नवी आशा जगण्याची... भाग 64

अजून ते स्क्रॅप घोटाळाचे पैसे नाही भरले त्याने, ती ही केस करणार आहे, एक त्याच्यावर त्याची सही आहे एका पेपर वर आपल्याला कडे पुरावा आहे


नवी आशा जगण्याची... भाग 64

©️®️शिल्पा सुतार
........

आदित्य आबा पुढे चालत होते, सीमा अनघा मागुन येत होत्या,

"आपल्याला माहिती नाही अश्या परिस्तिथीत लोक राहतात इथे, बायकांना तर किती त्रास आहे ग, कस करत असतिल ते घरकाम, शेतावर काम?",.. अनघा

"अनघा ताई एवढी नाही पण बरीच गरिबी आम्ही ही बघितली आहे, अगदी जेवणाचे हाल नव्हते, पण पुढे कस होईल? शिक्षण होईल की नाही ही चिंता होती आम्हाला ",.. सीमा

" हो ग सीमा, खूप सहन केल आहे तुम्ही ही, तू आधी ही नौकरी करायची का? ",.. अनघा

" हो ताई, मला माझ्या शिक्षणासाठी दर वर्षी काम कराव लागयच तेव्हा पुढच्या वर्षीच्या फी चे पैसे निघायचे, ऑफिस मध्ये अकाऊंटंट होती मी ",.. सीमा

अनघा आश्चर्याने सीमा कडे बघत होती... "आता काहीच काळजी करू नकोस सीमा, मस्त रहा, तू स्वतःच्या कर्तुत्वावर हा जॉब मिळवला आहे, खूप छान करते आहेस तू आणि आदित्य आहे आता तुझ्या सोबत, तो खूपच चांगला आहे",

" हो ताई खरच आदित्य खूप चांगला आहे",... सीमा

"आवडायला लागला वाटत आदित्य",.. अनघा

"ताई तुम्ही हि", .. दोघी हसत होत्या

ते वापस फार्म हाऊसवर आले, आबा आक्का आजी अनघा खाली बसले होते,

सीमा किचन मधे होती, चहा झाला आहे, चला लवकर, आदित्य आत आला, तो चहा घेवून बाहेर आला, सगळ्यांचा चहा झाला,

"सीमा चल आपण फिरू थोड इथेच, आम्ही आलो दहा मिनिटात",.. आदित्य

सीमा आदित्य वरच्या रूम मध्ये आले, खूप छान वाटत होत

"या रूम सोबत अनेक गोड आठवणी आहेत नाही आदित्य, बाल्कनी या खुर्च्या सगळ किती छान ",.. सीमा

"हो आपण येऊया एकदा परत दोघं इथे लाल साडी घेऊन",. आदित्य

"तुझं काय नेहमी ते चाललं असतं आदित्य.. लाल साडी लाल साडी ",.. सीमा

"नेसली का नंतर मग तू ती साडी एकदा तरी",.. आदित्य

" कशी नेसणार? तूच बोलला होता ना माझ्या समोर नको नेसु ही साडी तू ",.. सीमा

"अरे ते तेव्हा बोललो होतो मी, तेव्हा तुला पंधरा दिवसाचा वेळ हवा होता, फारच सुंदर दिसत होती तू त्या दिवशी त्या साडीत ",.. आदित्य

" मग कुठे दिला तू मला पंधरा दिवसाचा वेळ ",.. सीमा

" तूच मला घाबरून आधीच होकार दिला ",.. आदित्य

" हो मग तू सारखं रुसून बसतो, ते मला नाही आवडत",.. सीमा

"काय बोललीस सीमा",.. आदित्य

"काही नाही",.. सीमा

"सांग एकदा परत",.. आदित्य

" काही नाही आदित्य, मी म्हणत होती की तू आहेच एवढा छान ",.. सीमा हसत होती, आदित्य चिडला, तो सीमाच्या मागे आला, त्याने तिचा हात धरला ,

" आदित्य खाली सगळे आहेत उगीच नको त्रास देवू, हात सोड ",.. सीमा

"अस नाही सोडणार तुला, तू मला त्रास देतेस आता हल्ली, मी रुसून बसतो का? ",.. आदित्य

"नाही आदित्य तू छान आहेस , सोड ना हात चल खाली जावू",..सीमा

सीमा हे शक्य नाही, आदित्यने येवून तिला मिठी मारली,..

पुरे आदित्य..

