©️®️शिल्पा सुतार
........
........
सकाळी नाश्त्याला सगळे हजर होते, सीमा आदित्य कडे बघत होती
"आबा आक्का मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे",.. आदित्य
"काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का?, चेहरे असे काय झाले तुमच्या दोघांचे ",.. आक्का
"हो विक्रम बद्दल बोलायचं होत, तो आम्हाला त्रास द्यायची एक ही संधी सोडत नाही, आता तर तो सीमाच्या मागे लागला आहे ",.. आदित्य
आबा आक्का आश्चर्याने बघत होते, सीमा बाजुला उभी होती
" सीमा काय झालं मोकळ सांग ",.. आबा
सीमा गप्प होती, आक्का सीमा जवळ गेल्या,.." काय झालं सीमा? विक्रम काही बोलला का तुला?",.
" आई आबा मला काही समजत नाही तो विक्रम का अस करतो? अचानक तो माझ्या मागे मागे यायला लागला, मला नाही आवडत हे अस ",... सीमा
" काही बोलला का तुला तो",.. आक्का
"विशेष नाही पण विचित्र पद्धतीने बघतो तो",.. सीमा
"काय हे अस? मी बोलू का त्याच्याशी? ",.. आबा चिडले होते, आदित्य चल आपण जावू त्यांच्या कडे
"नको आबा आता आपल्या कडे पुरावा हवा, मी केली त्याची पोलिस कंप्लेंट, तुम्ही कोणीही माझी किवा सीमाची माहिती कोणाला देवू नका, की कुठे गेली सीमा मी ऑफिस मध्ये आहे की नाही , कोणाला काही सांगू नका, शाळेत गेली तर मुद्दाम घरी आहे किवा दुसरी कडे गेली अस सांगा ",.. आदित्य
"हो मला विचारत होता परवा विक्रम, की घरी कोण कोण आहे ",.. आजी
" हो तेच तो सध्या अस करतो आहे ",.. आदित्य
" पण पुढे काय? हे अस चांगल नाही ना? ",.. आक्का
" हो मी करतो काहीतरी ",.. आदित्य
सीमा गप्प होती
" सीमा माफ कर आम्हाला तुला या घरात सुरक्षित नाही वाटत ",.. आबा
" आबा अस नका बोलू ",.. सीमा उठून आबा आक्का जवळ जावून बसली
" सीमा आपण करू त्याच काही तरी, बॉडी गार्ड आहे ना सोबत",.. आदित्य
" हो आणि काय कर सीमा एखाद्या वेळी विक्रम रस्त्यात दिसला आणि बोलत असला की बॉडी गार्डला त्याला मारायला लाव जरा एकदा",... आबा
" हो मुद्दाम अस करायला हव एकदा",.. आदित्य
"माझ्या कडून नाही होणार हे, मला भिती वाटते, मला नाही आवडत तो विक्रम, मी लांब थांबेन त्याच्या पासून ",... सीमा
" तुला हिम्मत करावी लागेल सीमा तो तुला एकट्याला गाठून त्रास देतो तुला उत्तर द्याव लागेल त्याला ",.. आदित्य
"त्या विक्रम ला आपण कुठे जातो ते समजू द्यायच नाही",..आबा
" पण का करतो तो विक्रम अस त्याच लग्न जमल ना ",... आक्का
" मुद्दाम त्रास देतो तो आपण त्याचे घोटाळा बाहेर काढले ना ",.. आदित्य
" मग तुला त्रास द्यायचा ना आदित्य, सीमाला का? ",.. आक्का
" कारण सीमाला त्रास दिला म्हणजे मला जास्त त्रास होईल, मी एकटा पुरून उरेल त्याला, सीमा तुला हिम्मत करावी लागेल, तू अशी गप्प राहू नको तुझा दोष नाही यात",... आदित्य
हो..
" सीमा वेळ आली तर कानामागे दे त्याच्या",.. आबा
" हो तेच बोललो मी आबा हिला, पोलिस कंप्लेंट ही केली त्या विक्रमची",.. आदित्य
" सीमा काळजी करू नकोस",.. आबा
सीमा आत गेली तिने तिचा डबा भरला, आदित्य आत आला,.." लवकर ये आदित्य घरी, मी निघते आता",
" हो नीट जा",.. आदित्य सीमा कडे बघत होता
सीमा शाळेत गेली..
