नवी आशा जगण्याची... भाग 13

आदित्यला ती दिसली, त्या दिवसाची सुंदर मुलगी, जिचे स्वप्न तो दोन दिवसापासून बघत होता, खूप आनंद झाला होता त्याला, हीच आहे ती, खूप छान दिसत होती ती आज ही, त्या दिवसाची साडी, तीच धावपळ, अजिबात शांत नाही, काय होणार आहे माझ काय माहिती,


नवी आशा जगण्याची... भाग 13

©️®️शिल्पा सुतार
........

विक्रम ऑफिस मध्ये काम करत होता

"आज घरी जायचं नाही का विक्रम? ",... प्रकाश

त्याचे पण बरेच सहकारी त्याला सोबतीला ऑफिसमध्ये होते

" पैशाचा हिशोब करतो आहे, मुश्किल वाटत आहे सगळ, एक तर आता आपल्याला नवीन ऑर्डर मिळायला पाहिजे,नाहीतर काहीतरी व्हायला पाहिजे आपल्या बाजूने, त्या कंपनीतुन आपल पेमेंट मागायला लोक आले होते तिथे तुझी ओळख आहे का ? थोडे दिवस मिळत आहेत का पैसे वापस करायला ते बघ" ,... विक्रम

" नाही ओळखीच कोणी, काहीही बाकी नाही का आपली आबांकडे? " ,... प्रकाश

नाही ना.... विक्रम

" तिथला अकाउंटचा मॅनेजर मॅनेज करायला पाहिजे म्हणजे तो काढून देईल आपल्याला पाच सहा लाख रुपये, त्याबदल्यात त्याला थोडे पैसे द्यावे लागतील ",... प्रकाश

" पूर्वीचा अकाउंटंट होता असा, आता हा मनुष्य खूप प्रामाणिक आहे ",... विक्रम

" हो ते आहे म्हणा आणि सगळा व्यवहार तो आदित्य बघतो",.. प्रकाश

" काय करू या बोलून बघ एकदा त्या मॅनेजर शी",... विक्रम

हो...

" नको पण, त्याने जर आदित्यला सांगितलं तर तोंडावर पडायला होईल ",... विक्रम
......

आदित्य घरी आला कालचे पाहुणे अजून घरी होते, अनघा शरद गेलेले नव्हते बहुतेक ते लोक आदित्यच्या स्थळाबद्दलच बोलत होते दिवसभर

" आज विचारते मी आदित्यला की मुलगी बघायला कधी जायचं?",... अनघा

आदित्य वरून खाली आला, सगळे जेवायलाच बसत होती अनघाने विषय काढलाच,... "काय ठरल आहे मग आदित्य तुझं? ",..

कशाबद्दल...

" काल मी तुला सांगितलं होतं ना स्थळाबद्दल",... अनघा

" मला अजून थोडे दिवस थांबायची इच्छा आहे",.. आदित्य

" काही हरकत नाही पण बघून घ्यायला काय हरकत आहे",... अनघा

" नाही.. जर लगेच लग्न करायचं नाही तर मुलगी बघायला जायला मला आवडत नाही, मी सकाळी पण हेच सांगितल ना, सारख काय लग्न लग्न ",... आदित्य आता चिडला होता

" त्याला त्रास देवू नका कोणी, नाही तर मी ओरडेन आता ",... आबा

अनघा आक्कांकडे बघत होती... त्यांनी डोळ्याने सांगितलं मी बघते काय आहे ते.
.......

