नवी आशा जगण्याची... भाग 70

सगळ्यांना उद्याच्या निकालाची उत्सुकता होती, पेपर तर सगळे व्यवस्थित होते, आबांनी सगळे पेपर स्वतःकडे ठेवले,


नवी आशा जगण्याची... भाग 70

©️®️शिल्पा सुतार
........

आदित्य आज जरा उशिराच घरी आला, सीमा वाट बघत होती, जेवण झालं, खूप थकला होता तो,

" काय झालं आज का उशीर झाला एवढा आदित्य",.. सीमा

" कालच काम बाकी होत ते केल आज , वकील आले होते, सोमवारी तारीख आहे आहे कोर्टाची, आपल्याला जायचं आहे सगळ्यांना",.. आदित्य

" चालेल जाऊया ",.. सीमा

" मग त्यानंतर आपण जाऊ फिरायला",.. आदित्य

"हो चालेल पण तू खूप अति ठरवून ठेवू नको, काही काम निघाला तर मग तुलाच वाईट वाटतं",.. सीमा

हो

" आदित्य थँक्यू",.. सीमा

" का आता कशाबद्दल ",.. आदित्य

" मला राजाचा फोन आला होता सगळ्यांचे इन्क्रिमेंट झालं आहे ना ",.. सीमा

" हो राजाही खूप खुश होता",.. आदित्य

" आदित्य मलाही हवा जास्तीचा पगार ",.. सीमा

" आता तुझं हे काय नवीन सीमा? मालकांना पगार मिळत नसतो",.. आदित्य

" पण मी शाळेत नोकरीला आहे आधीपासून",.. सीमा

" तुला तरी पगार मिळतो आहे मलाच तेवढं ही मिळत नाही, तू मला पैसे देत जा सीमा दर महिन्याच्या ",.. आदित्य

" ठीक आहे, मला पण जास्तीचा पगार हवा, माझं पण इन्क्रिमेंट कर ",.. सीमा

" चला म्हणजे आजचा भांडणाचा विषय मला समजला आहे ",.. आदित्य

सीमा रागाने बाजूला जाऊन बसली..

" बरोबर बोललो होतो ना सीमा मी, रुसलीस बघ तू परत",.. आदित्य

" मी एवढं चांगलं बोलते तुझ्याशी आदित्य आणि तू माझं नेहमी नाव घेतो , मी भांडली होती का आता? मी फक्त विचारते आहे ना, तू असं का बोललास की हा आपला आपला भांडणाचा विषय आहे",.. सीमा

"बरं सॉरी इकडे ये चल, शाळेचे बॉस आबा आहेत, तू बोल त्यांच्याशी, घे पगार वाढवून हवा असेल तर ",.. आदित्य

" नको आबांशी नको बोलायला ",.. सीमा

" आता का? म्हणजे मला त्रास द्यायचा, बाकीच्यांना नाही अस ना ",.. आदित्य

सीमा काही बोलली नाही

" अनघा ताई गेली तर किती बोर वाटत आहे ना घरात",.. आदित्य

" हो ना मला तर सुमित ची खुप आठवण येते आहे",.. सीमा

" तुला लहान मुल आवडतात का सीमा? ",.. आदित्य

" कोणाला नाही आवडत, छानच असतात की लहान मुलं",... सीमा

" मग तुझा काय विचार आहे",.. आदित्य

कसला?

"आपल काय प्लॅनिंग आहे? ",.. आदित्य

" आदित्य चुप्प बस काय रे तुझं ",.. सीमा

" अरे यात लाजल्यासारखं काय आहे सीमा? केव्हा ना केव्हा हे होणारच आहे, सांग ना तुझा काय विचार आहे",.. आदित्य

" आदित्य तू झोप बरं",.. सीमा

" सीमा इकडे आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर दे",.. आदित्य

सीमा प्रचंड लाजली होती, आदित्य तिच्याकडे बघून हसत होता,.. कसं होणार आहे हिच, सीमा तयारीत रहा,

" आदित्य काय हे",.. सीमाने त्याला उशी फेकून मारली
.........

" सकाळी आज विक्रम काकांसोबत मामाच्या गावाला गेला ",..

