नवी आशा जगण्याची... भाग 68

सीमा शाळेत आली, खूप काम होते, थोड्या वेळाने आबा शाळेत आले, मदतनीस काका बोलवायला आले, दुसरी टीचर सीमा ऐवजी तास घेत होती,



नवी आशा जगण्याची... भाग 68

©️®️शिल्पा सुतार
........

आॅफीसच काम झाल..

"चल सीम आता आपण घरी जाऊ" ,.. आदित्य

"हो घरी जाऊन आवरायचं आहे, आणि तू मला सांगणार आहे मी कोणती साडी नेसू",.. सीमा

"अरे हो ते अजून बाकी आहे, तू कोणतीही साडी नेसली तरी सुंदर दिसते",... आदित्य

" माझं सामान तिकडेच राहिला आहे कॉन्फरन्स रूम मध्ये",.. सीमा

" जा घेऊन ये ",.. आदित्य

" तु पण चल आदित्य",.. सीमा

"अरे जा ना पटकन सीमा, ऑफिस मध्ये कस मी अस तुझ्या मागे मागे येणार प्रत्येक ठिकाणी ",... आदित्य

"कुठे आहे कॉन्फरन्स रूम",.. सीमा

" त्याबाजूला, आता आलो ना आपण तिकडून ",.. आदित्य

" मला नवीन आहे हे ऑफिस, किती मोठ आहे त्यात भरपूर केबिन",.. सीमा

आदित्य बिझी होता

" ठीक आहे मी राजाला घेऊन जाते, माझा भाऊ कामाला येईल, एक तर मला या ऑफिसमधलं काही माहिती नाही",.. सीमा रागाने बाहेर आली

" राजा माझं सामान कॉन्फरन्स रूम मध्ये आहे ",... सीमा सामान घेऊन आली, राजा सोबत होता

" आम्ही निघतो आहे राजा घरी जायला, तू आणि आई लवकर ये पार्टीत, रोहन बाय ",.. आदित्य सीमा निघाले

बाय ताई...

सीमा गाडीत गप्पच होते

" आता त्या कॉन्फरन्स रूमचा राग तू माझ्यावर काढणार आहे का सीमा ",.. आदित्य

"तू मला अजिबात ऑफिसमध्ये मदत केली नाही आदित्य",.. सीमा

" थोडं काम होतं सीमा, तु येई पर्यंत मी एक मेल पाठवून दिला, राहिलं असतं हे काम तर आता संध्याकाळी जमणार होत का",... आदित्य

" खूपच काम करता तुम्ही लोकं ",.. सीमा

"हो आपल्या संसारासाठी मला खूप कष्ठ घ्यावे लागतात, अजून बायको दुर्लक्ष करते ते वेगळ",.. आदित्य

"बापरे किती त्रास आहे तुला आदित्य ",.. सीमा

दोघं घरी आले बाकीचे सगळे तयार होत होते, आटपा लवकर सिमा आदित्य, आपल्याला अर्ध्या तासात निघायचं आहे

दोघं रूम मध्ये आले आदित्यच्या पसंतीने सीमाने खूप छान नेव्ही ब्ल्यू काठापदराची साडी नेसायचं ठरवलं, ती साडी आणि तिचे दागिने घेऊन अनघाच्या रूममध्ये जात होते

"कुठे जाते आहे सीमा?",.. आदित्य

" मी अनघा ताईं सोबत तयार होणार आहे ",.. सीमा

"अजिबात नाही इथेच तयार हो",.. आदित्य

" असं काय आदित्य? आमचं ठरलं आहे, आता तू तुझा तुझा तयार हो आणि खाली ये",.. सीमा

" अगं पण मी कुठला ड्रेस घालू?",.. आदित्य

" आता का? काल किती बोललास तू मला साडी वरुन ",.. सीमा

" तरी मी पसंत केली ना तुझी साडी, सांग ना सीमा, प्लीज, एक तर तू मला अस सोडून खाली जाते तयारीला हे मला अजिबात आवडल नाही ",.. आदित्य

"मी इथेच आहे खाली, काही लांब जात नाही, तुमच्या सगळ्यांचे काय ठरलं आहे त्या प्रमाणे तयार हो आदित्य ?",.. सीमा

" ते सगळे कुर्ता घालत आहेत",.. आदित्य

"तू पण घाल मग माझ्या साडीला मॅचिंग निळा कुर्ता पायजमा",.. सीमा

सीमा थांब.... सीमा

" काय आता आदित्य? उशीर होतो आहे",.. सीमा खाली निघून गेली

" किती बोर होत सीमा नसली की रूम मध्ये ",.. आदित्य

अनघा सीमा तयार झाल्या, अनघा ने सीमाची खूप छान हेअरस्टाईल करून दिली, सीमा मस्त दिसते आहेस, अनघा ही खूप सुंदर दिसत होती, बाकीचे तयार होवुन हॉल मध्ये बसले होते,

