Login

नवी आशा जगण्याची... भाग 69

आदित्य बोलला होता त्याप्रमाणे आबांच काम खरच खूप छान आहे, कुठली गोष्ट ते एकदम सिरीयस होऊन करतात, आणि समाज सेवा खूप करतात ते,



नवी आशा जगण्याची... भाग 69

©️®️शिल्पा सुतार
........

संध्याकाळी शाळा सुटली, सीमा बाहेर आली, कार आलेली होती , आता घरी जावू खूप काम आहे , कारच्या मागे आदित्य उभा होता, तो फोन वर बोलत होता, अरे हा काय करतो आहे इथे? सीमाला खूप आनंद झाला, आदित्यचा फोन झाला, सीमा जावून त्याला भेटली,.. "तू कसा आज इथे?",

"मॅडम तुमचा ड्रायवर आहे मी, गुड इविनिंग मॅडम" ,... आदित्य

"आदित्य पुरे सांग ना",.. सीमा

"तुला भेटायला आलो आहे मी, चल सीमा थोडा घुम के आऐंगे",.. आदित्य

दोघ निघाले,.. "आदित्य कुठे जातो आहोत आपण, आज ड्रायवर नाही का सोबत? आपण घरी जावू ",.. सीमा

आदित्य काही बोलला नाही

"कुठे चाललोय आपण समजेल का आदित्य ?",.. सीमा

" फार्म हाऊसवर",.. आदित्य

"अरे पण आत्ता",.. सीमा

"हो आज आपण तिथे राहणार आहोत ",.. आदित्य

" घरी सांगायला हव कपडे सामान नाहिये ",.. सीमा

" आणला आहे मी तुझा एक ड्रेस",.. आदित्य

"केव्हा घेतला तो",.. सीमा

सकाळी...

"उद्या शाळेत कस जाणार मी",.. सीमा

"असच तयार होवुन, सीमा तुला माझ्या सोबत नाही यायच का? ",.. आदित्य

" अस काही नाही आदित्य ",.. सीमा

" एन्जॉय कर, एकही प्रश्न नको आता",.. आदित्य

" मी घरी फोन करते ",.. सीमाने आक्कांना सांगितल ती आदित्य सोबत फार्म हाऊस वर जाते आहे

" हो आदित्य बोलला मला",.. आक्का

" उद्या इकडुन शाळेत जाईल",.. सीमा

ठीक आहे,..

"काय झालं आहे सीमा? तू एवढं काय टेन्शन घेते सगळ्या गोष्टीच?, नवर्‍या बरोबर आहेस ना तू, काय अस ",.. आदित्य

" तसं नाही आदित्य पण व्यवस्थित सांगून गेलेलं बरं म्हणजे मग मला रिलॅक्स वाटत आणि ते ही घरी एकटे आहेत ",.. सीमा

"ठीक आहे पण आता काळजीच कारण नाही, सिक्युरिटी भरपूर लावली आहे घरात, मेन गेट नीट बंद असतो आता",.. आदित्य

हो..

दोघ फार्म हाऊस वर आले, बहुतेक आदित्यने त्या लोकांना आधीच सांगून ठेवलं असेल की आम्ही येणार आहोत, चहा नाश्ता रेडी होता, दोघ फ्रेश झाले , बाहेर बाल्कनीत बसून चहा नाश्ता घेवु,

"आज असा का अचानकच फार्म हाऊस वर यायचा प्लॅन केला आदित्य? ",.. सीमा

"असंच मला राहायचं होतं तुझ्यासोबत",.. आदित्य

सीमा खूपच खुश होती, बर्‍याच दिवसांनी असं रिलॅक्स वाटत होतं,.. "आता काय प्लॅन आहे मग आदित्य?" ,

"काहीच नाही, शांतपणे राहायचं आहे तुझ्या सोबत, अशी दूर बसू नको इकडे ये ",.. आदित्य

" खाली जेवणाचं सांगितलं आहे का",.. सीमा

" हो मस्त पैकी खिचडी लोणचे आणि पापड",.. आदित्य

"माझा आवडता बेत आहे हा",.. सीमा

"म्हणूनच ते सांगितलं आहे",.. आदित्य

दोघेजण छान बोलत बसले होते,

" आता या एक दोन दिवसात सहज फिरायला जाणं शक्य नाही आपल्याला म्हणून आज इकडे आलो आहोत आपण मॅडम समजल का ",.. आदित्य

" छान प्लॅन केला, अनघा ताई पोहचली का घरी",.. सीमा

" हो तिचा मेसेज आला आहे बघ फॅमिली ग्रुप वर, आज आले होते का आबा शाळेत? ",.. आदित्य