" सीमा राहू दे तुझ्या जवळ ",.. आदित्य

" रोज असतो आपण सोबत ",.. सीमा

" पण अस नसतो सोबत , मी काय करणार सीमा?, तू फिरायला येत नाही, फार्म हाऊस वर येत नाही, माझ्याशी गोड बोलत नाही म्हणून मी अस करतो",.. आदित्य

" तू तर असं बोलतो आहे ना की तुला खूपच त्रास आहे ",.. सीमा

"मग काय, आहेच, तू माझ्या जवळ येत नाहीस सीमा ",.. आदित्य

"अरे मग घरात काम आहे की नाही? तुझ्या जवळच बसून राहू का",.. सीमा

" हो आधी सारख्या गप्पा मार ",.. आदित्य

" आधी सारख्या म्हणजे? आपल्या लग्नाला फक्त एक महिना होईल",.. सीमा

"तेच ना आपण कस वागतोय, जरा माझा विचार कर सीमा",.. आदित्य

" पुरे चल खाली ",.. सीमा

" आधी बोल की मला वेळ देशील ",.. आदित्य

हो चल आता...

" नाहीतर बाकीचे काय समजतील? की हे दोघ काही आता येता नाही घरी ",.. आदित्य

सीमा हसत होती...

सगळे निघाले नवीन बंगल्यावर आले, जरा नवीन एरियात होत हे घर, आजूबाजूला सगळे बंगले होते, थोडं पुढे गेल्यावर मोठा गेट लागलं, आत मध्ये बगीचा होता मोठा बंगला होता,

"किती सुंदर आहे हे घर",.. सीमा

"हो ना आबांनी खूप हौसेने बांधून घेतल होत",.. आदित्य

" आपण इथे येऊ रहायला, आता नको तिकडे, इथून शाळेत जाता येईल ना मला ",.. सीमा

"हो तो काय समोर मेन रोड आहे, काहीही भीती नाही, कार नसली तरी रिक्षा बस लगेच मिळते, रात्रीची भीती नाही",.. आदित्य

" खरच छान आहे हे, अस पाहिजे",.. सीमा

जुन्या घरासारखी बहुतेक डिझाईन होती या घराची, आक्कांना खूप बदल वाटू नये म्हणून आबांनी ती काळजी घेतली होती, सिक्युरिटी गार्ड कंपाउंड वगैरे व्यवस्थित होतं तिथे

" इथे थोडं फर्निचर करावं लागेल ते आपण राहायला आल्यावर ही करू शकतो किंवा रेडिमेट घेऊन फिक्स करू",.. आदित्य

"तिकडचे कपाटे इकडे शिफ्ट करता येतील तिकडे ते फिक्स नाही भिंतीत",.. आक्का

"सगळं ठरलं पुढच्या आठवड्यात आपण इकडे राहायला येऊन जाऊ चालेल ना आई",.. आदित्य

"हो चालेल आदित्य, तुमच्या मुलांच्या सिक्युरिटी पेक्षा माझा हट्ट मोठा नाही, तिथे राहण आता मलाही धोकादायक वाटतं आहे, तो विक्रम जेलमध्ये आहे तोपर्यंत ठीक आहे, नंतर तो काय करेल सांगता येत नाही, किती दार लावून बसणार आणि हे घर तसं सेफ आहे सगळ्या साईडने आपली सिक्युरिटी आहे",.. आक्का

" हो बरोबर, इथून ऑफिस ही जवळ आहे",.. आबा

अनघा सीमा आत फिरून बघत होते पूर्ण घर, छान आहे मोकळ घर

हो

" आता जरा वेळ ऑफिस ला जावू",.. आदित्य

सगळे ऑफिसमध्ये आले, मोठी फॅक्टरी होती ती, मोठ गेट लागलं, सिक्युरिटी गार्ड ने पळत येऊन गेट उघडलं, बरेच शॉप दिसत होते एका बाजूला, एका साईडला गार्डन होत, थोड आत गेल्यावर मोठ ऑफिस होतं, दोन मजली

आज सुट्टी असल्यामुळे कोणी नव्हतं ऑफिस मध्ये, शॉप मध्ये थोडेफार काम सुरू होत

सगळे आत गेले, बऱ्याच केबिन आणि टेबल खुर्च्या होत्या बसायला, खूप स्वच्छ आणि छान ऑफिस होतं, सगळे ऑफिस बघत होते, आदित्य पुढे चालत होता, सीमा त्याच्या जवळ गेली,..... " राजा कुठे बसतो आदित्य?",..

