©️®️शिल्पा सुतार
........
........
दुसऱ्या दिवशी दोघ छान फिरायला गेले, सोबत गाईड होता, अतिशय सुंदर हिल स्टेशन होतं, वेगवेगळे पॉईंट्स बघितले, खूप शांतता होती, सुंदर फुललेला निसर्ग होता, डोंगर दर्यातून फिरतांना छान वाटत होत, तिथे सुंदर तलाव होता, दोघांनी बोटींग केलं, खूप फोटो काढले, संध्याकाळी अतिशय सुंदर गार्डनमध्ये आरामात दोघे जण बसून राहिले
" किती सुंदर आहे वाटत आहे ना इथे",.. आदित्य
"मला खरं सांगू का घरच्यांची खूप आठवण येते आहे, सगळे सोबत हवे होते आपल्या",.. सीमा
"मला हि आठवण येते आहे, आपण पुढच्या वेळी नक्की सगळ्यांना घेऊन येऊ आबा आक्का आजी राजा तुझी मम्मी अनघा शरद जिजू आणि सुमित",.. आदित्य
बऱ्याच वेळ बसले तेथे, सनसेट झाल्यानंतर हॉटेलवर वापस आले,
" आज खूप थकलो आहोत ना, उद्या आपण कुठे जायचं नाही आरामात रूम वर बसूनच गप्पा मारायच्या",.. आदित्य
" हो चालेल",.. सीमा
आदित्यने जेवण मागवलं, दोघांनी छान जेवण केले आराम केला
दुसऱ्या दिवशी ते दोघे जण आरामात उठले, आज कुठे जायचं नव्हतं, संध्याकाळी इथे जवळ पायी फिरून येऊ, चहा घेण्यासाठी दोघ बाहेर खुर्चीवर येऊन बसले, आदित्य येऊन सीमा जवळ बसला,
" आदित्य तू सांगत होतास ना त्या दिवशी निशाचं घर तू माझं घर समजला होतास, त्यानंतर काय झालं",.. सीमा
"अरे हो ते राहीलच, मी तुझ्याकडे गाडी रिपेरिंग चे पाच हजार मागितले तेव्हा तू चिडली होती, फार मजा वाटली मला, पण नंतर वाटलं की उगीच तुझं नाव घेण्यापेक्षा सरळ सांगून द्यावा की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, पण तू किती भाव खात होतीस, काय होतं तुझ्या मनात",.. आदित्य
" काही नाही मला वाटलं असं अचानक एखादा मुलगा मुलीला कसा काय लग्नासाठी विचारू शकतो",.. सीमा
" याआधी असं कोणी तुझ्या मागे आलं नव्हतं का ",.. आदित्य
"आले होते बरेच मुलं पण थोडे दिवस, मी नकार दिल्यानंतर ते निघून गेले होते ",.. सीमा
" माझ्या बाबतीत मग तुझा कसाकाय विचार बदलला",.. आदित्य
"माझा विचार बदलला नव्हता, पण तू बोलला की तू मला आणि राजाला नोकरीवरून काढून टाकशील म्हणून मी लग्नाला होकार दिला होता",.. सीमा
" बापरे खरच की काय",.. आदित्य
"हो... अरे मग किती परिश्रमाने आम्हाला नोकरी मिळाली होती, तुला तर माहिती आहे आदित्य किती कष्ट केलेले आहेत राजाने, त्याला लहानपणापासून आरामात राहायला मिळालं नाही, एक वेळ मी जरी नोकरी नाही केली तरी त्याने प्रत्येक सुट्टीत काम केलेला आहे, त्यामुळे त्याची आपल्या कंपनीतली ही नोकरी बेस्ट होते, ती जायला नको म्हणून माझी धडपड सुरू होती",.. सीमा
आदित्यने सीमा चा हात हातात घेतला,.." सीमा मला माफ कर मी केवळ आणि केवळ तुझा होकार मिळवण्यासाठी अशी धमकी दिली होती, मला तुमच्या दोघांत बद्दल काही माहिती नव्हतं, नंतर मला खूप वाईट वाटलं होतं",
" ते मला माहिती नाही का आदित्य, तू कसा आहे मला माहिती होतं, तु माझा होकार मिळवण्यासाठी अस बोलतो आहे, मला राजाने सांगितलं होतं की तू खूप चांगला आहे, पण आपण जेव्हा बोलायचं तेव्हा तू खुप चिडायचा त्यामुळे मी जरा घाबरली होती",... सीमा
" होते मी तू होकार देत नव्हती म्हणून टेन्शनमध्ये होतो मी, मला तुझ्याशी लग्न करायचं होतं आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार होतो, पण तुझं माझ्यावर खरे प्रेम केव्हा झालं? ",.. आदित्य
" लग्न ठरल्यानंतर जेव्हा आपण प्रत्येक वेळी भेटलो तेव्हा मला समजलं की तु किती काळजी घेतो माझी आणि घरच्यांची आणि खूप चांगला मुलगा आहेस, लग्नाच्या दिवशी तर तुला वरातीत घोड्यावर बघून मला खूपच छान वाटलं होतं, सारखं तुझ्याकडेच बघत होती मी ",... सीमा
" कुठे उभी होती तू मला दिसलीस नाही",.. आदित्य
" वरती उभी होती मी आमच्या रूमच्या खिडकीत",.. सीमा
"मग होकार द्यायला का बर इतका उशीर लावला",... आदित्य
" आपली एवढही ओळखत नव्हती तेव्हा आदित्य की मी तुझ्या सोबत राहील आणि मला जरा भितीच वाटत होती",... सीमा
"कसली माझी का, खूप ओरडलो का मी तुला तेव्हा ",.. आदित्य
हो...
"सॉरी आता तू ठीक आहेस ना माझ्या सोबत सीमा, काही प्रॉब्लेम तर नाही ना ",.. आदित्य
"हो आदित्य मला आता तू खूप आवडतो,.. सीमा
आदित्य छान हसत होता
दुपार झाली
"चला आज खाली जाऊ आपण हॉटेलमध्ये जेवायला" ,... आदित्य
"आज रूम मध्ये नाही मागवायचं का जेवण",.. सीमा
नाही
दोघं खाली गेले जेवायला, खूप मोठा बुफे होता,
" एवढे पदार्थ खाल्ले जातील का आपल्याकडून आदित्य",.. सीमा
" थोडे थोडे घ्यायचे सगळे पदार्थ ",.. आदित्य
दोघांचा जेवण झालं दुपारी जरा वेळ आराम केला, संध्याकाळी तिथेच जवळच्या बागेत दोघेजण फिरायला गेले,
"खरच किती छान वाटत आहे ना सोबत",.. सीमा
"म्हणून मी म्हणत होतो तुला सीमा की आपण फिरायला येऊ अस, आता आपण दोघा नेहमी मी येत जाऊ फिरायला",.. आदित्य
बराच वेळ ते दोघे बगिच्यात बसले होते, लहान मुलं खेळत होते, बरेच लोक फिरत होते,
"किती वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत ना इथे",.. सीमा
" सगळ्यांच्या मागे काय ताण असेल माहिती नाही पण इथे सगळे आपापल्या परीने एन्जॉय करत आहेत",.. आदित्य
" हो ना आयुष्य असच असतं चान्स मिळाला की छान एन्जॉय करून घ्यायचं",.. सीमा
"मग आज काय विचार आहे तुझा सीमा",.. आदित्य
सीमा परत खूप हसत होती
"चल जावू या सीमा ",.. आदित्य
" थोड थांबू या का",.. सीमा
" नाही चल आता ",.. दोघ रूम वर आले
" सीमा लाल साडी नेसून तयार हो ",.. आदित्य
" आदित्य?? ",.. सीमा
" आणली ना सोबत साडी ",.. आदित्य
हो...
" नेस ग" ,.. आदित्य बाहेर गेला होता
सीमा खूप छान तयार झाली होती, लाला साडी, मोकळे केस, थोडासा मेक अप
आदित्य आला, तो सीमा कडे बघत बसला,.. "हे कोण आल रूम मध्ये? एवढी सुंदर मुलगी कोण आहे?",
सीमा हसत होती... "पुरे आदित्य ",
चला मॅडम
कुठे आता
वरती टेरेस वर
त्यांच्या कॉटेज च्या टेरेस वर त्याने सुंदर अरेंज मेंट करून घेतली होती पार्टी साठी
दोघ वरती आले, छान केक कापला, सीमा डान्स,.... लाइट म्युझिक सुरू केल मोबाईल वर , दोघ छान रमले होते एकमेकांत , आदित्यने सीमाला मिठीत घेतल, सीमा लव यु..., लव यु टु...
दोघ बोलत बसले, तिथे जेवण मागवल होत आदित्यने, सीमा खुश होती,.. "सीमा तू रोज असे केस मोकळे सोडत जा",..
