नवी आशा जगण्याची... भाग 17

अरे मग आम्ही जसा रीपोर्ट तयार केला तसा रीपोर्ट बनवून घे, इकडे सबमिट कर, काय प्रॉब्लेम आहे, ऑडिट सुरू आहे, आम्हाला हवा आहे पूर्ण हिशोब


नवी आशा जगण्याची... भाग 17

©️®️शिल्पा सुतार
........

सकाळी सीमाच आवरल तिला आदित्यच टेंशन आल होत,... "राजा अरे तू येशील का आज संध्याकाळी शाळेजवळ, तो मुलगा आला तर पैसे मागायला" ,

"हो येईल मी, तस तू मला फोन कर पाच वाजता , आणि जरी मी नसलो तरी त्याला सांग आम्ही देवून टाकू पैसे",... राजा

"हो.. मी निघते आई",.. सीमा

सीमा गेली मीना ताई काळजीत होत्या... "कोण असेल तो मुलगा राजा? काही प्रॉब्लेम तर नाही ना? ",..

" आई तू उगीच काळजी करतेस, मी आहे ना बघतो काय करता येईल, सगळे ओळखीचे आहेत माझे त्या गावत ",.... राजा

" मोठे लोक ते सांभाळून बोल, नाहीतरी व्हायचे भांडण ",... मीना ताई

"हो आई, तू काळजी करू नकोस, येतो मी ",.. राजा ऑफिसला आला

आदित्य नाश्त्याला आला,..." आबा कुठे आहेत?, झाला का त्यांच्या नाश्ता? ",

" ते काय त्यांचा जनता दरबार भरला आहे ",.. आक्का

" बापरे एवढे लोक आले भेटायला, आबा इलेक्शनला उभ रहाता की काय? ",.. आदित्य

" काय माहिती? पुढे साखर कारखान्याच इलेक्शन आहे , कमिटी बोर्ड वर घेतात की काय यांना काय माहिती ",.. आक्का

आदित्य आक्का दोघ हसत होते...

" पण काहीही म्हणा आबांचा जनसमुदाय दांडगा आहे, किती मानतात लोक त्यांना, कोणता ही मोठा प्रॉब्लेम असो सोडवतात ते , म्हणून लोकांचा एवढा विश्वास आहे त्यांच्यावर ",... आदित्य

हो ना.. आक्काच्या डोळ्यात कौतुक होत

नाश्त्या झाला, आदित्य आबांना भेटायला गेला,

" मी निघतो ऑफिसला जायला",... आदित्य

आबांचे मित्र बाजूच्या गावचे मोठे जमीनदार साखर कारखाना त्यांच्या अंडर होता असे कदम अण्णा भेटायला आले होते, दोघ चहा घेत होते आदित्य जावून त्यांच्या पाया पडला, दोघ खूप महत्त्वाच्या विषयावर बोलत होते

"मुलगा छान हाताशी आला आहे देशमुख साहेब",.. कदम

आबा छान हसत होते, आदित्य लाजला होता, माझाही मुलगा छान काम करतो आता, सगळ तोच बघतो,

" हो ना, मी आता आरामात रहाणार आहे, सगळ याच्यावर सोपवल" ,... आबा

"या एकदा तुम्ही सगळे आमच्या कडे",.. कदम

जरूर..

"मी येतो",.. आदित्य ऑफिसला निघून गेला

सचिन फोन वर होता, आदित्य केबिन मध्ये आला, सीमा आली असेल का शाळेत... करून बघू का शाळेत फोन..... सकाळी तिच्याशी बोलल म्हणजे दिवस छान जाईल

सीमा शाळेत पोहोचली, निशा आलेली होती, आज ट्रेनिंगचा शेवटचा दिवस होता, तीन वाजे पर्यंत परीक्षा होती, नंतर विशेष काम नव्हत,

निशा कामात होती,

"निशा ऐक ना एक सांगायच होत",... सीमा

" बोल ना, काय झालं, काही सिरियस आहे का?",.. निशा

"अग काल घरी जातांना तो मुलगा भेटला होता त्याच्या गाडीसमोर मी गेली होती अचानक त्या दिवशी तो",... सीमा

"कोण तो कार वाला का? का आला होता तो?",.. निशा

"पैसे मागत होता",.. सीमा

"कसले पैसे ? ",... निशा

"म्हणे कार खराब झाली त्याची माझ सामान पडून ",... सीमा

" कार खराब झाली? म्हणजे एवढी कार असतांना अस करतो तो, मला गडबड वाटते आहे, अजून काही बोलला का तो तुला ",... निशा

" नाही काही नाही फक्त पैसे दे अस करतोय तो, मला तेच वाटल तो खोट बोलतो आहे ",.. सीमा

"तुझ्या मागे तर नाही ना लागला तो? ",... निशा

म्हणजे..

अग प्रेम बिम...

" काहीही काय ग निशा, तो सिरियस आहे त्याला पैसे हवे आहेत, सारख पैसे दे अस करत होता तो",... सीमा

" मग कशाला उगीच नेमकी मी नसतांना तो बोलायला येईल तुझ्याशी? आज येणार आहे का तो पैसे मागायला? बघू जरा त्याच्या कडे, नेमकी मी काल तुझ्या सोबत नव्हती तर चान्स मारला त्याने तुझ्याशी बोलायचा ",... निशा

सीमा जागेवर जावून बसली, बरोबर बोलते आहे निशा, तो माझ्याशी हसुन बोलत होता, काय प्रकरण आहे हे? , त्याला मी आवडते की काय? , बापरे आता काय कराव, कोण आहे तो गाडी मोठी होती त्याची, त्याला मी माझ नाव ही सांगितल काय करू आता?

तेवढ्यात फोन वाजला टेबल वरचा, मॅडमने उचलला... "सीमा तुझा फोन आहे",..

"माझा फोन? असा शाळेत कोण असेल? राजा असता तर मोबाईल वर केला असता? तो मुलगा तर नाही ना.. बापरे मॅडम तिथे आहेत काय करू?",...

ती गेली टेबल जवळ फोन उचलला,... "हॅलो कोण बोलतय? ",...

"हॅलो सीमा.. मी बोलतोय काल भेटलो ना आपण",... आदित्य

मॅडम सीमा कडे बघत होत्या, चिडता ही येत नव्हत तिला...

" काय नाव तुमच? ",.. सीमा

"आदित्यने मुद्दाम सांगितल नाही ",...

" तुम्ही शाळेत का फोन केला? प्लीज अस करु नका? मी तुमचे पैसे द्यायला तयार आहे ",... सीमा एकदम हळु आवजत बोलत होती

" केव्हा भेटताय मग? ",.. आदित्य

"केव्हा ही या",... सीमा

मॅडम बाहेर गेल्या...

"तुम्ही मला इथे कसा काय फोन केला?",.. सीमा

"अरे एकदम बदल, एकदम चिडलीस का? ",.. आदित्य

" हो आमच्या मॅडम होत्या समोर, त्या आता बाहेर गेल्या.. या पुढे इथे फोन करू नका",.. सीमा

"मग तुमचा मोबाईल नंबर द्या",.. आदित्य

नाही..

" मग मी पैसे मागायला इथे फोन करणार ना ",.. आदित्य

" काही गरजच नाही दर पाच मिनिटाला पैसे मागायची, मी हो बोलले.. देते पैसे",... सीमा

"नंबर दे ना तुझा प्लीज ",... आदित्य

" हे बघा मी एक तारखेला तुमचे पैसे देते पगार झाल्यावर ",.. सीमा

"पण पगार पाच तारखेला होतो पाहिल्या पासून आपल्या कडचा",.... आदित्य

" हो का... मला माहिती नव्हत मग पाच तारखेला देते पैसे",.. सीमा

" ठीक आहे तस येतो मी आज भेटायला ",.. आदित्य

" कश्याला आता ?",... तिने निशाला हात दिला, निशा पुढे आली... तिने फोन घेतला

" कोण बोलतय? काय काम आहे तुमच सीमा कडे? काय पैसे पैसे करताय हो? मुद्दाम त्रास देताय तुम्ही, आज तुमची खराब झालेली गाडी घेवून या, आम्ही तपासणी करू, अहो ऐकताय ना.. बोला काही तरी",... निशा

" तुम्ही बॉडी गार्ड आहात का सीमाच्या? ",... आदित्य

"निशाला सुचल नाही काही.. मी मैत्रीण आहे तिची",... निशा

" मग त्यांना मला भेटायला पाठवून द्या आज संध्याकाळी ",.. आदित्य

" हो का बर सांगते तिला... आज या मग, सीमा ही भेटेन आणि तुमचे पैसे ही ",.. निशा

"अग नको भांडू निशा",... सीमाने फोन ठेवून दिला

" हा तो गाडी वाला बराच आगाऊ आहे, मागे लागलेला दिसतो आहे तुझ्या, आज सरळ करू त्याला ",... निशा रागात होती

" हो ना ग मॅडमला समजल तर? नवीन नौकरी आहे माझी, बापरे शाळेत का फोन केला त्याने? , पैसे देवून देवू त्याचे लवकर ",.. सीमा

"घाबरू नको ग तू सीमा, असे बरेच मुल सरळ केले मी",.. निशा

"बघ ना, आज येतो म्हणे संध्याकाळी, मला नाही भेटायच त्याला ",.. सीमा

"येवू दे त्याला चांगल बघू त्याच्या कडे, तू काळजी करू नकोस ",.. निशा

तिने राजाला मेसेज केला,... "आता मला शाळेत फोन केला होता त्याने, तुझ्या कडे आहेत का पाच हजार रुपये? , घेवून ये ते सोबत देवून टाकू त्यांचे ",..

" ठीक आहे... नाव काय त्याच? ",.. राजा

विसरली विचारायच

" काय तू पण, येवु दे त्याला संध्याकाळी बघु जरा ",.. राजा

सीमाला आता बर वाटत होत, एकदाचे पैसे देवून टाकू त्याचे

सचिन, पवार साहेब आत आले,...

" सर सगळे रीपोर्ट बनवून झाले आहेत एकदा बघता का",.. पवार

ठीक आहे...

पवार साहेबांनी इंटर काॅमवरून राजाला आत बोलवलं,

राजा रीपोर्ट घेवून आला, सगळे रीपोर्ट आदित्य नीट बघत होता, आठ कंपनीत प्रॉब्लेम होता, त्यातल्या पाच विक्रमच्या मित्रांच्या होत्या,

" बापरे ह्या मित्रानी मिळून प्रॉब्लेम केला आहे तर , सगळ्यांना नोटिस द्या, हिशोबा व्यतिरिक्त जे पैसे जास्तीचे घेतलेले असतिल ते लगेच भरा म्हणा दोन दिवसात आपल्या अकाऊंट डिपार्टमेंटला, नाही तर लीगल एक्शन घेवू आम्ही आणि नंतर व्याज सकट पैसे द्यावे लागतील, द्या आपल्या वकिलांनी तर्फे नोटीस पाठवून ",... आदित्य

हो सर.. पवार सर, सचिन वकिलांकडे गेले

राजा केबिन मध्ये होता

" तू खूप छान काम केलेस हे, हिशोबात पक्का दिसतोस तू",... आदित्य

" सर पवार साहेबांकडून शिकतो आहे मी",... राजा

राजा बर्‍याच वेळ बोलत होता आदित्यशी, बाकीच्या कंपनी कडून वेळेवर पेमेंट मिळण्यासाठी काय काय करावे वगैरे बर्‍याच आयडिया होत्या त्याच्या कडे

"राजा खूप हुशार आहेस तू",.. आदित्य खुश होता त्याच्या कामावर, काही काही लोक अगदी प्रामाणिक पणे सदोदित चांगला काम करत राहतात कंपनी साठी, त्यातल्या एक राजा आहे, व्यवस्थित मुलगा, याचा पगार वाढवायला पाहिजे, नंतर घेतो याचे सचिन कडून डिटेल्स

"सर मी निघतो आता थोड काम आहे",.. राजा

जावून बघु का शाळेजवळ कोण मुलगा त्रास देतो आहे सीमा ताईला? काय कटकट आहे, माझी एवढी साधी बहीण, जातांना पैसे काढून घेवू ए टि एम मधुन, आधी फोन करून बघु सीमा ताईला
........

वकील विक्रमच्या आणि इतर कंपनीत नोटिस देवून आले, विक्रमचे मित्र त्याला फोन करत होते,... काय करता येईल बघ जरा विक्रम

विक्रम लगेच आदित्यच्या ऑफिस मध्ये आला, आदित्य कामात होता, त्याला बाहेर बसायला सांगितल, खूप चिडला होता तो आधीच, आदित्य फ्री झाला, ये रे विक्रम

"आदित्य काय हे? माझ्या कंपनीला नोटिस पाठवली आहे का तू?",... विक्रम

"मी नाही कंपनीने नोटिस दिली, काय मागितली ती माहिती देवून दे, काही प्रॉब्लेम नाही ना",... आदित्य

"अरे पण आपण आपल्यात हा प्रॉब्लेम सोडवला असता ना, नाही घेतले आम्ही जास्तीचे पैसे",... विक्रम

" अरे मग आम्ही जसा रीपोर्ट तयार केला तसा रीपोर्ट बनवून घे, इकडे सबमिट कर, काय प्रॉब्लेम आहे, ऑडिट सुरू आहे, आम्हाला हवा आहे पूर्ण हिशोब ",.. आदित्य

"तस नाही आदित्य तू अविश्वास दाखवला माझ्यावर ",... विक्रम

" यात विश्‍वास अविश्वास चा प्रश्न येत नाही, हा काही आपला घरचा हिशोब नाही विक्रम, प्लीज समजून घे, कामाच्या ठिकाणी काम",.... आदित्य

ठीक आहे,... विक्रम रागात होता

" आणि या विषयावर आबांशी बोलून उपयोग नाही, ऑफिसच्या गोष्टी घरी जावून बोलत नको जावुस तू",.. आदित्य

" ठीक आहे ",...विक्रम बाहेर आला, त्याचे मित्र आलेले होते बाहेर

" झाल का बोलण? काय म्हणतो तो आदित्य? ",...

"ऐकत नाही तो, फारच भास मारतो, खूप स्ट्रीक्ट वातावरण करून टाकल त्याने ",... विक्रम

" अकाऊंट डिपार्टमेंट मध्ये आहे का कोणी ओळखीच मॅनेज होण्या सारख? ",...

"सगळे लोक नवीन आहेत इथे आता",.. विक्रम

"तू तुझ्या काकांशी बोलून बघ ना",.. मित्र

"काही उपयोग नाही",... विक्रम

मग आता..

"जेवढा फरक असेल ज्याने त्याने आपले आपले पैसे भरून टाका नाही तर केस होईल नंतर ही द्यावे लागतील पैसे",.. विक्रम

"वैताग आहे हा",...
.......

शाळा सुटली, निशा सीमा घरी जायला निघाल्या, बाहेर आल्या, आज आदित्य नव्हता बाहेर

"दिसतो का कुठे तो मुलगा? ",.. निशा

"नाही ग",.. सीमा

"येणार होता ना तो आज? ",.. निशा

"म्हटला तर होता तो,पण दिसत नाही",....सीमा

" कुठे लपला असेल ",.. निशा

"कश्याला अस करेल तो, तुझ आपल काहीही निशा",.. सीमा

"तू कोणाच्या बाजूने आहेस माझ्या का त्या मुलाच्या? ",... निशा

" काहीही काय ग तुझ निशा",.. सीमा लाजली होती

" आता लाजतेस काय तू अलर्ट रहा",... निशा

राजाचा फोन आला,..ताई सुटली का शाळा?

हो..

"आला का तो मुलगा?",.. राजा

"नाही आला आज, मी जाते घरी",.. सीमा

"ठीक आहे बोलू संध्याकाळी",.. राजा

सीमा निशा बस स्टॉप वर आल्या,

" बहुतेक आज मी तुझ्या सोबत असल्या मुळे तो आला नसेल का?",.. निशा

" तू असल्याने काय होत? त्याला फक्त पैसे हवे होते ना",.. सीमा

" मला अस वाटतय तो मुलगा मुद्दाम तुझ्याशी बोलायला पैसे मागत असेल तर ",... निशा

माहिती नाही काही

विचार करत सीमा घरी आली, आज का नाही आला तो? , निशाला ती बोलली खरी की अस काही वाटत नाही की तो माझ्या मागे असेल, पण खरच कोण आहे तो मुलगा? , पण मला लग्न करायच नाही, माझ्या मागे येवून काही उपयोग नाही, मी नकार देईन, काय वैताग आहे....

🎭 Series Post

View all