" माझी केबिन कुठे आहे ते नाही विचारलं सीमा? , लगेच स्वतःचा भाऊ कुठे बसतो ते बघते आहेस, म्हणजे तू अजून माझ्या वर दोन नंबर इतक प्रेम करते, एक नंबर वर अजून राजा आहे ",.. आदित्य

"तीन नंबर... तू आदित्य, आई राजा आणि मग.... तू,.. आणि तुझी केबिन मला माहिती आहे आदित्य, तू सांगितल त्या दिवशी मला ",.. सीमा

" बर अस आहे का? मी तीन नंबर, ठीक आहे, नंतर बघेन मी तुझ्या कडे , दाखवा बरं माझी केबिन? , एक मिनिट काही नको मी नाही बोलत तुझ्याशी सीमा ",.. आदित्य

" अरे आदित्य ऐक तरी, ती समोरच्या कोपर्‍यातली केबिन कडे सीमाने बोट दाखवलं.. ही तुझी केबिन, तू सांगतोस ना ऑफिस बद्दल त्या वरुन वाटल, माहिती नाही पण वाटत हीच तुझी केबिन आहे ",.. सीमा

" ठीक आहे माझ्याशी बोलायची काही गरज नाही ",.. आदित्य पुढे गेला

"अरे काय झालं आदित्य? एक मिनिट थांब, राजा कुठे बसतो, सांग ना ",.. सीमा

" केबिन समोर तिकडे राजाचा टेबल आहे ",.. आदित्य

" माझ्या भावाला केबिन नाही का",.. सीमा

" नाही कशाला हवी त्याला केबिन? , त्याच्या बॉसला केबिन आहे, आणि तू माझ्या मागे येवू नकोस, उगीच बोलू नकोस ",.. आदित्य

" आदित्य इकडे ये काय झालं, आता आहेस तू तीन नंबर वर तर काय करणार मी, सीमा हसत होती, आणि मी जर ऑफिस जॉईन केलं तर कुठे बसणार? ",..

" जेव्हा तू येशील तेव्हा बघू",.. आदित्य रागात होता

"म्हणजे? याला काय अर्थ आहे? ",.. सीमा

" तू शाळेत एवढी व्यस्त आहे तू कशाला येशील इकडे आमच्या ऑफिस मधे ",.. आदित्य

" येऊ शकते ",.. सीमा

"जर तुझी केबिन केली तर तुला आठवड्यातून दोन दिवस कंपल्सरी ऑफिसला याव लागेल ऑफिस ला, पण मग मी काम कस करणार",.. आदित्य

"का काय झालं काम न करायला",.. सीमा

"बायको ऑफिस मध्ये म्हणजे लक्ष तिच्याकडे राहील",. आदित्य

"हो का... सीमा हसत होती... पण मला शाळेपासून वेळच नाही तर कस काय येणार",.

" मग कशाला केबिन मागते आहे ",.. आदित्य

" अरे मी तुझी बॉस आहे ना तुला केबिन तर मला नको का? ",.. सीमा

" कोणी सांगितल हे बॉस च",.. आदित्य

" तूच बोलला मला की मी बॉस आहे तुझी ",.. सीमा

"काही नाही अस, आता मीच बॉस आहे समजल का, आणि माझ्या मागे येवू नकोस ",.. आदित्य

आदित्य बरोबर चालताना सीमा त्याच्या कडे बघत होती, आदित्य मुद्दाम अनघा आईं सोबत चालला गेला,

सीमा जास्तच करते आहे, मी तिच्याशी घरी गेल्यावर बोलणारच नाही... आदित्य चिडला होता

सगळे घरी आले खूप थकलेले होते ते, सीमा रूम मध्ये जात होती, आदित्य मुद्दामच खाली बसून होता

"अरे आदित्य चल वरती",.. सीमा

त्याने उत्तर दिल नाही

सीमा वरती आली तिला काम होत खूप, आता जी माहिती घेतली होती त्याच्या रीपोर्ट तयार करायचा होता, पण या आदित्यला उगीच चिडवलं मी, आता रुसला तो, काही खर नाही,

सीमाने आदित्य ला फोन केला आदित्य थोड्यावेळाने वरती आला

"खाली काय करत होतास तू आदित्य",.. सीमा

"काम असतात मला, अरे काही घरातल्यां बरोबर पण बोलू देते की नाही तू मला",.. आदित्य

"तूच तर बोलला होता ना आदित्य तुला माझ्या सोबत राहायचं आहे, मग आता का? तुला राग आला आहे का माझा",.. सीमा

"नाही मला कशाला येईल राग",.. आदित्य कॉट वर जावुन बसला

सीमा मागे गेली,.." बोल ना आदित्य प्लीज ",

" एक सांग मग, माझा कितवा नंबर? ",.. आदित्य

" पहिला नंबर, बस का आता ",.. सीमा

" नुसत बोलायला आहे हे, तस वागत नाही तू सीमा",... आदित्य

वागते..

" हो ना मग चल इकडे ये माझ्या जवळ ",.. आदित्य

" आदित्य आता नाही, आधी सांग मला केबिन नाही एवढ्या मोठ्या ऑफिस मध्ये त्याच काय करू या? ",.. सीमा

" तुला केबिन हवी आहे का ",.. आदित्य

" हो मग हवी आहे आहे मी आबांशी बोलणार आहे ",..सीमा

" ठीक आहे माझी अर्धी केबिन तुझी",.. आदित्य

"म्हणजे प्रत्यक्षात काही नाही अस ना",.. सीमा

"बरोबर.. ",.. आदित्य हसत होता

" जा आता मी नाही बोलणार ",.. सीमा

आदित्यने उठून दार लावून घेतल, तो सीमाच्या जवळ आला, आदित्य काय आता? ..

सीमा मॅडम रुसल्या आहेत, मनधरणी करावी लागेल मला, आणि माझा तिसरा नंबर का, बोल पटकन सगळ्यां समोर कस करते तू मला, मी बघतो आता तुझ्या कडे

" नाही आदित्य तुझा पहिला नंबर तू सगळ्यात प्रिय आहेस, बस का ",.. सीमा

"माफी माग आधी सीमा, नाही तर तुझ काही खरं नाही",.. आदित्य

आदित्य अरे सॉरी, प्लीज सोड आता ",.. सीमा खूप हसत होती

नाही..

सगळे जेवायला खाली जमले सीमा अनघा ताट करत होत्या

" काय काम चाललं आहे बाहेर काय गोंधळ आहे तिकडे",.. आबा

"ते कंपाऊंड करायचा आहे ना ते काम सुरू झालं तर काका त्या लोकांशी भांडत होते, त्यांनी त्यांच्या बाजूची किती जमीन आहे त्याचा मोजमाप सुरू केला",.. आदित्य

मग पुढे?

"झाला प्रॉब्लेम सॉल्व काहीही नाही आहे त्यांच्या ताब्यात, सगळी आपली जमीन आहे, आपण त्यांच्या घरापासून कंपाउंड टाकून घेतो आहे",.. आदित्य

" मग या घराचं काय करणार?",.. अनघा

" बघू काहीतरी करू, आपल्या ताब्यात राहील, लागतात असा आपल्याला गेस्ट हाऊस, तस काहीतरी तयार करू",.. आदित्य

" आईला चालेल ना ",.. अनघा

" ती नाही म्हटली तर राहू देवू घर आपल्या ताब्यात ",.. आदित्य

उद्या इलेक्शनचा रिजल्ट आहे तर आबा कदम साहेबांशी फोन वर बोलत होते,

"उद्या किती वाजता येणार आहात तुम्ही इकडे ",.. कदम साहेब

" आम्ही सकाळी सकाळीच येतो तिकडे ",.. आबा

" आदित्य येणार आहे का?",.. कदम साहेब

" हो तो थोडा उशीराने येईल मी आणि मिसेस लवकर येऊ",.. फोन झाला, आबा आत आले

" उद्या आम्ही दोघे जण सकाळी जातो इलेक्शन चा रिझल्ट आहे, अनघा तू येशील का सोबत? ",.. आबा

" पण मग आजी एकटी राहील ना ",.. अनघा

" तू जा अनघा तुला जायचं तर मदतनीस बायका घरात आहेत त्या लक्ष देतात माझ्याकडे ",.. आजी

" आदित्य तू येणार आहेस ना ",.. आबा

" हो आबा मी अकरा वाजेपर्यंत येईल",.. आदित्य

सीमा तू?..

" मी नाही येणार आबा मी शाळेत जाणार आहे, उद्या शक्य झालं तर मी आशा शी बोलणार आहे सकाळी, आदित्य तू माझ्यासोबत शाळेत चल",.. सीमा

हो चालेल...

"हो आता हे जरा इलेक्शनच काम झालं की कोर्टाच्या केस कडे बघू, आधीच केस कडे लक्ष द्यायचं होत तर मधेच विक्रमच निघालं, काय झालं त्याचं ",.. आबा

" उद्या कोर्ट सुरू होईल नक्कीच तो विक्रम जामीन साठी अर्ज करेल ",.. आदित्य

" केस तर सुरू राहील त्याच्यावर, करू दे काहीही ",... आबा

" अजून ते स्क्रॅप घोटाळाचे पैसे नाही भरले त्याने, ती ही केस करणार आहे, एक त्याच्यावर त्याची सही आहे एका पेपर वर आपल्याला कडे पुरावा आहे ",.. आदित्य

" बर झाल त्याला सोडू नको",.. आबा

जेवण झाल, सीमा रीपोर्ट च काम करत होती, आदित्य ईमेल चेक करत होता,

"झाल का काम सीमा? ",.. आदित्य

" नाही अत्ताशी सुरू केल, खरं तर संध्याकाळी करायचं होत हे काम मला ",.. सीमा

" हो ना पण मी करू दिल नाही ना ",.. आदित्य

आदित्य पुरे..

"मग आधी का माझ नाव घेते माझ? , मला चिडवते",..आदित्य

सीमा हसत होती,.. "त्या शिवाय कुठे करमत मला आदित्य" ,...





🎭 Series Post

View all