"काहीही काय आदित्य, शाळेत रोज अस कस जाणार, ते नियमा बाहेर आहे, मी काय कोणी नटी आहे का",... सीमा
"तू नटी पेक्षा जास्त आहेस माझ्या साठी सीमा",.. आदित्य
"पुरे आदित्य चल आराम करू",... सीमा
"एक मिनिट सीमा, अस नाही मी घेवून जाणार तुला खाली",... आदित्य ने सीमा ला उचलून घेतल,
" आदित्य सोड मला, अरे आपण दोघ पडू खाली, जिना आहे",... सीमा
" काहीही होणार नाही अस, तू शांत रहा सीमा ",.. आदित्य
दोघ खाली आले..
रूम अतिशय सुंदर सजवली होती, सगळीकडे फुल कॅन्डल, एकदम स्वप्नं वत सगळ
" अरे केव्हा केली ही सजावट",.. सीमा
"सरप्राईज आवडल सीमा ",...
हो आदित्य...
सीमाने येवून त्याला मिठी मारली,
" हे राहील होत ना आपल सीमा",... आदित्य
सीमा खूप लाजली होती, सीमा मोकळी रहा, दोघ छान रमले होते एकमेकां सोबत,
दुसर्या दिवशी सकाळी..
"आदित्य उठ आता आपल्याला निघायच ना",.. सीमा
" सीमा इकडे ये, आज थांबू या इथे ",.. आदित्य
"नाही आदित्य अनघा ताई वाट बघत असतील आपण निघू",.. सीमा
ते अनघा ताई कडे जाणार होते, सुमितला कधी भेटू असं झालं होतं सिमाला, दोघं निघाले सीमाने अनघाला फोन करून दिला, अनघा खूपच वाट बघत होती दोघांची, दुपारी जेवायच्या वेळेपर्यंत आदित्य सीमा अनघा कडे पोहोचले, सुमित जरा वेळाने शाळेतुन येणार होता
खूप सुंदर बंगला होता त्यांचा, शरद जिजू ऑफिसला गेले होते, ते दुपारी जेवायच्या वेळेपर्यंत येणार होते, घरात अनघा ताईंच्या सासुबाई होत्या,
आदित्य पुढे बसून टीव्ही बघत होता, सीमा मदतीला किचनमध्ये आली,
"झालेल आहे सगळ सीमा माझ, तू जाऊन बस पुढे ",.. अनघा
"नाही ताई मी थांबते इथे",.. सीमा
"काय मग आली का जोडी फिरून",.. सीमा लाजली होती
"आम्हालाही सांगा जरा आठवणी",.. अनघा
" सुमितला घ्यायला कोण जाणार आहे",.. सीमा विचारत होती
" शरद घेऊन येणार आहे त्याला येताना",.. अनघा
"कधी भेटू सुमितला असं झालं आहे",.. सीमा
" तुमच्या दोघांचा काय विचार आहे सीमा, सुमितला कोणी जोडीदार भाऊ बहीण कधी येणार",.. अनघा
"ताई तुम्ही ही ना, मी बोलणार नाही",.. सीमा
" हो बापरे आदित्यने हा प्रश्न विचारून त्रास दिलेला दिसतोय",.. अनघा
" तसं काही नाही ताई",.. सीमा खूप हसत होती
" तुझ्या चेहर्यावर सगळे स्पष्ट दिसत आहे सीमा, छान असेच राहा प्रेमाने",.. अनघा
थोड्यावेळाने शरद सुमित आले, सुमित पळतच आला, डायरेक्ट येऊन सिमाला भेटला, सगळे हसत होते
" हे बघ सुमित तुझ्या मामीला मामा फिरायला घेऊन गेला होता",... शरद
" सुमितला रोज सीमा ची आठवण येते ",.. अनघा
" आम्हाला हि रोज सुमितची आठवण येते",.. सीमा
" मग काय विचार आहे तुमचा आदित्य सीमा? कशी झाली तुमची हनीमून ट्रीप? आदित्य एकटे एकटे गेले होते फिरायला",.. शरद
सगळे हसत होते,
" शरद आल्या आल्या त्यांना दोघांना छळू नका",.. आदित्य सीमा लाजले होते
" चल आता लवकर जेवायला बसा",. अनघा
सगळे जेवायला बसले, खूप छान वाटत होतं अनघाकडे,
" आपण पाच नंतर जावू फॅक्टरीत, तो पर्यन्त तुम्ही आराम करा",.. अनघा
" आम्ही सुमितला नेवू का आमच्या सोबत रूम मध्ये",..आदित्य
" हो पण पंधरा मिनीटात आमच बाळ वापस करा, आणी आता तुम्ही तुमच तुमच बाळ आणा",.. अनघा
आदित्य सीमा रूम मध्ये आले, सुमित त्यांच्या सोबत होता, आदित्य त्याच्या जवळ होता,.." किती इनोसंट आहे ना हा, सीमा अनघा ताई काय म्हटली, काय आहे विचार ",
आदित्य चूप,..
" विचार कर सीमा",.. आदित्य
" अरे तुम्ही सगळे काय मला त्रास देताय",.. सीमा
" आपण देतो का त्रास सुमित मामीला",.. आदित्य
नाही...
"मामी कशी आहे",.. आदित्य
छान छान..
"चांगल शिकवून ठेवल आहे सुमितला ",.. सीमा
" जा त्याला सोडून ये अनघा ताईंकडे, त्यांनी सांगितल त्याला पाठवून द्यायला थोड्या वेळात",.. सीमा
"मग काय करूया ",... आदित्य
" आदित्य हा ऐकतो आहे गप्प बस जरा ",.. सीमा
" खेळतो आहे तो, अरे याला काय अर्थ आहे सीमा ",..आदित्य
संध्याकाळी चहा झाल्यावर ते बाहेर जाणार होते, अनघाने सीमाला छान तयार करून दिल,
" मस्त दिसतेस सीमा, खूप सुंदर आहेस तू ",.. अनघा
" ताई तुम्ही ही ना, तुम्ही किती छान आहात ",.. सीमा
" झाल असेल एकमेकींच कौतुक तर चला निघू ",... शरद आवाज देत होते
दोघी हसत होत्या
फॅक्टरीत गेले सगळे, त्यांच ऑफिस बघितल, त्या नंतर ते सगळे बाहेर जेवायला गेले होते, खूप मजा येत होती,
सगळे घरी आले, आदित्य शरद बोलत बसले होते, सीमा अनघा सोबत त्यांच्या रूम मध्ये होती,
" सीमा ही घे साडी तुला",.. अनघा
" किती सुंदर आहे ही साडी",... सीमा
" ही आई ला दे, हा ड्रेस ही घे तुला" ,... अनघा
" किती देणार अनघा ताई? एकच काहीतरी द्या मला" ,... सीमा
" घे ग सीमा, तुम्ही किती काय काय देतात मला तेव्हा" ,... अनघा
"तुम्ही कधी येणार आता ताई" ,... सीमा
"सुमीतची परीक्षा झाली की येईल मी",.. अनघा
" आपल्या शाळेत आता परीक्षा आहे, इथून गेली की बिझी मी ",.. सीमा
" पण बर झाल वेळ काढला तुम्ही एकमेकांसाठी",... अनघा
" उद्या आम्ही निघतो खूप काम बाकी आहेत",.. सीमा
"उद्या रहा परवा जा",.. अनघा
"परवा शाळा आहे, आदित्यला ऑफिस आहे, खूप सुट्ट्या झाल्या",... सीमा
" उद्या दुपारनंतर जा मग जेवून",... आदित्य
"शाळेच्या उद्घाटन साठी या ताई ",.. सीमा
ठीक आहे..
दोघी बर्याच वेळ बोलत होत्या
दुसर्या दिवशी आदित्य सीमा निघाले, अनघा शरद जिजू इमोशनल झाले होते, सीमा आदित्यच्या डोळ्यात पाणी होत,... सुमीत ला नेतो आम्ही
"नाही द्या आमच बाळ, तुम्ही तुमच आणा",... अनघा
सगळे हसत होते
ते निघाले बर्याच वेळ ते गप्प होते, संध्याकाळी घरी आले
आबा आक्का आजी.. आदित्य सीमा आले म्हणून खुश होते, करमत नव्हत आम्हाला तुम्ही दोघ नव्हते तर,
रेग्युलर शाळा ऑफिस सुरू झाल, आदित्य बिझी झाला, सीमा दोघी कडे बघत होती, रेग्युलर शाळा.. नवीन शाळा सुरू करायची होती लवकर, शाळेच बांधकाम झाल होत जवळपास...
