©️®️शिल्पा सुतार
........
........
आज कोर्ट केस चा निकाल... सकाळी सगळे लवकर तयार होते, आबा आक्का नाश्ता करत होते, सीमाने शाळेत फोन करून दिला की ती आज येत नाही, आदित्य ही सचिनशी बोलत होता, काय काय काम आहेत आज ऑफिस मध्ये,
"मी पण येतो आहे कोर्टात आदित्य, मला यायच आहे ",.. सचिन
"ठीक आहे ये तू, पवार साहेबांना सांगून दे सगळी कडे आज लक्ष द्यायला" ,... आदित्य
ठीक आहे...
सगळ्यांनाच उत्सुकता होती की काय होणार आहे कोर्टात, जरा वेळाने वकील आले, सगळे कोर्टाकडे निघाले, मोठ्या गाडी सगळे बसले होते, इतर वेळेस सीमाचं नाव घ्यायचा एकही चान्स न सोडणार आदित्य एकदम गप्प पुढे बसलेला होता, सीमा आक्कां जवळ मागे बसली होती, आदित्य पूर्णवेळ वकील साहेबांशी बोलत होता, आबा गप्प होते त्यांना टेंशन आल होत, एवढ्या मेहनतीने कष्टाने जमीन घेतली होती किती त्रास दिला बाकीच्या लोकांनी आपल्याला, पण आता सगळ नीट जुळून आल आहे, आपण केस जिंकणार
कोर्टात जरा वेळाने त्यांचा नंबर होता, ती वेळही अजिबात जात नव्हती,
"आज आपल्याला नंतर ची वेळ का दिली वकील साहेब? ",.. आदित्य
"कारण जवळजवळ आपल्या केसचा निकाल लागल्यासारखा आहे त्यामुळे बहुतेक नवीन केस आधी घेतात ते ",.. वकील
आबांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, जरा वेळाने यांची केस कोर्टात उभी राहिली, प्रकाश आणि त्यांच्या वस्तीतील लोक आले होते, त्यांनीच पूर्वी दावा केला होता की ती त्यांची जागा आहे अस,
सब्मिट केलेले पेपर सगळे ठीक होते, एक दोन लोकांच्या साक्ष झाल्या, जरा वेळाने लगेच निकाल होता, आबा आदित्य सगळ्यांना टेंशन होत
अपेक्षेप्रमाणे आबा ही जमिनी ची केस जिंकले होते, अनाउन्समेंट झाली, खुप आनंद झाला होता सगळ्यांना, आक्कांच्या डोळ्यात पाणी होतं, मोठी होती ही गोष्ट, करोडो ची जमीन आबांनी एवढी कष्टाने उभी केलेली होती, आबा येवून अक्कांना भेटले, आदित्य खूप खुश होता,
सगळे एकमेकांना येऊन भेटत होते, सीमा खूप खुश होती
" आपण सांगू शकतो बाकीच्यांना आता की आपण केस जिंकलो",.. सीमा
"हो सांग",.. आदित्य
"मला आईला आणि राजाला सांगायचं आहे",.. सीमा
"सांग लगेच",.. आदित्य
सीमा ने मीनाताईंना फोन करून बातमी दिली, राजालाही फोन करून सांगितलं,
"आम्ही येतो संध्याकाळी घरी भेटायला ",.. मीना ताई
आक्का अनघाशी बोलत होत्या, खूप खुश होते ते दोघ,
सगळे कॅन्टीन मध्ये चहा घ्यायला आले, सचिन पेढे घेवून आला, सगळ्यांना पेढे वाटले, आबा प्रत्येकाला भेटत होते आभार मानत होते, त्यांनी निशा च्या सासरी फोन केला त्यांचे आभार मानले
घरी यायला बराच वेळ झाला, खूप भेटणारे येत होते,
"आता आपल्या शाळे जवळच्या जमिनीवर कोणी सिक्युरिटी गार्ड ठेवू या, लक्ष ठेवून राहू आता, तिथे काय करायचा प्लॅनिंग आहे तुमचा आबा ",.. आदित्य
"तिथे कॉलेज सुरू करायच आहे मला, आबा त्यांच्या प्लॅन बाबतीत खूप बोलत होते" ,.. सगळे भारावून ऐकत होते
सीमा आदित्य बरीच मेहनत घेतली तुम्ही ही या केस साठी, निशा आशा ची मदत झाली,
" आहेच मुल हुशार आपली सगळ सांभाळून घेतात",.. आक्का
सीमा कामात होती, बर्याच वेळा चहा पाणी झाल होत आज, खूप उत्साह होता
मीना ताई राजा आले, ते मिठाई हार घेवून आले होते, सगळीकडे आनंदाच वातावरण होत, सीमा येवून त्यांना भेटली
बाकीचे गेले, मीना ताई राजा होते जेवायला, खूप छान बेत होता, जेवायला गोड केल होत, सगळे सोबत बसले जेवायला, जेवण झाल बर्याच वेळ झाला होता,
" आम्ही निघतो आता",.. मीना ताई
"उद्या सकाळी जा आता खूप रात्र झाली आहे " ,.. आक्का
"हो आई थांबून घे",.. सीमा
"पण उद्या सकाळी लवकर जावू आम्ही, राजा ला ऑफिस आहे",.. मीना ताई
हो चालेल....
आक्का मीना ताई बोलत बसल्या होत्या, राजा सीमा आदित्य बसले होते, आबा फोन वर बोलत होते
"चला आता आराम करा, सीमा त्यांना रूम दाखव",... आक्का
सीमा, राजा, मीना ताई खोलीत आले, मी कपडे घेवून येते, सीमाने मीना ताई साठी राजा साठी घरातले कपडे आणले,
सीमा तिथे बसुन होती, सगळ ठीक आहे का ते बघत होती,
सीमा तिथे बसुन होती, सगळ ठीक आहे का ते बघत होती,
बराच वेळ झाला सीमा आली नाही बाहेर, आदित्य आत आला, राजा झोपत होता तो उठून बसला, मीना ताई सीमा बोलत होत्या,
सीमा इकडे ये एक मिनिट,... "काय चाललय सीमा? , गप्पा संपतात की नाही आज तुमच्या?, राजा ला झोपू द्या, चल आता, झोपायची की नाही, आई आली तर नवर्याला विसरली ",..
"एवढ बोलायची काय गरज होती मला , आली मी",... सीमा
"आई झोप तू, राजा आई गुड नाइट",.. सीमा
आदित्य सीमा रूम मध्ये आले, सीमा चिडलेली होती,.. " पाच मिनिट तू बोलू देत नाही मला माझ्या आई शी आदित्य, आई किती दिवसानी अशी भेटली होती मला ",
" पाच मिनिट??... दोन तास झाले सीमा, किती बोलणार? , नवर्या कडे काही लक्ष आहे की नाही, त्याला काही हव नको कोणी बघायच? ",... आदित्य हसत होता, सीमा रागात होती
"रोज बघते, सगळ नीट होत तुझ, तरी अस करतोस मला तू आदित्य ",.. सीमा
"हो का, रोज बघते का? आता मी बघु का तुझ्या कडे, चल इकडे ये सीमा, राग सोड",.. आदित्य
" आदित्य आता झोप बर, माझ्याशी बोलू नकोस ",.. सीमा
" तू चिडली आहेस का?", ... आदित्य
हो..
" जा खाली जातेस का तुझ्या आई कडे झोपायला",.. आदित्य
"आता कशाला?" ,... सीमा
"मी तुला एक गोष्ट सांगणार होती, पण आता जावू दे तुला राग आला आहे ",.. आदित्य
सीमा जवळ येवून बसली,..." काय बोल आदित्य",
जावू दे..
" सांगणार का लवकर,.. प्लीज ",... सीमा
"आपण उद्या निघतोय फिरायला आणि हे फिक्स आहे ",.. आदित्य
" तयारी केव्हा करणार आदित्य? आता सांगतोय तू",.. सीमा
" सकाळी कर तू तयारी ",.. आदित्य
ठीक आहे
" आपण दुपारी निघू, सकाळी थोड काम आहे ऑफिस मध्ये, तू नको जावू शाळेत ",...आदित्य
"वापस कधी येणार आपण तस सांगाव लागेल शाळेत",.. सीमा
" सोमवारी जा शाळेत आता तू, आपण तिथून दोन दिवस अनघा ताई कडे जाणार आहोत, रविवार येवू परत ",...आदित्य
सीमा खूप खुश होती, सुमित भेटणार,.. "अनघा ताईंना सांगितल का आपण येणार ते",..
" हो तिला माहिती आहे ",..आदित्य
सकाळी सीमा लवकर उठली, आदित्य अजून झोपलेला होता, चहा नाश्ता झाला, आबा आक्का होते खाली
" आम्ही निघतो आता, राजाला ऑफिसला जायच आहे",... मीना ताई
आक्का सीमा बाहेर पर्यंत गेल्या
"आज आम्ही जात आहोत फिरायला, नंतर अनघा ताई कडे जावू, रविवारी येवू ",.. सीमा
"त्या नंतर ये घरी रहायला",.. मीना ताई
"हो ताई कधीची आली नाहीस तू",.. राजा
"हो नक्की येईन",.. सीमा
" हो पाठवेन मी तिला ",.. आक्का
" तुम्ही ही या आक्का",.. मीना ताई
"हो नक्की ",.. आक्का
मीना ताई राजा गेले
सीमा आत आली, आदित्य उठलेला होता ,..." आई राजा गेले का? ",
हो..