" विक्रम तिथे गेल्या गेल्या आधी तू सगळ्यांची माफी मागून घे ",.. काका

" हो तसच कराव लागणार आहे, आई पप्पा तुम्ही सगळ्यांनी जरा थोडे दिवस डोळे आणि कान बंद ठेवा, खूपच पडत घ्यावे लागणार आहे मला",... विक्रम

" पण आता जर पूजा ने होकार दिला तर तू व्यवस्थित वागणूक ठेव विक्रम",.. काकू

" हो आई जर पूजाने मला माफ केलं तर आपण इकडेच कुठेतरी राहू, मामा सोबत काम करेल मी, हळूहळू तिकडचं कर्ज फिटल की मग वापस जाऊ",.. विक्रम

" पण मामा माफ करेल का? ",.. काकू

" माहिती नाही",.. विक्रम

ते मामाच्या घरी पोहचले, मामाला त्यांना बघून कपाळावर आठ्या आल्या, पूजा घरी नव्हती

" काय विक्रम झाली का सुटका तुरुंगातून? ",.. मामा

" दादा अरे कसा बोलतो आहेस तू त्याच्याशी",..काकू

"मग काय बोलू ताई, तुम्ही कशाला आले आहात सगळे इकडे? तुम्हाला जर वाटतं मी माफ करेल तर ते होणार नाही ,आले आहात इथे तर जर जेवून जा, माझ्याकडून कुठल्याही गोष्टीची अपेक्षा ठेवू नका ,पूजा बरोबर आता विक्रमच लग्न होणार नाही",..मामा

" दादा अरे ऐकुन घे, आपण कधीच चुका केल्या नाहीत का, झाली चूक विक्रम कडून तो माफी मागतोय ना, त्या साठी नाती का तोडायची ",.. काकू

" त्या दिवशी झाल ना बोलण किती वेळा तेच बोलणार आहोत आपण, ही चूक मला मान्य नाही, माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ",.. मामा

विक्रम पुढे गेला,.." मामा माफ करा मला, पुरे आता हे ",..

" काही प्रॉब्लेम नाही विक्रम, तुला काही लागल तर सांग मला, पण पूजाच लग्न तुझ्याशी होणार नाही ",.. मामा

" मला एकदा पूजाच्या तोंडून ऐकायच आहे ",.. विक्रम ला माहिती होत तो पूजा ची समजूत काढेल, एकदा होवु दे हे लग्न, मग मी आहे मामा आहे, त्याची पोरगी आहे,

" ठीक आहे पूजा येईल आता थांबा",.. मामा

मामा घरी होते, दुपारी पूजा घरी आली, काकू काका विक्रम ला बघून ती आत रूम मध्ये निघून गेली, मामा मागे गेले

" का आला आहे विक्रम?",.. पूजा

"तुझ्याशी बोलायला",.. मामा

"मला नाही बोलायच त्याच्याशी",.. पूजा

"तू सांग त्याला तुझ्या तोंडून ऐकायच आहे ",.. मामा

तेवढ्यात दार वाजल विक्रम आला होता,.. "मामा मला पूजा शी बोलायचं",..

"चला हॉल मध्ये बसुन बोलू",.. मामा

"नाही इथे बोलायच मला पाच मिनिट ",.. विक्रम

" नाही विक्रम तू बस हॉल मध्ये मी येते" ,.. पूजा

विक्रम बाहेर येवून बसला काका काकू त्याच्या कडे बघत होते, त्याने मानेने सांगितल काही खरं नाही अस

पूजा बाहेर आली ती सगळ्यां समोर येवुन बसली

" पूजा विक्रम ला तुझ्याशी बोलायच आहे ",.. काकू

बोला..

"जा आत जावून बोला ",.. काकू

" नाही आत्या इथेच बोलणार आम्ही, जे बोलायचं असेल इथे बोला" ,... पूजा

"पूजा आपण लग्ना ची तारीख लवकर काढून घेवू, खूप उशीर झाला आता",... विक्रम

"मला हे लग्न करायच नाही विक्रम ",.. पूजा

" का पण ",.. विक्रम

" तुला माहिती नाही का कारण विक्रम, बोलून दाखवू का",.. पूजा

"मी माफी मागितली सगळ्यांची ",.. विक्रम

" माफी मागितली म्हणजे झाल का? नीट कोण वागेल, परत इतरांना त्रास द्यायला मोकळे आपण, असच ना? ",.. पूजा

" काय झालं आहे एवढ? , हसी मजाक करत होतो मी वहिनी शी, त्यांना नाही समजल ते, त्याला मी काय करणार ",.. विक्रम

"ही तुझी बाजू झाली विक्रम, मी सीमा ताई शी बोलली आहे तिने मला सगळ सांगितल तू कसा तिच्याशी वागत होता, कसा तिच्या कडे बघत होता, मला हे अजिबात आवडल नाही, मुळात लग्न झालेल्या वहिनीच नाव का घ्यायच?, आणि मी तुझ्या आयुष्यात असतांना तू अस केल, मला धोका दिला आहेस विक्रम तू ",... पूजा

