©️®️शिल्पा सुतार
........
........
विक्रमने पूजाला फोन केला तिने फोन उचलला नाही, मामाला फोन केला त्यांनी उचलला,
"मामा मी विक्रम बोलतोय",..
"बोला.. झाली की जेल मधुन सुटका",.. मामा
"थोडा गैरसमज झाला होता मामा, बाकी काही नाही आता मिळाला जामीन" ,.. विक्रम
"गैरसमज झाला होता तर मग तुमच्या वरची केस मागे का घेतली नाही त्यांनी",.. मामा
"घेतील ते बिझी आहेत, आज बोलतो मी त्यांच्याशी, आबा इलेक्शन ला उभे होते ना ",.. विक्रम
"हो का मी बघतो त्यांना फोन करून, विचारतो सगळ नक्की काय झालं ते ",.. मामा
" मामा जावू द्या ना आता तुम्ही का चिडले इतक, मला पूजाला भेटायला यायच आहे तिकडे ",.. विक्रम
" का चिडले म्हणजे? माझ्या मुलीचा आयुष्याचा प्रश्न आहे हा, तुम्ही सीमाच्या मागे लागले आहेत हे समजल आम्हाला, आता तुम्ही असे वागतात पुढे जावून काय होईल, आणि इकडे यायची काही गरज नाही ",.. मामा
" मागे लागलो होतो म्हणजे काय मामा? मी सहज बोलत होतो वहिनी शी, त्यांनी गैरसमज करून घेतला ",.. विक्रम
" तुमच सहज बोलण समजल इकडे, या पुढे इथे फोन करू नका आपला संबध संपला ",.. मामा
" एक चान्स द्या मामा, मी अशी चूक कधीच करणार नाही, माझ पूजा वर प्रेम आहे ",.. विक्रम
" ते शक्य नाही, यापुढे पूजाच नाव घ्यायच नाही ",.. मामा
" पूजा कुठे आहे तिच्याशी बोलायच होत मला, एकदा बोलू द्या ",.. विक्रम
" जमणार नाही या पुढे तुम्ही इथे फोन करू नका ",.. मामा
" मामा ऐकुन तरी घ्या... मामा", .... त्यांनी फोन ठेवून दिला
विक्रमने प्रशांत ला फोन केला,.. "येतो का इकडे जरा वेळ, मला बोलायचं आहे तुझ्याशी",.
" ठीक आहे येतो मी जरा वेळाने, जेवला आहे का तू जेवण घेऊन येतो मी",.. प्रशांत
"काही नको आणू, तु ये फक्त मला बोलायचं आहे तुझ्याशी",.. जरा वेळाने प्रशांत आला, विक्रम काहीतरी काम करत होता
" बोलला का तू घरी फोन करून",.. प्रशांत
हो माझ लग्न मोडल आहे , यायचा जायचा रस्ता बंद झाला आहे आमचा घरा जवळचा, आदित्य डबल केस करणार आहे माझ्या वर, माझे मित्र माझ्या पासून लांब थांबतात, मी कर्ज बाजारी आहे, अजून काही आहे सांगण्यासारख
"तू काय शिकलास यातून मग विक्रम? आदित्य आबांची माफी मागून चांगल आयुष्य सुरू करणार का आता",.. प्रशांत
"तुझ्याशी माझ काही काम नाही प्रशांत, तू जा बर इथून, माझ आधीच डोक खराब आहे",.. विक्रम
"तू चिडू नकोस विक्रम अरे अजून वेळ गेली नाही ऐक माझ थोड",.. प्रशांत
"मला थोडा वेळ हवा आहे प्रशांत ",.. विक्रम
" भरायचे का पैसे तुला आदित्यच्या कंपनी मध्ये",.. प्रशांत
" नको लागतील ते पैसे बघु अजून केस होते का माझ्या वर ते, तू भरले का पैसे,.. विक्रम
हो..
