नवी आशा जगण्याची... भाग 55

काका बोलले ते विक्रमला पटल, विक्रम आत आला, मामा उठून भेटायला आले, पूजा बसलेली होती ती लाजली, मामी आल्या होत्या त्या पाणी घेवून आल्या



नवी आशा जगण्याची... भाग 55

©️®️शिल्पा सुतार
........

काका बोलले ते विक्रमला पटल, विक्रम आत आला, मामा उठून भेटायला आले, पूजा बसलेली होती ती लाजली, मामी आल्या होत्या त्या पाणी घेवून आल्या, विक्रम सरळ पूजा जवळ गेला, त्याने मुद्दामून कान धरले, पूजा गडबडली,... विक्रम काय हे,

"माझी चूक झाली एवढ्या गोड मुलीचा फोन मी उचलला नाही" ,... विक्रम

"काय झाल काही प्रॉब्लेम आहे का जावई बापू?",... मामा

"हो फॅक्टरीत खूप प्रॉब्लेम सुरू आहे, सांगेन नंतर " ,.. विक्रम

"काय पाहिजे जावई बापू तुम्ही सांगा, मी काय कामाचा आहे, असा ताण करून घ्यायचा नाही, तुम्ही त्रासात तर आमची मुलगी त्रासात",..... त्यांनी नोटांचा बंडल विक्रमला दिल, नक्की लाख दोन लाख रुपये असतिल, विक्रम घेत नव्हता त्यांनी ते खिशात कोंबले,

सगळे जेवायला बसले,

" पूजा झाल का समाधान विक्रमला भेटून आता शांत जेव बाई",... काकू

" हो ना तिचा जिवात जीव नव्हता",... मामी

" मी नंतर बसते जेवायला, तुम्हाला वाढते",... पूजा

"कश्याला नंतर, बस विक्रम सोबत जेवायला",... काकू

जेवण झाल, मामा काका बोलत बसले होते, विक्रम तिथे होता, थोड चांगल वागल तर लाख दोन लाख सुटले, मदत होवू शकते यांची, चला पूजाच्या मागे मागे करा आता, तो सोफ्यावरून पूजा कडे बघत होता, पूजाला ते समजल, ती लाजली होती,

"आई मला पूजाशी बोलायच आहे",... विक्रम

जा पूजा, मामा खुश होते, दोघ वरती आली, विक्रमने पुढे होवुन पूजाला मिठी मारली, पूजा त्याला मारत होती, पूजा हात दुखतील तुझे, राग गेला नाही का, त्याने तिला उचलून घेतल, सोड विक्रम, मग सांग राग गेला का तरच सोडेन

"तू का माझा फोन उचलत नव्हता ",.. पूजा

"सांगितल ना टेंशन होत",.. विक्रम

"या पुढे अस करु नको, तुला काही लागल तर मला सांगत जा, मी सांगेन पप्पांना",.. पूजा

"नाही पूजा आपण दोघ मिळून करू, ज्या काही अडचण आल्या त्या सोडवू, तू साथ देशील ना मला",.. विक्रम

हो... किती चांगला आहे हा विक्रम, मी त्याची पूर्ण साथ देईन

"तारीख काढायची ना लग्नाची मग पूजा ",... विक्रम

पूजा लाजली होती,.." हो, पण या पुढे तू अस रुसू नको माझ्यावर",

" नाही रूसणार सॉरी, तू शिक्षा देशील ते मान्य आहे मला सांग काय करू मी ",... विक्रम

"मला रोज फोन करायचा",..

"ठीक आहे मॅडम आता खुश, अजून काय करू ",... विक्रम तिच्या कडे बघत होता, पूजा लाजली , विक्रम ने तिला मिठी मारली, पूजा खूप खुश होती,

काय काय कराव लागणार मला काय माहिती अजून, विक्रम घड्याळ्या कडे बघत होता, पाच वाजता सीमाची शाळा सुटेल तो पर्यन्त निघू इथून

सीमाच्या विचाराने त्याला फ्रेश वाटत होत,

विक्रम पूजा खाली आले,... "मामा मी ऑफिसला जावून येतो, तुम्ही आहात ना आज",

"हो या तुम्ही सावकाश",... मामा

विक्रम मुद्दाम पूजा कडे बघत होता,... येतो मी

मामा मामींच्या चेहर्‍यावर समाधान होत

विक्रम प्रशांतच्या ऑफिस मध्ये आला,.. "पवार साहेबांनी उचलला का फोन?",

"नाही... तू कुठे गेला होतास? केव्हा च फोन करतो आहे मी? ",.. प्रशांत

" मी घरी गेलो होतो ",.. विक्रम

का आता?

"पूजा आणि मामा आले आहेत",.. विक्रम

"तुझी होणारी बायको का?",.. प्रशांत

हो..

"अरे वाह मग आता काय पुढे",.. प्रशांत

"तारीख ठरवणार आहे आज लग्नाची",.. विक्रम

" खूप छान विक्रम, हे बरोबर आहे, आता मी खुश आहे तुझ्या साठी",... प्रशांत

" मामाने पैसे दिले थोडे",... विक्रम

" अरे वाह चला तुझा प्रॉब्लेम थोडा तरी नीट झाला, आज संध्याकाळी भेटू या मग पवार साहेबांना",... प्रशांत

"हो पण लवकर जरा नंतर मला बाहेर जायच आहे ",.. विक्रम

" कुठे वहिनींना घेवून जाणार का बाहेर ",.. प्रशांत

" नाही थोड काम आहे ",.. विक्रम

" काय काम आहे विक्रम? नीट सांग? मी जेवढ तुला ओळखतो तुला काहीही काम नाही संध्याकाळी ",... प्रशांत

" एक दोन हिशोब चुकते करायचे आहेत ",.. विक्रम

" काय हे आता, आदित्य सीमा का? ",.. प्रशांत

" हो मी सोडणार नाही त्या सीमाला, आदित्य चिडेल तीच नाव घेतल की, तो भांडायला आला की खूप मारेन मी त्याला ",... विक्रम

" सोड ना त्यांना, तुझी बायको एवढी छान आहे विक्रम, अस करु नकोस ",...प्रशांत

" \"सीमा दर वेळी माझा अपमान करते त्या आदित्यला पैशाचा माज आहे",... विक्रम

" काही उपयोग होणार नाही त्यांच नाव घेवून, उलट ते लोक तुला पोलिसात देतील ",... प्रशांत

" तू कधीच नीट बोलणार नाहीस का प्रशांत? ",... विक्रम

"हेच सत्य आहे, तू कश्याला त्याच्या बायकोच्या मागे लागतोस, तुझ्या बायकोच्या मागे तो आला तर ",.. प्रशांत

"काय फरक पडतो, मी पूजाशी पैशासाठी लग्न करतो आहे ",.. विक्रम

" व्यवस्थीत वाग विक्रम, अजून वेळ गेली नाही ",.. प्रशांत

गप्प रे...

पाच वाजत आले होते, जावू का शाळे जवळ, नको आज नकोच, सीमा ही अलर्ट असेल आज , हा प्रशांत कटकट करतो, त्या सीमाला जेव्हा वाटणार नाही मी येईल तेव्हा जावून भेटायला पाहिजे तिला , घरी पूजा मामा आहेत उगीच गडबड नको आज, सीमा मी तुला नंतर भेटेन, विक्रम प्रशांत सोबत बसुन होता पुढे काय करायच ते ठरवत

शाळा सुटली सीमाला धडकी भरली, कार आली असेल का बाहेर? तिने आदित्यला फोन लावला, निघाले ड्रायवर काका मी देतो त्यांच्या नंबर, सीमा बाहेर आली कार आलेली होती, आत आदित्य ही होता, कस वाटल सरप्राईज ,

"खूप खूप छान" ,... आदित्यला बघून सीमा खूप खुश होती,

" राजाला भेटायला जावू या ",.. आदित्य

हो..

सीमाला माहिती होत आज माझा मूड ठीक नव्हता म्हणून माझ्या साठी हा आदित्य वेळ काढतो आहे, मुद्दाम आई कडे घेवून जातो आहे हा मला,

सीमाने आदित्यचा हात हातात घेतल,.." खूप thank you तू खरच मला खूप समजून घेतोस" ,

"पुरे आता समोर ड्रायवर काका आहेत ",.. आदित्य

" म्हणून काल बोलत होते ना मी की तिकडे सरकून बस तेव्हा नाही ऐकल होत माझ",.. सीमा

"घरी सांगून दे आपण आई कडे जातो आहे ते",.. आदित्यने आक्कांना फोन केला, आम्ही सीमाच्या आई कडे जातो आहोत रात्री येवू जेवून
......

" प्रशांत मी निघतो घरी मामा पूजा आहेत, तू येतोस का चल ना",... विक्रम

" नको विक्रम तू जा घरी, मी जरा पवार साहेबांनी गाठणार आहे, थोड्या वेळाने निघतो ",... प्रशांत

विक्रम घरी आला, पूजा मामी आत आराम करत होते, काका मामा कुठे तरी गेलेले होते,

"आई शेजारी आबा आक्कांना बोलवून घे जरा वेळ पूजा भेटेल त्यांना, त्यांनी जस केल तस आपण नको करायला",... विक्रमला वाटत होत सीमा येईल आक्कां सोबत

हो बरोबर आहे....

काकूंनी आबा आक्कांना रात्री साठी जेवायच आमंत्रण दिल, मामांनी गुरुजी कडून जवळचे दोन तीन मुहूर्त काढून आणले होते

संध्याकाळी आबा आक्का तिकडे गेले, विक्रम बघत होता आदित्य सीमा नाही आले का? पण त्याने तस विचारल नाही, सगळ्यांच्या संमतीने एक मुहूर्त काढला,
........

आदित्य सीमा घरी गेले, मीना ताई समोर बसल्या होत्या, राजा अजून आलेला नव्हता, सीमा जावून आईला भेटली, खूप खूप छान वाटत होत तिला, आज दिवस भर विक्रम मुळे खूप त्रास झाला होता, तो दूर झाला, आई आम्ही जेवून जावू वापस

"हो काय करू या स्वयंपाक? कोथिंबीर वड्या करू का? , तुम्हाला कोणती भाजी आवडते आदित्य?",... मीना ताई

"काहीही कर आई ते सगळ्या भाज्या खातात",... सीमा हसत होती

आदित्यचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता,... "करतो आता अॅडजेस्ट, सासरी आहे मी शेवटी, काय सांगणार कोणाला आता" ,

मीना ताई आत आवरत होत्या, आदित्य सीमा कडे बघत होता

" काय आता आदित्य? नुसत बघत बसू नकोस इकडे तिकडे, तुला काम ही कराव लागेल , नुसत समोर बसुन टीव्ही बघू नको, जरा आत जावून आईला मदत कर" ,.. सीमा

"मी काय करू पण ?,.. अस कस सीमा तू ये ना",... आदित्य

" नाही आदित्य मला थोड काम आहे मी बाहेर जाते आहे ",.. सीमा

" कुठे? कोणाकडे? ",.. आदित्य

"मी बाजूच्या वहिनीं कडे जाते आहे",.. सीमा

" मी येवू का सोबत ",.. आदित्य

नाही आदित्य...

राजा आला

" बर झाल आता काही प्रॉब्लेम नाही राजा मी बसतो आरामात ",.. आदित्य

" नाही राजा... आदित्य मदत करा आईला ",.. राजा हसत होता तो आत गेला

"सीमा इकडे ये काय अस?",.. आदित्य

"मला कस करतो तू तुमच्या घरी, खाली जा काम कर, आता तू कर की इकडे थोड फार काम ",.. सीमा

"मला काही सुचत नाही ग",.. आदित्य

" मलाही अस होत तुमच्या कडे, तू ऐकतो का तिकडे, किती काम देतोस ",.. सीमा

"पण मी सपोर्ट करतो तुला" ,...आदित्यने पुढे येवून सीमाचा हात धरला

आदित्य... सोड ना... सीमा काही न बोलता हात सोडवून घेत होती, आत आई होती, राजा होता, आदित्य हसत होता

" आदित्य हात सोड ",.. सीमा हळूच बोलली,

नाही ...

" आदित्य तू मला असा त्रास देणार का, आत सगळे आहेत आदित्य",.. सीमा विनवण्या करत होती

"मग तू मला अस बोलू नकोस, मला सुचत नाही इथे, काम देवू नकोस मला प्लीज, नाहीतर मी हात सोडणार नाही, मग कोणीही येवू दे मला फरक पडत नाही ",.. आदित्य

सीमाला माहिती होत आदित्य हट्टी आहे..." ठीक आहे आदित्य, राहू दे तू काम, आधी माझा हात सोड, राजा येईल" ,...

आदित्य ने हात सोडला

" इथे ही माझ राज्य आहे काय... घाबरून रहायच मला सीमा",... आदित्य

" बर ठीक आहे आदित्य, मी नंतर बघेन तुझ्या कडे ",.. सीमा

"आई मी येते पाच मिनिटात मग करते मदत ",..

हो ये लगेच, सीमा बाजूच्या वहिनींना भेटायला गेली, ते काका आदित्यला बोलवायला आले, दोघ तिकडे जरा वेळ बसुन वापस आले

सीमाने पोळ्या करायला घेतल्या, आदित्य आत आला,
... " हे काय बघतो मी सीमा? तुला पोळ्या येतात?" ,

मीना ताई हसत होत्या, म्हणजे काय? स्वयंपाकात हुशार आहे माझी मुलगी,

"वास छान येतो पोळ्यांच्या, गोल ही येतात म्हणजे सीमाला खरच येतात पोळ्या",.. आदित्य कौतुकाने बघत होता, स्वयंपाक झाला होता,

आदित्य राजा नुसते बसलेले होते ,तुम्ही दोघांनी जेवणाची तयारी करा आता,

"राजा तुझी ताई बघितल का माझा किती छळ करते तिला सांग दोन शब्द",... आदित्य

" आदित्य तू माझे गार्‍हाणं करतो आहेस का ",.. सीमा

" हो मग काय करू? राजा समजून घेवू शकतो, तुझ्या सोबत तो लहानपणी पासून होता",.. आदित्य

राजा फार हसत होता,

"तुझी ताई मारते ना तुला ",.. आदित्य

" हो खूप मारते ",.. राजा

" कुठे राजा? आज कुठे मारल मी तुला? ",... सीमा

" दर वेळी करते तू हात मोकळा",.. राजा

" हो तो माझा जन्म सिद्ध अधिकार आहे ",. सीमा

खूप छान झाला होता स्वयंपाक मस्त जेवण झाल, आदित्य या सगळ्यात मिसळून गेला होता,
.....

विक्रम कडे लग्न ठरल्याची तारीख जाहीर झाली, पूजा विक्रमने सगळ्यांच्या पाया पडल्या, सीमा आदित्य कुठे आहेत? आजी नाही आल्या का? ,

" सीमा आदित्य तिच्या आई कडे गेले आता येतीलच ते",.. आक्का

काका जावून आजींना घेवून आले, जेवण झाले

"उद्या तुम्ही आमच्या कडे या चहा नाश्त्याला",.. आबा

"आम्ही निघतोय उद्या",.. मामा

"मग सकाळी सकाळी या तिकडून चहा नाश्ता करून निघा",...आबा

"पण एवढ्या सकाळी?",.. मामा

"काही प्रॉब्लेम नाही, सगळे उठतात ऑफिस असत",.. आबा

ठीक आहे

आक्का आबा आजी घरी आले,
......

सीमा आदित्य निघाले, आता कार आदित्य चालवत होता, ड्रायवर काका संध्याकाळी घरी गेले होते

" आदित्य खूप thank you खूप छान वाटले आई भेटली तर " ,... सीमा

" तुला छान वाटल ग पण मला किती ओरडली तू तिकडे",.. आदित्य

" तू कुठे ऐकल काही पण माझ आदित्य, माझा हात धरून ठेवला ",... सीमा

सॉरी,

"मी आता अस करणार तुला सगळ्यां समोर मिठी मारणार",.. सीमा

"अरे वा माझी काही हरकत नाही सीमा, नवर्‍याने खुश ठेवल आज तुला, आता तू काय करणार नवर्‍या साठी ?",... आदित्य

सीमा हसत होती, तिला समजल आदित्य बरोबर याच विषयावर येतो,... बघु

" अरे बघु म्हणजे काय, माझा काही विचार कर ",.. आदित्य

" तू मला त्रास देतोस आदित्य, नीट वागतोस का तू? ",.. सीमा

" काय केल मी? ",.. आदित्य

" माझा हात धरला कोणी पाहिल असत म्हणजे? ",.. सीमा

"पाहिल तर नाही ना",.. आदित्य

"तू अस मला त्रास देवून तुझ काम काढून घेतोस आदित्य , मी पण नाही सपोर्ट करणार, मी दमली आहे आता मस्त आराम करणार ",... सीमा

" याला काय अर्थ आहे, नेक्स्ट टाइम नाही घेवून येणार आई कडे ",.. आदित्य

" ठीक आहे मी माझी माझी येईन",.. सीमा

" मला विचारल्या शिवाय तू जात नाही कुठे , मला माहिती आहे, मी नवरा आहे तुझा, तेव्हा मी नाही म्हणेन सगळ्यां समोर ",... आदित्य

" काहीही, आदित्य काय हे ",.. सीमा

" मग मी म्हणेन तस वागायच",.. आदित्य

ठीक आहे

सीमा आज सकाळ पासून नाराज होती, आता कुठे छान हसरी झाली होती ती, आधी सारखी.. आदित्य उगीच तीच नाव घेत होता, दोघ हसत गप्पा करत घरी येत होते ,

" किती अंधार आहे बाजूला आदित्य ",.. सीमा

आदित्यने सीमाचा हात हातात घेतला, मी आहे,

" सीमा हो ना मग ",.. आदित्य

आदित्य...

"मी तुला उद्या ही घ्यायला येईल, मग आपण जावू फार्म हाऊसवर फिरायला ",.. आदित्य

"तिकडे नको आदित्य",.. सीमा खूप हसत होती

"का आता घाबरलीस का? ",.. आदित्य

"आदित्य तुला नाही घाबरत मी आता ",.. सीमा

"हो का घरी गेल्यावर बघतो जरा",.. आदित्य
....

🎭 Series Post

View all