"या दोघींच होत की नाही आज? , सुमित जा बघून ये, त्यांना सांग लवकर तयारी करा नाहीतरी आम्ही निघून जावू ",.. शरद

सुमित कुर्ता घालून खूप गोड दिसत होता, तो आत आला,.. "मम्मी मामी झाल का? आम्ही निघून जावू?" ,

सीमाने सुमितला जवळ घेतल,.. "कोण दिसतय एवढ गोड आज",

"मामी आटोप... आम्ही निघून जावू ",.. सुमित

" कोणी सांगितल हे अस बोलायला सुमित ",.. अनघा

पप्पांनी...

"बर बघते मी जरा",.. अनघा

सीमा अनघा बाहेर आल्या, सगळे त्यांच्या कडे बघत होते,

" आदित्य हे आपल घर आहे ना? एवढ्या सुंदर मुली कोण ह्या? ",.. शरद

सगळे हसत होते

" पुरे आता, सगळ घेतल का?, आणि सुमित ला काय शिकवताय बोलायला अस? ",.. अनघा

"अनघा किती उशीर करता मग तुम्ही दोघी आवरायला ",.. शरद

आदित्य सीमा कडे बघून सगळ विसरून गेला होता , आज खूपच सुंदर दिसते आहे ही, सीमा मुद्दाम काय घ्यायच ते बघत होती, ती जिकडे गेली तिकडे आदित्य.. सुमित तिच्या मागे होते,

" निघा आता आदित्य शरद, आता नाही होत का उशीर?, आमच्या कडे बघत बसणार का ? ",.. अनघा

" कोण कुठे बसणार, एक गाडी घ्या मोठी",.. आदित्य

गाडीत सीमा जवळ आदित्य बसला, तो अजून ही सीमा कडे बघत होता

"काय आहे आदित्य?",.. सीमा

"एवढ काय ओरडून बोलतेस, एवढी सुंदर दिसतेस तस बोल प्रेमाने ",.. आदित्य

" सगळे आहेत सोबत जरा समोर बघ आदित्य ",.. सीमा

त्याच्या जवळ सुमित होता

" मामी कशी दिसते आहे आज सुमित? ",..आदित्य

"छान छान", ..सुमित

"तुला आवडली का ही मामी",.. आदित्य

"हो खुप",.. सुमित ..

" मला पण",.. आदित्य

सीमा अजून ही रागाने आदित्य कडे बघत होती

"सुमित इकडे ये चल मागे ",.. अनघा

" नको मी मामी जवळ बसतो ",.. सुमित

" हे दोघ मुल वेडी झाली आहेत आदित्य, सुमित" ,.. अनघा चिडली होत्या, बाकीचे हसत होते

ते पार्टीच्या ठिकाणी पोहोचले..

बरेचसे लोक आलेले होते, सगळे आबांच अभिनंदन करत होते, मीना ताई राजा आले, खूप खुश होती सीमा, सगळे गप्पा मारत होते निशाची फॅमिली आली, निशा मीना ताईंना भेटली, कदम साहेबाची फॅमिली आली होती, आक्का आदित्य सगळ्यांच स्वागत करत होते, त्यांच्याशी बोलत होते,

अनघा सीमा केक आला तिकडे गेल्या, केक टेबल वर ठेवला होता, आक्का आबा सुमितने मिळून केक कापला

सगळे बोलत बसले होते, आबा साखर कारखान्या बद्दल सगळ्यांना सांगत होते, आता पुढे तिकडे काय काम करतील याबद्दल सगळ्यांना उत्सुकता होती,

घरगुती पार्टी खूप छान झाली, जेवण ही छान होत,

सीमा आबां जवळ येवून बसली, सीमा तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे,... "आपल्या छोट्याशा शाळेसाठी मंजुरी मिळाली आहे, दोन टीचर आणि एक मदतनीस आपण ठेवू शकतो",

"अरे वा आबा ही खूप छान आनंदाची बातमी आहे" ,... सीमा

"उद्यापासून शाळेचं काम करायला सुरुवात करू शकतो आपण, चांगला मुहूर्त बघून छोटीशी शाळा बांधून घेऊन, ही व्यवस्थित चालली तर पुढच्या पण शाळांसाठी मंजुरी मिळेल ",.. आबा

" चालेल ना, तसंच करू आबा ",.. सीमा खुश होती

हळू हळू बाकीची मंडळी जात होती, निशा निघाली, सीमा तिच्याशी बोलत होती, आबा निशाचे सासरे ते दोघ बोलत होते

" चल आता आपणही निघू ",.. मीनाताई राजा निघाले

सीमा आदित्य त्यांना सोडायला बाहेर पर्यंत गेले होते, सीमा आई शी बोलत होती, राजा आदित्य उभे होते,.. "या तुम्ही आमच्या कडे",

हो.. आदित्य बोलला

ते दोघे आत मध्ये आले, घरचे सगळे बसलेले होते, चला आता आपणही निघू या, बराच उशीर झाला आहे

सगळे घरी आले, सुमित गाडीत झोपून गेला होता, शरद राव सुमितला घेवून रूम मध्ये गेले, त्याला झोपवुन ते वापस आले,

"आम्ही उद्या निघतोय सकाळी",.. शरद

"का लगेच ताई जिजु",.. आदित्य

"खूप काम आहेत तिकडे सुमितची शाळा आहे, तुम्ही दोघ या आता तिकडे",.. शरद

"हो नक्की येवू आम्ही पण ताई राहिली असती थोडी",.. आदित्य

"नाही येईन मी नंतर",.. अनघा

आबा आक्का ऐकत होते, अनघा त्यांच्या जवळ जावून बसली, तिच्या डोळ्यात पाणी होत, कोणी काही बोलत नव्हत,

" झोपा आता उशीर होतो आहे ",.. आक्का

विक्रम आज जरा उशिरानेच घरी आला तो ऑफिसमध्येच विचार करत बसला होता की पुढे काय करायचं? सगळ्या बाजूने फसलो आहे आता मी, काका बाहेर उभे राहून कोणाशी तरी फोनवर बोलत होते, विक्रम बांधलेल्या कंपाऊंड कडे बघत होता,.. "हे खूपच आपल्या घराजवळ घेतलं आहे, तुम्ही विरोध नाही केला का पप्पा?",..

"काय विरोध करणार बरोबर आहे त्यांचे मोजमाप इतके दिवस आपण त्यांच्या जागेवरून रस्त्यावर जात होतो, आता त्यांना वाटलं त्यांनी टाकलं कंपाऊंड, त्यांना त्रास होतो आपला ",.. काका

दोघांचा आवाज ऐकून काकू बाहेर आल्या,.. "आज काय शांत दिसत आहे बाजूच घर? ",

" आज पार्टी आहे मोठी, आबा इलेक्शन जिंकले तर सगळे तिकडे गेलेले आहे ",.. विक्रम सांगत होता, काका काकू ऐकत होते,

" आपल्याला बोलावलं नाही त्या आदित्यने पार्टी साठी , त्याची बायको आत्ता आली आहे ना, आपण आधी पासून नातेवाईक आहोत, त्यांना आपल्याशी संबंध ठेवायची नाही आहेत आता ",.. काकू

" जाऊ दे ",.. तीघे आत मध्ये आले

" मामा ला कोणी फोन केला होता, किती गडबड झाली आहे ही",.. विक्रम

" माहिती नाही ते डायरेक्ट आले होते, खूप बोलले ते आम्हाला, पण तुला ही अक्कल नाही का विक्रम? त्या पोरीच कश्याला नाव घेत बसला, ते ही त्यांच्या घरात घुसून, दुसरी कडे कुठे ती भेटली नसती का तुला? ",.. काका

" काय बोलताय तुम्ही? विक्रम ची चूक झाली आहे, त्याने अस सीमा च नाव घ्यायची गरज नव्हती, ते बोलायच सोडून तुम्ही काय त्याला बोलताय की बाहेर नाव घ्यायच घरात घुसून नाही, कसे विचार आहेत हे, आता तरी डोळे उघडा",.. काकू चिडल्या होत्या

" आई मला समजली माझी चूक शांत हो, आपण उद्या जायचं का आई मामाकडे? जाऊन प्रत्यक्ष भेटू त्यांना, जर ते मला तिकडे रहायच म्हंटले तर मी तिकडेच राहील थोडे दिवस, पूजा शी लग्न उरकून घेईन, तुम्हाला काय वाटत आहे आई पप्पा? ",.. विक्रम

" काही हरकत नाही, जाऊन बघू",.. काका

" तुम्ही येणार का? ",.. विक्रम

हो जाऊ या...
.....

आदित्य सीमा रूम मध्ये आले, सीमाने कपाटातून तिचे कपडे घेतले

" राहू दे ना थोड्यावेळ ही साडी सीमा",.. आदित्य

सीमा आश्चर्याने आदित्य कडे बघत होती,.." किती उशीर झाला आहे आदित्य, उद्या सकाळी शाळा आहे, झोप आता ",.

" इकडे ये आपण जरा वेळ बोलत बसू",.. आदित्य

दोघ बाल्कनीत गेले..

आदित्य सीमा जवळ बसला,

" काय झालं आहे आज आदित्य? एकदम वेगळा मूड? ",..सीमा

" अस तुझ्या सोबत थोड रहावस वाटत, फिरायला जायच कधीच ठरवतो आहे आपण, पण जमत नाही, किती बिझी झालो आहोत आपण, तुला काही गिफ्ट घेतल नाही कधीच, आता कोर्टाची केस, माहिती आहे महत्वाच आहे तरी कंटाळा आला आहे आता",.. आदित्य

"पुढच्या आठवडय़ात आपण जावू फिरायला नक्की, आदित्य खर सांगू का तू सोबत असला की कुठे ही छान वाटत मला, आपल घर एका हॉटेल पेक्षा कमी आहे का? , मी कधी अस बघितल नव्हत एवढ मोठ घर प्रेमळ माणस ",.. सीमा

" इकडे ये सीमा, आज कोणी सांगितल होत एवढी छान तयारी करायला, किती सुंदर दिसत आहेस तू आज",... आदित्य

" तू उगीच जास्त तारीफ करतोस माझी ",.. सीमा

" नाही खरच... माझ्या डोळ्यातून एकदा बघ स्वतःला ",.. आदित्य

काहीही..

आदित्यने सीमाला जवळ घेतल, ते दोघ बर्‍याच वेळ बोलत बसले होते,

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सीमा खाली गेली अनघा ला निघायच होत, आक्का उठून आल्या होत्या, दोघींनी मिळून त्यांच्यासाठी डबा चहा नाष्टा बनवला,
सगळ आवरलं, चहा नाश्ता झाला, सगळे गप्प होते,

"चल अनघा आटोप उशीर होत आहे" ,... शरद राव घाई करत होते

अनघा येवून सीमा ला भेटली,.."काळजी घे ग खूप बिझी असते तू ",

हो ताई ..

"सीमा आदित्य आता नक्की या तुम्ही आमच्याकडे ,आई आबा आजी नक्की या ",..अनघा

सीमा सुमितला सोडतच नव्हती ,... याला इथे राहू द्या, तो पण मामी बरोबर खूष होता

ते निघाले..

सगळे आत आले

" मुली सासरी गेलं की जरा दुःखच वाटत नाही, किती खुश असतात सगळे त्या आल्या की ",.. आबा

" हो ना सीमा तू पण मध्ये मध्ये जाऊन मीनाताईंना भेटत जा",.. आक्का

"हो जाईन मी नंतर आई कडे",.. सीमा

आदित्य तिच्याकडे बघत होता, बिझी दिसते सीमा नंतर जाईल बहुतेक राजा च्या घरी

" जरा वेळाने मी येतो शाळेत सीमा, मिटिंग घेऊन टाकू आपण नवीन शाळेसाठी मंजुरी मिळाली आहे, त्याचं काम लगेच सुरू करू",.. आबा

" ठीक आहे आबा तुम्ही आले की मला सांगा, मग मी येईल माझं प्रेझेन्टेशन तयार आहे",.. सीमा

ठीक आहे..

सिमा आदित्य रूम मध्ये आले, सीमा शाळेत जायची तयारी करत होते

" काय झालं आहे आदित्य गप्प का? ",.. सीमा

" तुला जायच का आई कडे सीमा? ",.. आदित्य

"नंतर जाईल मी, आता शाळेत खूप काम आहेत ,.. सीमा

सीमा शाळेत आली, खूप काम होते, थोड्या वेळाने आबा शाळेत आले, मदतनीस काका बोलवायला आले, दुसरी टीचर सीमा ऐवजी तास घेत होती, सीमा ऑफिस मध्ये आली, प्रिन्सिपल मॅडम, कोऑर्डिनेटर सर आलेले होते, सीमा येवून बसली

आबा सगळ्यांना शाळेची कल्पना सांगत होते, सीमा ने छोट् प्रेझेंटेशन दिल, सगळ्यांना खूप आवडली ही कल्पना,

"दोन शिक्षक एक मदतनीस लागतील त्या बाजूच्या गावातील शिक्षक बघा" ,... आबा

"हो सर" , ..

बांधकामच कॉन्ट्रॅक्ट द्यायला हवा, जागा ठरवलेली होती, बर्‍या पैकी ठरलं होत आता सगळं ,

लंच ब्रेक मध्ये निशाला सीमा ने सगळ शाळेचा प्लॅन सांगितला, तिला खूप आवडली कल्पना, तिथल्या बायकांसाठी महिला गृहउद्योग सुरू करणार आहे मी,

खूप छान सीमा,

बायका स्वतःच्या पायावर उभ्या राहतील दोन पैसे मिळतील त्यांना, गरजू लोकांना मदत होईल....

🎭 Series Post

View all