नवी आशा जगण्याची... भाग 43

बापरे कठीणच आहे हे आता, या लोकांनी अशा आयडिया काढल्या तर, तरी त्यांना माहिती आहे राजा की तू आदित्य साहेबांचा फॅमिली मेंबर आहेस, तरी

नवी आशा जगण्याची... भाग 43

©️®️शिल्पा सुतार
........

आदित्य सीमा बोलत बसले होते...

"आम्ही लहान होतो तेव्हाच माझ्या आजोबांनी वाटणी करून दिली आणि काका काकू बाजूला राहायला गेले,
आपल्या फॅक्टरी सारखीच त्यांची फॅक्टरी होती पण आपली फॅक्टरी आबांनी खूप छान सांभाळली मोठी केली, शाळा काढली अजून बरेच व्यवसाय आहेत आपले, आता इंजिनिअरिंग कॉलेज काढायच आहे, आजी आजोबांना सांभाळल, ह्या लोकांनी अस काही केल नाही शिकणार्‍या लोकांना नाव ठेवले, त्यांच्या कंपनीचे बारा वाजवले आणि खूप कर्ज आहे त्यांच्यावर, आपल्या फॅक्टरीत खूप चोऱ्या करतात ते, बरेच घोटाळे करून ठेवले आहेत, राजाला माहिती आहे ते सगळं, अकाउंट डिपार्टमेंट तोच सांभाळतो",... आदित्य

" बापरे बरेच त्रासदायक दिसत आहेत हे लोकं ",.. सीमा

" एवढेच काय आपल्या शाळेमागची जमीनही त्यांनी बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे, कोर्टात केस सुरु आहे त्याची ",.. आदित्य

" कुठे आहे ती जमीन ",.. सीमा

" शाळेमागे थोडस गेलं की डोंगराच्या बरोबर खाली तिथे त्यांनी चुपचाप पक्के घर बांधले आणि एक छोटी वस्ती तयार केली आहे आता ते लोक हक्क सोडायला तयार नाहीत, आबांनी बरेच प्रयत्न केले त्यांना समजावण्याचे, आता नवीन वकिलाकडे केस दिली आहे",.. आदित्य

" आपल्या शाळेतली पण एक टीचर तिकडेच राहते म्हणजे त्यांनी आपल्या जमिनीवर कब्जा केला आहे का? बापरे आता काय होईल पुढे? ",.. सीमा

" चालू आहे केस नवीन वकील शोधला आहे, इन्स्पेक्टर साहेब ही आहेत मदतीला, आपण जिंकू ही केस फक्त हे सगळं कसं साध्य करायचं ते बघावे लागेल, मी आता याकडे लक्ष घालणार आहे आणि विक्रम आणि त्याच्या मित्रांनी पण दोन वर्षांपूर्वी आपल्या कंपनीतला सगळा स्क्रॅप परस्पर विकून टाकला, तो पण खूप मोठा घोटाळा आहे ",.. आदित्य

"कस काय झाल हे, तू कुठे होतास तेव्हा? आणि आता आपले लग्न मोडण्याचा पण प्रयत्न केला होता, तू काही बोलत नाही का त्याला? ",.. सीमा

"हो मी शिक्षणासाठी परदेशात होतो, आबांच्या लक्ष्यात आल नाही लवकर, त्यांनी कंपनीच्या आतले लोक फोडले होते, मी खूप ओरडलो होतो, त्याला काही फरक पडत नाही, त्या लोकांना पोलिसातच द्यायला पाहिजे",.. आदित्य

" ते असं का करतात त्यांचं त्यांचं सामान का नाही वापरतात, तुमचं फॅक्टरी तुमच्या आयुष्यात का बरं ढवळाढवळ करता",.. सीमा

" एवढे जर त्यांना समजले असत तर काय झालं असतं सीमा",.. आदित्य

बराच वेळ आदित्य सीमा बोलत बसले, तरी दुपार झाली होती, आता अजिबातच करमत नाही आहे इकडे, जेवण झालं, आता दुपारी झोपलो तर परत रात्री झोप येणार नाही, काय करणार आहोत?, खाली हॉल मध्ये जाऊन दोघांनी टीव्ही बघितला, संध्याकाळ झाली,

" आपण वॉकला जायचं का आदित्य?",.. सीमा

आदित्यने वॉचमनला विचारलं... "इथे फिरायला जायला कुठे जागा आहे का?",.

