नवी आशा जगण्याची... भाग 62

खूप छान घर होत कदम साहेबांच, जेवण झाल

नवी आशा जगण्याची... भाग 62

©️®️शिल्पा सुतार
........

अनघा आदित्य सीमा छान बोलत बसले होते,.. "तू  आली ना ताई नंतर जावू आम्ही फिरायला",

"सीमा चालेल ना तुला? ",.. अनघा

"ताई तुम्ही ही ना",.. सीमा

"नाही तर म्हणशील अनघा आली आणि आमचा प्लॅन पुढे गेला",.. अनघा

"अग ताई माझ्या पेक्षा सीमाला जास्त काळजी आहे घरच्यांची",.. आदित्य

"हो रे माहिती आहे मला मी गम्मत करत होते ",.. अनघा

" मी जरा ऑफिसला जाऊन येतो, थोडं काम आहे नंतर पोलीस स्टेशनला ही जावे लागेल, तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या, दार उघडू नका कोणाला, तस सिक्युरिटी गार्ड आहे बाहेर ",.. आदित्य

" तू ही नीट जा रे नाही तर फोन वर कर काम ",.. अनघा

"नाही मी येतो जावून काम पेंडींग राहतात",.. आदित्य आवरायला आत गेला
........

मामा मामी पूजा घरी आले, काका काकू बसलेले होते, ते त्यांना बघून दचकले,..." तुम्ही आता या वेळी कसे इथे?" ,

" विक्रम कुठे आहे?" ,... मामा

"तो ऑफिस मध्ये गेला आहे ",.. काका

" किती खोट बोलताय तुम्ही, तुम्हाला काय वाटल आम्हाला काही समजणार नाही का काय झालं इथे ते",..मामा

"काय झालं भाऊ? का असा चिडला आहेस तू? अरे काही झाल नाही,  त्या दोघ भावाचा थोड्या मारामाऱ्या झाल्या, त्यात काय विशेष, बाकी काही नाही" ,... काकू

" सीमाच्या मागे लागला आहे ना विक्रम? , माझ्या मुलीच काय भविष्य आहे इथे ते समजेल का आम्हाला? असला फालतू पणा अजिबात खपवून घेणार नाही आम्ही",..मामा

" अरे ती पोरगी तशी आहे, काही तरी गडबड आहे तुम्हाला कोणी फोन करून सांगितल ",.. काका

" गप्प बसा दाजी दुसर्‍याच्या पोरीला काही बोलू नको उगीच, चांगली आहे ती पोर, मी भेटलो तिला, खोट आपल्या पोरात आहे ",.. मामा

" बर मग आता तुम्हाला सगळ समजल तर का आले आहात तुम्ही इथे आम्हाला चिडवायला का? ",.. काका

" खात्री करून घ्यायला नक्की काय झाल ते?, आता समजल सगळ, विक्रम तर करतोच आहे चुका, तुम्हीही काही कमी नाहीत त्याला पाठीशी घालणारे, हे लग्न होवू शकत नाही आता ठरलं ",.. मामा

" पूजाचा तर विचार कर भाऊ, ते दोघ एकमेकां वर प्रेम करतात, असा तडकाफडकी निर्णय नको घेवू, झाली चूक विक्रम कडून तो चांगला आहे रे, अस करु नकोस ",.. काकू

" पूजा ने नकार दिला आहे लग्नाला, असा मुलगा नको, आता पासून हे नाटक तुमचे, पुढे कस होईल, लग्न ठरलं असून तो इतर मुलीच्या मागे लागतो म्हणजे काय",.. मामा

" तरुण मूल ते ",.. काका मध्येच बोलत होते

" दाजी तुम्ही सांगू नका काही, आधी पासून दाबल असत विक्रमला म्हणजे बर झाल असत ",.. मामा

काकू रडत होत्या,.. "राग सोड आता भाऊ मदत कर, आम्हाला कोणाचा आधार आहे",

"हे चुकीच केल विक्रमने मी मदत करणार नाही",.. मामा

"भाऊ त्याच्या जामीन च बघ काही तरी, मी हात जोडते",.. काकू

मामा काही बोलले नाही, ते मामी कडे बघत होते, मामी काकू कडे गेली,.." आम्हाला निघाव लागेल आता ताई, तुम्ही काळजी घ्या ",

" का ग अशी करते वहिनी? तू तरी समजून घे, सांग भाऊला",.. काकू

" ते जामीन मिळून देतील पण विक्रम नंतर तरी नीट वागेन का? त्या पेक्षा आम्ही या भानगडीत पडणार नाही, हे लग्न आता होणार नाही" ,... मामी

"मी पाया पडू का आता तुमच्या, झाली चूक विक्रमची नका ग ताणू ",.. काकू

" नाही ताई पूजाच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा, बळजबरी नका करू",.. मामी

मामा मामी पूजा आबां कडे भेटायला आले

ते पुढे बसले होते, आबा आक्का आले, अनघा आदित्य आजी सीमा येवून बसल्या, पूजा पटकन येवून सीमाला भेटली, सीमा खूप चूकच झाली विक्रम कडून, मी लग्नाला नकार दिला आहे, तू ठीक आहे ना

हो..

" तुम्ही कसे आहात आबा ",.. मामा

" ठीक आहे मी ",.. आबा

" अ‍ॅडमिट केल होत का तुम्हाला",.. मामा

"हो पूर्ण बॉडी चेक अप करून घेतल",.. आबा

"आबा जोरात पडले",.. आक्का

"सीमा तू आम्हाला आधी का नाही सांगितल हे  विक्रम बद्दल",.. मामी

" मला काय माहिती विक्रम अस करेन, त्याचे विचार एवढे घाण असतिल, तो थोडा बोलायचा माझ्याशी पण अस नाव घेईल अस वाटल नव्हत ",.. सीमा

" चुकीच वागला विक्रम ",.. मामी

हो...

"आम्ही आता निघतो घरी जायला, विक्रमच्या जामीन साठी नाही करणार प्रयत्न, आता यांचा आमचा संबंध संपला, ताईला यायच असेल तर ती येईन माझ्या कडे पण आता मी येणार नाही परत ",... मामा

मावशी चहा फराळ घेवून आल्या, चहा झाल्यावर मामा मामी पूजा घरी गेले

आदित्य ऑफिस मध्ये आला, थोडं काम बाकी होतो ते केलं नंतर तो आणि सचिन पोलीस स्टेशनला गेले, त्यांच्यासोबत वकीलही होते, विक्रम कडुन काय काय लिहून घ्यायचं काय काय चार्जेस आहे ते सांगितलं, अजिबात सोडू नका याला, मी उद्या नाही येऊ शकत काही, काम असेल तर फोन करा, सचिन येवून जाईल

ठीक आहे साहेब...
.....

सीमाने निशा ला फोन केला,

"कुठे होत्या आज मॅडम? मस्त सुरु आहे तुझ हनीमून , शाळेत यायच लक्ष्यात नाही वाटत, आता बर वेळ मिळाला मला फोन करायला",.. निशा

"निशा एक मिनिट ऐकुन घे मी काय सांगते ते, तुझी तू बोलत राहते का ग",.. सीमा

"बोल काय झालं",.. निशा

"अग आज विक्रम सकाळी जबरदस्ती घरात घुसला किचन मधे आला तो डायरेक्ट आणि माझा हात धरला, खूप गोंधळ झाला, भांडण झाल, बर झाल वेळेवर आबा आक्का आले, तो पळत होता आबा मध्ये आले, त्यांना ढकलून तो निघून गेला ",.. सीमा

" बापरे काय प्रकार आहे हा? लागल का आबांना ",.. निशा

" हो ते अ‍ॅडमिट होते काल, पूर्ण चेक अप केल काल",.. सीमा

" तू कशी आहेस ",.. निशा

" मी ठीक आहे निशा , पण किती विचित्र पणा हा, मनातून धडकी भरली आहे माझ्या, खूप घाण वाटल त्या विक्रमने मला हात लावला तर, हात एवढा दुखतोय मुरगळला थोडा, तो का मला अस करतो, मला नको तो माझ्या मागे यायला ",.. सीमा

" कठीण आहे हे सगळ, एवढ झाल आदित्य कुठे होता?, तू काळजी करू नकोस, होईल ठीक ",.. निशा

" तो वरती होता रूम मध्ये, मी खाली चहा नाश्ता तयार करत होती ",..सीमा

पुढे

"नंतर आदित्य विक्रमची मारामारी झाली, विक्रम मला खूप बोलाल की त्याचे माझे आधी पासून संबध आहेत",.. सीमा

" एवढी आपली चॉईस वाईट आहे का?, कोण ठेवेल त्या विक्रम शी संबंध, लागायच असत तर तू तेव्हा आदित्य जिजुंच्या मागे लागली असती ",.. निशा

" नाही तर काय, त्याच्याशी मी कश्याला ओळख ठेवेन, मला काय करायच, आणि तेव्हा तर मला लग्न करायच नव्हत, तुला माहिती आहे ना ",.. सीमा

" हो ना आता आदित्य जिजुंवर फूल फिदा ना तू ",.. निशा

" पुरे निशा, पण सांग ना तो विक्रम का अस करतो, मी कोणाची तरी बायको आहे, भीती वाटते ग त्याची, काहीही बोलतो तो, आता तरी बंद होईल ना त्याच माझ्या मागे येण?",.. सीमा काळजीत होती

" एवढी अक्कल असती त्या विक्रम ला तर नीट वागला असता, बिझनेस नीट केला असता ना, फ्रॉड नुसता  ",.. निशा

" हो ना आणि त्याच लग्न मोडल",.. सीमा

" बर झालं आता सोडू नका त्याला चांगली शिक्षा व्हायला हवी ",.. निशा

हो ना,

" उद्या येणार का शाळेत",.. निशा

"नाही उद्या इलेक्शन आहे तिकडे जातो, सोमवारी येईल",.सीमा

'तुम्ही फिरायला जाणार होते ना ",..निशा

"नंतर जावू, खूप गोंधळ झाला आता नको ,तू प्रिन्सिपल मॅडम ला सांगशील का तस मी फोन करणार आहे",.. सीमा

हो.. काळजी घे

हो..

रात्रीचे जेवण नाव झाली, आबा छान गप्पा मारत बसले होते, त्यांच्याकडे बघून सगळ्यांनाच बरं वाटत होतं, चला आता ठीक आहेत आबा, उद्या इलेक्शन साठी आपण सगळे जाऊ तिकडे, तेवढेच माझे एक दोन वोट वाढतील, सगळे हसत होते,

सीमा आदित्य रूम मध्ये आले,.. "गोळ्या घेतल्या का सीमा?",

हो..

"हाथ ठीक आहे का? बघू इकडे",.. आदित्य

"आज फारच गोंधळ झाला नाही आदित्य",.. सीमा

" हो ना मी लक्ष द्यायला पाहिजे होत, मला वाटलं नव्हतं विक्रम असा वागेल",.. आदित्य

"मलाही नव्हतं वाटलं",.. सीमा

"चल आता आराम कर, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, तू येते आहे ना इलेक्शन साठी? की आईकडे जाते तुझ्या? ",.. आदित्य

" नाही मी येते आहे तुमच्यासोबत, आबांनी यायला सांगितलं आहे, संध्याकाळी जाईल मी आईकडे ",.. सीमा

चालेल...

" मी ही आज घाबरून गेलो होतो, रागाच्या भरात तुला ही खूप बोललो ",. आदित्य

" काही हरकत नाही आदित्य, ठीक आहे तुझी काळजी होती त्या मागे ",.. सीमा

" म्हणजे तुला राग नाही आला",.. आदित्य

नाही...

" मला वाटल आज माझ काही खर नाही, चांगली बघशील तू माझ्याकडे, मला ओरडशील",.. आदित्य

" मी कशाला ओरडू ",. सीमा

"किती तू चांगली, चल मग आता ये इकडे ",.. आदित्य

" आदित्य का करतात कोणी अस दुसर्‍याच्या नको असतांना त्यांच्या मागे मागे ",.. सीमा

"मूर्ख असतात असे लोक, काळजी करू नकोस तू होईल ठीक",.. आदित्य

" मला या पुढे त्या विक्रमच तोंड बघायच नाही",.. सीमा

"आपण रविवारी जावू नवीन बंगला दाखवतो तुला आपला, लवकर रहायला जावू तिकडे, ऑफिस मध्ये ही चल तू एकदा ही आली नाहीस तिथे ",.. आदित्य

ठीक आहे

सीमा झोपली आदित्य काळजीत होता सीमा ने धसका घेतला आहे विक्रमचा, मी आता नीट लक्ष देईन हिच्या कडे..

सकाळी सगळे लवकर उठले चहा नाश्ता करून इलेक्शनला जायला निघाले, मोठी गाडी केली होती त्यांनी, आक्का, अनघा, आजी, सीमा यांनी छान कॉटनच्या साड्या घातल्या होत्या, आबा आदित्य छान दिसत होते कुर्ता-पायजमा मध्ये, आबांनी लिस्ट करून घेतली होती घरून काय काय सामान घ्यायच याची, शिंदे मॅनेजर आले होते ते बघत होते सगळीकडे,

"सीमा तुझ्या हाताची पट्टी कुठे आहे",.. आदित्य

" नाही घेतली ती सोबत",.. सीमा

"का असं? थांब मी पट्टी घेऊन येतो उगाच हात जास्त दुखेल",.आदित्य

" काही विशेष झालेलं नाही मोठी वाटते पट्टी",..सीमा

" डॉक्टरांनी सांगितलं आहे दोन-तीन दिवस वापर ",..आदित्य

ठीक आहे..

अनघा हसत होती, छान सुरु आहे तुमच सीमा आदित्य, असे मस्त रहा,

सगळे त्या गावी पोहोचले, जिथे इलेक्शन होत तिथे भरपूर गर्दी होती, कदम  साहेब.. मॅडम दोघ आले होते ते सगळ्यांना येवून भेटले,.." आजच दुपारच जेवण आमच्या कडे ",..

अहो पण..

" आम्ही ऐकणार नाही",.. कदम साहेब

"पण इलेक्शन झाल्या शिवाय इथून निघता येणार नाही",..आबा

"दोन तीन तासात होत हे काम, मग जावू घरी",.. कदम साहेब

थोड्या वेळाने इलेक्शन सुरू झाल, आबा एकदम बिझी झाले, आदित्य सोबत होता त्यांच्या, बरेच लोक येवून आबांना भेटत होते, त्यांच पूर्ण पॅनल पुढे होत, दोन दोन दिवसांनी रिजल्ट समजणार होता, उत्साही वातावरण होत

" बर झालं आदित्य आपण फिरायच पुढे ढकलल, सोमवारी असेल रिजल्ट ",... सीमा

" हो ना पण आपण कॅन्सल नाही करणार फिरायला जाणार आहोत ",.. आदित्य

" हो आदित्य तुझ काय रे तेच तेच ",.. सीमा

" म्हणजे काय हनीमूनला जायच ह, मला तुझ्या सोबत रहायच आहे ",.. आदित्य

" कोणी ऐकेल आदित्य, हळू बोल ",.. सीमा

" माझ्या बायकोशी बोलतो आहे मी, कोणाची भीती आहे मला ",.. आदित्य

सीमा हसत होती

तिथल काम झाल, ते सगळे दुपारी कदम साहेबाच्या घराकडे जात होते, रस्त्यात छोटीशी शाळा दिसली, बर्‍या पैकी गावाबाहेर होती ती शाळा, गाडी थांबवा,..

" आबा हे बघा अस म्हणते आहे मी की या मुलांना एवढ्या आत गावत येतं येत नाही शाळेत तर त्यांच्या साठी आपण अशी व्यवस्था करू शकतो",.. सीमा

सगळे आत गेले, आम्हाला आत जावून बघायची होती शाळा, त्यांनी परवानगी दिली, छोटीशी शाळा होती, थोडी मुल होते पण छान सांभाळले जात होते, एक दोन शिक्षक होते त्यांच्या सोबत,

मागून कदम साहेब आले, ते ही सोबत होते त्यांच्या,.." माझी आहे ही शाळा, इथल्या मुलांसाठी व्यवस्था केली आहे ही",

"आमच्या शेतात बाजूच्या गावात खूप कामगार आहेत, त्यांच्या मुलांना शिक्षण साठी असी शाळा उभारायची आहे, सीमाची इच्छा आहे",.. आबा

"खूप छान विचार आहेत तुमचे सूनबाई, आम्ही करू मदत, आम्हाला एक वृद्धाश्रम उभा करायचा आहे, त्यात तुम्ही आम्हाला मदत करा ",.. कदम साहेब

" हो नक्की आम्ही येवू सेवा द्यायला",.. सीमा

सगळ्यांनी शाळा बघितली,..

"आता समजल सीमा तू काय म्हणते ते आपण करू सुरु अशी शाळा",. आबा

सीमा खुश होती..

खूप मोठ घर होत कदम साहेबांच, घरातले लोक खूप चांगले होते, त्यांच्या मुलाच अजून लग्न झालं नव्हत, दोन मुली होत्या लग्न झालेल्या, जेवण झाल सगळे छान गप्पा मारत बसले होते,

"तुम्ही करा आराम आम्ही एकदा परत इलेक्शनच्या ठिकाणी जावून येतो, मग निघू आपण घरी जायला",... आबा, आदित्य, कदम साहेब, त्यांचा मुलगा ही सोबत गेला, तिथून ते त्यांच्या फॅक्टरीत जाणार होते, एक दोन तास लागतील, सीमा अनघा आराम करत होत्या, आक्का कदम मॅडम बोलत होत्या,

आबा कदम साहेब वापस आले चहा झाला...

सगळे घरी यायला निघाले, खूप छान झाल इलेक्शन, भांडण नाही की काही प्रॉब्लेम नाही, खूप थकले होते ते, संध्याकाळी घरी आले,

पोलिस स्टेशन हून फोन आला होता, आदित्यला बोलवलं होत तिकडे , आदित्य जाणार होता,.... "सीमा येते का तू? तुला जायच होत ना आई कडे?",.. सीमा आक्का कडे बघत होती

"जावून ये सीमा आई कडे" ,.. आक्का

"अनघा ताई येतेस का चल फिरून येवू",.. आदित्य

"नाही तुम्ही जावून या मी थांबते आई जवळ" ,... अनघा

दोघ निघाले बॉडी गार्ड सोबत होता

"इलेक्शन व्यवस्थित पार पडलं आता कोर्टाच्या  केस कडे लक्ष द्यावे लागेल आदित्य ",..सीमा

" हो आणि आपल्या फिरायला जाण्याकडे पण लक्ष द्यावे लागले",.. आदित्य

"आदित्य काय सारखं सारखं फिरायला जायचं.. फिरायला जायचं चालू आहे तुझ ",.. सीमा

" अरे मग आपल्या रिलेशनला थोडा वेळ द्यायला हवा ना आता ",.. आदित्य सीमा कडे बघत होता

सीमा लाजली होती, नक्की याचा काय विचार आहे,

" सोमवारी रीझल्ट आहे त्या नंतर जाऊ शकतो आपण फिरायला ",.. आदित्य

" अस जमेल का मधेच ",.. सीमा

" एक दोन दिवस इकडे तिकडे चालेल",.. आदित्य

ठीक आहे

" आता फिक्स ठेव तू हे सीमा, आपण दोघ जाणार आहोत, सगळे नाही, नंतर जावू त्यांच्या सोबत फॅमिली ट्रीपला",.. आदित्य

" अरे म्हणजे मी बदलला होतं का आधी प्लॅन ?, तू मला बोलतोस" ,.. सीमा

" अरे मग आपल्या हनीमून च कोणाशी बोलणार मी सीमा? तुझ्याशी ना",.. आदित्य

आदित्य पुरे आता... सीमा हसत होती,..

" सीमा तुला माहिती का मी जेव्हा तुझ्याशी फिरायला जाण्या बाबत बोलतो तेव्हा तू खूप छान लाजते, खूप सुंदर दिसते तेव्हा",... आदित्य

आदित्य मी मारेन ह....

सीमा खर बोलतो आहे मी....

🎭 Series Post

View all