आज शाळेच उद्घाटन होत, छोटीशी छान शाळा बांधुन तयार होती, बरेच मुलांचे नाव हजेरी पटावर होते, दोन शिक्षक दोन मदतनीस होते, पूर्ण परिसर फुलांनी पताकांनी सजवला होता, सीमा आदित्य आबा आक्का अनघा सुमित आजी मीना ताई राजा सगळे हजर होते, आज पासून शाळा सुरू होणार होती, उद्घाटन आक्का मीना ताई यांच्या हस्ते होत, सगळे खूप खुश होते, अस समाजकार्य घडो सीमा तुझ्या हातून...
रिबिन कापून सगळे आत गेले, लगेच शाळेची प्रार्थना झाली, लगेच पहिला तास सुरू झाला, सीमा स्वतः सगळीकडे लक्ष देत होती, ती स्वतः आठवड्यात दोन दिवस शाळेत येणार होती शिकवायला,
सगळेघरी आले, सीमा तुझा खूप अभिमान आहे आम्हाला, कदम साहेबांचा अभिनंदनाचा फोन आला, त्यांच्या वृद्धाश्रम सुरू झाला होता, जेवण झाल
आदित्य सीमा रूम मध्ये आले,.. "छान झाल ना शाळेच काम",
"हो सीमा तू केवढी हुशार वाटत होती तिकडे",.. आदित्य
"तिकडे म्हणजे काय आदित्य ? घरात नाही वाटत का मी हुशार ",.. सीमा
"इथे घरात मी बॉस आहे",.. आदित्य
काहीही आदित्य...
शाळा सुरू झाल्यामुळे सीमा खूप खुश होती
पाच वर्षानी....
सीमा आदित्यने अस समाजकार्य सुरू ठेवल होत, दोघांच्या जिवनात आता एका गोड परीच आगमन झाल होत, किती छान सुमितची छोटीशी बहीण,
सगळे तिच्या आजुबाजुला असायचे, राजाच मागच्या वर्षी लग्न झाल होत, ते सुखात होते
सीमा खूप बिझी झाली होती परत, आज त्यांच्या गरजु मुलांसाठी दहा शाळा होत्या, जिथे ते अजिबात फी घेत नसत, अनाथाश्रम वृद्धाश्रम सुरू केले आहेत, वृद्धाश्रमातील लोक शाळेत मदत करत होते , मुल सांभाळली जात होती, बर्याच लोकांना या शाळेबद्दल समजल होत, ते येवून बघून जात होते काय केल नक्की, वाह वाह होत होती सीमाच्या कामाची
सीमा घरी आली, तिची परी आता दोन वर्षाची झाली होती, आक्का आबांना परी शिवाय काही सुचत नव्हत, त्यांनी बरच काम कमी केल होत आता,
आदित्य ऑफिस मधून आला बरच वेळ तो परी सोबत होता, जेवण झाल, सीमा परीला घेवून रूम मध्ये गेली, परीला झोपवल
आदित्य आत आला,.. "कसा होता सीमा तुझा आजचा दिवस?",
"हळू आदित्य किती मोठ्याने बोलतो, परी उठेल, आता आठवण आली का बायकोची? , संध्याकाळ पासून एक शब्दही बोलला नाहीस तू माझ्याशी",... सीमा
"अरे मी माझ्या परी राणी सोबत होतो, आता तुझा दुसरा नंबर सीमा माझी परी एक नंबर",... आदित्य परी जवळ गेला
" आदित्य उठवू नको तिला प्लीज ",.. सीमा
" सीमा परी झोपली आहे, काय विचार आहे, सीमा लव यु",.. आदित्य
"मी बोलणार नाही तुझ्याशी आदित्य, माझा दुसरा नंबर का? ",.. सीमा
" अस काय करतेस सीमा बोल माझ्याशी , माझ कस होईल मग ",.. आदित्य सीमा जवळ आला
" आदित्य काय हे? मला त्रास देवू नकोस, उद्या सकाळी लवकर जायच आहे मला, शाळेचा व्याप वाढला आहे खूप, मला छळू नकोस ",.. सीमा
" अस बरोबर नाही सीमा, नवर्याला वेळ कोणी द्यायचा",.. आदित्य
" आदित्य झोप तू , परी झोपली आहे मला आराम करू दे .... तू मला त्रास नको देवूस",... सीमा
" तेच म्हणतो मी की परी झोपली आहे, सीमा हो म्हण ना ... इकडे ये चल ",.. आदित्य
आदित्य....
.....
समाप्त...
वाचकांचे खूप खूप आभार खूप प्रेम दिल तुम्ही