"थोडं पुढे गेलं की छान नदी वगैरे त्याच्या तिथे जाता येईल, संध्याकाळी तिकडे मोठी आरती असते",.. वॉचमन

आदित्य सीमा निघाले सोबत बॉडीगार्ड ही होता..

"हा कायम सोबतच असतो का? म्हणजे तसा काही धोका आहे का?",.. सीमा

"नाही, धोका वगैरे नाही, पण असू दे विक्रम आणि मित्र मंडळीचा काही भरवसा नाही ",... आदित्य

दोघा चालत नदीकिनारी आले, किती शांत वाटतं आहे नाही, ते तिथे बसले बऱ्याच वेळ बोलत, आरती झाली, वापस फार्म हाऊस वर आले

आत आले निशाचा फोन आला,.." आम्हाला तर विसरून गेली तू फार्म हाऊस वर जावुन? , काय सुरु आहे सांग जरा सीमा? ",.. निशा

" अशी करता का सुरुवात बोलायला निशा? तुला कस माहिती आम्ही इकडे आहोत फार्म हाऊस वर",.. सीमा हसत होती...

"हमारे जासूस कोने कोने मे फैले है... मग आता हनीमून वाल्या मैत्रिणीशी काय बोलणार? , सांग ना काय सुरु आहे तिकडे? , कसे आहेत आदित्य जिजु?, फूल फिदा का तुझ्यावर ",... निशा

" पागल आहे का तू निशा काहीही काय ग बोलते ",.. सीमा

" चिडते काय, मला माहिती आहे सगळ, वैतागलेली दिसते बरीच, आदित्य त्रास देतो का? ",.. निशा

" तु फोन ठेव निशा आपण नंतर बोलू ",.. सीमा

" डिस्टर्ब केल की काय ",... निशा

सीमाने फोन ठेवून दिला

आदित्य खालून आला,.." कोण होत फोन वर?, हसते काय ",

" निशा होती उगीच चिडवत होती ",.. सीमा

" हो ना.. तिला काय माहिती इकडे अस काही नाही झाल, मी बिचारा कसा रहातो ते माझ मला माहिती ",.. आदित्य

"निशाच झाल आता तू सुरू करू नकोस आदित्य, मी चिडलेली आहे प्रचंड",.. सीमा

"काय झालं मला सांग सीमा? तुला कंटाळा आला का असा लांब लांब राहून, तुझा विचार तर नाही ना बदलला, ओह माय गॉड सीमा तू होकार देते मला ",.. आदित्य

कसला...

" 15 दिवस माझ्या पासून दूर रहाण अवघड झाल का? ",.. आदित्य

" आदित्य तू गेलास आता",.. , सीमा त्याच्या मागे धावली त्याला फार मारल सीमाने,

" अरे काय? याला काय अर्थ आहे? सांभाळ स्वतःला, आजच्या दिवस मारून घे मला, उद्या पासून आमच्या घरी रहाव लागेल, मग माझ राज्य समजल का, आजी आई अनघा माझ्या वर फार प्रेम करतात, हे अस मला मारल तर त्या रागावतील तुला ",... सीमा

सीमा शांत झाली, तिला आता टेंशन आल होत,..." कस आहे तुमच्या घरच वातावरण? ",..

" खूप कडक आहे, आक्का आबा शिस्त प्रिय आहेत, त्यांना गडबड गोंधळ आवडत नाही, रागवतील ते ",.. आदित्य

ओह माय गॉड.... म्हणजे

" मला तिकडे अहो बोलायच, सगळ्यांसमोर रोज पाया पडायच्या, सकाळी 5 ला उठायचं, सगळ घर झाडून पुसून घ्यायच, स्वयंपाक चहा नाश्ता करायचा, मग जायच शाळेत, मला मारायच उलटून बोलायच नाही",.... आदित्य

" पण तुमच्या कडे बाई आहेत ना स्वयंपाका साठी",.. सीमा

"त्या लग्नापूरत्या होत्या, आता नसतील",... आदित्य

" काय? .. मला नाही जमत एवढ स्वयंपाक वगैरे, आदित्य तू मदत करशील का तिकडे?... प्लीज आदित्य ",.. सीमा

" नाही.... मी 8 लि उठतो, लगेच 9 ला ऑफिस असत, आधी कधी मदत केली नाही आईला, आता आई बोलेल ना की आईला नाही केली कधी मदत आता बरी बायकोला मदत करतो आहेस, सॉरी सीमा मी नाही करू शकत मदत",... आदित्य

आदित्य प्लीज.... सीमा टेंशन मध्ये होती, ती गप्प बसुन होती

आदित्यला बर वाटल, जरा थोडी तरी घाबरली बर झाल,..