" तिने तुला जास्त सांगितल पूजा, त्या लोकांना वाटत आपल लग्न नको व्हायला ",.. विक्रम

" ती नाही कोणी असती समोर तरी एका मुलीशी हे तू अस वागला मला अजिबात नाही पटल ",.. पूजा

" मी माफी मागायला तयार आहे सीमाची, तुझ्या समोर माफी मागतो तिची, तुझी ही माफी मागतो, काय करू अजुन ",.. विक्रम

" त्याने काय होणार आहे, माझा निर्णय झाला आहे मला हे लग्न नाही करायच, आता तू काहीही कर विक्रम माझा काही संबध नाही ",... पूजा

विक्रम चिडला तो उठून पूजा जवळ आला,.." काय झालं आहे एवढ पूजा? , मी चांगल बोलतो आहे अजून तुझ्याशी समजत नाही का?, मी माझ्या भाषेत सांगू का? गुपचूप लग्नाला तयार हो",

मामा उठून आले,.." ही कोणती बोलण्याची पद्धत आहे विक्रम? हे असे वागणार तुम्ही लोक माझ्या मुलीशी? निघा आताच्या आता घरा बाहेर, या पुढे येवू नका इथे, नाही तर पोलिसात देईल मी तुम्हाला, निघा म्हणतोय मी",..

पूजा आत निघून गेली, विक्रम काका काकू निघाले,

" कशाला चिडला तू तिकडे इतका विक्रम ",.. काका

हो ना... काकू बोलल्या

" आई पप्पा पुरे आता, गप्प रहा जरा, माझ डोक फिरल आता",... विक्रम

आदित्य सीमाच्या वाटेला जायच नाही या पुढे, खूप नुकसान झाल, मित्र तुटले लग्न मोडल, जावू दे, होईल ठीक कधी तरी
..........

सीमा शाळेत आली, आज अर्धा दिवस शाळा होती, शाळा सुटल्यावर तिने जेवण करून घेतलं, आबा आक्का आले जरा वेळाने, ती त्यांच्याबरोबर शाळेची साईट बघायला निघाली, त्यांच्या शेतापासून थोड्या अंतरावर ती साईट होती, मोजमाप सुरू होत, कंस्ट्रक्शन साठी कॉन्ट्रॅक्ट दिलं होत, म्हणजे काम पटापट होईल

त्या गावातुन शिक्षक येणार होते भेटायला, ते आले, आबा त्यांच्याशी बोलत होते, सीमाने मुलांची थोडी माहिती दिली की साधारण किती मुलं असतील,

आबा आक्का सीमा आता जिथे वस्ती आहे तिथे गेले, ते सर मुलांची माहिती घेत होते शाळेची माहिती देत होते, सीमाने बऱ्याच बायकांना गोळा केलं, ती त्यांना गृह उद्योगाची माहिती देत होती, बऱ्याच बायका शेतात कामाला जात होत्या, ज्या घरी होत्या त्यांनी काम करायची तयारी दाखवली, थोड्या वयस्कर बायकांनी त्यात सामील झाल्या, घरबसल्या जर व्यवस्थित काम होत असेल तर काय हरकत आहे, गरोदर बायका, ज्यांची मुले लहान आहेत अशा बायकांना गृहउद्योग आवडला होता

मी येईल पुढच्या आठवड्यात मग आपण सगळी तयारी करू, दोन चार ठिकाणी चौकशी करावी लागेल

आबा लांबूनच बघत होते सीमा खूप छान पद्धतीने सगळ्या बायकांना सगळं समजून सांगत होती, आक्का सीमाच्या सोबत होत्या, ही मुलगी छान शाळेचा पसारा वाढवेल, नंतर कॉलेजही टाकू आपण, अशा गरजू लोकांसाठी दोन-चार शाळा अजून काढू, सीमा ला हेड करून टाकू नंतर शाळेचा,

ते घरी निघाले रस्ता भर सीमा खूप बोलत होती, काय काय प्लॅन आहे ते सगळं सांगत होती, आबा आक्का कौतुकाने तिच्याकडे बघत होते

"सीमा तू खूप हुशार आहेस",.. आक्का

"नाही आई तुम्ही आबा हुशार आहात, आम्ही तुमच्या कडे बघुन शिकतो आहे ",.. सीमा

सगळे हसत होते
.....