आबा आदित्य निघाले, आक्का काळजीत होत्या
" आई आजी विक्रम भेटला तर नॉर्मल बोला त्याच्याशी, आपल्याला काही माहिती आहे असं समजता कामा नये त्याला",.. आदित्य
हो
सीमा शाळेत आली, आशा तिची वाट बघत होती स्टाफ रूम मध्ये,.." सीमा काय झालं बोल? ",..
"एवढ काय टेंशन घेतल तू आशा, मी सहज बोलली होती तुला, बस बर आधी शांत ",.. सीमा
आशा बसली ती सीमा कडे बघत होती
" अग तु कुठे राहतेस आशा ",.. सीमा
" आम्ही डोंगराच्या पायथ्याशी, का ग",.. आशा
"रजिस्टर मध्ये तुझा पत्ता वेगळा आहे",. सीमा
"हो तो पर्मनंट अॅड्रेस आहे ",..आशा
" इकडे कधी रहायला आले तुम्ही",.. सीमा
"दोन वर्ष झाले, का ग सीमा काही प्रॉब्लेम आहे का? ",.. आशा
"नाही बोलेन नंतर मी तुझ्याशी ",.. सीमा
" सांग नीट सीमा ",.. आशा
" विशेष नाही काही दोन वेगळे अॅड्रेस दिसले म्हणून विचारल, कोण आहे तुमच्या घरी ",.. सीमा
" मी आई बाबा भाऊ",.. आशा
" लग्न नाही झाल का तुझ? ",.. सीमा
"नाही अजून ",.. आशा
" मी येईन तुझ्या कडे एकदा चालेल का? ",.. सीमा
"हो ये ना केव्हा ही ये ",.. आशा
निशा आली आशा गेली
" काय झाल सीमा का बोलत होती हिच्याशी, काही प्रॉब्लेम ",.. निशा
" अग इकडे ये, हळू बोल जरा लाऊड स्पीकर, ते कोर्ट केस त्या साठी, आशा तिथे रहाते त्या आमच्या जमिनीवर",.. सीमा
"ह बर झाल आठवल मी विसरून जात होती अग माझ्या सासरे त्यांना माहिती आहे त्या तुमच्या जमिनी बाबत काहीतरी ",.. निशा
काय?
" त्यांच्या कडे न्यूज पेपर मध्ये काही तरी बातमी आहे ",.. निशा
" अरे वा यांनी खूप मदत होईल आपल्याला",.. सीमा
" तुम्ही याल का आमच्या कडे आज संध्याकाळी",..निशा
" हो मी कळवते तस आदित्यला तो लवकर आला तिकडून त्या गावातून तर आज येवू नाही तर उद्या ",. सीमा
ठीक आहे
निशा क्लास मध्ये गेली, सीमाने आदित्यला फोन लावला, आदित्य आबा गावात पोचतच होते,
" काय झालं आहे सीमा काही प्रॉब्लेम आहे का? ",.. आदित्य
" आदित्य मला तुझ्याशी फार महत्वाचे विषयावर बोलायचं हे जमिनीबाबत",.. सीमा
" ठीक आहे मी दहा मिनिटात करतो फोन मी, इथे रेंज नाही खाली उतरल्यावर करतो",.. आदित्य
जरा वेळाने आदित्य ने फोन केला,.. "काय झालं आहे सीमा"
" निशा सांगते आहे की तिचे सासरे आहेत ना त्यांच्या कडे काहीतरी पुरावा आहे आपल्या जमिनी बाबत, ती आपल्याला विचारते आहे ते तुम्ही आमच्या घरी याल का आज संध्याकाळी, तर मी तिला हो सांगितलं आहे, जरा तुझं गावातलं काम लवकर झालं तर मला शाळेजवळ घ्यायला ये म्हणजे मला पण परस्पर निशाच्या घरी जाऊ",.. सीमा
" ठीक आहे मी सांगतो तुला जर आज नाही जमलं तर आपण उद्या जाऊ द्या यांच्या घरी ठीक आहे ",.. आदित्य
"पण याने खूप मदत होणार आहे आता आपल्या केस मध्ये",. सीमा
हो..