" आदित्य मला खूप टेंशन आल आहे ",... सीमा

" आणि एक सांग यायच राहील शेतात जाव लागत मध्ये लक्ष् द्यायला तिथे काम आहे ",... आदित्य

" एवढ नाही होणार माझ्या कडून ",.... सीमा

" करायला पाहिजे माझी आई करते वर्षोनुवर्षे",... आदित्य

सीमा आदित्य जवळ आली,... "आदित्य खरं सांग एवढ काम आहे का, प्लीज काही तरी कर, मला सुरुवातीला जरी समजून दिल कोणी काय काय करायच तरी मी करेन हळू हळू, प्लीज मदत कर, स्वयंपाक येतो थोडा मला पण तुमच्या कडे काय पद्धत आहे ते माहिती नाही ",..

" ते तू आईला विचार, किचनच मला काही विचारायच नाही ",.. आदित्य

" पण स्वयंपाक तुला ही यायला पाहीजे आदित्य",.. सीमा

" अस काही नाही सीमा ",.. आदित्य

" मला भिती वाटते आक्कांची, तु सांग ना ",.. सीमा

" माझी नाही वाटत का भीती ",... आदित्य

" नाही तू चांगला आहेस",... सीमा

जेवतांना सीमा चिंता करत होती, आदित्य तिच्या कडे बघत होता, बिचारी सांगू का की अस काही नाही माझ्या घरी माझ्या पेक्षा तुला जास्त जपतील आबा आक्का, काय करू नको सांगायला जरा राहू दे टेंशन मध्ये, आणि फाॅरेनला असताना मीच करायचो माझा स्वयंपाक, मला सगळ येत पण मी सीमाला सांगणार नाही

जेवण झाल, दोघ रूम मध्ये आले

" सीमा बॅग पॅक करून घे उद्या जायच ना घरी",... आदित्य

"आदित्य राहू या का इथे उद्या",.. सीमा

"काय झाल आज तर तु बोलली तुला करमत नाही इकडे, जावू घरी मग" ,... आदित्य

ठिक आहे,

सीमाला खूप भीती वाटत होती एकदम सुरेशची आई आठवली, बापरे किती डेंजर होत्या त्या किती बोलल्या होत्या मला, आता उद्या घरी जायच कामाच काही वाटत नाही पण रागावल्या तर आक्का, बापरे, एकदम रडवेली झाली होती ती हात थरथरत होते, आदित्य टीव्ही बघत होता त्याला नव्हत माहिती सीमाने धसका घेतला होता असा त्रासाचा म्हणून ती लग्नाला नकार देत होती

सीमाने झोपून घेतल झोप येत नव्हती, काय करू आईला करू का फोन? नको उगीच रडायला येईल, ती हळूच बाल्कनीत गेली, जरा वेळ बसली, आदित्य आला मागून बघितल तर सीमा रडत होती गुपचुप

" काय झाल सीमा?",.. सीमा उठली तिने आदित्यला मिठी मारली, ती अजून रडत होती

"काय झालं सीमा? का रडतेस? घाबरली का एवढी तू?",.. आदित्य

"मला नाही माहिती मला उद्या आई कडे सोडून दे आदित्य, मी आई कडे राहीन, मला भिती वाटते खूप कोणी काही बोलल की",... सीमा

"बापरे तू अजून तोच विचार करतेस का, अग मी गम्मत करत होतो तुझी, मुद्दाम तुला चिडवत होतो अस काही नाही आमच्या कडे, ठीक आहे सगळ",.... आदित्य

" नाही आता तू मुद्दाम सांगतो आहेस मला, कोणी रागावला तर आदित्य ",.. सीमा

" रागवेल तर रागवल जास्त घाबरायचं नाही, काय हे अस तुला भीती वाटते का कोणी बोलाल तर ",... आदित्य

हो..

" बापरे उगीच बोललो तुला, मला सोडणार का सीमा? ",...आदित्य

सीमा अजून त्याच्या मिठीत होती

सॉरी... सीमा बाजूला झाली, आदित्य खुर्चीवर बसला,.."बस आरामात सीमा, मी गम्मत करत होतो, आमच्या कडचे लोक चांगले आहेत",..

सीमा आता शांत झाली, ती काही बोलली नाही, चल झोप आता, दोघ आत आले सीमा झोपली, आदित्य तिच्या कडे बघत होता, हिला खूप सांभाळाव लागेल, हळव्या मनाची आहे ही, उगीच गम्मत नको करायला या पुढे,

सकाळी मीना ताई उठून आवरत होत्या, राजाही तयार झाला ऑफिसला जायला

" आई ताई नाहीतर अजिबात करमत नाही घरात, ताई येईल का आज?",.. राजा

"माहिती नाही खरंच करमत नाही आहे सीमा शिवाय, पण आता आपल्याला सवय करावी लागेल, सीमा आली तरी दोन तास येईल लगेच आदित्य राव येतील तिला घ्यायला, असंच असतं मुलींचं आयुष्य, आता तिला आपल्या घरी अस आरामात यायला जमणार नाही आता ",.. मीना ताई

" फोन करूया का आपण ताईला? ",.. राजा

"तिचा आला होता परवा फोन ती आदित्य राव त्यांच्या सोबत आहे, नको फोन करायला येईल तिचा फोन",.. मीनाताईंनी राजाचा डबा भरला

राजा ऑफिसला जायला निघायला, घरापासून थोडं दूर आला असेल तर दोन तीन मुलांनी त्याची वाट अडवली,... "तू राजा आहेस ना?",..

" हो काही काम होतं का? ",... राजा

" हो थोडं बोलायचं होतं",..

" बोला ना",.. राजा

" असं नाही थोडं महत्वाचं काम आहे आज संध्याकाळी भेटता येईल का?",..

"कशाबद्दल आहे काही समजेल का आणि तुमची ओळख सांगा",.. राजा

"काम थोडसं पर्सनल होतं त्यात तुझा ही फायदा आहे आणि आमचा ही फायदा आहे ",..

राजाला समजलं की नक्की काहीतरी गडबड आहे, नक्की विक्रम कडचे लोक दिसत आहेत हे त्यांना समजले असेल की मी अकाउंट काम करतो आता यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही,.." ठीक आहे मी तुम्हाला सांगतो संध्याकाळी भेटायचं की नाही पण तुम्ही मला तुमची ओळख सांगितली तरच आपण भेटू, अनोळखी लोकांना भेटायला माझ्याकडे वेळ नाही",

तसे ते दोघं मुलं निघून गेली काहीही बोलले नाही, कोण होते नक्की ते मुलं? राजा ऑफिसला आला, आदित्य साहेब तर सुट्टीवर होते, काय करू कोणाला सांगू ही महत्त्वाची गोष्ट आहे, हे जर सगळ्यांना सांगितलं तर ते लोक सावध होतील, मला ही गोष्ट आदित्य साहेबांना सांगायला पाहिजे, पण काय करू? करू का फोन? ते सीमा ताई बरोबर फिरायला गेले आहेत,

राजाने फोन केला नाही त्याने सचिन आणि पवार साहेबांना सांगितलं,.. "मला दोन मुलं भेटले होते, मला वाटत आहे की ते विक्रम चे मित्र असतील, माझ्याशी त्यांना बोलायचं आहे संध्याकाळी, ते भेटायला या असं म्हणत आहे",..

"बापरे कठीणच आहे हे आता, या लोकांनी अशा आयडिया काढल्या तर, तरी त्यांना माहिती आहे राजा की तू आदित्य साहेबांचा फॅमिली मेंबर आहेस, तरी त्यांची हिंमत तू आदित्य साहेबांना सांगितलं का ",... सचिन

"नाही सांगितलं तुम्हीच फोन करून द्या सचिन साहेब",.. राजा

" ठीक आहे मी बघतो, आदित्य अजून सुट्टी वर आहे",.. सचिन

आदित्य सकाळी उठला, सीमा अजून झोपलेली होती, त्याला स्वतःचाच राग आला कशाला मी उगाच सीमाला चिडवलं काल, तिच्या मनात नक्की कसलीतरी भीती आहे, ती भीती बाहेर काढायला पाहिजे, मग सीमा मोकळी राहिल, आज मी बोलणार आहे तिच्याशी, पण अजून का नाही उठली ती, आठ वाजून गेले, हिला जास्त वेळ झोपायची सवय असेल तर घरी कसा होणार? , ठीक आहे समजून घेऊ आपण, पण शाळेत लवकर जाते ती, इथे उगाच माझ्या सोबत असल्यामुळे रिलॅक्स असेल, त्याने खाली जाऊन चहा नाष्टा सांगितला

🎭 Series Post

View all