नवी आशा जगण्याची... भाग 9

सीमाला समजतच नव्हतं काय करावं, खूप आनंद झाला होता तिला, ती केबिन मधुन निघाली, ऑफिस मध्ये गेली, दोन मुली तिथे काम करत होत्या तिने ते पत्र त्यांना दाखवलं, त्यांनी समोरच्या केबिन कडे इशारा केला,


नवी आशा जगण्याची... भाग 9

©️®️शिल्पा सुतार
........

सीमा दुसर्‍या दिवशी कॉलेजला गेली, पूजा भेटली, सगळ्या मुलींनी मिळून एक कंप्लेंट लेटर तयार केल सगळ्यांनी त्यावर सह्या केल्या ते लेटर जावून प्रिन्सिपल सरांना दिल, सरांनी अ‍ॅक्शन घेणार असल्याच आश्‍वासन दिल, कॉलेज मधले बरेच प्रॉब्लेम साॅल्व्ह झाले होते एवढ्यात,

परीक्षा आता जवळ आल्या होत्या, सगळ्या मुली अभ्यासाला लागल्या होत्या, सीमा राजाचा जॉब सुरु झाला होता, दोघ बिझी होते, सोबत ट्यूशन सुरू होती मुलांची , मीना ताई आता ठीक होत्या, त्यांनी घरी न सांगता अजून दोन काम धरले होते,

सीमा कॉलेज हून डायरेक्ट ऑफिसला पोहोचली, तिची तिथे रश्मीशी छान मैत्री झाली होती, ती नुसतीच जॉबला जॉईन झाली होती, फूल टाइम, तिने सीमाला खूप छान पद्धतीने काम समजवून सांगितल, त्या मुळे सीमा खूप कंफर्टेबल होती कामाच्या ठिकाणी, अचूक काम त्यामुळे तक्रारीला जागा नव्हती,

मध्ये एक दोनदा सुरेशचा फोन येवून गेला, सीमा ने फोन उचलला नाही, त्या गावाला जायच नाही तर का बोला त्यांच्याशी, आत्या एक स्थळ घेवून आल्या होत्या, या वेळी सीमाने स्पष्ट नकार दिला, त्यामुळे मीना ताई आत्याचा नाईलाज झाला, नंतर समजल सुरेशच ही लग्न जमल, आत्या सांगत होत्या, सीमाने दुर्लक्ष केल त्या बातमी कडे

परीक्षा झाली खूप छान पेपर गेले, आता सीमा फूल टाइम जॉबला जात होती, आनंदाची गोष्ट म्हणजे तिचा बि एड ला नंबर लागला, तिच्या बरोबर प्रियाचा ही नंबर लागला, खूप खुश होत्या त्या दोघी, आता पुढच्या एक तारखे पासुन कॉलेज सुरू होणार होत, शेवटचे 15 दिवस होते ऑफिसचे, रश्मीला खूप आनंद झाला होता अ‍ॅडमिशन मिळाली हे ऐकुन, पण आता सीमा काम सोडून जाईल हे ही दुःख होत,

"आपण कायम संपर्कात राहू",.. रश्मी

"हो एवढी चांगली मैत्री मला टिकवायची आहे ",.. सीमा

राजा सीमा दोघ चांगल्या मार्काने पास झाले,..

नवीन कॉलेज घरापासुन एक तासावर होत, रोज बसने जाव लागायचं, त्यात थोडी कॉलेज फी पण जास्त होती, पण सुट्टीत सिमाने जॉब केल्यामुळे बऱ्यापैकी तिचे पैसे साठले होते

राजाने सुद्धा त्याचे काही साठलेले पैसे तिला दिले, मीनाताई मुलांची फरफट बघत होत्या, सीमा आणि प्रियाने महिन्याचा पास काढून घेतला होता, आता खूप अभ्यास करायचा आणि छान आयुष्य घडवायच, टीचर बनायच हा उद्देश डोळ्यासमोर होता, आधीच्या कॉलेज पेक्षा या कोर्सला ग्रॅज्युएट झालेले सगळे मुलं-मुली होते, त्यामुळे वातावरण जरा वेगळ होत, दिवस भर लेक्चर तास घ्यावे लागायचे, सीमा आणि प्रियाचा व्यवस्थित अभ्यास सुरू होता

बघता बघता दोन वर्षाचा काळ संपला, सीमा आणि प्रिया दोघी व्यवस्थित पास झाल्या, प्रियाच लग्न जमलं होतं, आधीच्या कॉलेज मधलाच त्यांच्या वर्गातला मुलगा तिला आवडत होता, त्यामुळे प्रिया पुढे नोकरी करणार की नाही का थोडे दिवस गॅप घेणार आहे ते माहिती नव्हतं,

राजा ही ग्रजुएट झाला होता, त्याला लगेच एका कंपनीत काम मिळाल, त्याचे टेक्निकल सब्जेक्ट होते त्यामुळे लगेच नौकरी मिळाली, मीना ताईंनी आता काम बंद केल होत, म्हणजे सीमा राजा ने जबरदस्ती त्यांना काम सोडायला सांगितल होत

राजाला चांगला पगार होता, तो कंपनीच्या मालकाच्या मर्जीतला होता, हुशार लोक आवडतात सगळ्यांना, दिलेल काम वेळेत पूर्ण करणे, व्यवस्थितपणा, प्रामाणिकपणा सगळ त्याच्या अंगी होत, कंपनीत वेळेवर जाणार, नीट वागणार, इन्सेंटिव्ह ही मिळायचा त्याला,

राजा ऑफिस हून आला, सीमा ट्युशन घेत होती,

" हे घे सीमा",.. राजाने तिला लेटर दिल

"काय आहे हे",.. सीमा

"तुझ्या इंटरव्ह्यूच कॉल लेटर",.. राजा

"काय बोलतोस? कुठे आहे ही शाळा?",.. सीमा खूप खुश होती

"माझ्या कंपनीचे मालक आहेत ना, त्यांची आहे ही शाळा, मोठी शाळा आहे बारावी पर्यंत, तिकडे टीचरची गरज आहे, मी सांगितल माझी बहिण आहे बि एड झालेली , त्यांनी हे लेटर दिल, तुला 5 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यां साठी टीचर म्हणून इंटरव्ह्यू आहे ",... राजा

सीमाला खूप आनंद झाला होता, बरेच प्रयत्न करून नौकरी मिळत नव्हती, जर मला ही नौकरी मिळाली तर मी आलेल्या संधीच सोन करेन, खूप मनापासून काम करेन, राजा लकी आहे मला, किती करतो तो माझ्या साठी, उद्या काय प्रश्न विचारतील ते बघाव लागेल, माझे सर्टिफिकेट, इतर पेपर नीट आहेत की नाही ते बघते,

तिची लगबग मीना ताई.. राजा बघत होते, त्यांच्या डोळ्यात कौतुक होत,

सीमाने बीएड केलं त्याच गावातील शाळेत टीचर म्हणून आज तिचा इंटरव्यू होता याचं तिला खूप छान वाटत होतं, रात्री बराच वेळ ती अभ्यास करत होती, काहीतरी वाचत बसली होती, सकाळ कधी होते कधी इंटरव्ह्यूला जाते अस झाल होत तिला,

सकाळी छान कॉटनची साडी नेसली होती सीमा ने , केस व्यवस्थित बांधलेले, गळ्यात चैन, शिक्षणामुळे एक वेगळच तेज तिच्या चेहर्‍यावर होत, तरीही इंटरव्ह्यूच टेन्शन थोडस होत तिच्या चेहऱ्यावर , मीनाताईंनी चहा नाष्टा आणला,

"आई मला आता काहीच नको खायला, मी आधी जाऊन येते इंटरव्ह्यूला",.. सीमा

" अजिबात चालणार नाही असं, एकतर बस प्रवास आणि त्यात तिथे किती वेळ लागेल हे माहिती नाही, तुझा डबा ही तयार आहे डबा घेऊन जा, चहा नाश्ता खा, मग तुला राजा बस स्टॉप वर सोडून देईन",.. मीना ताई

सीमाने पटापट खाऊन घेतलं, चहा घेतला, आई डबा नको, मी लवकर येईन, राजा आणि ती बस स्टॉप वर आले, सीमा टेन्शनमध्ये होती,

" राजा मला या इंटरव्ह्यूच खूप टेन्शन आला आहे, तू येतो का माझ्यासोबत शाळेत",... सीमा

" मी आलो असतो ताई पण मला आता ऑफिसला जावे लागेल, आज महत्त्वाचं काम आहे तिकडे आणि हे बघ सीमाताई मला माहिती आहे की तू खूप हुशार आहेस, अजिबात टेन्शन घेऊ नको, अगं खूप छान आहेत ते लोक, एवढे श्रीमंत आहेत, त्यांच्या शाळा, कॉलेज, फॅक्टरी खूप शेती आहे, पण मनाने खूप चांगले आहेत, अजिबात गर्व नाही त्यांना कुठल्या गोष्टीचा आणि गरजू लोकांना तर ते मदत करायला नेहमी तयार असतात, तू बिंदास जा दिलेल्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित दे, होऊन जाईल तुझं काम बघ",... राजा

" ठीक आहे मग मी निघते",... सीमा

"तिकडे काय होतं ते सांग फोन करून",.. राजा

हो...

बस आली सीमा इंटरव्यू साठी निघाली

आज सीमा ताई एकदम लहान मुली सारखी वाटत होती, राजाला तिची काळजी वाटत होती, होवुन जायला पाहिजे ताईच काम

गाडी गावात पोहचली, गाव छानच होत, ओळखीच होत, शाळा थोडी बाजूला होती, शाळेचा पत्ता तिला माहिती होता, बस स्टॉप पासून दहा मिनिटाच्या अंतरावर शाळा होती, चालतच ती शाळेत पोहचली, सध्या शाळेतील मुलांना सुट्ट्या होत्या त्यामुळे शाळेत फक्त शिक्षक वर्गच होता, तिथे ऑफिसमध्ये चौकशी केली,

"तुम्ही इंटरव्यूला आल्या आहात का ? इथे खुर्चीवर बसा मॅडम, साहेब अजुन आलेले नाहीत, ते येतीलच दहा मिनिटात" ,... शिपाई काका

"अजून कोणी नाही आलं आहे का इंटरव्यू साठी, मी एकटी आहे का?",... सीमा

"येतात ना,... रोज येतात बरेच लोक, तुम्हाला पाणी चहा वगैरे काही सांगू का? ",... काका

" नाही नको मी बसते इथे ",.. सीमा तिथे बसून सगळं बघत होती, शाळेची इमारत प्रशस्त होती, भरपूर वर्ग होते, समोर मोठ ग्राउंड होत, एका बाजुला मोठी पाण्याची टाकी होती , इथे खूप छान काम करता येईल, आजचा इंटरव्ह्यू व्यवस्थित जायला पाहिजे, मला या शाळेत काम मिळायला पाहिजे,

दहा मिनिटांनी शिपाई काका बोलवायला आले,.. चला तुम्हाला आत बोलवलं आहे

सीमा त्यांच्यामागे गेली, अतिशय स्वच्छ अशा बिल्डिंग मध्ये ती कोपऱ्यातील केबिन देशमुख साहेबांची होती, केबिन कडे बघतात टेन्शन वाटत होतं, सुंदर लाकडाचा मोठा दरवाजा उघडून सीमा आत गेली,.. "मी येऊ का सर आत मध्ये?",..

हो या....

आत जाऊन सीमा उभी राहिली, तिचे हात पाय थरथरत होते

बसा..

सीमा बसली ती केबिन कडे बघत होती, बरेचसे बक्षीस ढाल ठेवलेले होते, बाजूला भरपूर कपाट होते, केबिन मध्ये खाली उंची गालिचा अंथरला होता, त्याच्यावर लाकडाचा टेबल, टेबल वर खूप फाईल होत्या, समोर खुर्चीवर देशमुख साहेब बसलेले होते, अतिशय भारदस्त व्यक्तिमत्त्व, बघता क्षणी त्यांच इम्प्रेशन पडेल अस व्यक्तिमत्त्व, तरीसुद्धा चेहऱ्यावर गोडवा, प्रेमळ असे वाटणारे, पांढरे कपडे घातलेले साहेब, त्यांच्याकडे बघून असं वाटायचं की ते नेहमी प्रगतीचाच विचार करत असतील, खूपच चांगले पॉझिटिव वाटत होतं साहेब,

राजा बरोबर बोलत होता, हे लोक चांगले दिसत आहेत, तिच्या हातातील फाईल बघून देशमुख साहेबांनी ती फाईल हातानेच मागितली, सीमाने उभ राहून त्यांच्या हातात फाईल दिली, बराच वेळ देशमुख साहेब ती फाईल बघत होते

" शिक्षण छान आहे तुमचं आणि मार्कही चांगले मिळाले आहे तुम्हाला, कोणता विषय शिकवणार तुम्ही या शाळेत",.. देशमुख साहेब

"सर बि एड ला माझा मराठी विषय होता, मी मराठी विषय शिकवेन",... सीमा

" खूप छान आम्हाला भाषेच्या टीचरची जास्त गरज होती, कधीपासून जॉईन होत आहात तुम्ही? एक काम करा दोन दिवसापासून म्हणजे सोमवारपासून रोज येत चला",.. साहेब

सीमाचा तिच्या कानावर विश्वासच बसत नव्हता, लगेच काम झालं, नोकरी मिळाली

" थोड तुमच्याबद्दल सांगा सीमा",.. साहेब

"सर.. खूप धन्यवाद, मला इथे काम करायची संधी दिली त्या बद्दल, मला खूप आनंद झाला आहे, मी माझ्या परीने मुलांना व्यवस्थित शिकवण्याचा प्रयत्न करेल, मला तसा पूर्वी अनुभव नाही टीचर म्हणून पण मी घरी बरेच वर्ष झाले ट्युशन घेते आहे आणि मुलांना शिकवायला मला खूप आवडतं" ,... सीमा

"काय असेल तुमची शिवायची पद्धत",.. साहेब

" मुलांना ओरडून रागावून शिकवण्यापेक्षा त्यांना तो विषय व्यवस्थित समजावून सांगितला किंवा त्या विषयाची गोडी निर्माण केली तर त्यांना तो विषय लवकर समजतो आणि कायम लक्षात राहतो ",... सीमा

"खुप छान विचार आहे तुमचे सीमा, बाहेर ऑफिसमध्ये जाऊन पगार विषयी ठरवून घ्या",.. देशमुख साहेबांनी एक पत्र सही करून सीमा कडे दिलं, त्या पेपर वर सीमाला कामावर रुजू केलं आहे टीचर म्हणून असं लिहिलेलं होतं,

सीमाला समजतच नव्हतं काय करावं, खूप आनंद झाला होता तिला, ती केबिन मधुन निघाली, ऑफिस मध्ये गेली, दोन मुली तिथे काम करत होत्या तिने ते पत्र त्यांना दाखवलं, त्यांनी समोरच्या केबिन कडे इशारा केला, सीमा तिथे गेली एक मॅडम बसलेल्या होत्या त्यांनी ते पत्र सीमा कडून घेतलं व्यवस्थित फाईलला लावलं,

"ही तुमची पहिली नोकरी आहे का?",.. मॅडम

"हो मॅडम",.. सीमा

" त्यांनी पगाराची बोलणी केली, सुरुवातीला सहा महिने 15 हजार पगार असेल नंतर वाढवण्यात येईल",.. मॅडम

"हो चालेल",.. सीमा

त्या मॅडमने सीमाला सोमवारपासून यायचं पत्र हातात दिलं, तीला खुप आनंद झाला होता, तिला विश्वासच बसत नव्हता की तिचा इंटरव्ह्यू झाला, काम झालं आहे, सीमा आनंदात बाहेर आली....

🎭 Series Post

View all