नवी आशा जगण्याची... भाग 18

सीमा तिच्या विचारात होती, आता कुठे शाळा सुरू होणार आहे, मला शाळेत लक्ष द्याव लागेल, मुलांना छान शिकवायच, लायब्ररीत जावून बसू आज, वाचन वाढवायला पाहिजे, आता कुठलाही विचार करायचा नाही, फक्त मुल आणि मी... मी एक छान टीचर होणार आहे


नवी आशा जगण्याची... भाग 18

©️®️शिल्पा सुतार
........

सीमा घरात आली, काय सुरु आहे हे माझ्या सोबत काय माहिती, आता हा मुलगा का मागे लागला आहे? आधी सगळे मुल मला पसंत करतात नंतर घरच्यांच ऐकुन नकार देतात, मला त्रास होतो अस मागे येणार्‍या मुलांमुळे, या पुढे कोणाकडे लक्ष द्यायच नाही, आपण भल की आपल काम भल..

"आला होता का ग तो मुलगा आज पैसे मागायला? ",.... मीना ताई

"नाही आई नाही आला तो आज",.. सीमा

"काय बाई एक एक, काल किती घाई झाली होती त्याला पैशाची आज पत्ता नाही",.. मीना ताई

सीमा काही बोलली नाही..

"कोण आहे ग तो मुलगा? तु काय विचार करते आहेस सीमा?",.. मीना ताई

"आई निशा बोलते आहे त्याला पैशाची गरज नसेल तो माझ्याशी बोलायला आला असेल का?, काय उद्देश असेल त्याचा? ",.. सीमा

" तुला काय वाटत त्याच्या विषयी?, कसा आहे तो मुलगा? ",.. मीना ताई

"आई मला काही वाटत नाही, उगीच त्रास आहे हा ",.. सीमा

" का अस बोलतेस बेटा, जिवन आहे पुढे जाव लागत ना, जुन्या गोष्टी झाल्या तश्या नेहमीच अस होईल अस नाही ना बेटा, चांगले लोक आहेत ना या जगात, मला नाही माहिती तो मुलगा कोण आहे, त्याचा काय विचार आहे, पण तू नेहमी घाबरलेली का असतेस? , तुझा लग्नाकडे बघायचा दृष्टिकोन बदल सीमा, नवीन सुरुवात कर बेटा, घाबरू नको ग, आव्हान घेत चल, आम्ही आहोत ना तुझ्या सोबत ",... मीना ताई

" आई पण तुला महिती आहे ना मी दत्तक घेतले मुलगी आहे, शिवाय हुंड्या साठी माझ सदोदित लग्न मोडत, मला त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा, मला नको आता काही, लग्न स्थळ वगैरे होईल, जेव्हा व्हायच तेव्हा होईल आता माझ लग्न, मी अशी खुश आहे तुझ्या सोबत राजा सोबत",.. सीमा

सीमा आवरायला आत गेली, मीना ताई काळजीत होत्या कस समजावाव आता या मुलीला,

जरा वेळाने राजा घरी आला,..." काय झालं सीमाताई? आला नाही का तो मुलगा पैसे घ्यायला? ",

"बघ ना नाही आला तो, आज निशा रेडी होती त्याच्याशी बोलायला ",.. सीमा

"हे घे तुला पाच हजार रुपये, उद्या जर तो मुलगा दिसला तर देऊन टाका त्याला हे पैसे ",.. राजा

"म्हणजे तू नाही येणार का राजा मदतीला ",.. सीमा

" शाळा आणि ऑफिसमध्ये बरच अंतर आहे एवढ्या वेळ तो मुलगा थांबला नाही तर असुदे तुझ्याजवळ पैसे तसंच तुला तो मुलगा दिसला तर मला पटकन मेसेज करून दे, मी लगेच येईन ",.. राजा

" हो चालेल",.. सीमाने सगळे पैसे नीट ठेवले
....

विक्रम आणि मित्रांची मिटिंग सुरु होती ,

"माझ्याकडे नाही आहे येवढे पैसे, काय कराव आता? त्या आदित्यच्या कंपनीत कस काय पैसे भरणार आहोत आपण? कोणी उधार देता का मला? ",...