आदित्यने आबांना सीमा काय म्हणत होती ते सांगितलं, आबांना खूप आनंद झाला ,
" त्यांच्याकडे काय आहेत पुरावा",.
"ते माहिती नाही मला जाऊनच बघावे लागेल",.. आदित्य
" ठीक आहे मग आज लवकर साडेचारला आपण निघू, असं भरपूर काम झालं आहे आणि तू आज त्यांच्या कडे जाऊन ये कारण आपण केस च काम लवकर करायला पाहिजे आणि आहे तो पुरावा आपण हातात घेऊन घेऊ",.. आबा
......
......
विक्रम प्रशांत केबिनमध्ये बसलेले होते,.. "झाली का प्रशांत तुझी पैशाची व्यवस्था",..
"नाही अजून",.. प्रशांत
"मी देऊ का तुला पैसे",.. विक्रम
"नको विक्रम तू तुझे पैसे भर मी माझं बघून घेईन, मी कर्ज घेणार आहे परत, एक दोन कंपन्यांचे पेमेंट ही मला येणार आहे तेव्हा ते कर्ज फेडून टाकीन",.. प्रशांत
"एक काम कर प्रशांत तू सीमाला फोन करायला मला मदत करशील का? आणि तिला भेटायला बोलव, मी जर सीमाला फोन केला तर ती लगेच आदित्यला सांगते मला बोलायच आहे सीमाशी तीची मदत होऊ शकते ",.. विक्रम
" आहे का फोन नंबर तुझ्या कडे तिचा? , काहीही नको सांगू विक्रम, एक सांगू का प्रामाणिकपणे काम कर ना, कशाला तुझ्या वहिनीला त्रास देतो देतोस, मी फोन करणार नाही सीमाला, मी त्याच्या विरोधात आहे, पहिली गोष्ट दुसऱ्या लग्न झालेल्या बाईकडे बघायलाच नाही पाहिजे तू, तुझं हि लग्न ठरल आहे, कस वागायचं हे काय मी सांगायचं का तुला आता विक्रम, समजत नाही का तुला ",... प्रशांत
"प्रशांत तू एवढं टेन्शन घेऊ नको ",.. विक्रम
" अस काय करतोस पण विक्रम तू? सीमा वहिनीला त्रास का देतो, ती नाही ना तयार तुझ्याशी बोलायला, ती तिच्या घराशी नवऱ्याशी प्रामाणिक आहे, कशाला मागे लागतो ",.. प्रशांत
" या लोकांनी आम्हाला पूर्वीपासून खूप त्रास दिला आहे प्रशांत तुला नाही माहिती ",.. विक्रम
"तेव्हा सीमा होती का? आता का त्रास देतोस तिला तू, फक्त तिचा नवरा आदित्य आहे म्हणून तू तिच्या मागे लागला आहेस, तिचं सौंदर्य तुला दिसत आहे, या जागी तुझ्या मामाची मुलगी असती तर काय केलं असतं तू? तुला वाटलं असतं ना की ती सुखी व्हावी नवऱ्यासोबत, काय करतो आहेस विक्रम? विचार कर थोडा वागतांना, तुला राग आहे ना आदित्यचा, त्याच्याशी भांड ना मग तू, लेडीज लोकांना कशाला मध्ये घेतो, साधी आहे ती वहिनी, तुझ्या घरच्यांना किंवा आबा आक्कांना समजलं तर उगीच इज्जत जायचे काम आणि मी तुझ्या सोबत नाही आहे या कामात, दुसऱ्याला असा त्रास द्यायचा माझा विरोध आहे, प्रामाणिकपणे काम कर, उशिरा का होईना मिळेल यश",.... प्रशांत निघून गेला
विक्रम विचार करत होता या पुढे प्रशांतला काही सांगण्यात अर्थ नाही, आता जे काही करायच ते मला कराव लागेल, सीमाला प्रत्यक्षात भेटण्या पेक्षा फोन करायला पाहिजे, तिचा फोन नंबर कुठे मिळेल घरी विचारू का आक्कांना त्या देतील का? पण कस विचारणार, कारण काय सांगायच.. विक्रमने आक्कांना फोन लावला,
विक्रम चा फोन बघून आक्कांच्या कपाळावर आठ्या होत्या, आता काय काम आहे याला, किती खराब आहे हा
,... बोल विक्रम
,... बोल विक्रम
"आक्का तुम्ही म्हणत होत्या ना की आबांना मदत करा जरा इलेक्शन साठी, कुठे आहेत आबा, मला आहे आज जरा वेळ ",.. विक्रम
"अरे काही गरज नाही आता, आबा बाहेर गेले आहेत",.. आक्का
"आदित्य ऑफिसला गेला आहे का?",.. विक्रम
हो..