सीमा कडे ट्युशनला मुलं येऊन बसलेले होते, त्यांना अभ्यास देऊन सीमा आवरायला आत गेली

"सीमा आता हे ट्युशन्सच पुरे झालं ना, एक तर तू सहानंतर शाळेतून येते, त्यानंतर पण एक दोन तास ट्युशन घेतेस, खूप थकून जातेस तू आणि आमच्यासाठी पण वेळ नाही" ,.... मीना ताई

"काही करायच आहे का आई? बोल ना तसं",.. सीमा

"नाही ग, काही काम नाही, पण मला बोलायला मिळत नाही तुझ्याशी, तुझी धावपळ होते",... मीना ताई

"पण मुलांना ट्युशन घ्यायचं काम मी बरेच वर्ष झाली करते आहे, आई मला बरं वाटत आहे त्याने , आज पासून रात्री झोपण्याच्या आधी आपण मस्त गप्पा मारूया म्हणजे तुलाही माझ्यासोबत राहिल्या सारखं वाटेल आई ",... सीमा येवून मीना ताईंच्या गळ्यात पडली,

" ठीक आहे, हे छान जमत तुला सीमा, चल सांग पटकन काय करू स्वयंपाक",... मीनाताई खूष होत्या

" आई मी उद्या माझी मैत्रीण आहे शाळेतली निशा तिच्याकडे जाऊ का जरा वेळ? लगेच येईल एक दोन तासात ",... सीमा

" हो चालेल जा पण मग तुझ्या ट्युशन च काय?",...मीना ताई

"मी उद्या अभ्यास लिहून देते वहीवर, तू त्या मुलांना देशील का अभ्यास? म्हणजे मुलं अभ्यास करतील त्यांचा वेळ वाया जाणार नाही, तेवढ्यात मी येतेच",.. सीमा

" ठीक आहे आता मी पण टीचर बनते तुझ्या सारख ",... मीनाताई हसत होत्या

" तू आहेस ग टीचर, तू तर सगळ्यात हुशार आहे, मला आणि राजाला एवढ छान शिकवल आहेस तू, आमच्या सगळ्यांपेक्षा हुशारीने घर संसार केला आहे, आम्ही अजूनही तुझ्या कडून सगळ्या गोष्टी शिकतो आहे ",.. सीमा

"पुरे झाला आता कौतुक, उद्या डब्याला ला काय भाजी करायची ते सांगा",.. मीना ताई

" मेथीची भाजी कर ",... सीमा

"नाही मेथीची भाजी मुळीच करु नको आई",... राजा

" राजा मेथीची भाजी निशाने मागितलेली आहे",.. सीमा

"आता ही निशा कोण?",.. राजा

"माझी मैत्रीण आहे शाळेतली, तिच्याकडे मी उद्या जाणार आहे संध्याकाळी" ,... सीमा

" पण मी मेथीची भाजी खाणार नाही",... राजा

" भांडू नका, लहान आहात का आता तुम्ही? तुला दुसरी भाजी करते राजा, गवारची भाजी खाशील का तू? ",... मीना ताई

" हो खाईन ",.. राजा

"\"मग ती गवार इकडे आण निवडायला",.. मीना ताई

आदित्य सकाळी सकाळी जॉगिंगला गेला होता, त्याच फिक्स रुटीन होत, आज काहीही करून शाळेच्या गेट जवळ जायचं आहे पटकन, बस स्टॉप वर नको, कारण ती कुठून येईल माहिती नाही, तिचा विचार करून ही आदित्य ला फ्रेश वाटत होत, पटकन रूम मध्ये जाऊन आदित्यने आवरलं, खाली नाष्टा करायला आला तो, आज आक्का होत्या फक्त डायनिंग टेबलवर

"कुठे गेले आहेत सगळे अनघा ताई, जिजू, आबा",.. आदित्य

"आहेत सगळे फिरायला गेले होते ते, घरात आहेत, आवरत असतील, तू रागवणार नसशील तर, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं आदित्य",.. आक्का

" बोल ना आई, मी रागवतो का तुझ्यावर कधी? आई, तू मला खूप आवडते",.. आदित्य

" तुझं खरच मन नाही आहे का आता लग्नाचं? , की कोणी तरी आहे मनात ",... आक्का

"आई मला बोलायच आहे तुझ्याशी थोड, पण थोडा वेळ दे मला, कोणाला काही बोलू नको",.. आदित्य

"तू मला जे सांगतो ते मी कधी कोणाला सांगते का?, सांग ना पटकन ",... आक्का

" आता नाही आई दोन तीन दिवस दे ",... आदित्य

" थोड तर सांग ",.. आक्का

" नाही... एक दोन दिवस दे, अजुन कशात काही नाही ग माझं, पण माझा तुझ्यावर विश्वास आहे आई म्हणून मी तुला सांगणार आहे, आणि मला अजून सहा महिने तरी लग्न करायच नाही, बरं झालं तू विषय काढलास, तू समजुन सांग ताईला, रोज आपलं तेच तिला, सांग माझ्या मागे लागू नको, या वेळी काहीही दुसरा विषय बोललो नाही आम्ही, आत्ताशी तर जॉईन झालो आहे मी फॅक्टरीत, थोडा वेळ लागेल ग काम आहेत मला, जरा स्वतःसाठी पण वेळ हवा आहे ",... आदित्य

" हो पण आवडती मुलगी मिळाली तर आठवतील ना काम, तुझ सीक्रेट नंतर सांग मला , काही हरकत नाही आदित्य बेटा तू तुझा वेळ घे, मी समजावेन ताईला, पण तिलाही तुझी काळजी आहे ",... आक्का

" हो आई, ताई काळजी करते माझी, आई तू किती छान आहेस ग, कोणाला बोलू नको काही, स्पेशल ताई ला काही सांगू नको, नाही तर ती माझ जीवन मुश्किल करेल",... आदित्य

" मस्का पॉलिष नको आहे, पण खरचं आता मला उत्सुकता लागली आहे , आम्हाला वाटत आता कुटुंबात नात नातवंडांत रमाव, विचार कर आमचा ",... आक्का

हो आई...

" साधा आहेस आदित्य तू एकदम, कस होणार तुझ काय माहिती?, मला एक सांग, तुला कशी मुलगी हवी म्हणजे मी पुढे लक्ष्यात ठेवेन, किवा कशी आहे ती सीक्रेट बातमी ",... आक्का

"आई मला तुझ्या सारखीच मुलगी बायको म्हणून हवी आहे, अतिशय प्रेमळ दुसऱ्यांची काळजी घेणारी साधी तरीही खूप छान ",.. आक्का छान हसत होत्या, काहीतरी तुझ

" खरंय एकदम करेक्ट बोलतो आहे आदित्य ",... आबा

" काहीही काय हो तुमच, मुलांसमोर तुम्ही ही ना ",.. आक्का लटक्या रागात होत्या

आबांनी फुल आणले होते येतांना त्यांनी ते आक्कांन कडे दिले

" अग आदित्य बरोबर विचार करतो आहे अस म्हणतो आहे मी, तुला काय वाटल",.. आबा

आदित्य गोड हसत होत,.. आबा आक्का होतेच एक आदर्श जोडपं,

" आई आबा येतो मी ताईला सांग मी विचारल",... आदित्य

"ती उद्या जाणार आहे तिच्या घरी",.. आक्का

"राहणार नाही का या वेळी ती, मी येतो आज लवकर, आपण छान घरघुती सेलिब्रेशन करू ",... आदित्य

" अरे आदित्य काल तो विक्रम आला होता काय आहे त्याच हिशोब पैसे लागत असतिल तर देवून टाक त्याला",... आबा

"हो आला होता तो ऑफिस मध्ये झाल बोलण आमच",... आदित्य

आदित्य घरातुन निघाला

" अहो त्या विक्रमच सुरू आहे का अजून पैसे मागतो का तो? ",... आक्का

"हो ना, असेल काही तरी अडचण जाऊ दे, करावी थोडी मदत ",... आबा

" नेहमी काय पण? त्याचे आई बाबा चांगले आहेत म्हणून आपण काही बोलत नाही ",... आक्का
....