" आमच्या सगळ्यांची अवस्था तीच आहे आता काय करावं? कुठे लोन मिळतं आहे का ते बघायचं का?",... विक्रम

आदित्य फॉरेनला होता तेच बर होत...

हो ना, तेव्हा आपण त्या आधीच्या अकाउंट मॅनेजरला छान हाताशी धरल होत

आता खूप भास मारतो तो आदित्य, एकदा धडा शिकवला पाहिजे त्याला

" नाही रे हे अस नको, माझा भाऊ आहे तो लांब थांबा त्याच्या पासून",.. विक्रम
........

सचिन आत मध्ये आला,... "तू आज गेला नाही का तिकडे सीमाला भेटायला शाळेजवळ? ",..

" नाही इकडे विक्रम आला होता आणि तसंही आज मी जाणार नव्हतो कारण सिमाने तिकडे सगळ्यांना गोळा करून ठेवलं तिची मैत्रीण वगैरे, सगळेजण मिळून माझ्या वर हल्ला करणार होते म्हणून मी गेलो नाही ",... आदित्य

" बापरे कठीण आहे हे तुला कसं काय समजलं? , का त्रास देतो आमच्या वाहिनीला ",... सचिन

" मी शाळेत फोन केला होता ना, तेव्हा तिच्या मैत्रिणीने मला धमकी दिली बोलली की तु तुझी खराब झालेली गाडी घेऊन ये आम्ही स्वतः परीक्षण करू गाडीच मग पैसे मिळतील ",... आदित्य

" तुमचा मॅटर अजून वाढतच चालला आहे, किती पैसे मागितले ",.. सचिन

" पाच हजार , आणि सीमाला माहिती नव्हत आपला पगार पाच तारखेला होतो ते ",... आदित्य हसत होता

" नवीन जॉईन झाली ती स्वतःच्या शाळेत, मालकीण बाई",... सचिन

" हो ना ",.. आदित्य छान हसत होता, तिने हो म्हणायला पाहिजे पण सचिन..

"तुला कोण नाही म्हणेल ",... सचिन

" अस काही नाही खूप स्वाभिमानी आहे ती",... आदित्य

"आता पुढचा काय प्लॅन आहे?",.. सचिन

" काही नाही उद्या सकाळी मी तिला भेटायला जाणार आहे, सकाळी नसेल तिच्या सोबत कोणी",.. आदित्य

"चालू द्या तुमचं मी निघतो आहे घरी आता",... सचिन

" चल मी पण येतो",.. आदित्य

आदित्य सचिन घरी जायला निघाले

" आदित्य एक मिनिट थोडे दिवस असे एकट फिरू नको विक्रम आणि त्याच्या मित्रांची मला भीती वाटते ",.. सचिन

" अरे काय होणार आहे एवढ्याशा पैशासाठी कोणी हल्ला करत नाही ",... आदित्य

" एवढेसे पैसे तुझ्या साठी आहेत, त्या लोकांसाठी ती रक्कम जास्त असेल आदित्य",... सचिन

" मला काहीही होणार नाही",.. आदित्य

" तरीसुद्धा तुला माझं ऐकाव लागेल",... सचिन

" मग काय ठरवलं आहेस तू ",.. आदित्य

" तुझ्यासाठी बॉडी गार्ड नेमला आहे तो तुझ्या सोबत राहील",.. सचिन

" आता हे काय? ",.. आदित्य

" कंपल्सरी आहे ",.. सचिन

" मग तुला हि धोका आहे, पवार साहेबांना, राजालाही धोका आहे, तुमच्या सगळ्यांसाठी पण बॉडीगार्ड मागवुन घ्या",... आदित्य

"आम्हाला काही विशेष धोका नाही, जर आम्हाला कोणी भेटायला आलं तर मी सरळ सांगतो की हा सगळा आदित्यचा निर्णय आहे ",.. सचिन