" हो आले होते इथल्या शाळेचे जवळ-जवळ ठरल आहे",.. सीमा

"आता बघ आबा किती फास्ट काम करतील, त्यांना सांगायचा अवकाश की ते काम पूर्ण झालेलं असतं, अगदी महिन्याभरात मुलं शाळेत जायला लागतील",.. आदित्य

" पण टीचर मिळाल्या नाहीत अजून",.. सीमा

" झालं असेल तेही काम, आबांच्या खूप ओळखी आहेत, त्या गावाकडचे दोन-तीन शिक्षक त्यांनी बघून ठेवले असतील",... आदित्य

" बापरे खूपच छान काम करतात आबा",.. सीमा

" हो म्हणूनच तर एवढा पसारा उभा राहिला, त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे",.. आदित्य

" खरंच मी तर त्यांना पहिल्यांदा बघितलं तेव्हाच मी भारावून गेले होते",.. सीमा

"बरोबर आहे तेव्हा तुला काय माहिती यांच्याच मुलाबरोबर आपल्याला संसार करायचा आहे",.. आदित्य

"तू कसं काय ठरवलं आदित्य माझ्याशी लग्न करायचं",.. सीमा

"माहिती नाही सीमा फक्त मनात हाच विचार होता जोपर्यंत आपल्याला स्वतःला मुलगी आवडत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, तू त्या दिवशी अचानक गाडी समोर आली आणि खूपच आवडली, एवढी सुंदर दिसत होती तू त्या दिवशी ",.. आदित्य

"त्या दिवशी म्हणजे काय आदित्य? आता नाही का दिसत मी सुंदर ",... सीमा

" आता आधी पेक्षा छान दिसतेस तू",.. आदित्य

" मी आहेस तशी खूप छान",.. सीमा

"पुरे झालं सीमा स्वतःचं कौतुक",.. आदित्य

"तुझ्या सोबत राहून मला स्वतःचं कौतुक करायची सवय लागली",.. सीमा

"हो का अजून काय काय सवय लागल्या सांग",.. आदित्य

"आधी तु ते सांग मग पुढे काय ठरवल होत तेव्हा मी दिसली तर त्या दिवशी",.. सीमा

"हो मग दोन दिवस मी तुला शोधत होतो, मेन बस स्टॉप वर",... आदित्य

मग..

" मग मी तुझ्या निशा च्या मागे आलो त्या दिवशी ",.. आदित्य

कधी?

" निशाच्या घरी तू गेली होती तेव्हा,.. मला वाटल ते तुझ घर आहे ",.. आदित्य

" अस आहे तर बराच उचापती दिसतो तू आदित्य",.. सीमा

" उचापती म्हणजे? सीमा तू गेलीस आता, काही खरं नाही तुझ, एवढा विचार करून ठेव सीमा तू आपण दोघे इथे एकटेच आहोत, मी सोडणार नाही तुला, तुला माफी मागायची का माझी",.. आदित्य

कशाबद्दल...

"तू मला काहीही बोलते त्या बद्दल",.. आदित्य

"हे.. मुळीच नाही आदित्य",.. सीमा

"मग कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकतं इथे, मला सांगू नकोस ",.. आदित्य

आदित्य उठला, सीमा आत पळून गेली,.. सीमा थांब, सीमा दाराची कडी उघडायचा प्रयत्न करत होती, तो पर्यंत आदित्य तिथे आला, तो तिच्या कडे बघत होता, पुढे होवुन त्याने सीमाला जवळ घेतल,.. "तुला माहिती आहे ना सीमा या दाराची कडी फक्त मला उघडता येते तरी इतकी रिस्क घेतली तू",..

आदित्य सोड मला, सीमा हसत होती,.. "अरे मी अस बोलत होती आदित्य की किती मागे मागे करत होता तू तेव्हा",

"तेव्हा.... अजून ही किती मागे मागे कराव लागत मला तुझ्या, तेव्हा तुला मी दिसतो, आपण लग्नानंतर इथे आलो होतो तेव्हा किती व्यवस्थित वागलो होतो ना मी तुझ्याशी त्याचा पुरेपूर बदला आता मी घेणार आहे",.. आदित्य सीमा कडे बघत होता, ती लाजली होती, काही बोलली नाही ती, खूप छान दिसते तू सीमा अशी लाजली की , आदित्य जवळ आला

बाहेर दरवाजा वाजत होता, आदित्य बाजूला झाला, काय कटकट आहे कोण आहे आता?

सीमा हसत होती... आता उघड दार, तुला येत ना उघडता

खालचे काका जेवण घेऊन आले होते, सीमाने लगेच उठून जेवण टेबलावर मांडून घेतलं, ते काका गेले, सीमा जेवणाची मांडामांड करत होती, आदित्य मागून येऊन तिच्या जवळ उभा होता, सीमा वळाली एकदम आदित्य जवळ होता ,.. "काय चाललं आहे आदित्य, तू असं माझ्या मागे का येतो आहेस? लागून जाईल तुला",..

"जरा प्रेमाने बोल सीमा" ,... आदित्यने पुढे होऊन सिमाला जवळ घेतलं,

आता काय आदित्य? अगदी हट्टी आहे हा... "पुरे आदित्य आता जेवून घे",..

"नाहि आधी तू माझ्या जवळ ये",.. आदित्य

आदित्य...

"ठीक आहे सीमा.. बाल्कनीत जेवू या का? ",.. आदित्य

ठीक आहे,

सीमा तुझ्यासाठी सरप्राईज आहे आपण दोघ टेरेस वर झोपायला जाणार आहोत, बाहेर बघ किती छान चांदणं पडल आहे, दोघांचे जेवण झालं, वरती दोन गाद्या घेऊन आदित्य गेला, सीमा सगळं आवरून आली, गार वारा सुटला होता, खूप शांतता होती, चांदण पडल होत आदित्य मस्त आकाश कडे बघत होता

"किती छान वाटत आहे या टेरेस वर आदित्य गार अगदी " ,.. सीमा

"ये सीमा इकडे, आम्ही लहानपणी इथे वरती यायचो झोपायला, खूप छान वाटत ना इथे" ,... आदित्य सीमा मस्त लोळून आकाशा कडे बघत होते,

"खरच किती छान वाटतं आहे अशा वातावरणात" ,.. सीमा

"माझ आधीपासून स्वप्न होते की मी एकदा तरी तुझ्या सोबत इथे येईन ",.. आदित्य

"मागच्या वेळी आपण आलो होतो तेव्हा तु का नाही सांगितलं मला हे",.. सीमा

"तेव्हा तुझ्याबरोबर असा आरामात थोडी राहता येत होता मला, तू तर एकदम लांब लांब पळत होती",.. आदित्य

"आदित्य आता उगाच तू मला चिडवू नको",.. सीमा

"इकडे ये सीमा",.. आदित्यने तिला मिठीत घेतलं

"आदित्य किती शांतता आहे ना इथे, खूप छान वाटत आहे तुझ्या सोबत ",.. सीमा

" सीमा तू खूप छान आहेस ",.. आदित्य

" काय आता ",.. सीमा

" थोड्या दिवसात पूर्ण घराची जबाबदारी मस्त सांभाळली तू, माझ्या कडे नीट लक्ष आहे तुझ ",.. आदित्य

"त्यात काय? चांगले आहेत घरचे आपल्या, मला आवडत अस काळजी घ्यायला ",.. सीमा

" मी कसा आहे तुझ्याशी नीट वागतो ना मी?, तुला कस वाटल होत तुझा नवरा कसा असेल ",.. आदित्य

" तू गोड आहेस आदित्य, मी असा काही विचार केला नव्हता कधी की नवरा कसा असेल ",.. सीमा

" तुला लग्न करायच नव्हत ना आधी ",.. आदित्य

हो..

आता सीमा..

" आता मला तुझ्या सोबत आवडत आदित्य",.. सीमा

" माझी अजून तारीफ कर ",.. आदित्य

" काहीही काय आदित्य"... सीमा

" तू मला सांगितल नाही पुढे काय झाल ते ",..सीमा

कसल?..

" माझ्या मागे तू निशाच्या घरी आलास, त्या नंतर काय झाल?",.. सीमा

उद्या सांगेन.. आदित्य

"आता का नाही आदित्य? ",.. सीमा

"आता मला तुझ्या सोबत छान वेळ घालवायचा आहे सीमा",.. आदित्य
.......

दुसऱ्या दिवशी तिथूनच आवरून सीमा शाळेत गेली, आदित्य ऑफिसला गेला

आज वकील भेटायला आले होते

" कोणती तारीख मिळाली आहे कोर्टाची?,सगळे कागदपत्र आहे ना व्यवस्थित ?अजून काही लागत आहे का ?",..आदित्य

" तेच सांगायला आलो आहे मी आता, सगळे कागदपत्र व्यवस्थित आहे सोमवारी कोर्टाची डेट आहे, आपण बहुतेक हि केस जिंकू, कार विरोध करायला कोणीच राहिल नाही",.. वकील

आदित्य खुश होता,.." जातांना तुमची फी घेऊन जा ",

" हो सर",..

आदित्यने आबांना फोन लावून सगळी माहिती सांगितली, ते खूष होते, सीमालाही मेसेज करून दिला
.....

विक्रमने प्रकाशला फोन केला,.." तू देशमुख इंडस्ट्रीमध्ये मीटिंगसाठी गेला होता असं ऐकलं आहे मी",..