शाळेच्या गेट समोर एक मोठं झाड होतं, खूप जून, सुंदर पार होता आजुबाजूला, तिथे बरोबर आडोशाला जाऊन आदित्य उभा राहिला, शाळेच्या गेट मध्ये कोण जात आहे कोण नाही हे सगळं त्याला दिसत होतं, हीच जागा परफेक्ट आहे,

सकाळी लवकर आवरून सीमा शाळेत जायला निघाली, मीना ताईंनी नेहा साठी खास जास्त भाजी दिली होती, सीमा बस स्टॉप वर उतरली, दहा मिनिट होते शाळा सुरू व्हायला, ती आत जात होती

आदित्यला ती दिसली, त्या दिवसाची सुंदर मुलगी, जिचे स्वप्न तो दोन दिवसापासून बघत होता, खूप आनंद झाला होता त्याला, हीच आहे ती, खूप छान दिसत होती ती आज ही, त्या दिवसाची साडी, तीच धावपळ, अजिबात शांत नाही, काय होणार आहे माझ काय माहिती, तो गालातल्या गालात हसत होता, सीमा घाईने आत निघून गेली, तिला कल्पना नव्हती की कोणी तरी तिच्या कडे बघत आहे तिकडून,

"कोण हवाय तुम्हाला?",.. वॉचमनने आदित्यला विचारल

"साहेब तुम्ही... या झाडा मागे काय करता आहात? काही हव आहे का तुम्हाला?",...

"नाही थोड ऑफिस मध्ये काम होत माझ, तिकडे जातो आहे मी ",.. आदित्य

"चला ना मग आत",... वॉचमन

आदित्य बळजबरी आत गेला,.. "या सिक्युरिटी गार्डने आता याव का इथे?, कुठे गेली ती? कोणत्या क्लास मध्ये असेल? ",..

तो शाळेच्या ऑफिस मध्ये गेला, तिथला स्टाफ इथून उभा राहिला,

" आज इकडे कसे साहेब? ",..

" सहज आलो होतो, ऑफिस मध्ये जाता जाता, सगळ ठीक आहे ना, झाली का तयारी, आठ दिवसात शाळा सुरू होणार आहे ",... आदित्य

"हो सर व्यवस्थित सुरू आहे",...

"इथे कोण नवीन जॉईन झाल आहे का? , म्हणजे त्यांच ट्रेनिंग वगैरे नीट सुरू आहे ना",... आदित्य

"हो सर अजून दोन दिवस आहे ट्रेनिंग",..

"ठीक आहे मी येतो ",.. आदित्य

आदित्य ऑफिसला आला,.... सचिन आत ये आधी

"काय झालं ",.. सचिन

"सापडली ती शाळेत आहे टीचर म्हणून, आता तिकडून येतो आहे मी ",.. आदित्य

" काही समजली का माहिती तिच्या बद्दल ? ",.. सचिन

" नाही काही नाही, मला ती फक्त आत शाळेत जातांना दिसली ",.. आदित्य

" आता काय प्लॅन आहे मग? ",.. सचिन

" आज जाऊ या का संध्याकाळी शाळा सुटल्यावर शाळे जवळ",... आदित्य

" हो पण कोणी मारणार नाही ना आपल्याला ",.. सचिन

" नाही रे..... बघु ना कोण आहे? कुठे रहाते ते",... आदित्य

" ठीक आहे... पण आज करमेन ना तुला ऑफिस मध्ये",...सचिन

आदित्य छान हसत होता..

"पण तू खरच सिरियस आहे ना तिच्या साठी, कारण आपण अस मागे जावून रिस्क घेतो आहोत, एक तर सगळे ओळखतात आपल्याला इथे ",.. सचिन

" मग अस कोणत्याही मुलीच्या मागे जाईन का मी?",... आदित्य

" ठीक आहे शाळा साडे पाचला सुटते, आपण बरोबर पाचला तिथे हजर पाहिजे, तोपर्यंत तुझे काम संपव",... सचिन

ओके......


🎭 Series Post

View all