" अरे मग छान आहे ना तुम्ही सगळे जण जे झालं ते सगळं माझ्या अंगावर लोटतात",.. आदित्य

" म्हणूनच तुला बॉडीगार्ड जरुरी आहे तो येईलच आता दहा-पंधरा मिनिटात",... सचिन

"लगेच बघितलास का तू",.. आदित्य

"हो सकाळ पासून सांगितलं आहे त्या लोकांना, त्यांनी पाच नंतर पाठवलं त्याला",.. सचिन

" ठीक आहे पण ऐक ना सचिन आता काय बॉडीगार्डला सगळीकडे घेऊन सोबत जावे लागेल का? जर मला सिमाला भेटायला जायचं असेल तर मी कसा जाणार",.. आदित्य

"तो तुला डिस्टर्ब करणार नाही, तू काळजी करू नकोस या लोकांच्या ट्रेनिंग झालेलं असतं ते उगाच खाजगी गोष्टीत नाक खुपसत नाहीत, फक्त तुझ्या सुरक्षिततेकडे लक्ष देतील",... सचिन

" ठीक आहे तू म्हणशील तसं",... आदित्य

बॉडी गार्ड सुरेश आत आला सचिनने ओळख करून दिली, ते दोघ घरी जायला निघाले

आबा घरी आदित्यची वाट बघत होते, आक्का बाजूला बसल्या होत्या

"आज उशीर झाला घरी यायला",... आबा

"हो खूप मीटिंग होत्या, येतो मी आवरून दोन मिनिटात",...आदित्य

आदित्य जेवायला आला

"काय झाल आज ऑफिस मध्ये?",... आबा

"आबा आठ फ्रॉड समोर आले आहेत, या लोकांनी जास्तीचे पैसे घेतले आहेत, त्यांना नोटिस दिल्या आहेत",...आदित्य

" विक्रम आहे का त्यात?",.. आबा

"हो... त्याने तुम्हाला विचारल या बाबतीत तर सांगा आदित्य काही सांगत नाही घरी, तुम्ही यात पडू नका",... आदित्य

" बरोबर आहे स्ट्रिक्ट वातावरण हव जरा कंपनीत, हे लोक असे करतात, त्यांचा ग्रुप आहे एक म्हणूनच मी आधीच्या अकाउंट मॅनेजरला कामावरून काढून टाकलं होतं",... आबा

" आता जे नवीन अकाउंट मॅनेजर आहे ना पवार साहेब, ते खूप चांगले आहेत आणि त्याचं असिस्टंट राजा हि खूप चांगला आहे हुशार आहे ",... आदित्य

" काही धोका आहे का रे यात? ",.. आबा

नाही आबा..

" मग बॉडी गार्ड का? ",... आबा

" हो ना आदित्य आम्हाला केव्हाची काळजी वाटते आहे",.. आक्का

" तुम्हाला कोण सांगत सगळ्या बातम्या? ",.. आदित्य

" सिक्युरिटी गार्ड ने सांगितले गेटवरच ",...आबा

"तो सचिन ऐकत नाही आहे तो म्हणतो आहे की बॉडीगार्ड ठेवणे गरजेचे आहे म्हणून मी परवानगी दिली",... आदित्य

" चांगलं केलं ना काही हरकत नाही आहे नाहीतरी तुम्ही लोकं खूप रिस्की काम करत आहात ",... आबा

"कदम साहेब का बर आले होते सकाळी? काय ठरलं तुमच्या लोकांचं?",... आदित्य

" हो बरं झालं तू विषय काढला, साखर कारखान्याच्या कमिटी मेंबर साठी इलेक्शन आहे, त्यांचं म्हणणं आहे मी पण त्यासाठी अर्ज भरावा, तुला काय वाटत आहे त्या गोष्टीच",... आबा उत्साही होते हे बोलतांना

" काही हरकत नाही तुम्हाला वेळ आहे ना एवढ्या कामासाठी?, तुम्ही तर ते काम सहज करू शकतात, एवढे हुशार आहात तुम्ही आबा, करायला काही हरकत नाही आणि तुमच्या ओळखी पण भरपूर आहेत सगळीकडे",... आदित्य

" अरे पण खर्च आहे सुरुवातीला, इलेक्शन वगैरे ",.. आबा

" असू द्या तुम्ही काही कमी कमवून ठेवल का? किती मेहनत घेतली पूर्वी पासून, होवु द्या खर्च",.. आदित्य

" लोक घ्यावे लागतील कामा साठी ",.. आबा

" मी एक मॅनेजर उद्या पाठवून देतो घरी तुम्ही त्याला द्या सगळे काम",... आदित्य

"मी येतो उद्या थोड्या वेळ ऑफिस मध्ये दुपारनंतर तेव्हा ठरवु",... आबा

चालेल..
.......

सीमाचं लवकर आवरलं सकाळी, राजाने दिलेले पाच हजार रुपये आहे की नाही हे तिने पर्समध्ये परत एकदा बघितले,.... "आई मी निघते ग",

"सगळ्या गोष्टीची खूप काळजी करत बसू नको सीमा, नीट जा, डब्बा घेतला का",... मीना ताई

" नाही करत काळजी मी आई",.. सीमा घरातुन निघाली, आज राजा आधीच गेलेला होता ऑफिसमध्ये, त्याला खूप काम होतं

सीमा बस स्टॉप वर आली, बस अजून आली नव्हती, ती विचार करत होती आदित्यचा, आज तो भेटला तर काय बोलायच,

आदित्य आला बस स्टॉप वर, बॉडी गार्ड सुरेश ड्रायवर गाडीत होते,

सीमा तिच्या विचारात होती, आता कुठे शाळा सुरू होणार आहे, मला शाळेत लक्ष द्याव लागेल, मुलांना छान शिकवायच, लायब्ररीत जावून बसू आज, वाचन वाढवायला पाहिजे, आता कुठलाही विचार करायचा नाही, फक्त मुल आणि मी... मी एक छान टीचर होणार आहे.

आज साडीत खूप मस्त दिसत होती सीमा, लांब केसांची तिने वेणी घातली होती, उगीच ती वेणी पुढे मागे घेत होती, अशी विचार करतांना.... खूपच सुंदर दिसते ही

हाय सीमा...

सीमा दचकली, तिने वळून बघितल, तोच होता तो, आज सकाळी कसा काय इथे, म्हणजे कोणी नसतांना हाच येतो मला भेटायला, निशा बोलते ते बरोबर आहे, बापरे आता काय करू मी, काय वैताग आहे

"तुला भेटायला आलो मी सीमा",... आदित्य

"दिसतय ते मला, तुमचे पैसे आहेत माझ्या कडे मी देते लगेच, ते घ्या आणि जा, या पुढे मला भेटायला येत नका जाऊ",... सीमा

"थांब, एवढी काय घाई आहे" ,... आदित्य

" काल का नाही आलात तुम्ही संध्याकाळी? ",... सीमा

" तू वाट बघत होती का माझी? ",... आदित्य

" काहीही काय, तुम्हाला अर्जंट पैसे हवे होते ना म्हणून म्हटलं मी",... सीमा

"मला नको पैसे थोड बोलायच होत तुझ्याशी महत्वाच",.. आदित्य

"कार झाली का ठीक? आता का नको पैसे?, काल पर्यंत खूप पैसे पैसे करत होता तुम्ही",... सीमा

" ऐक ना सीमा मी सोडू का तुला शाळे पर्यंत गाडीने, जातांना बोलू आपण ",.. आदित्य

" का? मी जाईन माझी माझी",.. सीमा

" मला बोलायच आहे तुझ्याशी ",.. आदित्य

बोला..

इथे

हो...

" तू मला अहो बोलू नको",... आदित्य

" का पण ऐकेरी? आपण ओळखतो का एकमेकांना अरे कारे करायला? ",... सीमा

बस आली,...

" सीमा ऐक ना प्लीज, मी सोडतो तुला शाळेत थांब ना ",... आदित्य

" ते शक्य नाही ",.. सीमा

सीमा बस मध्ये चढली,....

🎭 Series Post

View all