नवी आशा जगण्याची... भाग 12

सचिन निघून गेला, आदित्यने बघितलं पाच वाजून गेले होते, तो पटकन उठला, शाळेत जाण्यासाठी निघाला, शाळेपर्यंत पोहोचे पर्यंत बराच वेळ झाला होता, सगळे निघून गेले होते जवळपास, ठीक आहे आज थोडा वेळ कमी पडला, मी उद्या सकाळी लवकर येइन मी इकडे


नवी आशा जगण्याची... भाग 12

©️®️शिल्पा सुतार
........


पार्टी झाली, घरचे लोक उरले होते, सगळ्यांनी जेवायला घेतल होत, अनघा सारखी आदित्यच्या मागे घुटमळत होती

"काही बोलायच आहे का ताई? ",.. आदित्य

आबा आक्का शरद एकमेकांकडे बघत होते...

"अरे बोला काही झाल आहे का?",... आदित्य

"आता तुझ शिक्षण झाल, आज पासून काम ही सुरू झाल, किती हुशार आहेस तू",.. अनघा

"हो मग... ताई पुरे झाल बटर लावण, नीट सांग ",.. आदित्य

" तुझ्या साठी एक स्थळ आल आहे पाहण्यात",.. अनघा

" बापरे हे काय आता नवीन?, मला एवढ्यात लग्न करायच नाही",... आदित्य

का?,..

" आता ऑफिस जॉईन केल आहे, थोड काम नीट बघायच आहे इथल",... आदित्य

"हे थोडी दुसर्‍याच ऑफिस आहे, होईल हळू हळू कामाची सवय, पण लग्न महत्वाच आहे, योग्य वयात व्हायला पाहिजे ",... अनघा

"माझ फार वय झाल का ताई, काय बोलतेस तू ",.. आदित्य

" तस नाही आदित्य, पण आता हेच योग्य वय आहे लग्नासाठी, काही प्रॉब्लेम आहे का? तुला कोणी दुसरी मुलगी पसंत आहे का?",... अनघा

"नाही तसं काही नाही ताई",.... आदित्यच्या डोळ्यासमोर सीमाचा चेहरा येत होता, आत्ताच माझं शिक्षण झालं आता मी कंपनीत जॉईन केली आहे, थोडं काम करायचं आहे, ती मुलगी कोण आहे ते बघायच आहे, या आधी तिला गावत कधी बघितल नाही पण, तीच लग्न झाल आहे की नाही माहिती नाही, ताई उगीच घाई करते

" मी विचार करून सांगतो",.. आदित्य

" अरे मुलगी चांगली आहे, शिक्षण भरपूर झाल आहे, शिवाय नौकरी करते ती, बघून यायला काय हरकत आहे",.. आक्का

" नाही जमणार मला , हे असं मुलगी बघायला जाणं पसंत नाही, जर लग्न करायचं असेल तेव्हाच मुलगी बघण योग्य आहे, उगीच त्या लोकांच्या अपेक्षा वाढतात",..... आदित्य

आदित्य ऐकत नव्हता, आता काय करावे असा प्रश्न घरातल्या सगळ्यांना पडला.

" जाऊ दे उद्या बोलु नंतर सावकाश आता थकला आहे तो",... असा विचार करून आक्का अनघाकडे बघत होत्या

आदित्य त्याच्या रूम मध्ये आला, त्याला आता प्रचंड राग आला होता, अजून कशातच काही नाही माझ्या लग्नाच बोलणी सुरू आहे आणि आदित्यच्या मनात तिचे विचार सुरू होते, तिला सोडून मी दुसऱ्या कुठल्या मुलीला बघायला जायचं म्हणजे माझ मन ऐकत नाही, एवढं काय वाटलं आहे मला तिच्याबद्दल? कोण आहे ती मुलगी? हे माझं एकतर्फी तर प्रेम नाही ना, झाल नसेल ना तीच लग्न, कोण आहे ती हे माहिती नाही आपल्याला, उद्या भेटेल की नाही ती ते ही माहिती नाही, ठीक आहे आता जे होईल ते होईल, विचार करून आदित्य झोपायला गेला

सीमा दुसऱ्या दिवशीचा होमवर्क पूर्ण करत होती, आई टीव्ही बघत होती, राजा उगाच इकडून तिकडे करत होता.

"झाला नाही का तुझा होमवर्क पूर्ण सीमा ताई?",.. राजा

" थोडाच बाकी आहे काही काम होतं का?",..सीमा

" हो मला बोर होत आहे तुझ्याशी बोलायचं आहे ",..राजा

"बोल ना मग तू मी ऐकते आहे आणि आज तु एवढ्या उशिरा का आला राजा",..सीमा

" आज आमच्या साहेबांच्या घरी पार्टी होती",..राजा

" साहेब म्हणजे तेच ना त्यांनी माझा इंटरव्यू घेतला",..सीमा

" हो तेच आबा देशमुख, त्यांचा मुलगा परदेशात गेला होता शिकायला तो आला आहे, त्याची कंपनीच्या सीईओपदी जागी नेमणूक झाली यापुढे सगळे काम आदित्य सर करतील ",..राजा उत्साहाने सांगत होता

" डायरेक्ट सीईओ पण आहे का तेवढा हुशार तुमचा साहेब?, की मालकाचा मुलगा म्हणून वरची पोस्ट मिळाली ",... सीमा

" मग आहे ना हुशार, मला चांगले ओळखतात ते ",... राजा

" का तुम्ही लोकांनी त्याला डोक्यावर बसुन ठेवल आहे? ",... सीमा

" हुशार आहे ग आदित्य साहेब, नुसते शॉप मधुन फिरले तरी लोक घाबरतात, काम सुरळीत होतात आणि खूप बदल केले त्यांनी कंपनी मध्ये बरेच गैरव्यवहार कमी झाले, नवीन मशीन आणले",... राजा कौतुकाने सांगत होता

अरे वाह...

" तुझा आहे का त्यांच्याशी डायरेक्ट संबंध कामाचा",... सीमा

" हो मग आहे ना ताई, काही काम असल तर मी डायरेक्ट त्यांच्या केबिन मध्ये जातो, खूप छान सपोर्ट करतात ते, मेहनती लोकांचे पगार ही वाढवले त्यांनी ",.... राजा

"खूप छान चाललय तुमच",.... सीमा

हो...

" पार्टी मोठी होती का रे ",... सीमा

" हो खूप छान होती, मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, खूप पदार्थ होते खायला, आदित्य साहेबांची बहीण ही होती आलेली, खूप चांगले लोक आहेत ते, माझी चौकशी केली आक्कांनी",.. राजा

अरे वाह....

" आपण तर एकदाही गेलो नाही अशा पार्टीला",.. सीमा

" हो ना तुला यायचं होतं का आज माझ्याबरोबर",... राजा

" नाही रे बाबा मला नसत जमलं असतं उद्या सकाळी शाळा आहे, कोणी ओळखीच नाही तिथे ",.... सीमा

मीना ताई ऐकत होत्या सगळ.... कौतुक वाटत होत त्यांना

सकाळी सीमा आवरुन घरातून निघाली निशा ने सांगितल्या प्रमाणे तिने आज शाळे जवळच्या बस स्टॉपच तिकीट घेतल

बस स्टॉप वर उतरून ती शाळेत आली लगेच ट्रेनिंग सुरू झाल

आदित्य सकाळी पटकन उठला, आवरून रेडी झाला, आज काहीही झाल तरी लवकर स्टँड जवळ पोहोचायचं आहे, तो घाईत खाली आला, नात्याचा टेबल वर सगळे बसले होते, पटकन दे मला खायला,

"काय रे एवढी घाई",... आक्का

"लगेच मीटिंग आहे",... आदित्य

कसतरी खावून आदित्य निघाला, विक्रम समोरून आला,... "आदित्य मला एक मिनिट मला बोलायच आहे तुझ्याशी",..

"आता नाही विक्रम मी घाईत आहे",.. आदित्य

"अरे एक मिनिट ऐक तरी",.. विक्रम

"ऑफिसच काम आहे ना, ऑफिस मध्ये येवून बोल मी निघू का प्लीज",... आदित्य

आदित्य निघून गेला.

"कुठे गेला हा एवढ्या घाईने? चौकशी करायला पाहिजे याची? जरा खूप अकडतो आहे सध्या ",.... विक्रम

आदित्य स्टँड वर गेला, बराच वेळ तो तिथे सीमाची वाट बघत होता, बस येत होत्या जात होत्या सीमा मात्र येत नव्हती

सचिनचा फोन आला, ..." कुठे आहेस तू आदित्य?",.

" येतो आहे मी",.. आदित्य

"काही प्रॉब्लेम आहे का?",... सचिन

"नाही रे आलोच",... आदित्य

"नक्की काय सुरू आहे या आदित्यच काय माहिती?",.. सचिन

आदित्य ऑफिसला आला, येवून केबिन मध्ये बसला, सचिन आला मागे,.. "आजही स्टँड वर च्या बस स्टॉप वर गेला होता का तू?",

नाही....

"खोट बोलू नको आदित्य एक फ्रेंड म्हणून विचारतो आहे मी तुला हे, एकाने सांगितल मला तू तिकडे उभा होता, काही झाल आहे का? कोणाला शोधतो आहेस तू?",.. सचिन

आदित्यला फोन येत होता... सांगतो नंतर

विक्रम आदित्यच्या ऑफिसला आला, त्याला एका कंपनीत लगेच पेमेंट करायच होत, पैसे नव्हते पुरेसे, मागणारे दारात उभे होते, तेच आज तो आदित्य कडे मागणार होता, काम केल्याचा पेमेंट द्या अस, हिशोब करून त्याला टेंशन आल होत,

" येवू का आत आदित्य? ",.. विक्रम

"हो ये, काय झालं ",.. आदित्य

" मघाशी तू घाईत होतास का?",.. विक्रम

"हो थोड काम होत बोल काय म्हणतोस तू",.. आदित्य

"माझ्या कंपनीच पेमेंट अजून झाल नाही",... विक्रम

"हो का थांब मी फायनान्स मॅनेजर ला बोलवतो, काय आहे ऑर्डर डिटेल्स, सांग",.... आदित्य

मॅनेजर आत आले..

" यांच्या कंपनीचा हिशोब करा, ऑर्डरचे पैसे किती होतात ते बघा, आणि या नंतर वेळेवर पेमेंट व्हायला पाहिजे सगळ्यांचे ",.... आदित्य

" येस सर, पण जास्त नाही सर त्यांचे पैसे, दिले गेले बाकीचे वेळोवेळी ",... मॅनेजर

" कुठे आहे यांचा हिशोब आणा इकडे",... आदित्य

"हो मी प्रिंट घेवून येतो ",... मॅनेजर

तसा विक्रम चपापला....

" नंतर करा तो हिशोब, आता मला कामा पुरते देवून टाका पैसे ",... विक्रम

"नाही साहेब अस जमणार नाही, मी येतो एक मिनिटात प्रिंट घेवून ",... मॅनेजर

अरे पण...

"बस रे विक्रम येईल तो हिशोब घेवून काय घेतोस तू चहा की कॉफी ",... आदित्य

विक्रम ला टेंशन आल होत,

"काही नको मी घाईत आहे जरा आता",... थोड्या पैशासाठी या आदित्य समोर हात पसरावे लागता आहेत, नाहीतर पूर्वी मी आबा कडून असेच पैसे घेवुन जायचो, आज ही गेलो होतो मी मागायला, त्यांनी ऑफिस मध्ये पाठवल की आता आदित्य बघतो सगळा व्यवहार, आधीचा फ्रॉड नको उघडा व्हायला नाही तर जेल होईल

मॅनेजर आले,... "सर काहीच विशेष हिशोब राहिला नाहिये यांचा, जो थोडा राहिला आहे तो नेक्स्ट पेमेंट सायकलला होईल",..

मॅनेजर गेले..

"विक्रम पैसे लगेच लागता आहेत का? मी देवू का",.. आदित्य

"अरे नाही तस काही विशेष नाही, मी करेन मॅनेज येतो मी",... विक्रम

"अरे यात काय एवढ ऐक ना विक्रम अरे घेवून जा",... आदित्य

"नाही त्या पेक्षा मला ऑर्डर दे कामाची ",.. विक्रम

" वाह हे आवडल मला विक्रम ",... आदित्य

विक्रम निघून गेला,... उगीच कशाला त्या आदित्यचे उपकार सगळी कडे सांगत फिरेल तो की मी आज विक्रमला पैसे दिले

आदित्य कामात बिझी झाला, तरी कुठे तरी मनात सुरू होत,...... आज ती मुलगी का दिसली नाही? मला उशीर झाला का, मी तर अर्धा तास होतो तिथे, काय कारण असेल, का एक दिवसा पुरत ती आली नसेल ना इकडे... काय कराव? आदित्य विचार करत होता,

सचिन आत आला,... "का आला होता विक्रम?",

"त्याचा काहीतरी हिशोब बाकी आहे म्हणे",... आदित्य

"मुळीच नाही उलट तो नेहमी जास्तीचे पैसे घेवुन जातो नेहमी, इम्पॉसिबल आहे तो, आबांना अस फसवायचा तो " ,... सचिन

"असू दे रे सचिन, काय त्यात? एवढं का चिडतोस",.. आदित्य

"तुला माहिती नाही तो विक्रम आणि गँग किती खतरनाक आहेत ते",... सचिन

हो ना..

" तुझा झाला का मूड मला खरं सांगायचा",.. सचिन

" बापरे आता माझा नंबर वाटत, सांगतो, ये बस जरा शांत...... अरे ऑफिस मध्ये पूजा होती ना त्या दिवशी सकाळी मी घाईने ऑफिसला येत होतो, तर माझी गाडी रस्त्याने एक मुलीला धडकता धडकता राहिली",.... आदित्य

" ओ माय गॉड,.. मग लागल का तिला? कोण होती ती? ",... सचिन

"काहीच माहिती नाही कोण होती ती, काही लागल का तिला ते ही माहिती नाही, फक्त ती घाईने निघून गेली लगेच ",... आदित्य

" कहानी मे ट्विस्ट.... म्हणजे तू तिला शोधतो आहेस का? ",... सचिन

" हो... म्हणजे नाही तस काही नाही ",... आदित्य

"आधी का नाही सांगितल ",... सचिन

" अरे अस काही नाही मी शोधत नाही मुळी तिला",... आदित्य

" काही गडबड तर नाही ना ",... सचिन

म्हणजे...

" तुझ तिच्या वर प्रेम आहे का, लव अॅट फर्स्ट साईट टाइप",.... सचिन

" नाही तस काही नाही सचिन तू अति करतोस, फक्त तिला काही लागल तर नाही ना हे बघायचं होत ",... आदित्य

" अच्छा एवढच ना, फक्त लागल की नाही ते बघायचं होत ना, मग जाऊ दे नाही तर मी केला असता तपास",.. सचिन

"तुला शक्य आहे का शोधण? ",... आदित्य नीट उठून बसला खुर्चीत

" हो त्यात काय ",.. सचिन

" प्लीज बघ ना कोण आहे ती ते ",... आदित्य

" मला थोडे डिटेल्स लागतील कुठे भेटली होती ती मुलगी? कुठे चालली होती? वगैरे ",... सचिन

"कुठे चालली होती ते मलाही माहिती नाही ",... आदित्य

" काय झालं होतं नेमको त्या दिवशी",... सचिन

"मी पूजेसाठी घाईने ऑफिसला येत होतो, स्टॅन्ड जवळ ती त्या रस्त्याने जात होती, माझी गाडी एकदम तिच्या जवळ जाऊन थांबली, ती खूप घाई होती माझ्याशी दोन शब्द बोलून ती निघून गेली",... आदित्य

" तिचा चेहरा कुठल्या साईडला होता रस्त्याच्या या साईडला की त्या साईडला",... सचिन

"हा काय प्रश्न आहे सचिन? ",... आदित्य

" म्हणजे कुठल्या साईडला जात होती ती ते समजेल",.. सचिन

त्या बाजूला...

" ओह म्हणजे शाळेच्या साईडला जात होती ती शाळेत तर नसेल ती कामाला",.... सचिन

" हो वाटतं कारण तिने साडी नेसली होती ",.. आदित्य

बरेच क्लू लागले होते आता, आदित्यला त्याला खूप आनंद झाला होता

"आता तुला कशाला आनंद झाला तुला तर फक्त चौकशी करायची होती ना तिची",.. सचिन

" तुला काही काम नाही आहे का सचिन? ",... आदित्य

" हे बरं आहे, माहिती सापडली तर मित्राची काही गरज नाही",.. सचिन हसत होता, माझ्याकडून जाताजाता अजून एक टीप घे की साडेपाचला शाळा सुटते

सचिन निघून गेला, आदित्यने बघितलं पाच वाजून गेले होते, तो पटकन उठला, शाळेत जाण्यासाठी निघाला, शाळेपर्यंत पोहोचे पर्यंत बराच वेळ झाला होता, सगळे निघून गेले होते जवळपास, ठीक आहे आज थोडा वेळ कमी पडला, मी उद्या सकाळी लवकर येइन मी इकडे
......

सीमा बसस्टॉपवर उभी होती, निशा तिच्याशी बोलत होती... "उद्या तू येणार आहेस माझ्याकडे संध्याकाळी ?

" हो येईल ना नक्की, तसं मी आईला सांगून देईन, पण मग तुला पण माझ्याकडे यावे लागेल",... सीमा

" नक्की.. हो मी येणारच आहे तुझ्याकडे अगदी शनिवार-रविवार राहायला, काकूंच्या हातच खायच आहे मला ",.. निशा

" आई ला ही छान वाटेल तिला आवड आहे ग",.. सीमा

" उद्या मेथी ची भाजी आण ग माझ्या साठी डब्यात सीमा",... निशा

हो.....

बस आल्यावर सीमा निघाली, थोड्याच दिवसात तिची आणि निशा ची खूप छान मैत्री झाली होती....
........

🎭 Series Post

View all