नवी आशा जगण्याची... भाग 8

पाच मिनिटांनी ती आत गेली, दोन मुली एक मुलगा आत काम करत होते, ती केबिन मध्ये गेली, सर चांगले होते त्यांनी बरेच प्रश्न विचारले सीमाला, सीमा हुशार आहे हे लगेच लक्षात आलं त्यांच्या,


नवी आशा जगण्याची... भाग 8

©️®️शिल्पा सुतार
........

कॉलेज झाल, त्या तिघी घरी यायला निघाल्या,

वर्गातली पूजा मागे आली,... "एक मिनिट सीमा मला बोलायच होत थोड" ,

"काय झाल पूजा?",... सीमा

" बाजूच्या वर्गातील एक मुलगा रोज मला त्रास देतो, तुम्ही मुलींनी त्या दिवशी छान धडा शिकवला त्या मुलांना, पण कॉलेजच्या आत मध्ये जे मूल मुलींना त्रास देतात, किंवा मुली ही दादागिरी करतात त्यांचा प्रश्न बाकी आहे अजून, ते काम आपण करायला पाहिजे, कंप्लेंट तरी करायला हवी अश्या मुल मुलींची ",.. पूजा

" बरोबर आहे तुझ आपण उद्या भेटू या टीचरांना जावून आणि कंप्लेंट करू त्यांची, बघू कॉलेज काय ॲक्शन घेतात ते मग ठरवू, आधी उगाच आपण एक्शन घेतली तर मागच्या वेळेस सारखं ओरडा बसेल",.. सीमा

" हो चालेल", ,.. पूजा

" चल आम्हाला निघाव लागेल ",.. सीमा

" कॅन्टीन ला जावू या का सीमा, प्रिया ",... मोना

" का ग ",.. सीमा

" प्रविण येणार आहे तिकडे मला भेटायला ",... मोना

" ओह मग तू जा, प्रिया तुला ही भेटायला येणार आहे का कोणी? ",.. सीमा

"नाही ग ",... प्रिया

"मला जरा वेळाने इंटरव्यू साठी जायच आहे, चला पटकन जाऊ घरी, नाही तर तुम्ही मुली जा कॅन्टीन ला, मी निघते ",.. सीमा

मोना ला भेटायला तिचा बॉयफ्रेंड आला, ती गेली त्याच्या सोबत, सीमाला सुरेशची आठवण आली, पण तिने तो विचार झटकला , प्रिया आणि ती गेट बाहेर आल्या, समोर सुरेश उभा होता, सीमाचं लक्ष नव्हतं, ती मैत्रीणीं बरोबर बोलत बोलत पुढे जात होती

सीमा.... सीमा सुरेश ने आवाज दिला

सगळ्या थांबल्या प्रिया सीमा सुरेश कडे बघत होत्या

सीमा पुढे गेली,... "हे बघा सुरेश मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की मला आता तुमच्याशी काहीही बोलायचं नाही, त्यामुळे तुम्ही इथून गेलेलं बर राहील, मला थोडं काम आहे संध्याकाळी, मला लगेच घरी जायचं आहे",.

"फक्त पाच मिनिटं बोलायचं आहे मला तुझ्याशी सीमा, ऐक ना जरा",.. सुरेश

"बोला काय बोलायचं आहे? ",.. सीमा

" आपण कॉफी घेऊया का?, कुठे तरी बसुन बोलू ",.. सुरेश

" नाही जे बोलायचं असेल ते इथेच बोला, मला उशीर होतो आहे ",... सीमा

" सीमा मला माहिती आहे कि तू रागवली आहे, पण बोलूनच प्रश्न मिटकरी मिळतील हे ",.. सुरेश

"आता बोलत बसण्यात काही अर्थ नाही, आता निर्णय घेण योग्य राहील, तुमच्या कडे झाला तेवढा आमचा अपमान पुरे झाला, मला आता या गोष्टीत पडायचा नाही, मी काल ही सांगितलं होतं की मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही",... सीमा