"बरोबर ऐकलं आहेस तू विक्रम",.. प्रकाश

" मी काही कायमचा जेलमध्ये थांबणार नव्हतो, लगेच काय धीर सोडला तू",.. विक्रम

" तुला माहिती आहे का विक्रम त्यांच्या कडे सगळे पुरावे आहेत, आम्ही जरी मदत केली नसती तरी ते केस जिंकले असते, आता त्यांना थोडी मदत करून मी माझा स्वार्थ साधून घेतला आहे, त्यांच्या कंपनीतर्फे स्क्रॅप कॉन्ट्रॅक्ट मलाच मिळणार आहे",.. प्रकाश

"कशाला देतील ते तुला कॉन्ट्रॅक्ट",.. विक्रम

" तसा करार झाला आहे आमचा आणि हे लोक खूप प्रामाणिक आहेत आणि तू कधी पासून आम्हाला पैसे दिले नाहीत विक्रम",.. प्रकाश

" त्याचं काय आता, आधी किती पैसे दिले ते विसरला का तू प्रकाश, अजून ही दिले असते ना मी, तू तो पेपर आदित्य ला देवू नकोस ",.. विक्रम

" नाही विक्रम मी अस करणार नाही, मी पैसे घेतले मी सही चा पेपर देणार",.. प्रकाश

" मी पण आधी दिले होते तुला पैसे",.. विक्रम

"त्या बदल्यात केल ना मग मी काम, जमीन सांभाळली कोणाला येवू दिल नाही",.. प्रकाश

"आता काय झालं मग? लढलो असतो आपण ",.. विक्रम

"तुला फक्त आमच्या कडून काम करून घ्यायचं होतं, तुझ्या सोबत राहून काही फायदा नाही विक्रम",.. प्रकाश ने फोन ठेवला
....
आज शाळेत परत मिटींग होती, त्या बाजूला शाळा बांधण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, ते काम सुरू झालं होतं, असं जर व्यवस्थित काम सुरू राहील तर एका महिन्यात शाळा सुरू होऊ शकते, ते गरजेच आहे आधीच खूप वेळ गेला आहे

आदित्य बोलला होता त्याप्रमाणे आबांच काम खरच खूप छान आहे, कुठली गोष्ट ते एकदम सिरीयस होऊन करतात, आणि समाज सेवा खूप करतात ते,

सीमा संध्याकाळी घरी येत होती, राजाचा फोन आला

"बोल राजा",..

"आता मला जिजूंनी आत बोलवुन घेतलं होतं",.. राजा

"काय विशेष",.. सीमा

"माझा पगार वाढला आहे ताई, तसा सगळ्या ऑफिसचा वाढला आहे, सगळ्यांच छान इन्क्रिमेंट झालं",.. राजा

"अरे वा आनंदाची बातमी आहे ही राजा, आता पार्टी झाली पाहिजे, आई खुश असेल",.. सीमा

"पहिल्यांदा तुला सांगितलं आहे ताई, अजून आईला घरी गेल्यावर सांगेन",.. राजा

"घरी जाताना गोड घेऊन जा काहीतरी ",. सीमा

" हो ताई",.. राजा

सीमा खूप खुश होती, राजा हुशार आहे आणि आदित्य ही चांगला आहे खूप सपोर्ट करतो, ऑफिसच्या लोकांना छान सांभाळतो तो,

सीमा घरी आली आबा आक्का समोर बसलेले होते,

" आबा शाळेचं काम सुरू झालं ना, मला खूप आनंद झाला आहे",.. सीमा

"आपण उद्या जाऊ ते बांधकाम बघायला, तुला उद्या अर्धा दिवस शाळा असेल ना",.. आबा

"हो आबा, आपल्याला टीचर मिळाल्या का?",.. सीमा

"एक शिक्षक मिळाला आहे, ते बोलले आहे की त्यांच्या ओळखीचा आहे कोणीतरी शिक्षक ते करणार आहेत मदत",.. आबा

" तिथल्या बायकांसाठी थोडा गृह उद्योग मला सुरु करायचा आहे मला ",.. सीमा

" हो मला अनघा बोलली की सीमा विचार करते आहे ",.. आबा

" तिथल्या बायकांना थोडी माहिती देणार आहे मी, ज्या बायका घरी असतात त्या पापड लोणचे ते बनवू शकतात, मग ते दुकानांमध्ये सप्लाय करायच बोलावा लागेल, तेवढा त्यांचा घरात हातभार लागेल ",.. सीमा

" खूप छान विचार आहे हा सीमा काही लागल तर सांग मला",.. आबा

"हो आबा, आई तुम्ही ही याल का आमच्या सोबत उद्या ",.. सीमा

" हो येईल मी, छान करतेस तू सीमा, हुशार आहेस ",.. आक्का

" आई आबा तुम्ही चहा घेणार का? मी करते आहे चहा",.. सीमा