पवार साहेब

"कधी पर्यंत",.. विक्रम

"एक दोन दिवस द्या",.. पवार साहेब

"तुम्ही आदित्यला सांगितल तर",.. प्रशांत

"मला ही गरज आहे मी कशाला बोलेल विश्वास नसेल तर जाऊ द्या",.. पवार साहेब

"माफ करा तुम्ही घ्या वेळ ",.. प्रशांत

पवार साहेब निघाले

🎭 Series Post

View all