कसे?.. विक्रम
" माझ एका कंपनीतुन आल पेमेंट ते तिकडे वळते केले",.. प्रशांत
" माझ्या साठी बघ काही कर्ज मिळत का ते काय कटकट आहे",.. विक्रम
" गेल का डोक्यातून सीमाच भूत? की अजून पडतात तिचे स्वप्न, जाणार का आज शाळे जवळ 5 वाजता, जा आज तिचा नवराही नाही गावत",.. प्रशांत
विक्रम प्रशांत कडे रागाने बघत होता,.." तूच राहिला होता आता बोल मला ",
" खर सांग का केल तू अस? सीमा आवडते का तुला की आदित्यला त्रास द्यायचा होता",.. प्रशांत
" दोघ होत, सीमा ही आणि आदित्यला त्रास द्यायचा होता",.. विक्रम
" पण झाल काय तुला त्रास झाला, ते तिकडे खुश आहेत आबा इलेक्शन जिंकले,आता पुढे काय करणार तू सीमाला त्रास देणार की लांब थांबणार तिच्या पासून",.. प्रशांत
" लांब थांबणार, बस झाल समाधान हेच ऐकायच ना तुला",... विक्रम
" माझ्या समाधानासाठी नको बोलूस तु हे, चांगलं काय वाईट काय हे तुला समजतं, त्याप्रमाणे वाग, अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही तू तुझ आयुष्य व्यवस्थित करू शकतो आणि यापुढे मी कुठलेही इल्लीगल कामात तुझ्यासोबत नाही, आता तो रस्ता मी सोडला आहे विक्रम, मी आता साधं आयुष्य जगणार आहे, प्रामाणिकपणे काम करणार आहे मग मला यासाठी तुझी जरी साथ सोडावी लागली तरी चालेल, जर तुला माझ्यासोबत राहायचे असेल तर व्यवस्थित रहावं लागेल",.. प्रशांत निघून गेला, विक्रम बघतच बसला, सगळे फासे पलटने आहेत आता,
.........
.........
आशा घरी आली शाळेतून, तीचा भाऊ प्रकाश जरा वेळाने घरी आला, जो विक्रमचा मित्र होता ,.. "दादा मला तुझ्याशी थोड बोलायच आहे महत्वाच",..
"काय झालं?, काही प्रॉब्लेम आहे का? ",.. प्रकाश
"आपण रहातो ह्या जमीनीवर आपण कब्जा केला आहे का?",.. आशा
"आत जा आशा मला नाही बोलायच तुझ्याशी या विषयावर, तू यात लक्ष घालू नको",.. प्रकाश
"दादा ऐक ना आज आदित्य साहेब आले होते शाळेत, त्यांना तुला भेटायचय आहे",.. आशा
कश्या साठी?..
" तू जमीन वरचा हक्क सोडत असशील तर ते आपल्याला मदत करायला तयार आहेत ",.. आशा
" आपण का सोडणार हक्क, आपले घर आहेत इथे ",..प्रकाश
" त्यांची आहे ही जमीन आपण कब्जा केला आहे, हे चांगल आहे का, मला नाही माहिती तू कोणाच्या सांगण्यावरून अस करतो आहेस, नक्की विक्रम च्या सांगण्यावरून ",.. आशा
" ते काय मदत करतील आपल्याला? इथून बाहेर काढतील आपल्या कडून सगळ काढून घेतील ",.. प्रकाश
" नाही ते तसे नाहीत दादा आपला फायदा होत असेल तर करून घे, नाहीतर ते ही केस जिंकले तर आपल्याला काही मिळणार नाही, विक्रमला अटक झाली आणि आदित्य साहेबांकडे खूप पुरावे आहेत की ही जमीन त्यांची आहे, एक आठवड्याचा वेळ आहे आपल्या कडे, पुढच्या आठवड्यात केसचा निकाल आहे",.. आशा
" विक्रमला अटक झाली हे तुला कस माहिती ",.. प्रकाश
" आदित्य साहेबानी सांगितल ",. आशा
" ते तुझ्या ओळखीचे कसे ",.. प्रकाश
" त्यांची बायको माझी मैत्रिण आहे, शाळेत टीचर आहे ती",.. आशा
" शिकवतात का त्या मॅडम स्वतः",.. प्रकाश
" हो ती आधी पासून टीचर आहे शाळेत, नंतर तिने लग्न केल आदित्य साहेबांशी",.. आशा
ही तीच जिच्या मागे विक्रम लागला होता, म्हणून त्याला अटक झाली.. जावू दे आपल्याला काय.. प्रकाश विचार करत होता
" आज आले होते ते साहेब शाळेत ते तुला भेटायला तयार आहेत, उद्या येशील का त्यांना भेटायला",.. आशा
" मी विचार करून सांगतो ",.. प्रकाश
" उद्या मला सांगायच आहे त्यांना ",..आशा
" हो सांगतो मी ",.. प्रकाश
" कोणाला बोलू नको अजून तू या विषयावर दादा आपल्यात राहू दे हे, ते तुला मदत करायला तयार आहे तुझ्या स्क्रॅप बिझनेस मध्ये, चांगले लोक आहेत ते दादा, विक्रम पेक्षा यांच्याशी मैत्री ठेव तू प्रामाणिक पणे काम कर",.. आशा
" बरोबर बोलते आहेस तू, जावू या का आपण त्यांना भेटायला ",.. प्रकाश
" हो जावू या, मी पण असेल सोबत तू काळजी करू नकोस, आपण मदत नाही केली तरी ते केस जिंकतील थोड्या उशिराने, कोणी दुसरा मदत करेन त्यांना, मग ते आपल्याला इथून बाहेर काढतील काही वेळेस तुला पोलिसांच्या ताब्यात देतील सांगता येत नाही ",.. आशा
" नको अस कुठे भेटाव लागेल",.. प्रकाश
" मी सांगते उद्या बहुतेक संध्याकाळी भेटू त्यांना ",.. आशा
ठीक आहे..
