नवी आशा जगण्याची... भाग 49

एक मिनिट सीमा मला बोलायच आहे तुझ्याशी, तू छान मोकळी रहा माझ्या सोबत, अजिबात टेंशन घेवू नकोस, लग्न आपल्या दोघांच आहे,नवी आशा जगण्याची... भाग 49

©️®️शिल्पा सुतार
........

सीमा वरती आली, आदित्य कपाटात कपडे शोधत होता, सीमा येवून काॅटवर बसली,

"आता आली वाटत आठवण नवऱ्याची? ",.. आदित्य

" नवर्‍याला नाही राहायच बायको सोबत तर आम्ही काय करणार",.. सीमा

"काय झालं आता?... बोल बाई बोल",.. आदित्य

"कशाला आता ",.. सीमा

"काय झालं आता?.. ते काल मी तुझा हात सोडवुन घेतला ते ना ",.. आदित्य

"माहिती तर आहे सपोर्ट करत नाही तू मला ",.. सीमा

" मी अ‍ॅक्च्युअली घाबरून गेलो होतो तू अस माझा हात धरला सगळ्यां समोर ",.. आदित्य

" काहीही, काय हे बोलणं? , एवढा साधा आहेस का तू? ",.. सीमा

" मग तू काही केल असत मला म्हणजे अंधारात? ",.. आदित्य

" काहीही, मी काय करणार तुला, आता स्वतः अस वागला ते नाही लक्ष्यात येत तुझ्या, मुद्दामून आता अस बोलतो आहेस ",... सीमा

" एवढच ना... त्यात काय सीमा? चिडू नकोस ग, चल ये इकडे आता धरतो तुझा हात ",.. आदित्य

" आता काय उपयोग ",.. सीमा

आदित्यने पुढे होवुन सीमाचा हात धरला

" आदित्य हात सोड, तू तुझी तयारी कर, खाली ये सोड ना हात",.. सीमा

आदित्यने तिला जवळ ओढल,.." तुला हव होत ना मी हात धरायला, आता काय प्रॉब्लेम आहे, आणि सकाळपासून कुठे आहेस तू, नवर्‍याला काय हव नको कोणी बघायच",

" तुझी इच्छा आहे ना की मी खाली जाऊन सगळं काम करावं म्हणून लवकर उठली होती मी, आता तुला काय प्रोब्लेम आहे ",.. सीमा

"मग चहा नाष्टा तू बनवला होता का? ",.. आदित्य

" नाही तो आधीच तयार होता, मी आबा आक्कांशी छान बोलत होती, आदित्य उशीर नाही का होत आता, हात सोड ",... सीमा

"नाही पाहिले बोल तुझा राग गेला का ",... आदित्य

" ठीक आहे गेला, पण माझी एक अट आहे ",.. सीमा

" काय आता ",.. आदित्य

" तू खाली माझ्या कडे लक्ष देणार ",.. सीमा

" ठीक आहे, चल आता मिठीत ये माझ्या, माझा दिवस चांगला जाईल मग",... आदित्य

सीमा हसत होती

ये हुई ना बात, आदित्य आवरत होता,

" माझा पांढरा शर्ट कुठे आहे सीमा? ",.. आदित्य

" मला कसं माहिती असणार? मी कालच आली आहे नाही का इथे रहायला ",.. सीमा

" पण तू सगळी रूम उलथापालथ केली आहे, नेहमी इस्त्री केलेले कपडे काॅट वरच असतात मी आल्यावर कपाटात ठेवतो" ,... आदित्य

"काल असे कुठलेच कपडे नव्हते इथे, आणि मी रूम खराब केली अस कालपासून काय बोलतो आहेस तू? , उगीच माझं नाव घेतो आहेस ",.. सीमा

शर्ट सापडला

" काल तू झोपून घेतलं लवकर ",... आदित्य

" मग काय करणार मी?, तू केव्हा आलास रात्री वरती ",.. सीमा

" लगेच आलो ",.. आदित्य

" खोटं बोलू नको मी चांगली बारा वाजेपर्यंत जागी होती",..सीमा

" का बर? माझी वाट बघत होती का?, काय काम होत? ",.. आदित्य

" नाही तस नाही",.. सीमा

" बोल ना सीमा, का वाट बघत होतीस ",.. आदित्य

" काही नाही म्हटलं ना, मी उगीच तेच तेच विचारतोस तू ",.. सीमा

आदित्य आवरुन रेडी होता, कमालीचा हॅन्डसम दिसत होता तो, व्हाइट शर्ट काय दिसतो याला, सीमा त्याच्या कडे बघत होती, आदित्यने आरशातुन बघितल

" चल मी जावून येतो ऑफिसला ",..आदित्य

Ok गुड डे...

आदित्य सीमा जवळ आला, सीमा गडबडली जरा, ती खाली जात होती, आदित्य ने तिला अडवल,

" आदित्य.. , मला खाली जाऊ दे" ,... सीमा

"आता का तुला हव आहे ना मी तुझ्या सोबत रहायला , कसा दिसतो आहे मी?, चल ये इकडे",..आदित्य 

"नाही तस नाही, खाली काम आहेत ",... सीमा

"काय झालं, बोल, माझ्या जवळ ये, ",.. आदित्य

"नको तुझा शर्ट खराब होईल",.. सीमा

होवू दे..

आदित्यने सीमाला जवळ ओढल, तिला किस केल, त्याच्या फोन वाजत होता, फोन वर बोलत तो ऑफिसला निघून गेला,

सीमा कॉटवर बसली, तिचे हात गार पडले होते, बापरे आदित्य एवढ्या जवळ, हा आदित्य मला काही सुचू देत नाही,

सीमा रूम आवरत होती, काही सुचत नव्हत तिला जावू दे राहू दे पसारा

आदित्य ऑफिस मध्ये आला त्याच्याबरोबर शरद ही होते, कुठलातरी एक नवीन प्रोजेक्ट सोबत सुरू करायचा होता त्यांना, त्याबद्दल ते पूर्णवेळ बोलत होते, सचिन येऊन भेटून गेला,

राजा केबिनमध्ये आला, खरं तर त्याला आज आदित्यशी बोलायच होत, प्रशांत भेटून गेला ते सांगायचं होतं, पण शरद तिथे होते त्यामुळे राजा काही बोलला नाही, बराच वेळ शरद राजाशी बोलत होते, जरा वेळाने राजा सचिनच्या त्याच्या केबिनमध्ये चालला गेला

" बोल राजा ",.. सचिन

"काल रात्री मला विक्रमचा मित्र भेटला होता",.. राजा

"मग तू म्हटलं का त्यांना मी भेटायला येतो",.. सचिन

"नाही माझी हिम्मत झाली नाही",.. राजा

"काय झालं राजा? ",.. सचिन

"मी त्यांना सांगितलं की तुम्ही पवार साहेबांना कॉन्टॅक्ट करा",.. राजा

"ठीक आहे",.. सचिन

" जर पवार साहेब तयार असतील तर मी पण मदत करायला तयार आहे असं मी त्यांना सांगितलं",.. राजा

" ठीक आहे काही हरकत नाही मी सांगतो नंतर आदित्यला",.. सचिन

तेवढ्यात पवार साहेब आत आले, राजा तिथे होता, सचिन त्यांना काल काय झालं ते सांग सांगत होता, राजाने तुमच नाव पुढे केल आहे,

"ठीक आहे नाहीतरी राजाचं बरोबर आहे डिसिजन मेकर जर मी आहे तर तो कस काय त्या लोकांना भेटू शकतो असं त्याला वाटलं सहाजिकच आहे, ते मुलं जर मला येऊन भेटले तर मी त्यांना सांगतो की मी तुम्हाला मदत करायला तयार आहे",.... पवार साहेब

"आदित्य आज बिझी आहे नंतर सांगतो मी त्याला",... सचिन

" ठीक आहे आणि तो स्क्रॅप रिपोर्ट पण तयार आहे खूप घोटाळा केला आहे या मुलांनी",.. पवार साहेब

" त्यासाठीच तर गडबड सुरू आहे ना त्यांची, आज बोलता नाही येणार आदित्यशी, मी सोमवारी सांगतो त्याला सगळं, वकील बोलवून घ्यावे लागतील सोमवारी, लगेच काम सुरू करू",... सचिन

सीमा रूममध्ये बसलेली होती, तिला काही सुचत नव्हतं, सारखा आदित्यचा चेहरा डोळ्यासमोर येत होता, तिची हृदयाची धडधड वाढली होती, मला नक्की काय हव आहे ते समजत नाही? आदित्य जवळ नसला की राग येतो, तो रूम मध्ये आला की धडधड होते, बापरे,.. काय करू नक्की? जास्त विचार नाही करायला पाहिजे, खाली जाऊन बघू का? पण खाली काही काम नसतं, नुसतं बोलत बसायचं सगळ्यांशी, सीमा खाली आली खाली, फक्त आजी होत्या पुढे बसलेल्या,

आई कुठे गेल्या आहेत

" त्या दोघी अनघाच्या रूम मध्ये आहेत चल आपणही जाऊया",... आजी

दोघी गेल्या तिकडे अनघा बॅग भरत होती, सुमित खेळत होता, अक्का तिला मदत करत होत्या, सीमाने मदत केली, अनघा सीमा छान बोलत बसल्या

दुपारी आदित्य शरद घरी यायला निघाले, रस्त्यात एका प्लॉटवर गेले, नंतर शाळे मागच्या प्लॉटवर गेले,

" मोठी जमीन आहे ही अजिबात ताबा सोडू नका",.. शरद

" हो ते तर आहेच, काही तरी कराव लागेल",... आदित्य

दोघं घरी आले सीमा समोरच बसली होती आजींसोबत आदित्य तिच्याकडे बघत होता, त्याच्याकडे बघायची हिम्मत झाली नाही तिने उठून त्या दोघांना पाणी दिलं

"मी आवरून येतो",... शरद आत मध्ये गेले

आदित्य रूम मध्ये गेला, यावेळी सीमा सोबत गेली नाही, ती जेवणाची तयारी करत होती, तिने ताट करायला घेतले, तोपर्यंत हे दोघं आवरून आले, सगळे जेवायला बसले आबा चौकशी करत होते

"काय ठरवलं तुम्ही दोघांनी कामाचं\",.. आबा

शरद जिजू खूप बोलत होते, काय ठरतंय ते सांगत होते,

आदित्य सीमा जवळ बसला होता जेवायला, आदित्यच सगळं लक्ष सीमा कडे होतं, दोन तीन दा त्याने तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला, सीमाने काही उत्तर दिल नाही,

" सीमा आदित्यला भाजी वाढ",... आक्का

सीमाने भाजी वाढली, भाजी ताटात जरा जास्तच पडली,

"खुपच प्रेम दिसत आहे आदित्य वर, केवढी भाजी वाढली",... शरद

सगळे हसत होते, सीमा गडबडली

"कोणीच हसू नका सीमाला, हुशार मुलगी आहे ती",.. आबांनी बाजू घेतली

सीमा आबा आक्कां कडे प्रेमाने बघत होती

जेवण झालं सगळे बोलत बसले,

आज आपण संध्याकाळी छान अंताक्षरीचा कार्यक्रम करू आणि मस्त बाहेर वनभोजन सारखं जेवण घेऊ

\"पण बाहेर जेवायला बसलो म्हणजे काका-काकूंना बोलवावे लागेल कारण त्यांना दिसेल आपला प्रोग्राम ",... आदित्य

"बोलवून घ्या त्यांना",.. आबांनी सांगितलं मग आता इलाजच नव्हता

"जेवायला काय करू या\",.. आक्का

" छान पैकी पावभाजी करा आणि गोड साठी जिलेबी घेऊन येऊ इथली जिलेबी प्रसिद्ध आहे ",.. आदित्य

" चला जरा वेळ आराम करा ",.. आबा

आदित्य सीमा रूम मध्ये आले, आदित्य जाऊन कॉटवर बसला, सीमा मुद्दाम काहीतरी आवरते आहे असं दाखवत होती,

" तुझं काम संपलं असेल तर इकडे ये सीमा, काय झालं आहे? तुझी जरा गडबड उडते आहे",.. आदित्य

सीमा आदित्य जवळ बसली,.... काही नाही

" सकाळी मुळे तू एवढी घाबरलेली आहेस का? ",.. आदित्य

"हो मला समजत नाही आदित्य, मी काय करू?",.. सीमा

"एवढं घाबरून जाण्यासारखे काही नाही त्यात, मोकळ रहा माझ्यासोबत",.. आदित्य

" माझी तिची इच्छा आहे, पण मला काही सुचत नाही ",.. सीमा

" ये चल ये इकडे माझ्याजवळ ",.. आदित्य

सीमा आदित्य जवळ गेली, दोघं बराच वेळ हातात घेऊन बसलेले होते,

"जरा वेळ आराम करतेस का",.. आदित्य

हो... सीमा बाजूला जाऊन झोपली, आदित्य मेल चेक करत होता

पवार साहेब ऑफिसमधुन निघाले, प्रशांत आणि मित्रमंडळी त्यांच्या मागावरच होते, आज काहीही करून पवार साहेबांशी बोलायचं, बऱ्याच पुढे गेल्यानंतर त्यांनी पवार साहेबांना थांबण्याचा इशारा केला, पवारसाहेबांनी मोटरसायकल साईडला लावली

" आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायच आहे, काम आहे एक ",.. प्रशांत

"बोला प्रशांत साहेब",.. पवार साहेब

"आम्हाला कशाला तुम्ही साहेब म्हणता आहात",.. प्रशांत

"तुम्ही फॅक्टरीचे मालक, इंडस्ट्रीयलीस्ट",... पवार साहेब

" कसलं काय फॅक्टरी साहेब? सगळं कर्जात बुडाल आहे, आमची तुमच्याकडून मदतीची अपेक्षा आहे, बघु काही होतं का",.. प्रशांत

" मी काय मदत करू शकतो तुम्हाला? मी नोकरदार माणूस आहे",.. पवार साहेब

" तुम्हीच मेन आहात, तुमच्यावर आशा आहे आता",.. प्रशांत

"बोला काय करू? ",.. पवार साहेब

" तुम्ही तयार आहात का मदतीला",.. प्रशांत

"मला आधी समजल पाहिजे काय काम आहे, तर मी विचार करेन",.. पवार साहेब

"मी करतो तुम्हाला फोन उद्या जमल तर भेटू आपण उद्या",... प्रशांत

ठीक आहे, पवार साहेब गेले

प्रशांतने पुढे येवून विक्रमला फोन केला,..." आता बोललो मी पवार साहेबांशी, ते उद्या भेटायला येतील बहुतेक ",..

"ठीक आहे, मला सांग वेळ मी येईन तिकडे, पवार साहेबांशी सांभाळून बोलायला पाहिजे, थोड्या पैशाची व्यवस्था करावी लागेल, त्यांना द्यावे लागतील पैसे ",.. विक्रम

"लगेच द्यायचे का",.. प्रशांत

"हो म्हणजे ते दबून राहतात, आपल्याला मदत करतात, मागे आपण अस केल होत ",... विक्रम

सीमाने जरा वेळ आराम केला, ती उठली तर आदित्य तिच्या जवळ बसुन ऑफिसच काम करत होता,..." चल खाली चहा घ्यायला जावू",

" तू ठीक आहेस ना",.. आदित्य

हो..

" एक मिनिट सीमा मला बोलायच आहे तुझ्याशी, तू छान मोकळी रहा माझ्या सोबत, अजिबात टेंशन घेवू नकोस, लग्न आपल्या दोघांच आहे, पुढे काय करायच याचा निर्णय आपण घेवू दोघ मिळून, तू आरामात रहाण माझ्यासाठी महत्वाच आहे" ,.आदित्य

"आता नवीन नवीन मला खरच काही सुचत नाही, घरच सगळ समजवून घेते आहे मी आधी",.. सीमा

"काही प्रॉब्लेम नाही",..आदित्य

"आदित्य तू चांगला मुलगा आहेस ",..सीमा

"खरच का? तुला अजून काही माहिती नाही माझ्या बद्दल मी कसा आहे ",..आदित्य

"सांग ना मग तू ",..सीमा

"अस सांगत नसता", ..आदित्य

मग ..

"दाखवू का मी कस आहे ते ",..आदित्य

"आदित्य.... चल खाली आता ",..सीमा हसत होती, किती चांगला आहे हा, मला कंफर्टेबल ठेवतो, मध्ये मध्ये उगीच नाव घेतो

"तू जा मी आलोच थोड काम आहे ",..आदित्य

"मी आई ला फोन करते तो पर्यंत, बोलायला वेळ मिळत नाही" ,.. सीमा

सीमाचा फोन येतो आहे बघून मीना ताईंना खूप आनंद झाला, राजा ताईचा फोन आहे, लवकर ये

"कशी आहेस आई, राजा आला का ऑफिस हून" ,... सीमा

हो आला..

" सॉरी.. तुम्हाला फोन करायला जमत नाही ग",.. सीमा

"ठीक आहे तू बिझी असशील, नवीन घर नवीन माणस होत अस बेटा काळजी करू नकोस",.. मीना ताई

"हो ग, काही सुचत नाही इकडे, मला तर अस वाटत काही येत नाही मला सगळा स्वयंपाक विसरून गेली की ",.. सीमा

"होईल सवय त्या घराची, अनघा ताई गेल्या का ",.. मीना ताई

" उद्या सकाळी जाणार आहेत, आता खाली जात होती मी",... सीमा

" राजाशी बोल, काल विचारात होता तो ताईचा फोन आला होता का अस ",.. मीना ताई

" हॅलो ताई कशी आहेस ",.. राजा खुश होता

" मी ठीक आहे तू कसा आहेस ",.. सीमा

" तुझी आठवण येते रोज \",.. राजा

"मलाही येते आठवण तुझी.. आईची, आई कडे लक्ष दे ",.. सीमा

"हो... तिकडे रमली का तू? ",.. राजा

"नाही ना सुचत नाही काही, शाळा सुरू झाली की वाटेल बर, सगळ वेगळ वाटत इकडे ",.. सीमा

"हो मग घरी येतं येईल थोड्या वेळ कधी कधी ",.. राजा

हो ना..

"तू तिकडून कस जाणार शाळेत? ",.. राजा

"अरे हो माहिती नाही विचार केला नाही तसा मी",.. सीमा

" आत घर आहे तुमच, शेतात",.. राजा

"हो... अंधार असतो, सामसूम असते, होईल काहीतरी बघु",.. सीमा

ठरवून ठेव...

"हो.. चल मी जाते आता खाली ",..सीमा

"फोन करत जा ताई ",.. राजा

हो....

🎭 Series Post

View all