" बॅग भर सीमा" ,...आदित्य
आदित्य ऑफिसला जायची तयारी करत होता ,सीमा त्याच्या कडे बघत होती
" काय विचार आहे सीमा, इकडे काय बघतेस तू? ",.. आदित्य
सीमा हसत होती,.. "अरे नवरा आहेस तू माझा, मी बघेन नाही तर काही पण करेन, किती भाव खातो तू आदित्य, पण ऑफिस ला जातांना तू छान दिसतोस",
"आणि इतर वेळी ",.. आदित्य
" तेव्हा नाही एवढा ",.. सीमा
" अस आहे का बघतो नंतर तुझ्या कडे, आता माझ्या ताब्यात आहेस तू दोन तीन दिवस एवढ लक्ष्यात ठेव ",.. आदित्य
" तरीही मी म्हणेन तस होत इकडे आदित्य ",.. सीमा
" अस काही नाही आता बघ मी काय करेन ",.. आदित्य
"केव्हा घरी येशील तू आदित्य ",...सीमा
"येतो दुपारी ",.. आदित्य
" तुझे कोणते कपडे घेवू ",.. सीमा
" ते काढून ठेवले काॅटवर",.. आदित्य
सीमा कपाट उघडून, तिथे आत बघत उभी होती, कोणते ड्रेस घेवू...
" तयारी होईल ना दुपार पर्यंत ",.. आदित्य
" म्हणजे काय आदित्य? तू मला बोलायची एक ही संधी सोडत नाही",.. सीमा
"मी कशाला एवढी रिस्क घेईन, ते ही फिरायला जायच्या आधी, चल इकडे ये सीमा, मस्त तयारी कर आराम कर, मी येतो दुपारनंतर",... आदित्य
चहा नाश्ता झाला,
" सीमा मी जावून येतो ऑफिसला, तू लाल साडी घे सोबत, नाहीतर विसरशील",.. आदित्य
सीमा लाजली होती,... लवकर ये आदित्य
सीमा बॅग भरून रेडी होती, आज बर्याच दिवसांनी ती घरी होती, आक्का आजी सीमा मस्त गप्पा मारत बसल्या होत्या,
स्वयंपाक झाला, आदित्य आला दुपारी, जेवण झाल,
आदित्य बॅग कडे बघत होता, भरल्या ना बॅग?
आदित्य बॅग कडे बघत होता, भरल्या ना बॅग?
" बघून घे आदित्य तुला जे हव ते सगळ आहे का बॅग मध्ये , नंतर उगीच वाद नको",.. सीमा
"मी भांडतो का नेहमी",.. आदित्य
"शांततेत घे आदित्य, आपण फिरायला निघतो आहोत ना, तू थकला का आदित्य? आराम करतोस का जरा वेळ",.. सीमा
"नाही निघू आता मी गाडीत झोपेने",.. आदित्य
" काळजी घ्या दोघ, मेसेज फोन करा",... आक्का
हो नक्की...
