नवी आशा जगण्याची... भाग 45

पण सगळ्यांना सांगून ठेवा मी नाटक करतो आहे ते, नाही तर पोलिस मला ही पकडतील त्या मुलां सोबत ",.. राजा


नवी आशा जगण्याची... भाग 45

©️®️शिल्पा सुतार
........

अनघा ताई, शरद जिजू खाली आले, खूप छान एकत्र रहात होते ते दोघ, मी अस वागायला पाहिजे आदित्यशी, सॉरी आदित्य प्लीज बोल मी आता तुला उलटून बोलणार नाही, काय करू आता?, सीमा आतून आदित्य कडे बघत होती, आदित्य बोल ना माझ्याशी..

बाहेर गाडी थांबली, आबा आक्का आले होते, सगळे बाहेर गेले, सीमा जावून त्यांना भेटली, तेवढ्यात गाडीचा मागचा दरवाजा उघडला, मीना ताई.. राजा खाली उतरले, सीमा त्यांच्या कडे बघत राहिली, तिला विश्‍वास वाटत नव्हता, एकदम पळत जावून त्यांना भेटली, रडायला लागली, मीना ताई तिला समजावत होत्या,

आक्का आल्या दोघीं कडे,.. "दोन तीन दिवसानी आई भेटली, भाऊ भेटला, रडून घे सीमा, असू द्या हो, होत अस",

खूप छान वाटत होत सीमाला, राजा भेटला, दोघी छान बोलत होत्या, आबा आक्का आले होते आम्हाला घ्यायला, सीमा आक्का कडे बघत होती,

"कस वाटल सरप्राईज सीमा",... आक्का

"खूप छान आई thank you",.. सीमा

चांगल्या आहेत हे ही दोघ,

"आई मी तुझ्या सोबत घरी येणार आहे घरी",... सीमा ,

"हो जावू घरी",.... मीना ताई ,

सगळे आत आले, सीमाने त्यांना पाणी दिल, चहा सांगितला करायला, खूप छान वाटत होत तिला, आधी इथे सगळे होते तरी काहीतरी कमी होती, मीना ताई राजा आल्या मुळे ती आता खुश होती, आक्का, अनघा, आजी मीना ताई, सीमा बोलत बसल्या होत्या, सीमा मीना ताईंच्या आजूबाजूला होती,

"आई भेटली की छान वाटत नाही" ,... आजी

"हो ना" ,..

सीमा बाहेर जावुन चहा देवून आली, ती आक्कां जवळ गेली,... "आई आज मी आई सोबत घरी जावू का? ",

"हो जा बेटा",.. आक्का

सीमा खुश होती.... आदित्यला विचारायला हव जावू का अस, कस पण? तो बघत नाही माझ्या कडे, रुसला आहे तो, पण त्याला विचारल्या शिवाय जाणार कस? काय करू? सीमाने आदित्यला मेसेज केला

"आदित्य मी आई कडे जावू का आज",...

आदित्यने जरा वेळाने मेसेज बघितला, काही उत्तर दिल नाही,

"प्लीज आदित्य सांग ना" ,

तो ही मेसेज आदित्यने बघितला तरी त्याने उत्तर दिल नाही

सॉरी आदित्य...

नंतर सीमाने मेसेज केला नाही, जावू दे आदित्य हो बोलला नाही तर जायच नाही, आता लग्न झाल माहेरचा आईचा मोह नको

ती तीच काम करत होती, मस्त जेवण झाल, सगळे बोलत बसले, सीमा आदित्य कडे बघत होती, तो अजून रागावलेला होता,

"चला तयारी करा आदित्य, सीमा, तुम्ही येतय ना घरी",... आक्का

हो..

"सीमा तू तयार हो तुला जायच ना मीना ताईं सोबत?",... आक्का

सीमा तिथे उभी होती..

काय झालं?

तिने आदित्य कडे बघितल

"त्याने हो नाही म्हटल का अजून?",.. आक्का

हो...

आक्कांनी आदित्यला बोलवलं,..." आदित्य सीमा घरी जायच म्हणते आहे ",

"ठीक आहे जा",.. आदित्य

" सीमा बॅग घेवून ये, तुझी बॅग आण आदित्य, जा तिच्या सोबत",... आक्का

आदित्य सीमा वरती रूम मध्ये गेले

सीमा आदित्य कडे बघत होती, आदित्य गप्प होता,.. "सॉरी आदित्य प्लीज चिडू नकोस ना प्लीज प्लीज",

ठीक आहे...

" अरे अस कस ठीक आहे",.. सीमाने बळजबरीने आदित्यला मिठी मारली, आदित्यने तिला दूर केल अटोप

" मी जावू ना आई कडे?",.. सीमा

"एवढ ऐकते का तू माझ?",.. आदित्य

"सॉरी ना आदित्य, आपण नको भांडायला, प्लीज बोल ना माझ्याशी तू",... सीमा रडत होती

आदित्य त्याची बॅग भरत होता, सीमा त्याच्या मागे होती, तो बोलत नाही बघून तिचा धीर खचला,

आदित्य बॅग घेवून खाली जात होता, त्याने बघितल सीमा रडते आहे, त्याने बॅग खाली ठेवली, तो सीमा जवळ आला,... "सीमा रडू नकोस, सॉरी सीमा मी नाही रागावलो तुझ्या वर, तू जावून ये आई कडे, मी येतो तुला सोडायला",

सीमा बॅग भरत होती, ती अजूनही रडत होती, मी येणार नाही आता वापस आई कडून.. ती मनात विचार करत होती, आदित्य बोलत नाही माझ्याशी काय करू इकडे येवून

आदित्य तिच्या जवळ आला तिला जवळ घेतल... सीमा रडू नकोस प्लीज.... " खरं तर दोन दिवस आपण एकटे होतो, तुझी खूप सवय झाली होती मला, आज अचानक सगळे आले, मला तुझ्या सोबत रहायच होत, माझी उगीच चीड चीड झाली, मी नाही चिडणार आता, जा जावून ये छान आई कडे ",... आदित्य

सीमाने उठून आदित्यला मिठी मारली,.." नक्की नाही ना राग आला ",

" नाही तुझा राग करून काय करू मी ",.. आदित्य

" मी उद्या राहीन आई कडे, परवा येईन, तू येशील ना मला घ्यायला ",... सीमा

ठीक आहे...

दोघ खाली आले

आदित्यच्या गाडीत आदित्य, सीमा, मीनाताई, राजा बसले ड्रायव्हर होताच गाडी चालवायला, दुसऱ्या गाडीत घरचे सगळे मेंबर बसले

" मी येतो सीमाला सोडून",.. आदित्य

"लवकर ये",.. आक्का

सगळे निघाले, सीमाला आता खूप छान वाटत होतं, आदित्यचा राग गेला आणि फायनली आपण आईकडे जातो आहोत, ती मीनाताईं जवळ बसली होती, तिला असं झालं होतं कधी घरी येत, ते घरी पोहोचले,

आदित्य आत आला नाही, मी येतो आता आई, घरी जायला उशीर होत आहे,

ठीक आहे सीमा बाहेर पर्यंत आली, आदित्य तिच्याकडे बघत होता,... "आता खुश आहेस ना सीमा?",..

"हो आदित्य",. सीमा

"मी निघतो",... आदित्य

"घरी गेल्यावर मेसेज कर",.. सीमा

आदित्य निघाला सीमा त्याच्याकडेच बघत होती, ती आत आली, खुपच रिलॅक्स वाटत होत घरात, तिने आधी जाऊन राजाचं नाव घेतलं,

"अरे काय चाललं आहे तुमचं आल्या आल्या मारामाऱ्या",..मीना ताई

" आई मी ताईला मारतच नाही, तीच मला मारते लहानपणापासून",.. राजा

" आता माझ्या हाताला कसं छान वाटतं आहे, दोन-तीन दिवसापासून राजा तू आणि आई आई भेटली नव्हती तर चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं",.. सीमा

मीनाताई येऊन सीमाला कडकडून भेटल्या,

" आई दुपारी काय केल होत जेवायला? ",.. सीमा

" पोळी भाजी खाते का? ",.. मीना ताई

"हो दे, थांब तू मी घेते, तुम्ही दोघ जेवणार का?,.. सीमा

" नाही किती भरपूर खाल्ल तिकडे ",.. राजा हसत होता

"असू दे जेवू दे तिला",... मीना ताई

" आईच्या हातच जेवण शेवटी खूप छान असत राजा तुला काय माहिती" ,.... सीमा

सीमा छान जेवत होती, मीना ताई तिच्याशी बोलत बसल्या होत्या

राजाने आंथरूण टाकल, मीना ताई राजा झोपले, सीमाला झोप येत नव्हती, आदित्य पोहोचला का घरी? तिने फोन बघितला, आदित्यचा मेसेज आलेला होता

आज आदित्य कमालीचा चिडला होता, आता मी त्याला अजिबात उलटून बोलणार नाही, मला ही समजत नाही कधी कधी कस वागाव, इथुन घरी गेली की शांततेने घेईन मी, आदित्य म्हणतो आहे ना मला होकार दे, मी त्याला होकार देईल, त्यासाठी तो रागवला होता आज, दोन-तीन दिवस आम्ही दोघं खूप छान सोबत होतो, आज अचानक सगळे न सांगता आले, पूर्ण दिवस धावपळीत गेला, त्यामुळेही थकला असेल तो, यापुढे घरातल्या कोणाशी भांडण होईल असं वागायचं नाही, सीमाने फोन बघितला

"पोहोचलो घरी मी.. Miss you",..

Hi.. सीमाने मेसेज केला

"झोपलीस का सीमा",.. आदित्य

"नाही आदित्य आवरते आहे",.. सीमा

"काय करते आहेस",.. आदित्य

"आईशी बोलत होती इतक्यावेळ",.. सीमा

"छान वाटत असेल ना घरी जावुन",.. आदित्य

"हो खूप छान वाटत आहे",.. सीमा

एन्जॉय..

"उद्या शाळेत जाऊ का मी",.. सीमा

"मला असं वाटत आहे की तू सोमवारपासून शाळेत जा, घरी आली की एक दोन दिवस घरी राहा मग धावपळ आहेच",.. आदित्य

" ठीक आहे",. सीमा

" तू ठीक आहेस ना आदित्य? माझ्यावर रागवला नाहीस ना, मला समजत नाही कधी कस वागू ते, गडबड होते माझी ",.. सीमा

" नाही मी नाही रागवलो",.. आदित्य

" मला ऍक्च्युली समजत नाहीये तुझ्याशी कसं वागावं? जर मी तुला काही चुकून बोलली तर मला समजून घे मी आता यापुढे असं तुला उलट बोलणार नाही",.. सीमा

" हे नातं आपल्या दोघांसाठी नवीन आहे, मला ही खरं समजत नाही काय करावं? तू माझी काळजी करू नकोस सीमा, माझ्या मनात असं काही नाही, मला काही लगेच राग येत नाही, पण दुपारी काय झालं होतं काय मी माहिती? उगीच चिडलो मी तुझ्यावर, छान आराम कर आता",... आदित्य

" आदित्य मला तुला एक सांगायच आहे ",.. सीमा

बोल..

" माझा होकार आहे आदित्य ",.. सीमा

" मला माहिती आहे सीमा तू मला चांगल वाटाव म्हणून होकार देते आहेस ",.. आदित्य

" नाही आदित्य खरच ",.. सीमा

" ठीक आहे सीमा तू इकडे आली की बोलू आपण तू आरामात रहा ",.. आदित्य

" हो चालेल" ,... सीमाने फोन बंद केला, बर झाल आदित्य नॉर्मल वागला बोलला, तिला आता शांत झोप आली

आदित्य अजून जागाच होता, दोन दिवस सीमा सोबत होती तर किती छान वाटत होत, असं वाटत होतं की आम्ही दोघांनी तिकडेच रहाव, किती हक्कानी रागवत होती आज ती मला दुपारी आणि मी काय केलं मी उगाच तिच्यावर खूप चिडलो, तिने मला मेसेज केला तरी मी बोललो नाही, तिला रिप्लाय दिला नाही, माझी मुलाची बाजू आहे, ती बिचारी बायको म्हणून मला विचारत होती मी जाऊ का आईकडे?, तर मी तिच्याशी नीट वागलो नाही

खरंतर तिच्या आई वडिलांना भेटायला माझ्या परवानगीची गरज नाही, तरी मी तिला तसा विश्वास दिला नाही, यापुढे असं करणार नाही मी सीमा, तुला माझ्यासोबत खूप कम्फर्टेबल ठेवेल, आता ही माझ्या साठी ती होकार देत होती, तुला जेवढा वेळ घ्यायचा तेवढा घे, माझी बळजबरी नाही, विचार करत आदित्य झोपला

तो सकाळी लवकर उठला आणि ऑफिस साठी तयार होवुन आला,

"आज सुट्टी वर नाही का आदित्य?",... आजी

"नाही महत्त्वाच्या मिटींग आहे, दोन-तीन येतो दुपारपर्यंत" ,... आदित्य नाश्ता करून निघाला

राजा ऑफिसला जायला तयार होता, सीमा उठली मीनाताई काम करत होत्या

"राजा ऑफिसला चालला का?",... सीमा

"हो ताई.. तू केव्हा पासून जॉईन होणार आहे",... राजा

" सोमवार पासून ",.. सीमा

राजा ऑफिस ला गेला

मीना ताई, सीमा चहा घेत होत्या,.. "नाश्ता साठी काय करू या सीमा?",

"राजाने काय खाल्लं",.. सीमा

"पोहे केले आहेत, पण तुला आवडत नाही ना ",.. मीना ताई

" खाईन मी आई थोडे आता नको काही करू ",.. सीमा

आदित्यचा फोन आला

" सीमा मी ऑफिसला निघालो",.. आदित्य

"तू जॉईन होतोस",.. सीमा

"मग काय करणार घरी तू नाहीस",.. आदित्य

सीमा खुश होती,

" उद्या येणार ना तू घरी ",... आदित्य

हो

" लवकर ये करमत नाही तुझ्या शिवाय ",.. आदित्य

सीमा आदित्य मस्त बोलत होते मीना ताईंच्या चेहर्‍यावर समाधान होत,

आदित्य ऑफिसला पोहोचला, खूप काम पेंडींग होत, कामाला सुरुवात झाली, बरेच लोक येत होते भेटायला अभिनंदन करत होते,

पवार साहेब राजा आत आले, आदित्यने सचिनला बोलवून घेतल

" राजा काय झाल काल?",.आदित्य

"मी ऑफिस ला येत होतो तर दोन मुलांनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला ते बोलले कि मी जे सांगतो ते काम केलं तर तुझाही फायदा आहे आणि आमचा ही फायदा आहे",... राजा

"त्या लोकांनी मागे पण असंच केलं होतो अकाउंटंट होता त्याला त्याच्या साईडने करून घेतलं होतं नंतर ते लक्षात आल्यामुळेच आबांनी त्याला काढलं होतं, नंतर नाही भेटला का तो संध्याकाळ",... आदित्य

" नाही मग मी संध्याकाळी तिकडे आलो होतो ना फार्म हाऊस वर",... राजा

"अच्छा आता जर ते मूल परत भेटले तर त्यांना सांग मी मदत करायला तयार आहे आहे जाऊन भेट त्यांना काय म्हणत आहे ते तर बघू",.. आदित्य

" पण मी असं कसं करू शकतो मला नाही पटत ते",.. राजा

" अरे राजा आपण एक सापळा रचतो आहोत त्यात ते सगळ्या मुलांची गॅंग बरोबर फसायला पाहिजे",.. आदित्य

पवार साहेब राज एकमेकांकडे बघत होते

" तुम्ही काळजी करू नका बरोबर होईल होईल मला बघायचं आहे कोण आहेत ते मुलं, सचिन तू एक छान प्लॅन तयार कर",.. आदित्य

ठीक आहे

" या चोरट्या मुलांना चांगला पोलिसांच्या ताब्यात देवू आपण ",. आदित्य

" पण सगळ्यांना सांगून ठेवा मी नाटक करतो आहे ते, नाही तर पोलिस मला ही पकडतील त्या मुलां सोबत ",.. राजा

" काळजी नको करू राजा एवढी, तुला आम्ही काही होवु देणार नाही, फक्त थोडा सावध रहा" ,.. आदित्य

ठीक आहे

" स्क्रॅप रीपोर्ट झाला का तयार पवार साहेब",.. आदित्य

" हो जवळ जवळ रेडी आहे ",... पवार साहेब

" ती पण केस सुरू करू आपण, म्हणजे ते मुल घाबरतील, खूप उपद्व्यापी आहेत ते ",.. आदित्य

बरेच काम सुरू झाले होते, आता शाळेमागची जमीन तीच काम बाकी होत, काही तरी कराव लागेल.....


🎭 Series Post

View all