नवी आशा जगण्याची... भाग 46

नको परत सीमा घरी येईल तर मला ऑफिसला जावस वाटणार नाही त्यापेक्षा मी लवकर घरी येतो",.. आदित्य स्वतःशीच विचार करत होता,


नवी आशा जगण्याची... भाग 46

©️®️शिल्पा सुतार
........

मीटिंग झाली, राजाला आदित्यने बोलवून घेतल,.. "राजा सीमाला काही सांगू नको विक्रम आणि त्याच्या मित्राबद्दल, ती आता हल्ली खूप टेंशन घेते ",...

हो... नाही सांगणार

"तू ही सावध रहा आणि आम्ही आहोत तुझ्या सोबत काळजी करू नकोस ",.. आदित्य

हो..

आदित्य संध्याकाळी घरी आला, सगळे होते घरी, सीमा नव्हती, करमत नव्हत त्याला, आदित्य रूम मध्ये गेला,
सीमाला फोन लावला

"काय करतेस",.. आदित्य

"अरे निशा आली आहे भेटायला, शाळा सुटल्यावर इकडे आली ती, आता जेवण करून जाईल ती",.. सीमा

"मजा आहे बाबा तुमची, इथे आम्हाला करमत नाही त्याच काय",.. आदित्य

"काय झालं घरी कोणी नाही का?",.. सीमा

"आहेत सगळे तू नाही ना, त्यात तू होकार दिलास काल, वाट बघतो तुझी ",.. आदित्य

सीमा एकदम लाजली.." आदित्य मी करते तुला फोन नंतर",..

"अरे काय बोल ना",.. आदित्य

"अरे या मैत्रिणी बोलू देत नाही",.. सीमा

निशा ने फोन घेतला.... "जिजु करमत नाही का तिकडे? एक दिवस सीमा आली तर सारखे फोन येतं आहेत तुमचे ",...

"हो ना नाही ना करमत, पण हे तुझ्या मैत्रीणीला कोण सांगेन? समजून सांग तिला, अजून माहेरची ओढ आहे ",...आदित्य

"एक आठवडा ही झाला नाही तीच लग्न होवुन, लगेच काय बोलताय तिला",... निशा

" तेच म्हणतोय मी अजून एक आठवडा ही झाला नाही",..आदित्य

"सीमा बघ जिजू काय म्हणताय",.. निशा हसत होती

" बोल आदित्य, कश्याला चिडवतोस निशाला ",.. सीमा

" तु इकडे ये आत्ताच्या आत्ता",.. आदित्य

" अरे काय अस? उद्या येणार आहे मी ",... सीमा

" आता येवू का मी तुला घ्यायला ",.. आदित्य

" नाही मी उद्या येईन, इकडे सगळे आहेत आदित्य प्लीज मला बोलता येत नाही आता",... सीमा

" ठीक आहे चालू द्या तुमच, ये उद्या लवकर ",.. आदित्य

" हो मी करते रात्री फोन ",.. सीमा

" ठीक आहे ",... आदित्य

निशा सीमा खूप गप्पा मारत होत्या,... " कस आहे आदित्यच घर?, घरचे कसे आहेत ",....

"माहिती नाही, एक दिवस ही राहिली नाही मी तिकडे, आम्ही लगेच फार्म हाऊस वर गेलो होतो ना ",.. सीमा

"अच्छा.... तो विषय राहिला आहे आपला बोलायचा.. फार्म हाऊसवर काय झाल सीमा? अजून सांगितल नाही तू ",.. निशा चिडवत होती

सीमाला आदित्यची आठवण येत होती, किती छान आठवणी आहेत त्या, आदित्य सोबत बर वाटत होत ... ती मुद्दाम चिडली होती निशा वर... चूप बस निशा

"याला काय अर्थ आहे सीमा थोड तर सांग",.. निशा

" निशा काय हे आई ऐकेल",.. सीमा

" सीमा कधी येते शाळेत ",... निशा

"सोमवार पासून", ... सीमा

"बोर होत तू नाही तर ",.. निशा

" हो ना मला ही अस घरी बोर होत, पण आदित्य म्हणला सोमवार पासून जा ",.. सीमा

"बापरे आता आदित्य बोलले तस होत वाटत इकडे",.. निशा

"तू जा बर घरी निशा ",.. सीमा

" जेवू तर दे ",.. निशा

" डबा घेवून जा घरी जेव",.. सीमा

"चांगल तर वाटतय तुला मी चिडवते तर उगीच नाटक सुरू आहे ",.. निशा

आता सीमा उठली निशाच्या मागे धावली, मीना ताई बाहेर आल्या,..." काय सुरु आहे हे, अरे तुम्ही मुलींच?, शांत व्हा, लग्न झालं ना आता शांततेत घ्या जरा",..

" काकू मला वाचवा",.. निशा

मीना ताई हसत होत्या...
..

विक्रम रात्री त्याच्या मित्रांबरोबर हॉटेल मध्ये बसलेला होता सगळे मुलं मिळून स्क्रॅप घोटाळ्या बद्दलच बोलत होते

" काय करूया आता विक्रम? ",...प्रशांत

" खूपच कौतुक सुरू आहे त्या आदित्यच, लग्न काय करून घेतल वाजत गाजत त्या पोरीशी, लग्न झाल्यापासून हवेत उडतो आहे तो, त्यांच्याच फार्महाउसला गेला होता म्हणे हनीमून साठी",... विक्रम

"बापरे एवढ्या लांब",.. बाकीचे मुलं हसत होते, जाऊन जाऊन कुठे गेला तर म्हणे फार्म हाऊसला

"त्याने ते लग्न लोकांना दाखवायलाच केलं आहे, बघा सामान्य घरातील मुलगी माझी बायको आहे, म्हणजे आबा इलेक्शन जिंकतील, नसेल त्याच एवढ मन या लग्नात, थोडे दिवस राहिल त्या पोरीसोबत, कशाला खर्च करेल तो? म्हणूनच गेले असतील इथेच फार्महाउसला",.. विक्रम काहीही बोलत सुटला होता

"आज तर तो आदित्य ऑफिसलाही आला होता ",.. प्रशांत

"झाली वाटतं हौस, दोन दिवसात जॉईन झाला ऑफिस मध्ये ",.. विक्रम

बाकीचे हसत होते

" पण मी त्या आदित्यला सोडणार नाही त्या पोरी साठी मला माझ्या आई वडिलां समोर बोलला तो खूप, बघतो जरा मी, प्रशांत काय झालं? तुला सांगितलं होतं ना ते काम पवार साहेबांची बोलायचं? ",.. विक्रम

"पवार साहेबांशी बोलायला सांगितलं होतं का? ",.. प्रशांत

"मग तू कोणाशी बोलला",.. विक्रम

"मी एका मुलाशी बोललो राजा तो सुद्धा काउंट डिपार्टमेंटला आहे",.. प्रशांत

"तुला थोडी तरी अक्कल आहे का रे प्रशांत? जे सांगितलं त्याच्या नेमके उलट करतो तू, आता त्या लोकांना आपला सगळा प्लॅन कळाला असेल",.. विक्रम

" कसा काय",.. प्रशांत

" अरे त्या राजाच्या बहिणीच आदित्यशी लग्न झालं ना,
त्यांने आत्तापर्यंत सांगितलं असेल त्याला तुम्ही लोक भेटले ते, आता ते लोक सावध होऊन जातील",... विक्रम

"तू असं कुठे बोलला होता की पवार साहेबांना भेटायचं आहे तू बोलला कडून डिपार्टमेंट मधले एकाला धरा",.. प्रशांत

" अरे मग तू जाऊन त्या राजालाच पकडायचं का",.. विक्रम

"मला काय माहिती आता काय करूया",.. प्रशांत

"काही नाही आत्ता शांत बसण्याशिवाय गत्यंतर नाही आता काय माहिती तो आदित्य काय प्लॅन करत असेल",.. विक्रम

" पण काय सांगावं तो राजा मदत करायला तयार असला तो ",.. प्रशांत

"तो कशाला करेल त्याच्या जिजाजींच्या कंपनीत फ्रॉड",..विक्रम

" असे घरचे लोक त्रासदायक असतात तो बरोबर कामाला येईल बघ आपल्या",.. प्रशांत

" पण तुम्हाला त्याच्याशी बोलायचं असेल तर मी मध्ये पडणार नाही काय सांगावं त्याने आदित्यला सांगितलं असेल तर",.. विक्रम

" हो तू आता लांब थांब मी बघतो काय करायच ते",..प्रशांत

"तू बघ भेटून त्याला काय म्हणतो आहे तो",.. विक्रम
.....

राजा घरी आला, घरात खूप गोंधळ सुरू होता, तो त्याच्याच विचारात होता काय कराव? आता खरंच जाऊन भेटाव का विक्रमच्या मित्रांना, की सरळ आदित्य साहेबांना सांगाव मला जमणार नाही, त्यात ते बोलत आहेत की सीमाला काही सांगायचं नाही, सगळ्यांना वाटलं मीच गुन्हेगार आहे तर? काय करू? बघून निघेल काहीतरी मार्ग,
....

आदित्य जेवायला खाली आला, सगळे खाली गप्पा मारत होते, आदित्य त्यांच्यात जाऊन बसला,

सुमित लगेच जवळ आला,.. "मामा मामी कुठे आहे?",..

"आधीच तो दुःखी आहे कशाला विचारतो त्याला",.. शरद चिडवत होता

आदित्य हसत होता,.. "मामी गेली बेटा तिच्या घरी उद्या सकाळी येईल ती",..

"हो आम्ही जाणार आहोत उद्या सकाळी मामीकडे, मम्मी आज सांगत होती",... सुमित

आदित्य अनघा कडे बघत होता

"उद्या जाऊन घेऊन येतो तुझ्या बायकोच्या घरी",... अनघा

" हो चालेल",.. आदित्य

" मग आदित्य तू जाणार आहेस का उद्या ऑफिसला की बायको घरी येणार म्हणून घरीच थांबणार",.. शरद

" तुम्हीही पण ना जिजू",.. आदित्य हसत होता त्याबरोबरच मनातुन तो खूप खुश होता उद्या सीमा येणार

"आम्ही परवा निघायचं म्हणतो उद्या सीमा येईल तर परवा निघतो",.. अनघा

" एवढी का घाई करत आहात",.. आदित्य

हो ना.. आक्का

" अरे मग किती दिवस थांबणार आहोत आम्ही इथे, झाल की आता लग्न, बरेच दिवस राहिलो, नंतर येऊ आम्ही आरामशीर, नाहीतर आता तुम्हीच या दोघा आमच्याकडे, तिकडे खूप फिरायचे ठिकाण आहेत, मस्त फिरू आणि ते गिफ्ट दिलं आहे हनिमून पॅकेज ते वापरा ",... अनघा

" हो आम्ही दोघं जाणार आहोत सुट्टी बघून, सीमा सुद्धा सोमवारपासून शाळेत जॉईन होणार आहे, जशी सुट्टी येईल तसं जाऊन येऊ",.. आदित्य

गप्पा मारत सगळ्यांचे जेवण झाले, आबा फोन वर बोलत होते बऱ्याच वेळ,

" कोणाचा फोन आहे",.. आदित्य

" पोलीस इन्स्पेक्टरांचा फोन आहे, जमिनीची केस सुरु आहे ना त्याबद्दल बोलत आहे ",... आक्का

आबा आत आले,

" आबा सीमा सांगत होती शाळेतील एक टीचर तिथे आपल्याच जमिनीतल्या घरात राहते",.. आदित्य

" कोण आहे ती?",.. आबा

" नाव नाही माहिती पण सीमा ओळखते तिला",.. आदित्य

" तिच्याशी बोलता येईल का आपल्याला? ",.. आबा

"मी सांगतो सिमाला तसं ",... आदित्य

" नको लगेच नको सांगू सीमा उद्या येईल मग बघ बोलून सविस्तर, काही तरी ठरवावं लागेल ",.. आबा

"काय म्हटले इन्स्पेक्टर साहेब?",... आदित्य

" तिथे जे लोक राहतात त्यांनाही माहिती नाही ही वस्ती ईललीगल आहे, त्या गुंडाला कोणाचातरी सपोर्ट आहे, त्या गुंडाशी आपण संपर्क साधला पाहिजे, बघू करू काहीतरी",.... आबा

" अजून संपलीच नाही का ती होय जमिनीची केस",.. अनघा

" नाही ना ताई मी आता त्या केस कडेच लक्ष देणार आहे",.. आदित्य

" होईल आता ठीक सगळ काळजी करू नका कोणी",.. अनघा
.....

जेवण झालं निशा घरी गेली,

"खुपच छान वाटतं नाही निशा आली तर ",... मीना ताई

" हो ना तिचं पण माहेर खूप लांब आहे, तिलाही आपल्याकडे येऊन छान वाटतं",.. सीमा

सीमा ने फोन घेऊन आदित्यला मेसेज पाठवला,.. जेवण झालं का

आदित्य बिझी होता त्याच फोन कडे लक्ष नव्हतं

सीमाने बघितलं राजा टेन्शन मध्ये होता

" काय झालं आहे राजा तूझ जेवणात हि लक्ष नव्हतं",.. सीमा

" काही नाही",.. राजा

" काही विचारात आहेस का?",.. सीमा

हो

"काय झालं?",.. सीमा

" काही नाही ऑफिसचा हिशोब विचार करतो आहे",.. राजा

" अच्छा त्यासाठी ऑफिसचा वेळ आहे की घरी आल्यावर कशाला विचार करतोस ",.. सीमा

राजा आता छान सीमाशी गप्पा मारत बसला, बाजूच्या वहिनी येऊन बसल्या होत्या जरा वेळ, मीनाताई त्यांच्याशी बोलत होत्या

" उद्या ये ग सीमा आमच्याकडे ",.. वहिनी

" वहिनी मी उद्या जाते आहे सकाळी ",.. सीमा

" का ग थांब ना ",... वहिनी

" माझी नणंद परवा गावाला जाणार आहे त्यामुळे सकाळीच उद्या जाणार आहे त्या येणार आहे घ्यायला मला आजच फोन आला होता",... सीमा

सीमाने बॅग भरून ठेवली, ती आणि राजा टीव्ही बघत होते, अजूनही आदित्यचा मेसेज आलेला नव्हता, जाऊदे तो बिझी असेल, अनघा ताई जाणार आहेत ना, बोलत बसले असतील, सीमाने झोपून घेतलं

आदित्यने उशीराने सीमाचा मेसेज बघितला,.. सीमाला रिप्लाय केला पण ती झोपलेली होते

सकाळी सीमा मीनाताई लवकर उठल्या, अनघा ताई नाश्त्यासाठी येणार होत्या, त्यांच्या बरोबर सीमा घरी जाणार होती, इडली सांबरचा बेत केला होता ताईंना, सुमित साठी ड्रेस घेतला होता, राजा ऑफिसला जायला तयार झाला,

"राजा मी निघते आहे आज",... सीमा

" ठिक आहे ताई",.. राजा येऊन सीमाला भेटला

सीमाच्या डोळ्यात पाणी होतं

"पुरे झाला आता सारखं रडणं बरं नाही, सीमा आनंदाने निरोप द्या एकमेकाला",... मीना ताई

राजा ऑफिसला गेला, सीमा आवरत होती आदित्यचा फोन आला,... "काय चाललं आहे? झाली का तयारी इकडे यायची?",

"हो झाली आहे बॅग भरून, तू ऑफिसला जातो आहेस का?",.. सीमा

" हो लवकर येईन मी घरी",.. आदित्य

" ठीक आहे मी आवरते आहे जरा अनघा ताईंना येणार आहेत ना",.. सीमा

" अरे माझ्याशी कुणी बोलत नाही आता",.. आदित्य

" तसं नाही आदित्य ",.. सीमा

" काय झालं मूड खराब आहे का ",.. आदित्य

" हो आईला सोडून यायचं जीवावर येत आहे",.. सीमा

"त्यांनाही घेऊन ये आपल्याकडे ",... आदित्य

" आई कशी येईल",.. सीमा

" एवढं माहिती आहे ना मग कशाला त्रास करुन घेते ",.. आदित्य

"ठीक आहे तू लवकर ये घरी, मी वाट बघते तुझी ",.. सीमा

हो

" आदित्य एक सांग आता घरी जावून काय काम असेल म्हणजे मला एकदा सांग सगळ",.. सीमा

" स्वयंपाक कर गेल्यावर, ठीक आहे मी ठेवतो फोन ",.. आदित्य मुद्दाम चिडवत होता तिला

" आदित्य एक मिनिट मी काही विचारल तर सांगशील का? मी तिकडे गेल्यावर मदत लागेल ",... सीमा

"मला काम आहेत सीमा ",.. आदित्य

" आदित्य तू ये ना घरी प्लीज ",.. सीमा

" घाबरते काय सीमा, नीट ऐक आईला सांग तुला जे हव ते मी सांगतो तिला, घरी जाते आहेस तू काही जंगलात नाही, एवढ घाबरण्यासारखं काही नाही तिकडे ",.. आदित्य

" आईंना.... नको नको त्यांना नको सांगू ",.. सीमा

आता काय?

बर सांग... सीमा गोंधळली होती, तू लवकर ये घरी

ठीक आहे

"काहि खरं नाही सीमाच, उगीच टेंशन घेते",.. आदित्य

घरी अनघा आवरत होती, अनघा शरद राव सुमित आजी सीमाला घ्यायला जाणार होते, आक्कांनी आजीजवळ मीनाताईंना द्यायला फराळ दिला, घरी केलेला चिवडा लाडू होता

आदित्य ऑफिसला जाण्यासाठी खाली आला

" सगळे जात आहात का तुम्ही सीमा कडे? ",.. आदित्य

"मी नाही जात आहे",.. आक्का

"आई इकडे ये ना जरा बोलायच होत",.. आदित्य

काय झालं?.. आक्का

"सीमा कडे लक्ष दे आल्यावर, ती जरा घाबरली आहे इकडे यायच तर",.. आदित्य

"त्यात काय घाबरण्यासारखं?,.. आक्का

" अग मीच तिला चिडवत असतो की इकडे खूप काम आहे, स्ट्रिक्ट वातावरण आहे, शेतात जाव लागेल वगैरे, तिला समजत नाही आता इकडे येवून काय करू",.. आदित्य

"ठीक आहे बघते मी, नको रे चिडवत जावू तिला, भोळी आहे ती, मुलींना येत टेंशन सासरी जायच, कसे असतिल लोक अस वाटत, मी सांभाळेल तिला",.. आक्का

" तुही चलतोस का आमच्यासोबत आदित्य ",.. आजी

" नाही आजी मी जातो ऑफिसला ",.. आदित्य

" चल रे जरा वेळ तिकडे नाश्ता कर आणि मग ऑफिसला जा ",... आजी

"नको परत सीमा घरी येईल तर मला ऑफिसला जावस वाटणार नाही त्यापेक्षा मी लवकर घरी येतो",.. आदित्य स्वतःशीच विचार करत होता,

" नाही आजी तुम्ही लोक जाऊन या मी जातो ऑफिसला लगेच मिटींग आहे सकाळी",... आदित्य ऑफिसला निघून गेला

आज आबा शेजारच्या गावातील कदम साहेबांना भेटायला गेले होते, इलेक्शनच काम पुढे कराव लागेल, आक्का एकट्याच घरी होत्या

" चला ग आई तू पण जाऊन येऊ सिमाकडे,.. अनघा

" अरे एवढ्या लोकांच काय काम आहे, मी घरच बघते",.. आक्का

🎭 Series Post

View all