" असा तडकाफडकी निर्णय नको घेत जाऊस सीमा ",.. सुरेश

" मग काय करायचं आहे अजून? पाच सहा भांडण करायचे आहेत का अजून, नाही ना मान्य तुमच्या घरच्यांना मी, माझी जात कोणती मी कोणाची मुलगी आहे माहिती नाही काही, या भांडणा मुळे परवा पासून माझी आई किती आजारी आहे, ती एकच आधार आहे आम्हाला, या पुढे आमच्या घरात आम्हाला तुमचा कोणाचाच विषय नको आहे, आईला त्रास होईल अस वागायचं नाही मला आता, संपलं आहे आता सगळं, तुम्ही उगाच माझा वेळ घेत आहात, तुम्ही निघा आता ",.. सीमा

" असं नको बोलू सीमा, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे ",... सुरेश

" पण मला आता हे जमणार नाही, तुमच्या घरच्यांनी मला समजूनच घ्यायचं नाही असं ठरवलं आहे, मी दत्तक घेतलेली मुलगी आहे आणि आमच्याकडे अजिबात पैसे नाही आहे हुंडा द्यायला किंवा मानपान करायला, मला पटत नाही हे असे विचार, मला आता या भानगडीत पडायचं नाहीये, मी पुढे कॉलेजला ऍडमिशन घेते आहे, आमची परिस्थितीच नाही आहे लग्नाची, आईने काय एवढी घाई केली यावेळी काही समजत नाही, उगाच त्रास झाला सगळ्यांना, माझी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही हे सगळं झालं गेलं ते विसरून जा आणि घरचे सांगतील तिथे एखाद्या चांगल्या मुलीशी लग्न करा ",.. सीमा

" मला माहिती आहे सीमा तू रागवली आहेस आपण करू ना दोघं लग्न, होईल थोड्या दिवसात सगळे नीट, मला माफ कर परवा जे झाल त्यात मी काही बोलायला हव होत पण त्या मुळे अजून वाद वाढले असते ",.. सुरेश

" नाही मला नाही जमणार लग्न करायला, खूप वेळ वाया जाईल या गोष्टीत आणि जे मला भविष्यात करायचं आहे, माझे जे ध्येय आहेत, त्या गोष्टीला खूप उशीर होईल, मला माझा आयुष्य असेच भांडत आणि लोकांना मनवत घालवायचं नाही, आपण विशेष काही भेटलो नाही एक दोन तास भेटलो आहोत, यापुढे जर तुम्ही मला भेटायला नाही आले तर चांगलं होईल, मला विसरून जा ",... सीमा

सीमा तिथून निघाली..

" सीमा ऐकून घे जरा मी काय म्हणतोय ते ",.. सुरेश

" आता बोलण्यासारखं काही राहिलं का, मला उशीर होतो आहे ",.. सीमा

" मी नेहमी आपल्या बद्दल ठरवतो, तू तुझ बघते, माझा ही विचार कर जरा, तुझ्या सोबत रहायचे स्वप्न बघितले होते मी",.. सुरेश

"मी माझ बघते म्हणजे काय? त्रास मला झाला आहे, अपमान माझा आईचा झाला आहे, कोणी कोणाला सपोर्ट केला नाही हे तुम्हाला ही महिती आहे आणि मला ही, खोट बोललात तुम्ही, मला सांगितल हुंडा नको, घरी काही सांगितल नाही या बाबतीत, जेव्हा तुमच्या घरचे मला आणि माझ्या आईला बोलत होते तेव्हा तुम्ही माझी बाजू घेतली नाही की मी ठरवल हिच्या सोबत देण घेण नाही होणार, म्हणून हिने होकार दिला लग्नाला, पटापट बोलले असते, तेव्हा एकट पाडल मला, आता असे दाखवत आहात की माझ्या मुळे लग्न मोडल",. सीमा

" माझे काही कारण आहेत, मला वाटल मी तुला दागिने करेल आणि आईला सांगेल की तुझ्या घरच्यांनी केले ते ",... सुरेश

" हो का, एकदम चुकीचे विचार आहेत हे, याने अजून प्रॉब्लेम वाढले असते, तुम्ही आईला काही बोलले नाहीत, त्या चुकीच वागल्या तरी तुम्ही त्या गोष्टीला विरोध केला नाही , ही पळवाट शोधण्या पेक्षा खरं बोलले असते तुम्ही तर अस झाल नसत, मग त्यादिवशी सगळ्यांसमोर का नाही सांगितले हि आयडिया, हुंडा घेण आणि देण गुन्हा आहे, मला मुळात अशा मुलाशी लग्नच करायचं नाही ज्याला सगळ्यांसमोर बायकोची बाजू घ्यायचा हिम्मत नाही, असं सुद्धा तुम्हाला वाटलं नाही की हीची काहीही चूक नसताना आपली आई हिला इतकं बोलते आहे, एकदा जरी तुम्ही बोलले असते ना तुमच्या आईला की हिला का बोलते आहेस तु? तिला काहीच माहिती नाही यातलं, तरी मी तुमच्याशी लग्न केलं असतं, पण आता या गोष्टीला काहीही अर्थ नाही, मुळात मला वेळ वाया घालवायचा नाही, मला आधी वाटलं होतं की खूप चांगले आहात तुम्ही, पण आता समजलं तुम्ही एकदम सर्वसामान्य आहात, तुमच्यात कुठली गोष्ट करायची हिंमत नाही आणि मला तुमच्याशी लग्न करायचं नाही, समजलं आहे ना आता, का वेगळ्या शब्दात सांगू, यापुढे आपण न भेटलेल बरं",.. सीमा

सीमाच्या मैत्रिणी पुढे थांबल्या होत्या, ती त्यांच्यासोबत चालायला लागली, सुरेश मागे उभा राहून फक्त जाणाऱ्या सीमा कडे बघत होता, त्याच्या डोळ्यात पाणी होत, माझ खरच खूप चुकल सीमा, मी तुझी बाजू घ्यायला पाहिजे होती, तुझी चूक नसतांना तुला त्रास झाला तू चिडणारच, मला माफ कर, माझं खरं प्रेम होतं तुझ्यावर सीमा, ठीक आहे तुझा नकार असेल तर माझी काही हरकत नाही, मी तुला परत भेटायला येणार नाही,

"काय झालं ग सीमा? काय म्हटला सुरेश? ",.. प्रिया

"काही नाही मी नकार दिला, त्यांना सांगूनच टाकला स्पष्ट की मला तुमच्याशी लग्न करता येणार नाही, या पुढे येवू नका भेटायला",.. सीमा

" पण तुला वाटतं का ते ऐकतील",.. प्रिया

"त्यांना काहीही वाटल तरी आता मला काहीही फरक पडत नाही, मला माझा आयुष्य असेच भांडत आणि लोकांना मनवत घालवायचं नाही, ध्येय काय आयुष्याचा तर फक्त सासू खुश राहिली पाहिजे, त्यांनी काही बोलायला नको, हे मला अजिबात मान्य नाही, यापेक्षाही चांगल्या गोष्टी आहेत आयुष्यात करण्यासारख्या, होईल मला दोन दिवस त्रास, पण हा डिसिजन आत्ताच घेतला पाहिजे",... सीमा

प्रिया सीमा घरी आल्या, सीमाचा चेहरा उतरलेला होता, खूप रडावस वाटत होत तिला, मीना ताई ठीक होत्या आता, राजा घरी आलेला होता, चल सीमा जेवायला,

" आई तू जेवलीस का? ",... सीमा

" हो मी जेवली",... आई जरा वेळ पडली

सीमा राजा पुढे येवून बसले, राजा तू जेव मला नको मी चहा करते, आधी इंटरव्ह्यूला जावून येते,

सीमा तयार झाली, ती इंटरव्ह्यूला पोहोचली, चांगल होत ऑफिस, जुनी कंपनी होती ती, तिने तिथे सांगितल काल माझा भाऊ राजा आला होता इंटरव्ह्यूला, त्याच्या रेफरन्स वरून मी आज इथे इंटरव्यूला आली आहे

"काय करता तुम्ही मॅडम",..

"मी कॉलेजला आहे शिकायला इथे पार्ट टाइम काम करायला जमेल मला" ,... सीमा

"हो सांगितल तुमच्या भावाने तुम्ही बसा जरा वेळ बोलवतील आत",..

पाच मिनिटांनी ती आत गेली, दोन मुली एक मुलगा आत काम करत होते, ती केबिन मध्ये गेली, सर चांगले होते त्यांनी बरेच प्रश्न विचारले सीमाला, सीमा हुशार आहे हे लगेच लक्षात आलं त्यांच्या,

"पुढच्या आठवड्यात एक तारखेपासून येऊ शकता तुम्ही कामाला, पार्ट टाइमचे पाच हजार रुपये मिळतील, नौकरी सोडण्या आधी एक महिना पूर्वी सांगाव लागेल ",... सर

"पुढे परीक्षा झाल्यानंतर मी फुल टाईम येऊ शकते का सर",.. सीमा

"हो काहीच हरकत नाही तेव्हा दहा हजार रुपये मिळतील, पण हिशोबाच काम थोड किचकट आहे ",.. सर

" काही प्रॉब्लेम नाही सर मी करेन काम",.. सीमाला खूप आनंद झाला

" तुम्ही बाहेर जातांना तुमचं जोईनिंग लेटर कामाची वेळ पगार सगळं कन्फर्म करून लेटर घेऊन जा",... सर

"हो सर थँक्यू व्हेरी मच",... सीमा घरी आली, आई बाहेर मावशीं बरोबर गप्पा मारत बसली होती, सीमा आता आली

" झालं का ताई काम ",... राजा

" हो मलाही तुझ्यासारखाच एक तारखेपासून बोलवलं आहे, ते सर किती चांगले आहेत ना ",.. सीमा

" हो ते नेहमी गरजू मुलांना नोकरी देतात",.. राजा

"मी मन लावून काम करणार आहे तिकडे",... सीमा

"काय झालं आहे ताई आज तुझा चेहरा खूप उतरलेला दिसतो आहे",.. राजा

सीमा ने बघितलं मीनाताई बाहेर बसलेल्या होत्या,

" आज कॉलेज सुटलं तर सुरेश आले होते भेटायला",.. सीमा

" आता कशाला आले होते ते भेटायला",.. राजा

" म्हणत होते की आपण लग्न करू दोघ",.. सीमा

"मी स्पष्ट नाही सांगितलं, लग्न करून तरी कुठे राहायचं तर त्यांच्या घरी, त्यांच्या घरचे लोक कसे आहेत हे माहिती आहे ना तुला, मला माझा महत्वाचा वेळ वाया घालवायचा नाही, त्या लोकांशी भांडत बसण्यात काही अर्थ नाही",..सीमा

"हो बरोबर बोलते आहेस तु ताई, पण तू ठीक आहेस ना",..राजा

" हो मी एकदम ठीक आहे, आता मस्त कॉलेजला जायचं, तिथून जॉब साठी जायच, सहा वाजता घरी येणार मी, नंतर ट्युशनला मुले येणार, रात्री अभ्यास करणार, परीक्षा जवळ येत आहेत याचा विचार करायला पाहिजे ",.. सीमा

" तू खूपच बिझी होऊन जाशील ताई",.. राजा

" तेच बर आहे इतर काही विचार येत नाही, प्रगतीचा विचार करायला पाहिजे आपण ",... सीमा

मीना ताई आत आल्या, सीमाने त्यांना नौकरी मिळाल्याच सांगितल, खूप आनंद झाला होता त्यांना, ट्युशनला मूल आले, सीमा उत्साहाने मुलांचा अभ्यास घ्यायला बसली...

🎭 Series Post

View all