त्यांचा प्रवास सुरू झाला,
ड्रायवर सोबत होता
आदित्य सीमाचा हात धरून गाडीत बसला होता, रिलॅक्स वाटत होता तो, संध्याकाळी ते छानशा हिल स्टेशनवर पोहोचले, घाटाचा रस्ता असल्यामुळे थोडा उशीर झाला पोहोचायला ,
डोंगर उतारावर छान छान छोटे छोटे कॉटेज होते, तिथे आदित्यने बुकिंग केलं होतं, आत मध्ये गेल्यानंतर एका मुलांने त्यांना त्यांच कॉटेज दाखवलं, आजुबाजूला अतिशय सुंदर फुलझाडं होती, आतून चालता येईल असा रस्ता, मधेच थोड्या पायऱ्या, डोंगर उतारावर ग्रीन लॉन, त्यावर असलेली जुनी झाडी त्यांनी तोडली नव्हती त्यामुळे खूप सुंदर वाटत होतं,
पुढे बसायला थोडीशी जागा होती तिथे खुर्ची टेबल टाकलेले होते, आत मध्ये बेडरूम त्याला लागून बाथरूम अशी रूम होती, वातावरण बऱ्यापैकी गार होतं, सीमा सगळीकडे फिरून बघत होती, आदित्य आरामशीर बसलेला होतं, थोडी झोप झाल्यामुळे आदित्य आता फ्रेश होता, त्याने फोनवरून दोन चहाची ऑर्डर दिली,
"खूपच सुंदर रूम आहे आदित्य",.. सीमा
"आवडली ना तुला?, आता छान रिलॅक्स रहा, तुझी खूप धावपळ होते",.. आदित्य
" आज मी आरामात होती घरी, शाळेत गेली नाही आज, आम्ही घरी खूप गप्पा केल्या ",.. सीमा
सीमा ने घरी फोन करून सांगून दिलं की ते पोहोचले, मीनाताईंना ही फोन करून सांगून दिलं
" सीमा इकडे ये काय चाललं आहे? केव्हाची तू फोनवर बोलते आहे, आता दोन-तीन दिवस फक्त माझ्याशी बोलायचं" ,.. आदित्य
" इतर वेळी मी तुझ्याशी बोलते फक्त आदित्य, घरी सांगायला नको का आपण पोहचलो ते",.. सीमा
"त्यासाठी फॅमिली ग्रुप आहे एक मेसेज टाकून द्यायचा",.. आदित्य
" ठीक आहे तुला काही सांगायचं असेल तर आता मी फॅमिली ग्रुप वरच मेसेज टाकून देईन ",... सीमा
" हे छान जमतं तुला सीमा, काही सांगितलं की वेगळ्या ठिकाणी वापरायचं, बर ठीक आहे आपण आता एक काम करू या भांडायला नको दोन-तीन दिवस छान राहू",.. आदित्य
"हे एकदम व्यवस्थित बोलला आहेस तू आदित्य, तू तर असा बोलत आहे जसा मी खूपच भांडकुदळ आहे आणि तुला खूप त्रास सहन करावा लागतो ",.. सीमा
आदित्य हसत होता, हिच्याशी बोललो नाही तरी करमत नाही,... चल इकडे ये सीमा जरा जवळ, हनिमून ला आलो आहोत ना आपण
आदित्य काय हे...
चहा झाल्यावर त्या दोघांनी छान टीव्ही बघितला आणि नंतर जेवण रूम मध्ये ऑर्डर केलं,
" उद्या सकाळी आपण फिरायला जाऊ इथे छान हिल स्टेशन वर ",.. आदित्य
आदित्य तिथल्या मॅनेजरशी बोलत होता, फिरायला जायला कोणत्या जागा आहेत, कोणते पॉइंट्स बघायचे याची माहिती घेतली, कोणी गाईड ठरवला,
सीमा आराम करत होती, टीव्ही बघत होती, जेवण आलं, सीमा उठली
" सीमा बस आरामात, मी देतो जेवण आज",.. आदित्य
" बापरे माझी खूपच सेवा सुरू आहे",... सीमा
"हो यात माझा स्वार्थ आहे जरा वेळाने समजेलच",.. आदित्य
" काहीही काय आदित्य तुझं सुरू झालं परत",.. सीमा
"अरे मग कशासाठी आलो आहोत आपण इथे? फिरायला ना, जरा राहू रिलॅक्स एकमेकांसोबत ",... आदित्य
सीमा छान हसत होती..
जेवण झाल सगळ सीमाच्या आवडीचे पदार्थ होते, सीमा खुश होती,.. हा घेतो मुद्दाम माझ नाव पण तितका प्रेमळ आहे, मुद्दाम माझी आवड जपतो तो,
" कस समजल आदित्य तुला माझी आवड ",.. सीमा
"माझ लक्ष आहे तुझ्या कडे सीमा , रोज काय सुरु आहे तुझ ते माहिती असत मला ",.. आदित्य
" बापरे मला सावध राहाव लागेल, कोणीतरी लक्ष देवून आहे",.. सीमा
"हो, तुला खुश केल मी, माझ काय?",.. आदित्य
सीमा लाजली होती, ती तिथून उठली, इथे पळून जायला जागा ही नाही, काय करू, आदित्य मागे आला, त्याने सीमाला जवळ ओढल,.." आता तरी मी तुला सोडणार नाही सीमा " ,..
"आदित्य मला वाटल नव्हत तू असा असशील",.. सीमा
"असा म्हणजे कसा? , सांग सीमा ",.. आदित्य
" त्रास देतोस तू मला ",.. सीमा
" तुला आवडत ना ते ",.. आदित्य
हो..
" चल मग ये इकडे ",.. आदित्य
.........
कथा संपली आहे, उद्या कथेचा शेवटचा भाग पोस्ट करेन, वाचकांचे खूप आभार, खूप प्रेम दिल तुम्ही
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा