©️®️शिल्पा सुतार
........
........
"उद्या आपण फार्महाऊसवर जायचे का? ",.. सीमा
आदित्य आश्चर्याने सीमा कडे बघत होता,.. "खर का, बापरे माझ काही खर नाही उद्या ",.
"आदित्य.. पुरे.. एवढा खुश होवु नकोस, अरे पूर्ण तर ऐकत जा, काहीही काय",.. सीमा
" मला जरा तिथल्या लोकांना भेटायचं आहे, ते शाळेच काम सुरू करायच आहे, त्या बाजूला जावून थोडी माहिती घ्यायची आहे, किती मुल आहेत, कितवीत आहेत सगळा रीपोर्ट करायचा आहे" ,... सीमा
" आपण सकाळी फार्म हाऊस वर जावू, आरामात राहू मग दुपार नंतर तिकडे जावू शाळेच्या चौकशी साठी ",.. आदित्य
" नाही आदित्य उगीच त्रास नको देवू बर",.. सीमा
"का कोण कोण जाणार तिकडे? ",...आदित्य
" सगळे जाऊ, दुपारी जेवून जाऊ",.. सीमा
"याला काय अर्थ आहे सीमा? मला वाटलं की आपण दोघ रिलॅक्स व्हायला जातो आहोत तिथे",.. आदित्य
सीमा खूप हसत होती,.." हळु बोल बॉडी गार्ड आहे",
"इकडे ये जवळ मग कानात सांगतो प्लॅन",.. आदित्य
"काही नको तू तिकडे थांब, अरे अनघा ताई असतिल, आबा असतिल त्यांच्या सोबत वापस येवू ",. सीमा
घर आलं, मीना ताई राजा बाहेर आले,
" आई मी पोलिस स्टेशनला जाऊन येतो", ... आदित्य
" मी येतो तुमच्यासोबत जिजाजी",.. राजा
" चल मग लवकर",.. आदित्य
सीमा आत गेली, राजा आदित्य सोबत पोलीस स्टेशनला गेला
"बरं झालं राजा गेला आदित्य सोबत, मला भीतीच वाटते तिकडे ते लोक कसे आहे? विक्रम चे मित्र पण डेंजर आहेत, गुंड आहेत सगळे",.. सीमा
" हो ना, काळजी करू नकोस, तुम्ही थांबणार आहात ना? स्वयंपाक काय करू? ",.. मीना ताई
"जास्त करू नको कढी खिचडी कर",.. सीमा
चालेल.... मीनाताई बोलत बसल्या होत्या, अनघा ताई नाही आल्या का?
" नाही त्या आईं सोबत आहेत",.. सीमा
" इलेक्शन कस झाल? ",... मीना ताई
" चांगल शांततेत झाल, आबा जिंकतील बहुतेक",.. सीमा मीना ताईंना मदत करत होती, तिकडे त्या गावात काय काय झालं ते ती सांगत होती
.....
.....
आदित्य राजा पोलीस स्टेशनला पोहोचले पोलिसांनी विक्रम विरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी मोठी केस फाईल फाईल तयार केली होती, ते सगळे पेपर त्यांनी आदित्यला दाखवले, वकील साहेब आलेले होते, तिथे त्यांनी सगळे पेपर वाचले, एक दोन बदल सुचवले, आदित्यने सही केली
एक वकील समोर आला, तो आदित्यला येऊन भेटला,.. "मी विक्रमच्या बाजूचा वकील आहे, काय केस आहे ती मला नीट समजून घ्यायची आहे",..
" तुम्ही ते विक्रम ला विचारल तर बर होईल, ते झाल की मला ऑफिसमध्ये येऊन भेटा किंवा आमच्या वकीलाला विचारा, आता मला तुमच्याशी बोलायला वेळ नाही",.. आदित्य
आदित्य राजा निघाले
"किती शिक्षा होईल विक्रमला? ",.. राजा
"जास्त होणार नाही",.. आदित्य
"पुढे काय होईल मग त्याने असा त्रास दिला तर, मला सीमा ताईची काळजी वाटते आहे ",.. राजा
"काहीतरी कराव लागेल, घर बदलतोय आम्ही आता इन्स्पेक्टरला सांगून लिहून घेवू त्याच्या कडून त्रास दिला तर सरळ पोलिस केस होईल",.. आदित्य
घरी आले सीमा समोर बसून टीव्ही बघत होती, स्वयंपाक झालेला होता
" अरे वा छान आराम चालला आहे तुझा सीमा ",.. आदित्य
" अरे मग काय करणार मी इथे, तुझ आपल काहीही ",.. सीमा
" चला जेवण करून घ्या",.. मीना ताई
कढी खिचडी खूप आवडली आदित्यला,.." सीमा तू अशी शिकून घे, कढी मस्त आहे चविष्ट ",..
जेवण झालं आदित्य सीमा घरी यायला निघाले
" काय म्हटले इंस्पेक्टर? ",.. सीमा
"काही नाही ते विक्रम वर काय आरोप लावायचे ती केस तयार केली होती त्यांनी, सही करायला गेलो होतो",.. आदित्य
"कोणी नव्हत ना तिथे विक्रमचे मित्र, नातेवाईक ",.. सीमा
" नाही कोणी साथ देत नाही त्यांची, प्रशांत तो जरा बरा आहे, तो करू शकतो मदत पण पवार साहेबानी त्याला आधीच सांगितल की विक्रम ला मदत केली तर तुला काम मिळणार नाही म्हणून तो लांब आहे ",.आदित्य
बर झाल...
ते घरी आले
"काय करते सीमा? आराम कर आता",.. आदित्य
"हो आलेच आदित्य",.. सीमा
" काय लिहिते आहेस? ",.. आदित्य
" प्लॅन करते आहे, रीपोर्ट बनवायचा आहे",.. सीमा
कसला?
" शाळेचा, आबा आणि मी मिळून पुढच्या आठवड्यात जाणार आहोत मंजूरी घ्यायला, त्या आधी काय कस हव याचा माझा रीपोर्ट रेडी हवा",.. सीमा
"बरोबर आहे",.. आदित्य
" आता वेळ वाया जावू द्यायचा नाही",.. सीमा
दुसऱ्या दिवशी सुट्टी होती सगळे आरामात उठले
सकाळी सकाळी काका काकु घरी आले होते, आबा आक्का बाहेर येऊन बसले,
" आम्हाला सीमाची माफी मागायची आहे",.. काका
" तुम्ही कशाला मागतात तिची माफी, तुम्ही काय केलं आहे? विक्रम गुन्हेगार आहे त्याला त्याची शिक्षा मिळणार आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ दोघं" ,.. आबा
" एक बोलायचं होतं, तुम्ही प्लीज विक्रम वरचे केस मागे घ्या मी वचन देतो की विक्रम तुमचं कोणाचं यापुढे काहीही नाव घेणार नाही",.. काका
" ते शक्य नाही आता जे आहे ते सगळे आदित्य ठरवतो आहे ",.. आबा
" तुम्ही बोलवा आदित्यला मी बोलतो त्यांच्याशी",.. काका
" तो वरती आहेत रूम मध्ये बोलवता येणार नाही, आणि तो चिडेल ",.. आबा
अनघा सगळं उभं राहून ऐकत होती,.." किती दिवस तुम्ही असं पाठीशी घालणार आहात विक्रमला",.
" अगं पण मग त्याला शिक्षा होऊन तरी काय होणार आहे, आमचा एकच आधार आहे तो ",.. काका
" म्हणून काय त्याने काहीही केलेलं चालतं का? तुम्ही दोघं थोडा धीर धरा, त्याला थोडी शिक्षा होऊ द्या, म्हणजे व्यवस्थित वागेल तो नंतर अशी अशा आहे, त्या विक्रम मुळे आदित्य आणि सीमाला एवढा त्रास झाला, किती घाण घाण बोलला तो विक्रम, तुम्हाला काय वाटल आम्हाला काहीही माहिती नाही का, खरंतर सीमाचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, विक्रमचा राग आदित्य वर आहे, पण तो उगाच आदित्यला त्रास व्हायला हवा म्हणून सीमाला त्रास देतो हे कितपत योग्य आहे काका काकू तुम्ही सांगा? तुम्हाला पटत आहे का हे, सीमा एकदम साध्या घरची मुलगी आहे, तिचा पूर्ण वेळ शिक्षण आणि नोकरी करण्यात गेला आहे, ती आपल्यापैकी कोणालाच आधी ओळखत नव्हती, ते माहिती आहे आम्हाला, मग तरीसुद्धा विक्रम असा काय बोलतो तिच्याबद्दल",.. अनघा
" तो विक्रम मूर्ख आहे, कस वागावं ते समजत नाही त्याला ",.. काका
" हो ना मग राहू द्या त्याला जेल मध्ये, थोडी समज आली पाहिजे",.. अनघा
" आम्ही वकील बघितला आहे तो करतो आहे काहीतरी प्रयत्न, पण तुम्ही थोडं केस मागे घेतली असती तर बरं झालं असतं ",.. काका
" मला असं वाटत आहे काका तुम्ही या विषयावर आदित्यशी नका बोलू, उगाच तो परत चिडेल तुमच्यावर, तुमचा चहा नाश्ता झाला आहे का? नाहीतर चला चहा घ्या",.. अनघा
"झाला आहे आमचा नाश्ता येतो आम्ही",.. काका काकू गेले, काकू आक्कां कडे बघत होत्या जातांना
" या लोकांना मदत मागायला यायला ही काही वाटत नाही का?, जे झाल त्याच यांना काहीच वाटत नाही का, की त्यांना समजून घ्यायच नाही ",..
" बघा ना आबा, बरं झालं आदित्य सीमा खाली आले नाही, नाहीतर अजून भांडण झाले असतं" ,.. अनघा
......
......
विक्रम जेलमध्ये बसून कंटाळा होता, त्याने दोन-तीनदा हवालदार काकांची बोलण्याचा प्रयत्न केला, कोणीही त्याच्याशी बोललं नाही, त्याचा मोबाईलही जप्त होता, फोन मिळाला असता तर त्याने प्रशांतला फोन केला असता, पप्पा वकील घेऊन आले होते थोड्या वेळा पूर्वी हे त्याला माहिती होतं, बेल मिळायला का बर वेळ लागतो आहे, बहुतेक सोमवारी होईल हे काम , पण मला भेटायला कोणीच नाही आल काल पासून, फक्त पप्पा होते, प्रशांत कुठे गेला आहे? मामा आले नाही, चांगलाच राग काढणार भरणार आहे मी नंतर त्यांच्यावर, त्या पूजा वर, तिला अस रडवेन ना, तेव्हा येतील हात पाया पडत, पण सीमा आणि आदित्य यांनी चांगलाच दणका दिला मी, त्यांना वाटलंही नसेल की ते तिथे त्यांच्याच घरात सुरक्षित नाहीत, मी असं सोडणार नाही आदित्यला,
सीमा.... जावू दे आता तिला... ती ऐकत नाही माझ, फारच प्रामाणिक आहे ती आदित्य सोबत , मला खरच सीमा हवी होती का? की ती आदित्यची बायको आहे म्हणून आवडली होती, आधी तिला बघितल होत मी, तेव्हा काही विशेष वाटल नव्हत मला तिच्या बद्दल, दोघ गोष्टी आहेत, सीमा आहेच छान पण त्या पेक्षा त्या आदित्यला त्रास होतो तिला हात लावला की ते बर वाटत, घाबरली होती सीमा मला, नाजूक आहे ती, कसे वागत असतिल आदित्य सीमा सोबत असतांना , त्यांचा विचार विक्रम करत बसला
विक्रमला माहितीच नव्हतं की मामा मामी घरी येऊन गेले आणि त्याचं लग्न मोडलं आहे
इन्स्पेक्टर साहेबांनी विक्रम वर बरेच चार्जेस लावलेले होते धमक्या देणं, फॅक्टरीत चोरी करण, बायकांची नाव घेण, हाणामारी, फ्रॉड, जबरदस्ती घरात घुसण, स्क्रॅप घोटाळा अजून बाकी होता
आदित्य सीमा खाली आले आबा आक्का आजी अनघा बसलेले होते,.. "कोण आल होत?, काय झालं एवढे शांत तुम्ही?",
"काका काकू..... अनघा
का आता??
"केस मागे घ्या अस सांगत होते",.. अनघा
"या विषयावर त्यांच्याशी बोलायच नाही या पुढे",.. आदित्य
सीमा आबां जवळ येवून बसली,.. "आपण जायचं ना आज फार्म हाऊस वर आबा, ते शाळेच बघायच ना",..
"तू बनवला का रीपोर्ट ",.. आबा
" हो आबा पण अजून माहिती हवी आहे मला, किती मुल असतिल साधारण त्यांचा वयोगट काय? आसपास कोणत्या वस्त्या आहेत, घरात किती वृद्ध लोक आहेत, पालकांचे उत्पन्न किती, सगळी माहिती हवी आहे",.. सीमा
"चालेल निघू आपण आता ",. आबा
" दुपारी गेल तरी चालेल ",.. सीमा
ठीक आहे
"अनघा ताई जावू आपण, आक्का, आजी",.. सीमा
" ठीक आहे जावू ",.. आबा
सीमा आबांशी बोलत होती तो पर्यंत आक्का नाश्ता घेवून आल्या, सीमा पटकन उठली,.." आई मी आणल असत ना तुम्ही बसा ",
सगळे सीमा कडे कौतुकाने बघत होते, घर ही.. शाळा ही छान सांभाळते, आता समाजकार्यात ही भाग घेणार आहे ही, खूप छान
" आबा आपण फार्म हाऊस हून घरी येतांना नवीन बंगल्यावर जावू, या सगळ्यांना घर दाखवून देवू आणि या घरासाठी शेतासाठी कंपाऊंडच काम करायच आहे आज पासून ",.. आदित्य
" आज पासून का?",.. आबा
"हो आधीच उशीर झाला आहे",. आदित्य
"पण कंपाऊंड टाकल तर काका काकू कसे जातील रस्त्यापर्यंत",.. आबा
"ते आपल्याला काय करायच? , जातील गावाला वळसा घालून, आपल्या भागात शेतात त्यांचा काही वाटा नाही ना आता ",.. आदित्य
" नाही काही संबध नाही त्यांचा",.. आबा
"ठीक आहे मग मी करतो काम सुरू,आधीच करायला पाहिजे होत हे उगीच त्यांचा विचार केला पूर्वी ",..आदित्य
" बरोबर करतो आहे आदित्य, आबा आक्का आता अजिबात दया माया नको, ते लोक सापा सारखे आहेत, किती सांभाळा त्यांना ते आपल्याला डंख मारतील",.. अनघा
पण अनघा...
" आई आम्ही ऐकणार नाही ",.. अनघा
" ठीक आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने जे योग्य आहे ते आदित्य करतो आहे" ,. आबा
"मुल मुल भांडत होते तो पर्यंत ठीक होत, आता सीमा पर्यंत आला तो विक्रम हे अजिबात चालणार नाही, हात बघ तिचा कसा झाला आहे हिरवा काळा, कसा वागला तो विक्रम सीमा शी, मुळात एका मुलीशी अस कस वागू शकतो तो, ते ही त्याची वहिनी आहे ही, त्रास तरी किती सहन करणार आपण, सीमा काही बोलत नाही म्हणून सोपी सापडते, बाजूला करून टाका त्यांना आपल्या आयुष्यातून ",.. अनघा
" एकदम बरोबर ताई, आता त्या लोकांना आपल्या कडे येवु द्यायच नाही ",.. आदित्य
दुपारी जेवणानंतर सगळे फार्म हाऊसवर आले
सीमा, अनघा, आबा, आदित्य तिकडे मागच्या बाजूला कामगार वस्तीत गेले, एक मॅनेजर होते सोबत, सीमा अनघा सगळ फिरून बघत होत्या , तिथले लोक जमले, आदित्य फोटो घेत होता वस्तीचे, सीमा सूचना देत होती, मॅनेजर लिहून घेत होते,
त्या लोकांनी बसायला खुर्च्या आणल्या, सीमा बायकांशी मुलांशी बोलत होती
ते निघाले,
"आज बरच काम झाल, आता बरीच आयडिया आली काय करता येईल त्याची",.. आदित्य
सीमा गप्प होती
"काय झालं सीमा?",.. आदित्य
"आबा आदित्य नुसत शिक्षण नाही तर अजून भरपूर काम कराव लागेल इथे, खूप शारीरिक व मानसिक समस्या आहेत इथल्या बायकांना, मला खूप वाईट वाटल सगळ ऐकुन" ,.. सीमा
" हो ना किती तो त्रास त्यांना नुसत बाथरूम ही नाही त्यांना",.. अनघा
" करू आपण ते ही काम, आरोग्य शिबीर भरवू, गोळ्या टॉनिक देवू सगळ्यांना" ,.. आबा
"पुरुषां सोबत बायकांच्या आरोग्य कडे, खाण्या पिण्या कडे लक्ष देण गरजेच आहे, हे त्यांना सांगितल पाहिजे, बरच दुर्लक्ष करतात या बायका ",.. सीमा
हो ना...
आदित्य बघत होता सीमा किती मनापासून काम करते, खूप यश मिळेल हिला.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा