नवी आशा जगण्याची... भाग 59

आदित्य पटकन घराबाहेर पडला, आबा ओरडले आदित्यला धरा तो त्या विक्रम कडे जाईल मारामाऱ्या करायला, विक्रम बदमाश आहे काहीतरी प्लॅन असेल त्याचा


नवी आशा जगण्याची... भाग 59

©️®️शिल्पा सुतार
........

सीमा आदित्य निशा घराकडे निघाले, गाडीत निशा खूप बडबड करत होती, सगळ तिच्या घरच सांगत होती, आदित्य बोलत होता तिच्याशी, सीमा गप्प होती, ते पेट्रोल भरायला आले, आदित्य खाली उतरला

"सीमा काय झालं ग तुला? कोणी काही बोललं का तुला? की आदित्य समोर तुझी बोलती बंद होते की काय",.. निशा हसत होती

"गप्प बस ग निशा, मी विचार करते आहे, अग मला कोणी तरी शाळेत फोन केला होता आज ",.. सीमा

केव्हा?..

"थोड्या वेळा पूर्वी",.. सीमा

"कोण पण? ",.. निशा

" माहिती नाही तोच विचार करते आहे मी कोण असेल ",.. सीमा

" विक्रम तर नसेल ना ",.. निशा

" हो तोच असेल, कारण इतर सगळ्यांकडे माझा मोबाईल नंबर आहे",.. सीमा

"तू कर त्याच काही तरी ",.. निशा

" हो, आता घरी ही समजल आता विक्रम बद्दल ",.. सीमा

" कोणी सांगितल",.. निशा

आदित्य ने..

बर झाल,..

आदित्य आत आला, निशा सीमा गप्प बसल्या, ते घरी आले, निशाच्या घरचे सगळे वाट बघत होते, निशाचे मिस्टर घरी होते

आदित्य सीमा आत येवून बसले,

" काका तुमच्या कडे काय पुरावे आहेत ",.. आदित्य

काकांनी बागेमध्ये एक जुना पेपर बाहेर काढून दाखवला, आदित्यने आधी त्या पेपरचे फोटो घेतले,

"या पेपर मध्ये बातमी आली आहे बघा की ही जमीन तुमची आहे आणि तिथे कोणीतरी भूमिपूजन केले आहे",..काका

आदित्यने नीट फोटो बघितला,.." हो हे तर आबा आहेत, आधी या जागेवर त्यांना फॅक्टरी उभारायची होती, पण त्याची मंजुरी मिळाली नाही म्हणून ती जागा शेतीसाठी वापरली, पण मधे थोडं दुर्लक्ष झाल्यामुळे बाकीच्या लोकांनी त्यावर कब्जा केला, पण ही खूप अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्ही दिली आहे, मी हा पेपर घेऊ शकतो का? ",..

" तुमच्यासाठीच आहे हे पुरावा नीट ठेवा",.. काका

आदित्यने पेपर वरची डेट नीट लिहून घेतली सगळे फोटो आबांना पाठवून दिले, सचिनला पाठवले, सचिनला मेसेज केला वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये फोन करून या तारखेचा पेपर परत मिळेल का ते बघ, आदित्यने पेपर नीट ठेवला

निशाचे मिस्टर छान गप्पा मारत होते, निशाने सीमाला आत बोलवलं

"खूप छान काम झालं आहे आज निशा, आबा खुश होतील आता, तुमच्या लोकांचे मी किती आभार मानू हे समजत नाही" ,.. सीमा

" हो ग, पण आधी काय खाणार ते सांग? ",.. निशा

फक्त चहा कर..

"फराळ कर ग",.. निशाच्या सासुबाई बोलल्या

"सीमा पोहे खातात का जिजु?",.. निशा

"हो पोहे कर छान, मी कांदा कापून देते",.. सीमा

" नको तू बस सासुबाईंशी बोलत मी आणि माझी जाऊ मिळून करतो",.. निशाने छान पोहे केली, बाहेर पोहे नेऊन दिले, आदित्यला पोहे खूप आवडले,

" खूपच छान चव आहे निशा, जरा इकडे ट्यूशन द्या आमच्या मॅडमला",... आदित्य हळूच बोलला

"जिजू काय हे, सीमा खूप छान करते स्वयंपाक, मुद्दाम तिला चिडवू नका ",... निशा

निशाच्या मिस्टरांचा आणि त्यांच्या भावाचा मिळून छोटा कारखाना होता, छोटे छोटे ऑर्डर ते घेत होते, आदित्यने त्यांना ऑफिसमध्ये बोलावून घेतलं,.." उद्या या तुम्ही सचिनला भेटायला, पण बघू तुमच्या कामाचं काहीतरी

" नाही हो साहेब त्यासाठी नाही मदत केली, ज्याची वस्तू आहे ती त्याला मिळालाच पाहिजे",..

" नाही हो तुम्ही हुशार आहात म्हणून काम देतो आहे, सीमा सांगते मला नेहमी तुमच्याबद्दल आणि निशा बद्दल, निशा काय मला परकी नाही, सीमाची बहीणच आहे ती, हक्काने देतो आहे मी काम, या आधी येणार होतो मी तुम्हाला भेटायला पण वेळ मिळाला नाही ",.. आदित्य

" ठीक आहे.. उद्या आम्ही दोघे भाऊ येतो तुमच्या कंपनीत",..

सीमा आदित्य निघाले निशा आणि तिची फॅमिली बाहेरपर्यंत आले होते

" ते पेपर आधी नीट ठेवा",.. काका सांगत होते

"हो काका तुमच्यासारखे चांगले माणसं नेहमी कामाला येतात, आबा येतील तुम्हाला भेटायला नंतर",.. आदित्य

" हो चालेल, घरी गेले की मेसेज करून द्या",.. काका

दोघ निघाले

"काय झालं सीमा बोल आता, गप्प का आहेस इतक्यावेळ",.. आदित्य

"आदित्य त्या काकांनी दिलेला पेपर नीट ठेवला ना",.. सीमा

"हो माझ्या लॅपटॉपची बॅग मध्ये आहे ",. आदित्य

" खूप बर वाटतय आता ",.. सीमा

" हो हा महत्वाचा पुरावा आहे",.. आदित्य

" आज विक्रमने मला शाळेत फोन केला होता",.. सीमा

" ओ माय गॉड आता अति होत चालल आहे, काय म्हटला तो",.. आदित्य

" माहिती नाही रिसेप्शनच्या मॅडम ने दिला नाही माझ्याकडे फोन, तेव्हा तास सुरु होतं",.. सीमा

" एक काम कर उद्या त्या मॅडमला सांग की कोणाचा जरी फोन आला तर तुला द्यायचे नाही, तू फक्त मोबाईल वरचे फोन नाव आलं तर अटेंड कर, काय करू मी सीमा आता या विक्रमच, एकदा त्याला दणका द्यावाच लागेल ",.. आदित्य

" नको आदित्य मारामाऱ्या नको, मला भीती वाटते ",.. सीमा

" अगं पण एकदा जर सोक्षमोक्ष लागला तर तो परत नाव घेणार नाही",.. आदित्य

" नको पण जर काही जास्त लागून गेलं तर ",.. सीमा

" तू नको आता याकडे लक्ष देऊ सीमा मी बघतो आता काय करायचं ते विक्रमचं ",.. आदित्य

ठीक आहे

" दोन दिवस झाले माझ्या पासून दूर दूर आहेस तू",.. आदित्य

" तूच बिझी आहेस",.. सीमा

" मग आज काय प्लॅन आहे ",.. आदित्य

सीमा खूप हसत होती,.. "आज आता तू घरी असल्यासारखं वाटतं आहे आदित्य",..

" खरं सांग सीमा आज काय प्लॅन आहे? ",.. आदित्य

" काहीच नाही रोज सारखा दिवस आहे",.. सीमा हसत होती

" उद्या नाही जाणार आहे मी साखर कारखान्यावर, आपण उद्या दोघं तुझ्यासाठी शॉपिंगला जाऊ",.. आदित्य

" माझ्यासाठी का बरं",.. सीमा

"तुला छान छान ड्रेस घेवू आपल्याला फिरायला जायचं आहे ना, उद्या शाळेत न परस्पर राजाला भेटू खरेदी करून घरी जाऊ, मग परवा इलेक्शन मध्ये बिझी राहू आणि रविवारी आपल्याला फिरायला जायचं आहे ",.. आदित्य

सीमा खूप खुश होती,.. चालेल

" कसा वाटला तुला प्लॅन सीमा? ",.. आदित्य

"खूप छान ",.. सीमा

" मग आज माझा थोडा विचार करणार का? ",. आदित्य

" आदित्य तु हि ना, जस काही खूप त्रासात आहेस तू, आज तरी माझा विचार करणार का म्हणजे काय? ",.. सीमा

" अरे म्हणजे काय तुझ्या पासून दिवस भर दुर राहायच म्हणजे त्रास आहे, त्यात तू कधी हो बोलते तेच बघत राहायच मी, बिचारा दुसर काय करणार ",.. आदित्य

" आदित्य पुरे आता, किती तो साधा, अगदी माझ ऐकतो",.. सीमा

सीमा आदित्य घरी आले, आबा आक्का त्यांची वाट बघत होते

" मिळाला का पुरावा",.. आबा

" काय जबरदस्त काम झाला आहे आपलं हे बघा आबा ",.. आदित्यने पेपर आबांकडे दिला

" हा पेपर नीट ठेवून देतो मी आता, अर्ध काम झालं आहे",.. आबांनी पेपर आक्कां कडे दिले

" सीमा तू बोलली का आशा शी",.. आबा

"हो बोलली, आशा दोन वर्ष झाले तिथे राहायला गेली आहे, त्यांचा परमनंट ॲड्रेस वेगळा आहे",.. सीमा

" ठीक आहे तो पण मॅटर आपण सॉल्व करू तिथे जो कोणी तो गुंड आहे त्याला कॉन्टॅक्ट करू, तो आपल्या बाजूने झाला तर पूर्ण केसच आपल्या ताब्यात येईल",.. आबा

" हो आणि आशा खूप चांगली आहे ती करेल मदत फक्त तुम्ही लोकांनी मदत करा आशा शी बोलायला ",.. सीमा

" हो आदित्य तू मदत कर सीमाला ",.. आबा

सगळ्यांच जेवण झाल, सीमा किचन मधे काम करत होती, आदित्य इकडे ये, आबा ऐकत होते

" काय झालं आई",.. आदित्य

"अरे आज विक्रमचा फोन आला होता घरी तो सगळ्यां बद्दल विचारात होता",.. आक्का

"बघितल कस करतो तो अजिबात घाबरत नाही, त्याने शाळेत फोन केला होता आज सीमाला",.. आदित्य

" बापरे हे अति झाल",.. आबा

"प्लीज सीमा समोर नको बोलायला आपण ",.. आक्का

" हो बरोबर, तिला कसतरी वाटत",.. आदित्य

सीमा आली, सगळे बोलत बसले, चला आता आराम करा

आदित्य सीमा रूम मध्ये आले,

या विक्रमच बघाव लागेल जरा, खूप वैताग आला आहे, उद्या बघतो काय करता येईल ते, नको नाही तर इलेक्शन होवु देवु..... आदित्य त्याच्या विचारात होता

"आदित्य काय विचार करतो आहेस",.. सीमा

"काही नाही",. आदित्य

"इलेक्शनचा का",.. सीमा

हो

"एकदम गप्प झाला आहेस",.. सीमा

"नाही अस काही नाही तुला काय काय हव लिस्ट केली का? ती लाल साडी घे सोबत आणि, फार्म हाऊसवर घातलेली तू काय जबरदस्त दिसत होती त्या दिवशी",.. आदित्य

" काहीही काय आदित्य",.. सीमा लाजली होती तू बघितल होत का माझ्याकडे त्या दिवशी

"नाही नीट नव्हत बघितल नाही तर काही खर नव्हत तुझ",.. आदित्य

आदित्य पुरे... सीमाने तिकडून आदित्य कडे उशी फेकली

" चल इकडे ये आता आराम कर ",.. आदित्य

आबा आक्का रूम मध्ये बसले होते,.." या विक्रमच काहीतरी कराव लागेल, आपल्या सीमा कडे वाकडी नजर ठेवतो म्हणजे काय? मी उद्या इंस्पेक्टर साहेबांना फोन करणार आहे",..

"मलाही खूप काळजी वाटते सीमाची असा काय हा विक्रम?",.. आक्का

" मी असा ठीक करतो त्या विक्रम ला, तू काळजी करू नकोस, आमच्याशी ठेव ना म्हणा वैर, पोरींच्या मागे का लागतो ",.. आबा

विक्रम टेरेस वरून आबांच्या घरा कडे बघत होता, सीमा शी बोलणार मी काहीही झाल तरी, मला माझ आणि सीमाच नाव सोबत जोडल गेल पाहिजे, सीमाची बदनामी व्हायला हवी, आदित्यने सीमाला घरातून बाहेर काढल पाहिजे, मग मी सीमाला सांभाळेल, तिच्या शी लग्न करणार नाही, पूजा शी लग्न करेन, मामाची ईस्टेट जास्त आहे आणि आदित्यच लग्न मामाच्या मुलीशी करून देईन, बघतो जरा, सीमाचा फोन नंबर मिळालाय हवा शाळेत असेल रजिस्टर मध्ये तिचा नंबर

सीमा सकाळी आवरत होती, मावशी स्वयंपाक करत होत्या, आबा आक्का फिरायला गेले होते, आजी नुकत्याच त्यांच्या रूम मध्ये गेल्या होत्या, आदित्यला उठवून सीमा खाली आली होती, ती नाश्ता तयार करत होती, एका बाजूला चहा ठेवला होता

विक्रमने बघितल आबा आक्का बाहेर फिरायला गेले, हीच संधी आहे, जरा आत जावून येतो, मुद्दाम सीमाला भेटायला, सीमा बदनाम व्हायला हवी,

तो गुपचूप घरात शिरला, हॉल मध्ये कोणी नव्हत, नंतर तो किचन कडे आला, सीमा एकटीच किचनमध्ये काहीतरी करत होती, स्वयंपाक करणार्‍या मावशी दिसत नव्हत्या, बर झाल चला,

अगदीच पाच ते दहा मिनिट आहेत माझ्याकडे त्यानंतर आबा आक्का येतील, सीमा किती छान दिसते आहे किचन मधे काम करतांना, आंघोळ नुकतीच झाली वाटत, एकदम फ्रेश दिसते आहे ही

सीमाच लक्ष नव्हतं, ती विचार करत होती आता शाळेत मुलांना काय शिकवायचं आहे, परत एक आठवडा सुट्टी होईल

विक्रम येऊन किचनच्या दारात उभा राहिला, सीमाने त्याच्याकडे बघितलं, ती दचकली,.. "काय करत आहात तुम्ही इथे? " ,

तिने आजूबाजूला बघितलं आबा आक्का दिसत आहेत का?

"गुड मॉर्निंग सीमा, सकाळी सकाळी खूप सुंदर दिसतेस तू , आणि कोणी नाही घरात आपण दोघ आहोत इथे",.. विक्रम

"काय करत आहात तुम्ही इथे?",.. सीमा

"तुला भेटायला आलो आहे" ,.. विक्रम

मावशी मावशी सीमा ओरडत होती, मोबाईल कुठे आहे माझा? वरतीच राहिला वाटत, तो चार्जिंगला लावला होता

विक्रम पुढे आला, त्याने सीमाला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, किती दिवस तुला अस लांबून बघणार आहे मी सीमा, चल इकडे ये, कश्याला एवढ घाबरते, कोणाला समजणार नाही, मी लगेच जाणार आहे वापस, अस नेहमी येईल तुला भेटायला

" हे बघ तु घरी जा विक्रम, नाहीतर मी काहीतरी करेल",..सीमा

" काय करशील सीमा, मी खूप उत्सुक आहे",.. विक्रम

सीमाचा आवाज ऐकून आजी बाहेर आल्या, स्वयंपाक वाल्या मावशी आल्या, गॅस जवळ सीमा उभी होती आणि विक्रम तिच्या अगदी जवळ उभा होता, एका हाताने त्याने सीमाचा हात धरला होता,

मावशी आल्या तसा विक्रम घाबरला, मावशी तुम्ही बाहेर जाऊन आदित्यला बोलवा पटकन

आजींनी बघितलं काहीतरी गडबड आहे, तेवढ्यात बाहेरून आबा आक्का आले , आजी घाबरलेल्या होत्या

"काय झालं आहे आई",. आक्का

"किचन मध्ये सीमा ओरडते आहे काहीतरी झालं आहे",.. आजी

आबा आक्का किचनकडे पळाले, विक्रम जवळ उभा होता त्याने सिमाचा हात धरलेला होता, सीमा त्याच्याशी भांडत होती,

आबांना बघून विक्रम दचकला, त्याने पळायचा प्रयत्न केला, आबा त्याला जाऊ देत नव्हते, आबांना विक्रमला तिथे पकडायच होत, त्याने आबांना ढकललं, आबा खाली पडले, नशीब त्यांना काही लागलं नाही पण खूप घाबरले होते आबा, आक्का घाबरून गेल्या होत्या, त्या रडत होत्या, तोपर्यंत मावशींनी आदित्यला बोलवलं

आदित्य खाली आला खूपच गोंधळ सुरू होता खाली, आबा सोफ्यावर झोपलेले होते, सीमा पाणी घेऊन आली, आक्का रडत होत्या, सीमा रडत होती काय झालं आहे सीमा?... आजी?.. कुणी सांगेल का काही?

"विक्रम आला होता आत मध्ये आता त्याने आबांना ढकललं, माझा हात पकडला होता ",.. सीमा

आदित्य सीमा जवळ आला,.. तू ठीक आहेस ना?

हो..

काळजी करू नकोस

तो प्रचंड चिडलेला होता,..." सीमा पटकन डॉक्टरांना फोन कर मी आलोच पाच मिनिटात ",.

" कुठे चालला आहे आदित्य?.... आदित्य थांब",.. आबा उठून बसले, त्यांना समजतच नव्हतं काय करावं

आदित्य पटकन घराबाहेर पडला, आबा ओरडले आदित्यला धरा तो त्या विक्रम कडे जाईल मारामाऱ्या करायला, विक्रम बदमाश आहे काहीतरी प्लॅन असेल त्याचा

आक्का घाबरून गेल्या होत्या,

" सीमा माझा फोन आणि पटकन ",.. आबा

सीमाने रूम मध्ये पळत जाऊन आबांचा फोन आणला, आबांनी बॉडीगार्डला फोन केला... "लवकर ये घरी, कुठे आहे तू?",

" मी दहा मिनिटात येतो आहे ",..

" आदित्य विक्रमच्या घरी गेला आहे भांडण करायला तिकडे जा परस्पर",.. आबा

आबांनी इन्स्पेक्टर साहेबांना फोन केला,.. "लवकर या इकडे दोन-तीन लोक घेऊन येथे प्रॉब्लेम झाला आहे, अजिबात वेळ घालवू नका",..

सीमाने पटकन डॉक्टरांना फोन केला डॉक्टर येतच होते

आबा घरात थांबले नाही ते विक्रमच्या घराकडे निघाले, सीमा त्यांच्यामागे होती,.. "आबा थांबा, तुम्ही नका जावू, आता डॉक्टर येतील ",

" सीमा तू घरी जा, मला बघाव लागेल आदित्य कुठे आहे ",.. आबा

"आबा मी तुमच्यासोबत येते ",.. सीमा आणि आबा विक्रमच्या घरी गेले, त्यांच्या घरी आदित्य नव्हता, विक्रम नव्हता, कुठे गेले आहेत हे दोघं, आता सीमा रडकुंडीला आली होती, तेवढ्यात बॉडीगार्ड आला,

आदित्य दिसत नाही आहे आधी त्या पटकन शोधा त्याला,
आबा सीमा बॉडी गार्ड शेता कडे पळाले...

🎭 Series Post

View all