नवी आशा जगण्याची... भाग 1

लेक्चर संपले सगळ्या घरी जायला निघाल्या त्या तिघी जवळच रहायच्या, सोबतच येणं जाणं होत कॉलेजला, प्रिया मोना मध्यमवर्गीय होत्या, तर सीमाची परिस्थिती जेमतेमच होती, तिची आई स्वयंपाकाचे काम करायची,


नवी आशा जगण्याची... भाग 1

©️®️शिल्पा सुतार
..............

ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, कोणाच मन दुखवायचा हेतू नाही.....
वाचकांचे खूप आभार...
........

कॉलेज चा सुंदर परिसर, ज्ञानदानासारख पवित्र काम जिथे होत, तिथे काही लोक उगीच टाईमपास करायला यायचे, नेहमीच होत ते , सकाळी गेट बाहेर पाच सहा मूल टवाळक्या करत उभे असायचे, खूप त्रासदायक होत त्यांच हे वागण, येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक मुलीचं ते मुलं नाव घ्यायचे,

आजही रोज प्रमाणे मोटर सायकल वर तो उनाड ग्रुप कॉलेज समोर येवुन थांबला, मोटर सायकल बाजूला लावून गाणे म्हणत ते उभे होते तेवढ्यात झाडा मागून मुलींचा ग्रुप आला, त्या मुलांना त्यांनी सगळ्या बाजूने घेरल, त्यांना मारायला सुरुवात केली, मुल अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरून गेले होते

कॉलेज च्या गेट बाहेर खूप गर्दी जमली होती, काय झालं आहे हे बघायला बरेच लोक त्या साईडला पळत आले, एक मुलगी आणि तिच्या मैत्रिणींन सोबत त्या मुलांची यथेच्छ धुलाई करत होत्या, हिरोगिरी करत आहात ना तुम्ही? दाखवा आता ताकद, ऐ काय रे, तू ते गाण म्हण ना रोज म्हणतो ते,.. ऐ सनम हम तो सिर्फ तुमसे प्यार करते है......
लाज नाही वाटत का असे उद्योग करतांना , घरच्यांना माहिती आहे का तुमच अस वागण....

ते मुलं खूप गयावया करत होते पण मुलींनी चांगला त्यांचा बेत बघितला

पोलिसांची व्हॅन बाजूने जात होती..

"चला सगळ्यांनी बाजूला व्हा, काय होतय मला बघू द्या",... पोलीस इन्स्पेक्टर यांनी हस्तक्षेप केला,

"काय होतय हे? काय चालले आहे? मारामारी का करता आहात तुम्ही?",.. इंस्पेक्टर

तसे ते मुलं हातापाया पडायला लागले,... "आम्हाला सोडा इंस्पेक्टर साहेब, खूप मारल आम्हाला या मुलींनी ",.

" इन्स्पेक्टर साहेब हे मुले रोज आमची छेड काढतात, रोज कॉलेज सुटायच्या आणि भरायच्या वेळी ते गेट जवळ टवाळकी करत असतात, गाणे गातात पिछा करतात ",... मुली

"पण तुम्ही असा कायदा हातात घेणे कितपत योग्य आहे मुलींनो, सोडा बर या मुलांना ",... इंस्पेक्टर

" तुम्ही तर रोजच चक्कर टाकतात ना इथून इंस्पेक्टर साहेब, मग तुम्ही का नाही या मुलांना कधी बघितलं टवाळगिरी करताना, का रोखले नाही, किती त्रास सहन करणार आम्ही" ,... मुलींनी रोखठोक उत्तर दिलं

तशा बाकीच्या मुलींनीही तिच्याबरोबर हो मिळवलं, आम्हाला काय त्रास होतो हे आमच आम्हालाच माहिती म्हणून आज शेवटी आम्ही या मुलांना वठणीवर आणायच ठरवल

" ठीक आहे आता आम्ही त्या मुलांना पोलीस स्टेशनला नेत आहोत, तुम्ही चला त्यांच्याविरुद्ध कंप्लेंट करायला" ,... इंस्पेक्टर

सगळ्या मुली पोलीस स्टेशनला पोहोचल्या, इंस्पेक्टर साहेबांनी कंप्लेंट लिहून घेतली, त्या मुलांनी यापुढे कधीच कोणाला त्रास न द्यायचं वचन दिलं

" तरीही त्यांना असं सोडू नका इन्स्पेक्टर साहेब, एक दिवस तरी त्यांना लॉकअपमध्ये ठेवा आणि थोडं फोडून काढा, घरच्यांन समोर अपमान करा त्यांचा म्हणजे मग त्यांना जरा समजेल की दुसऱ्याला त्रास दिला की कसं वाटतं",... मुली

सगळ्या मुली कॉलेजला वापस आल्या, वर्गात येऊन बसल्या बाकीच्या मुली अभिमानाने त्या तिघींकडे बघत होत्या, खूप छान केलत आज तुम्ही मुलींनो, अभिमान आहे आम्हाला, सगळ्या टाळ्या वाजवत होत्या, तिघींची मैत्री कॉलेजमध्ये प्रसिद्ध होती, त्या होत्या सीमा, प्रिया, मोना, अतिशय डॅशिंग अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या अशा, अभ्यासात हुशार, एकमेकांना खूप छान साथ द्यायच्या त्या, एकमेकींचा आधार होत्या त्या.

सीमा त्या ग्रुपची लीडर होती, बरेचशे मुलं तिला टरकून असायचे, दिसायला अतिशय सुंदर असलेली सीमा जेव्हा शांत असायची तेव्हा असं वाटतं वाटायच नाही कि ती एवढी डॅशिंग असेल, कुठलीही गोष्ट करायला घाबरायची नाही ती, अशी बोल्ड आणि ब्युटीफूल मुलगी, घरात मदतीला पुढे, मैत्रीला जागणारी, काही तरी करून दाखवायचे आहे आयुष्यात अश्या विचाराची, एक गोड मुलगी

"तुम्हाला तिघींना प्रिन्सिपल सरांनी बोलवलं आहे आता ",... शिपाई काकांनी येऊन निरोप दिला

तिघीजणी प्रिन्सिपल सरांच्या ऑफिस मध्ये गेल्या

" काय झालं होतं गेट बाहेर? , सीमा प्रिया मोना मारामारी केली का तुम्ही मुलींनो",... सर

"सर आम्हाला ते मुलं बऱ्याच दिवसापासून त्रास देत होते, एक दोनदा आम्ही त्यांची कंप्लेन ही केली होती कॉलेज ऑफिस मध्ये, पण कोणीच काही ऍक्शन घेतली नाही शेवटी आम्हाला आमच्या संरक्षणासाठी त्या मुलांना धडा शिकवावा लागला",... सीमा

" चांगलं काम गेला आहे तुम्ही, पण या पुढे असं काही झालं तर आधी तुम्ही मला येऊन सांगणार आहात, परीक्षा जवळ येते अभ्यासाला लागा आता",... सर

" ठीक आहे सर ",... तिघी बाहेर आल्या, लंच ब्रेक होता

" चला ग कॅन्टीनमध्ये जायचं का? आज खूपच थकलो आहोत मारामारी करून" ,... तिघीही कॅन्टीनमध्ये गेल्या

"सीमा आता तू तुझा डबा नको काढू ग इथे ",... प्रिया

"मी डब्बा खाल्ला नाही तर आई मला चिरून खाईल, तुला माहिती आहे ना आई किती सकाळी उठून माझ्यासाठी डबा बनवते तिला खूप वाईट वाटेल, तुम्ही घ्या नाष्टा, मी डबा खाल्ला की चहा घेईल तुमच्यासोबत",... सीमा

अशी डॅशिंग सीमा आईच्या बाबतीत तेवढीच हळवी होती,

लेक्चर संपले सगळ्या घरी जायला निघाल्या त्या तिघी जवळच रहायच्या, सोबतच येणं जाणं होत कॉलेजला, प्रिया मोना मध्यमवर्गीय होत्या, तर सीमाची परिस्थिती जेमतेमच होती, तिची आई स्वयंपाकाचे काम करायची,

आई मीना ताई चार पाच घरी स्वैपाकाच्या कामाला जायच्या, जातांना त्या घरचा स्वयंपाक करून जायच्या, नंतर सीमा तिचा भाऊ राजा दोघ कॉलेज ला जायचे, साधारण दुपारी एक वाजे पर्यंत मीना ताईंच काम व्हायच, दुपारी आराम असायचा, परत संध्याकाळी दोन तीन घरचा स्वयंपाक असायचा , त्या सात वाजे पर्यंत घरी यायच्या, तो पर्यंत सीमा राजा आले असायचे घरी, मुल करायचे संध्याकाळी काम, या वेळी मीना ताई बाजूच्या मंदिरात जावून बसायच्या जरा वेळ, तेवढाच विरंगुळा त्यांच्या एकट्या आयुष्यात, नाना त्यांचा नवरा दहा वर्षापूर्वी वारले, कसला तरी आजार होता त्यांना, चांगली नौकरी होती पूर्वी, दोन पैसे होते सोबत, नशीब घर तरी स्वतः च होत, दोन खोल्या होत्या तिथून त्यांना कोणी बाहेर काढू शकत नव्हत, सगळा पैसा नानांच्या आजारपणात खर्च झाला, पण उपयोग झाला नाही, नाना वारले, माई थोडे दिवस खूप एकट्या पडल्या होत्या, पण नंतर त्यांनी काम सुरू केल

साधारण 20 वर्षापूर्वी.....

नानांकडे मीना ताई लग्न होवुन आल्या, अतिशय प्रेमाने सुरू होता त्यांच्या संसार, काळ जुना असून त्यांच्या सासुबाई नवीन विचाराच्या होत्या, मीना ताईला त्या जीव लावून होत्या, बघता बघता लग्नाला दोन वर्ष झाले घरी पाळणा हलला नाही, सगळे ती आनंदाची बातमी मिळेल याचीच वाट बघत होते, पुढचं वर्ष उलटलं तरी सुद्धा काही लक्षण नव्हते, आता नाना मीना ताई काळजीत होते, सासुबाईना विचारात घेवून एक दिवस तिघे अनाथाश्रमात आले दोन दिवसांपूर्वी सीमा तिथे भरती झाली होती अगदी पंधरा दिवसाची होती ती, तिला दत्तक घ्यायची तयारी दाखवली, कागदपत्रे पूर्ण व्हायला पुढचे काही दिवस गेले, त्या दरम्यान मीना ताई सीमा साठी हळव्या होत होत्या, सीमाला कोणी दुसर दत्तक नाही ना घेणार? , वगैरे काळजी करत होत्या त्या

शेवटी कागदपत्र पूर्ण होवुन सीमा घरी आली, मीना ताई, नाना, आजी यांच्या आनंदला पारावर राहिला नाही, काय करू काय नको अस झाल होत त्यांना सीमा साठी, तीच बारस जोरात झाल, सीमा हळुहळू मोठी होत होती, आजी तिला दोन सेकंड दृष्टिआड होवु द्यायची नाही, नानांचा जीव की प्राण होती ती, दोन वर्षानी अचानक मीना ताई प्रेग्नंट असल्याचे समजले, सासुबाई नाना खूप खुश होते सीमाचे लाड अजुन वाढले, मीना ताईंची खूप काळजी घेतली जात होती, सीमाच्या पाठीवर राजाचा जन्म झाला, अगदी सुरेख कुटुंब होत ते, एक मुलगा एक मुलगी आई बाबा आजी, सुखात दिवस जात होते

सीमाचा पाचवा वाढदिवस आला, आजूबाजूचे नातलग सगळे जमले, कार्यक्रम जोरात झाला , मध्येच कोणी तरी बोलल दत्तक मुलीसाठी कश्याला एवढा खर्च करायचा, स्वतः चा मुलगा आहे आता, पुढे बरेच खर्च आहेत, उगीच आता पासून कौतुक ते... सीमा सगळ ऐकत होती, मीना ताई तिला आत घेवून गेल्या

"आई दत्तक म्हणजे काय ग?",.. सीमा

"सांगेन तुला वेळ आली की",.. मीना ताई

"राजा माझा भाऊ नाही का?",.. सीमा

"कोणी सांगितल तुला? तूच आहेस माझ्या राजाची ताई, माझी मोठी मुलगी, मी तुला कधीच अंतर पडू देणार नाही, कोणाच काही ऐकु नकोस",.. मीना ताई

नंतर त्यांनी सावकाश सीमाला तिला दत्तक घेतल ते सांगितल,

थोड्या वर्षांनी आजी वारली..

सीमा राजा आई बाबा अस चौकोनी कुटुंब राहील, सीमा खूप समजूतदार होती, ती अभ्यासात खूप हुशार होती, स्वतःचा अभ्यास करून ती राजाचा अभ्यास घ्यायची,
एवढी गुणी सीमा पण दत्तक लेबल तिचा पिछा सोडत नव्हता, एखाद्या कार्यक्रमात तिला ऐकायला मिळायच तिच्या आयुष्याची कहाणी, तिच्या छोट्याश्या मनावर फार परिणाम होत होता, घरचे खूप चांगले होते, तिने ठरवल बाकी कोणाचा विचार करायचा नाही

आताशा नाना फार आजारी पडत होते, काय होतय नक्की ते निदान होत नव्हत, सीमा त्यांची खूप सेवा करत होती, दवाखान्यात नेण तीच काम होत, घरी बाबांना पेपर वाचून दाखव, जेवायला देण त्यांच्या औषधाच्या वेळा सांभाळण तीच करत होती, नाना तासनतास सीमा शी गप्पा मारत बसायचे, अजिबात एकट सोडल नाही तिने नानांना, शेवटी नाना वारले, खूप मनाला लावून घेतलं होतं सीमाने, बरेच दिवस लागले तिला त्यातून सावरायला, पैसा पण भरपूर खर्च झाला होता आजारपणात, घर चालेल मुश्किल झालं होतं, मीनाताईंनी दोन-चार घरचे स्वयंपाकाची कामे धरली, सीमा ट्यूशन घ्यायला लागली, सीमा अतिशय हुशार त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळत होते त्यामुळे तिच्या क्लासला गर्दी असायची

राजाने हे पार्ट टाइम काम भरलं होतं सुट्टी तो फुल टाईम काम करायचा अशा पद्धतीने दोघं मुलं त्यांची कॉलेजची फी जमा करायचे आणि त्या दोघांचेही शिक्षण सुरू होतं

मीनाताई मुलांची फरफट बघत होत्या, कधी कधी त्यांना हे सगळं असह्य व्हायच, त्या दुःखी व्हायच्या पण एका गोष्टीचं समाधान होतं की मुलं तरी चांगले निघाले आहेत, तेवढे दोघं मुलं परिस्थिती जाणून होते कुठल्याही गोष्टीचा हट्ट नाही फक्त आईची मदत करणे एवढेच काम होतं त्यांच, सगळ समजत होत त्यांना, त्यामुळे कसला हट्ट नाही करायचे दोघ, फक्त आईकडे नीट लक्ष द्यायचे ते.....
🎭 Series Post

View all