रविवारी घरातच खूप मोठी मीटिंग होती, सोमवारी कोर्टाची डेट होती त्यामुळे वकील, सचिन, सगळे घरीच आले होते, असलेले पुरावे एकत्र करणे, पुढे काय करायचं ते ठरवत होते सगळे

आबांना विश्वास होता की केस ते जिंकतील,.. " प्रकाश कडून अजून तो पेपर आला नाही ज्याच्यावर सगळ्या लोकांच्या सह्या होत्या, आदित्य बघ जरा",

आदित्य ने प्रकाश ला फोन केला,. "तुम्ही तो पेपर अजून आणून दिला नाही ज्याच्यावर बाकीच्या लोकांच्या सह्या होत्या, पैसे मिळाले ना तुम्हाला",..

"हो मी सह्या केलेला पेपर दिला आहे पवार साहेबांकडे, अजून एक प्रत आहे माझ्याकडे, घेवून येवू का लगेच ",.. प्रकाश

"ठीक आहे, येतील पवार साहेब, काही लागल तर सांगतो मी तुम्हाला ",.. आदित्यने फोन ठेवला

"काय झालं आदित्य?",.. आबा

"आबा त्या लोकांनी पेपर पाठवला आहे पवार साहेबांसोबत ते येतील आता ",.. आदित्य

" ठीक आहे",. आबा

थोड्यावेळात पवार साहेब आले पेपर घेऊन, हाच एक पेपर राहिला होता, हेही काम झालं, सगळे खुश होते, सगळे घरी आले म्हणून आक्कांनी मोठा स्वयंपाक केला होता, आज सगळे इकडेच होते जेवायला,

जेवायची वेळ झाली आबा सगळ्यांना आग्रह करत होते, सीमा ताट करत होती, आदित्य मदतीला गेला, सगळे बघत होते ऑफिस मधला बॉस स्वतः वाढतो आहे,.. "कोणीही लाजू नका, व्यवस्थित जेवून घ्या",

आजींच ही जेवण झाल

सगळ्यांचे छान जेवण झाले, स्वयंपाक खूप छान झाला होता, नंतर आक्का आणि सीमा जेवायला बसल्या, आबा त्यांच्या सोबत बाकी होते जेवायचे, ते ही बसले जेवायला ,

सगळ्यांना उद्याच्या निकालाची उत्सुकता होती, पेपर तर सगळे व्यवस्थित होते, आबांनी सगळे पेपर स्वतःकडे ठेवले, उद्या सकाळी नऊ वाजताच ते तिकडे जाणार होते, सीमा आदित्य आक्का ही येणार होत्या,

आदित्य पूर्णवेळ कामात बिझी होता, संध्याकाळी त्याला थोडा वेळ मिळाला, सीमा रूम मध्ये काम करत होती

" चल सीमा आपण खाली फिरायला जाऊ" ,.. आदित्य

आता विक्रमच्या घराच्या बाजूने कंपाऊंड होत त्यामुळे फिरायला जायला भीती वाटत नव्हती, दोघ छान लांब पर्यंत फिरून आले

" उद्याच टेन्शन आहे सीमा सगळे पेपर तसे व्यवस्थित आहे" ,... आदित्य

" केसचा निकाल आपल्या बाजूने लागेल, काळजी करू नकोस, निशाच्या सासरच्यांनी त्यांनी खूप मदत केली, प्रकाशने सही दिली, झाला आपला ही थोडा खर्च पण आता उद्या व्यवस्थित निकाल लागेल, तू अजिबात काळजी करू नको आदित्य",.. सीमा

"माझ्यासाठी नाही आक्का आबा त्यांचा विचार करतो आहे मी ",.. आदित्य

" हो बरोबर आहे किती कष्ट आहेत त्यांचे एवढं सगळं उभं केलं आहे आणि काही लोक आयत्या बिळावर नागोबा होतात",.. सीमा

" हो त्यामुळेच खूप राग येतो मला",.. आदित्य

दोघा फिरून आले, आबा आक्का घरात बोलत बसले होते, सीमाने किचन मध्ये जाउन स्वयंपाक झाला आहे का बघितलं, जेवण झाले, आज खरं तर कोणालाच काही सुचत नव्हतं,

" उद्या सकाळी लवकर उठा सगळ्यांनी, येणार आहात ना तुम्ही सोबत ",.. आबा

हो आबा...

सीमा आदित्य रूम मध्ये आले

"आबा आक्का शांत झाले ना खूप",.. सीमा

"हो ना तेही टेन्शनमध्ये आहेत",.. आदित्य

होईल नीट सगळ...

🎭 Series Post

View all