......
......
शाळा सुटली सीमा लवकर घरी आली स्वयंपाक करणार्या मावशींनी तिने गोड स्वयंपाक करायचा सूचना दिल्या, घराचं थोडं डेकोरेशन केलं, येतांना ति हार फुल घेऊन आली होती, आजी होत्या मदतीला, बाहेर छान रांगोळी काढली, आरती ओवाळण्याचा ताट तयार ठेवलं, आता कुठल्याही क्षणी आबा आक्का आदित्य अनघा येथील ती आणि आजी तयार होत्या
सीमाने आदित्यला मेसेज केला,.. "कुठे आहात तुम्ही लोक?",
" आम्ही येतच आहोत घरी शरद जिजू आणि सुमित येतीलच",.. आदित्य
अरे वा..
थोड्यावेळाने आबा आले, सगळे गाडीतून उतरले, सीमा आणि आजी पुढे जाऊन आबांना भेटल्या, सीमाने आजीने त्यांना हार घातले, आधी आक्कांनी त्यांना ओवाळल, मग सीमा अनघा यांनी,
सगळे आत येऊन बसले शरद जिजू सुमित आले तोपर्यंत, सुमित पळत येऊन अनघाला भेटला, शरद जिजू पेढे आणि हार घेऊन आले होते, ते येऊन आबांना भेटले, त्यांच्या पाया पडल्या, त्यांचा सत्कार केला, सगळे खुश होते
सीमा आतून चहा घेऊन आली, सुमित दरवेळी प्रमाणे तिच्या मागे मागे होता
"सुमित अगदी आदित्यच्या वळणावर गेला आहे नाही सारखा सीमाच्या मागे मागे असतो",.. शरद जिजू परत विनोद करत होते, अनघा त्यांना ओरडत होती
बरेच लोक भेटणारे येत होते, सीमा किचन मध्ये काम करत होती, शरद जिजू, अनघा, आदित्य तिथे आले, उद्या पार्टी ठेवायची का आपण?.. ते चौघे मिळून प्लॅनिंग करत होते, कुठे करायची पार्टी घरी करायची का की बाहेर करायची
"बाहेरच करूया गेट-टुगेदर एका दिवसात तेच ठरेल आणि घरी करायचं म्हटलं तर परत काका काकू आहेत त्यांना नाही बोलवलं तर आबा आक्कांना वाईट वाटेल",.. अनघा
"हो त्यांना अजिबात बोलवायचं नाही, विक्रमला जामीन मिळाला",.. आदित्यने सांगितलं
सगळे आश्चर्याने आदित्य कडे बघत होते,
"घाबरण्यासारखं काही नाही आता त्याची हिंमत नाही आपल्या घराकडे बघायची",.. आदित्य
रात्री सगळे जेवायला बसले, ताटात पुरणाची पोळी होती,
"सीमा जगदी छान बेत केला आहे",.. आबा
" हो आबा तुम्ही जिंकले आणि शरद जिजु आणि सुमित आले म्हणून बेत आहे, सुमित साठी केली आहे पुरणाची पोळी",.. सीमा
सुमित खूप खुश होता, जेवण झालं सगळे गप्पा मारत बसले, आबा आक्का थकले होते ते रूम मध्ये गेले, ते गेल्यावर या चौघांनी पार्टीचा प्लॅनिंग जोरात सुरू केलं, कसं करू या घरातले सगळे राहू देऊ, आबांचे दोन-चार जवळचे मित्र कदम साहेब अन त्यांचे फॅमिली ला बोलवु, सीमाच्या घरचे आपलं घर पुरे झाले तरी सगळे मिळून वीस पंचवीस लोक होतील ऑफिसमधले काही बोलून घेऊ सचिन च घर, पवार साहेबांच घर
हो चालेल एकच उत्साह होता सगळीकडे
"तुम्हाला दोघांना फिरायला जायचं होतं ना सिमा आदित्य",.. अनघा
"नाही आम्ही नंतर जाऊ, तसं बुकिंग मी पुढचं केलं आहे मी, पुढच्या आठवड्यात कोर्टाचा निकाल आहे, तो पर्यंत कुठे जाता येणार नाही, खूप पेपर सबमिट करायचे आहेत कोर्टात, ही जमिनीची केस खूप महत्त्वाची आहे",... आदित्य
" आदित्य उद्या आपल्याला आशा च्या भावाला भेटायचं होतं ना ",... सीमा
" अरे हो पण संध्याकाळी आपली पार्टी किती वाजता असेल ",...आदित्य
" साडेसात वाजता ठेवूया का ",.. अनघा
" मग जर तुम्ही पाच वाजता ऑफिस मध्ये आल्या दोघी तर होईल काम एका तासात, मग आपण घरी येऊन तयार होऊ",... आदित्य
" चालेल हे काम महत्वाच आहे, आधी आशा तिच्या भावाशी काय बोलते आहे ते पण बघायला हव",.. सीमा
" हो जर ते रेडी असतील तर तुम्ही दोघी पटकन निघा, पाचला वकिलांना बोलून घेऊ, लवकर काम करून टाकू",.. आदित्य
ठीक आहे
आदित्य सीमा रूम मध्ये आले,.." तू खूप छान स्वागत केलं आबांच आणि पुरणपोळीचा बेत तर खूपच छान होता",.