"काही काम असेल तर तू जावून भेट त्याला" ,.. आक्कांनी मुद्दाम माहिती दिली नाही की आदित्य नाहिये गावत
कस विचारू सीमा बद्दल? काहीही समजल नाही, जावू दे उगीच त्या आक्कांनी आदित्यला सांगितल तर, तो इथे आहे ऑफिस मध्ये, जावू दे, जावून बघु का शाळेत, की शाळेत फोन करू का, येईल का ती सीमा फोन वर?
पूजा चा फोन येत होता
काय आहे आता हीच रोज रोज? वैताग नुसता.. गोड बोला रोज, काहीही काम करत असल की ही डिस्टर्ब करते,.. "बोल पूजा",.
"झाल का जेवण विक्रम",.. पूजा
"मी कामात आहे पूजा, नाही आता बसेन",.. विक्रम
"तू काळजी घेत जा तुझी",.. पूजा
"हो मॅडम तू जस म्हणशील तस",.. विक्रम
"घरी कसे आहेत सगळे?",.. पूजा
ठीक आहेत..
"सीमा ताई, आदित्य, आबा आक्का ठीक आहेत का?\",..पूजा
" हो ठीक असतिल, मला काय माहिती त्यांच्या बद्दल, तू एक काम कर तू फोन करून बघ सीमाला मी थोडा बिझी आहे",.. विक्रम
" माझ्या कडे नंबर नाही सीमा ताईचा",.. पूजा
"घरून घे मग नंबर ",.. विक्रम
ठीक आहे..
आता मिळेल सीमाचा नंबर, विक्रम खुश होता
जरा वेळाने पूजाचा फोन आला,.." आक्कांनी नाही दिला सीमा ताईचा नंबर, त्या बोलल्या सीमा करेन मला संध्याकाळी फोन घरून",..
ठीक आहे.. जास्त हुशार दिसताय हे लोक
विक्रमने शाळेत फोन केला ऑफिस मध्ये,.. सीमा मॅडम आहेत़ का
"कोण बोलतय?",..
"मी त्यांच्या घरून बोलतोय",.. विक्रम
"तुम्ही तुमचा नंबर द्या मी सांगते मॅडमला फोन करायला",..
" आता नाहीत का सीमा शाळेत ",.. विक्रम
" तास सुरू आहे ना साहेब",..
"ठीक आहे मी करतो नंतर फोन",.. विक्रम
"ठीक आहे आपल काय नाव कोण बोलतय",..
विक्रम ने फोन ठेवून दिला..
संध्याकाळी आदित्य लवकर निघाला, तो सीमाला शाळेत घ्यायला गेला, सीमा बाहेर येत होती
" सीमा एक मिनिट आज तुझा फोन आला होता इथे शाळेत ",..
" कोणाचा होता फोन? " ... सीमा
" माहिती नाही घरून बोलता आहेत अस सांगितल ",..
" कोण?.. नाव काय?",.. सीमा
ते सांगितल नाही
"अस कस पण शाळेत फोन केला माझा मोबाईल नंबर सगळ्यांकडे आहे",.. सीमा
माहिती नाही
ठीक आहे, सीमा तिच्या विचारात होती, कोण असेल फोन वर विक्रम तर नसेल ना, बापरे हे काय आता नवीन, आदित्य बाहेर उभा होता
" काय झालं सीमा कसल टेंशन आता?",.. आदित्य
"काही नाही सांगते नंतर",.. तेवढ्यात निशा आली
" निशा आम्ही तुझ्या कडे येतो, घरी विचार काका आहेत का घरी?",... आदित्य
निशाने फोन केला तिचे सासरे होते घरी, चला जावू या,