" मला पण खूप आनंद झाला आहे आबा जिंकले तर, किती हुशार आहेत ना आबा",.. सीमा
हो खरच...
"मी उद्या पार्टीत कोणती साडी नेसून आदित्य",.. सीमा
" तू जिंकली आहे का इलेक्शन? छान कोणतेही नेस, एवढ काय ",.. आदित्य
"म्हणजे तू सांगणार नाहीस का? , तुला काही इंट्रेस्ट नाही माझ्या तयारीत",.. सीमा
" सुरू झालं का तुझं सीमा, नवरा थोडा खुश दिसला की थोडं भांडण उकरून काढायलाच पाहिजे ",.. आदित्य
" अरे मग मी चांगलं विचारते आहे कुठली साडी नेसू तर सांगत का नाही",.. सीमा
" आता ते तू अनघा ताई आणि आई आणि आजी मिळून ठरवा ",.. आदित्य
" ठीक आहे यापुढे मी पण तुझे कपड्यांचं काही सांगणार नाही, तेव्हा बोलवू नको मला ",.. सीमा
" चल आता जायचं का खाली, सगळ्यांना बोलव साडी बद्दल डिस्कस करून घेऊ, तुमच्या चौघीं मध्ये मी पण येतो",.. आदित्य
" काही एवढं तिरकस बोलायची गरज नाही आदित्य, तू जास्तच करतो",.. सीमाने तिकडे तोंड करून झोपून घेतलं
" झालं सीमा तुला काहीतरी कारण हवं असतं माझ्याशी भांडायचं ",.. आदित्य
" मी भांडण करते का? तू कसा बोलतो मला",.. सीमा
आदित्य सीमा जवळ गेला,.." सीमा राग सोड आता, आजच्या इतक्या छान दिवशी भांडायचं आहे का आपण? ठीक आहे तू मला उद्या दोन-तीन साड्या दाखव, मी त्यातुन एक तुझ्यासाठी पसंत करतो",
" ठीक आहे हे मग आधी नाही सांगता येत का तुला",.. सीमा
" आता राग गेला का तुझा सीमा ",.. आदित्य
हो..
"चल मग ये इकडे",.. आदित्य मुद्दाम तिला चिडवत होता
सीमा हसत होती, आदित्य झोप आता,
" याला काय अर्थ आहे सीमा, मग मी उद्या पार्टीत तुझ्यासोबत राहणार नाही, बोलणार नाही तुझ्याशी ",.. आदित्य
"असं नको करू आदित्य, तुला माहिती आहे मला तुझ्याशिवाय करमत नाही, तू जर माझ्याशी बोलला नाही तर किती कंटाळा येईल मला तिथे ",.. सीमा
"आत्ता तसंच वाटत आहे मला, तू उगीच भांडते माझ्याशी, चल माझ्या जवळ ये आता ",.. आदित्य
" याला इमोशनल ब्लॅकमेल म्हणतात आदित्य ",.. सीमा
" ते काही का असेना जर तुला उद्या माझ्या सोबत राहायचं असेल तर आता मी म्हणतो ते कर",.. आदित्य
" आदित्य मी बॉस आहे ना इथली, तू माझं काहीच ऐकत नाही,मला केबिन नाही, मला नेहमी तू म्हणेल तसं करावं लागत",.. सीमा
आदित्य हसत होता, त्याने सीमा ला जवळ ओढलं..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा