नवी आशा जगण्याची... भाग 40

खूप सुंदर अशी हिरवी साडी सीमा नेसली होती, अनघाने तिची तयारी करून दिली, दोघीजणी खाली आल्या, आदित्य शरद राव आबा सोफ्यावर बसलेले होते



नवी आशा जगण्याची... भाग 40

©️®️शिल्पा सुतार
........

सुंदर मोती कलर घागरा घालून सीमा तयार होती रिसेप्शन साठी, आताची ही तिची तयारी खूप खास होती, नवी नवरी खूपच छान दिसत होती, लवकर तयार व्हायला सांगितलं होतं, पाहुणे लवकर येणार होते, सीमा आवरुन खाली गेली, मंगळसूत्र, कुंकू खूप शोभत होतं तिला,

आदित्य तिची वाट बघत होता, सीमा आली,.. "घागरा खूपच छान दिसतो आहे सिमा, किती हा उशीर",.. आदित्य मुद्दामून चिडवत होता,

सीमा काही बोलली नाही, आदित्य सीमा स्टेजवर आले, आदित्य सीमा कडे बघत होता ते सीमाला समजलं होत, ती मुद्दामून दुसरीकडे बघत होती,

"जेवतांना कसं मला चिडवत होता, आता कशाला प्रेमाने बघतो माझ्याकडे ",..

बरेच पाहुणे येत होते, बरेचसे आबांच्या ओळखीचे होते, आबा त्यांना घेऊन स्टेजवर येत होते, सगळे भेटून जात होते, मधेच आदित्य सीमाशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण सीमा त्याच्याशी बोलायला तयार नव्हती

"काय झालं आहे सीमा तू माझ्याशी अजिबातच बोलत नाही?, राग आला का तुला? , तुझा रुसवा काढावा लागेल मला आता",.. आदित्य हसत होता

सीमा काही बोलली नाही, एक तर सगळे तिच्या कडे बघत होते आणि भेटणारे खूप येत होते,... "काय बोलणार तू मला मुद्दामून चिडवत असतोस" ,

" आता काही बोललो का मी तुला? ",.. आदित्य

" नाही... ",.. सीमा

सगळ्यांसमोर ति नॉर्मल वागत होती, पण तिने ठरवलं होतं की आदित्यला धडा शिकवायचा, आता तिला थोडसं बरं वाटत होतं

अनघा, निशा, राजा, शरद राव, सुमित सगळे आजूबाजूलाच होते, बरेचसे पाहुणे येऊन गेले, आता छान ऑर्केस्ट्रा वर गाणे सुरू होते, एकाबाजूला जेवणाची व्यवस्था होती,

" चल ना सीमा काहीतरी खाऊ आपण",.. आदित्य

" आदित्य तुला गोड आवडतं ना? खाऊन ये मग गुलाबजाम",.. सीमा

"माझ काही खरं नाही, अरे दुपारचा राग अजून गेला नाही का तुझा? सॉरी... आता आपण तुझ्या आवडीच खाऊ पावभाजी नाहीतर पाणीपुरी",.. सीमा

"अरे याला कसं कळलं मला पाणीपुरी आवडते",.. थोडीशी सीमा खूष होती, ती आदित्य बरोबर पाणीपुरी खायला गेली

" मीनाताई आता आटपायला हवं पाठवण्याची तयारी करा आणि हे बघा त्रास करून घेऊ नका, सीमा आमच्याकडे खुश राहील ",.. आक्का

" तो काही प्रश्नच नाही आक्का, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर, आमच्याकडे राहिले नाही एवढी सुखी राहील सीमा तिकडे",.. मीना ताई

बराच कार्यक्रम झाला होता, जेवण झाले होते,

आक्का सीमा जवळ गेल्या,.." सीमा आटोप आता, बॅग भर तुझी, खाली ये लगेच आवरून ",

मीनाताई आता एकदम शांत खुर्चीवर बसल्या होत्या, आता सीमा सासरी जाणार हे त्यांना सहन होत नव्हत, राजा मीनाताईंच्या आसपास होता,

सीमा निशा सामान घ्यायला रूम मध्ये गेल्या, सीमाने तिची बॅग भरली,

"निशा नको वाटत ग हे, आई बघ कशी शांत झाली आहे ",... सीमाच्या डोळ्यात पाणी होत

"हो ना काय करणार मुलींच्या नशिबात आहे हे सासरी जाण, तू रडू नको",... निशा जावून सीमाला भेटली

"तू मधुन मधुन जात जा आई कडे",.. सीमा

"हो.. आता ही आधी मी तुझ्या घरी जाणार आहे, काकू नॉर्मल झाल्या की घरी जाईन",.. निशा

" किती चांगली आहेस ग तू निशा, तुला कस वाटल होत जिजुंकडे सुरुवातील",... सीमा

"सुरुवातीला करमत नव्हत, आता काही वाटत नाही सवय झाली ",.. निशा

" हा आदित्य नुसता चिडवत असतो मला",.. सीमा

" अग मुद्दामून करत असेल तो, किती प्रेम आहे त्याच तुझ्यावर ",.. निशा

"हो ग पण मला राग येतो ना ",.. सीमा

" तू चिडू नकोस गप्प होईल तो ",.. निशा

"आता अस करेन मी लक्ष देणार नाही त्याच्या कडे ",.. सीमा

त्या खाली आल्या, रूम मध्ये आदित्य आवरत होता, तिथे आदित्य व सीमाच्या हातून छोटीशी पूजा होती, त्यानंतर सीमा सासरी जागा जाणार होती,

सगळेच भारावून गेले होते, पूजा झाली, सामान सगळं गाडीत ठेवलं गेलं, सीमा आदित्य मोठ्यांचा नमस्कार करत होते, मीनाताई राजा निशाला बघून तिला एकदम रडायला येत होत, आक्का अनघा तिची समजूत काढत होते,

"हे बघ सीमा तू असा त्रास करून घेतला तर मीनाताईंना अजून रडू येईल, चल व्यवस्थित आनंदाने भेट सगळ्यांना",.. आक्का

सीमा मीना ताईंकडे गेली, एकदम जावून त्यांना भेटली, दोघी रडत होत्या, त्यांची समजूत काढली आक्कांनी, निशा राजा दोघ रडत होते,

आदित्य त्या दोघांची समजूत काढत होता, उगीच चिडवत होता त्यांना, राजा अरे आपण रोज भेटणार आहोत ना ऑफिस मध्ये मग का रडतोस तू? , निशा तुला तुझी मैत्रीण रोज भेटणार आहे शाळेत, ती नौकरी सोडणार नाही, रडू नको बर तू,

आता आदित्य मीना ताईं जवळ आला, सीमा अजूनही त्यांच्या जवळ रडत होती,.. "आई तुम्ही सीमाची काळजी करण्या पेक्षा माझी काळजी करायला पाहिजे, माझ कस होईल आता? , तुमची मुलगी डेंजर आहे" ,

सीमाने तिथल्या तिथे आदित्यला मारल,

"हे बघा आई काही तरी सांगा आता सीमाला" ,... आदित्य

मीना ताई सीमा हसत होत्या, त्यांनी दोघांना जवळ घेतल, सुखी रहा तुम्ही दोघ , खूप आशीर्वाद दिला, सीमा जावून निशा राजाला भेटली, बाजूच्या वहिनींना भेटली, आता बर्‍या पैकी सावरली होती ती,

"राजा आईची काळजी घे",.. सीमा

" तू काहीच काळजी करू नको ताई, आईला हेच हवं होतं की तुझ लग्न व्हावं तू सुखात रहावी, आई आनंदीच आहे, तू तुझी काळजी घे, तुला खूप चांगले लोक मिळाले आहेत, जप त्यांना",.. राजाने सीमाला मिठी मारली,

आदित्य अजून मीना ताईं जवळ बसला होता,.. "आई मी आहे तुम्ही काळजी करू नका",.. राजा मीनाताईं साठी पाणी घेवून आला, राजा काळजी करू नको,

हो...

फुलांनी सजलेल्या गाडीत मागे आदित्य सीमा बसले होते , मागच्या गाडीत आबा आक्का बसले, अनघा सुमित शरद राव आजी पुढे गेले होते स्वागताची तयारी करायला,

सगळ्यांचा निरोप घेतला, गाडी निघाली, आदित्य सीमा कडे बघत होता, ती रडते का ते...

"मी ठीक आहे",.. सीमा

"तू कुठे रडणार, तू तर मला रडवणार आहे आता",... आदित्य

सीमाने परत आदित्यला मारल, आदित्यने तिचा हात पकडला, घट्ट धरून ठेवला,

आदित्य...

"आता काय झाल? हातात हात तर दे, बसू दे तुझ्या जवळ",.. आदित्य

सीमा आता लाजली होती

" लाजता ही येत का तुला?",.. आदित्य

आदित्य....

दोघ घर येई पर्यंत छान बोलत होते

मीना ताई, राजा, निशा, निशाचे मिस्टर सगळे घरी गेले, निशा जरा वेळ मीना ताईं कडे थांबून मग घरी जाणार होती, बाजूच्या वहिनी होत्या लक्ष देवून

अनघाने स्वागतची खूप छान तयारी केली होती, आदित्य सीमा आले तसे फटाक्यांची आतषबाजी झाली, दोघ खाली उतरले, घरातील माप ओलांडून कुंकू मिश्रित पायांनी सीमा आत आली, आदित्य तिच्या मागे येत होता

"दोघांनी देवघरात जा, देवाला नमस्कार करा मोठ्यांचा आशीर्वाद घ्या",... अनघा

सीमाने देवाला दिवा लावला, मिठाई देवा समोर ठेवली, बाहेर येवून सगळ्यांचा पाया पडल्या, आजींनी सीमाला ज्वेलरी बॉक्स दिला, ती अनघा कडे बघत होती,.. "घे सीमा आजी खूप हक्काची आहे, अजून मागून घे तिच्या कडून",

आबांच्या पाया पडल्या,.." आज पासून आदित्यचे जेवढे अधिकार आहेत या घरात तेवढेच तुझे ही आहेत, तुला वाटल तर शाळेत जात जा, नाही तर फॅक्टरी जॉइन कर,",

"आबा मी शाळेत जात जाईन",.. सीमा

"चालेल तुला आवडत ते कर, आणि मी आहे तुझ्या बाजूने या घरात काही लागल तर मला सांग बेटा ",.. आबा

सीमाला एकदम नानांची आठवण झाली,

आक्कांच्या पाया पडायला गेले दोघ तर आक्कांच्या डोक्यात पाणी होत, त्यांनी दोघांना मिठी मारली,.. "खूप सुखी रहा, एकमेकांना समजून घ्या ",

अनघा शरद राव दोघ हातात गिफ्ट घेवून उभे होते,..
" हे आहे तुमच हनीमूनच पॅकेज",

सीमा आदित्य एकमेकांना कडे बघत होते,

"अरे बघता काय अस? हिल स्टेशनच बूकिंग आहे, तारीख तुम्हाला ठरवायची आहे तुमच्या सोई नुसार",.. अनघा

आता आदित्य सीमाला बर वाटत होत

सीमाला छान वाटत होत इकडे, समजूतदार वाटत होते सगळे

"खूप दमली असशील सीमा, चल आराम कर",.. अनघा

"माझ सामान कुठे आहे",.. सीमा

"हो आल आहे आजीच्या रूम मध्ये आहे, मी दाखवते रूम, आजी चल ",.. अनघा

" अरे याला काय अर्थ आहे, माझ्याशी ही बोला की, लगेच सगळे सीमाच्या टीम मध्ये का?, कुठे चाललात तुम्ही?",... आदित्य

"असच असत बाबा आदित्य, ये तू इकडे माझ्या जवळ बस, माझ्याशी बोल, मी ऐकतो तुला काय म्हणायच आहे ते ",.. शरद

" जिजु बघा ना", ... आदित्य

" मी समजू शकतो, अजून एक दोन दिवस तरी तुला सीमा अशीच भेटेन, काळजी करू नकोस, जा आराम कर ",.. शरद

सीमा अनघा आजी रूम मध्ये आल्या, मोठी रूम होती ती गेस्ट रूम,.." सीमा चल आवरुन घे",

सीमाने कपडे बदलून सलवार कुर्ता घातला, फ्रेश झाली ती,

" खूप थकली असशील झोप तू, काही लागलं तर मला सांग",.. आजी आवरत होत्या, त्या स्वभावाने खूपच छान होत्या, त्या खूप सीमाची काळजी घेत होत्या

अनघाने पाण्याची बाटली रूम मध्ये आणून ठेवली, ती आजींशी बोलत होते, तेवढ्यात दारावर टकटक झाली, आदित्य आणि शरद आलेले होते,

सीमा झोपण्याच्या तयारीत होती ती परत उठून बसली, तिने आदित्य कडे बघितल, आदित्य तिच्या कडे बघत होता, बापरे काही खरं नाही,

"तुम्ही दोघं काय करत आहात इथे?",.. अनघा रागवली

"काही नाही आजीशी काम होतं थोडं",. आदित्य

"मी इथे माझ्या मनाने आलो नाही मला आदित्य बळजबरी घेऊन आला आहे",.. शरद

"काय बोलता तुम्ही जीजु, अनघा इथे आहे तर मी पण येतो अस तुम्ही बोलले होते",.. आदित्य

"दोघांनी ताबडतोब तुमच्या तुमच्या रूम मध्ये जा, शरद आदित्य इथे अजिबात थांबायचं नाही, सीमाच्या अजिबात मागे मागे करायच नाही आदित्य ",.. अनघा

" पाच मिनिट बोलायच होत",.. आदित्य

बोल..

सीमा शी...

" नाही आता नाही ",.. अनघा

" तिला काही हव आहे का ते बघत होतो मी ",.. आदित्य

" मी आहे ना इथे सीमा जवळ मी बघते सीमाकडे तू काळजी करू नकोस आदित्य ",.. अनघा

आदित्य बळजबरी आत आला,.." आजी तू माझी आजी आहेस ना तू एकदम सीमाच्या बाजूने कशी काय झालीस?, आपली दोस्ती आहे ना, मदत कर, पाच मिनिट बोलू दे सीमाशी",..

काय गोंधळ चालला आहे हे बघायला आक्का आल्या,.. "अरे तुम्ही सगळे इथेच आहात का अजून? ",.

"हो अनघा इथे आहे म्हणून शरद राव इथे आले आणि सीमा आहे म्हणून आदित्य इथून जायलाच तयार नाही",.. आजी

आक्कांनी आधी आदित्यला बाहेर काढल, झोपा आता आरामात दिवसभर थकले आहात सगळे, शरद अनघा रूम मध्ये गेले

आदित्य रूम मध्ये गेला, त्याने सीमाला मेसेज केला

"झोपलीस का... बोल ना थोड माझ्याशी ",.. आदित्य

सीमाने बघितल काही तरी मेसेज आला आहे, आज सकाळ पासून तिने फोन बघितला नव्हता, आदित्यचा मेसेज बघून तिला हसू आलं, वाटलं नव्हतं माझ्या इतका मागे मागे करेल हा, इतर वेळी उगीच चिडवतो मला तो मुद्दाम, पण कसं वाटत आहे या सगळ्या घरच्यांसमोर, त्याला सांगून बघू का? नको परत तो माझ्यावरच चिडेल

हाय..... सीमाने रिप्लाय दिला

"झोपली नाहीस का?"... आदित्य

"झोपते आहे आता",.. सीमा

"मला भेटायला येतेस का पाच मिनिट?",.. आदित्य

"नाही कसं जमेल आता, आजी आहेत बाजूला",.. सीमा

"आजी झोपली कि ये",.. आदित्य

"का पण",.. सीमाला हसू येत होत

"असंच मला बोलायच आहे तुझ्याशी, आपल ठरलं होत ना रोज अर्धा तास गप्पा मारायच्या, दोन दिवसाचा गॅप पडला त्यात",.. आदित्य

" नाही जमणार मला, एक तर हे घर माझ्यासाठी नवीन आहे, कोणाच्या कुठल्या रूम आहेत मला माहिती नाही चुकून दुसऱ्याच्या रूम मध्ये जायची मी",.. सीमा

"मी येऊ का तिकडे ",.. आदित्य

" नको रे आत्ताच तुला आईंनी बाहेर काढलं ना, आराम कर आता, उद्या सकाळी भेटू आपण, मला खूप झोप येत आहे आता, मी झोपते",.. सीमा

" एक मिनिट सीमा, थांब ",.. आदित्य

" काय आता मी झोपते", .... सीमाने फोन बंद केला,

कोणी बोलायला तयार नाही माझ्याशी, आदित्यने झोपून घेतलं

दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यनारायणाची पूजा होती, साडेनऊ वाजता गुरुजी येणार होते, सीमा सात वाजता उठली, आजी उठलेल्या होत्या, सीमाने आवरलं, अनघा आली,

"आटोप सीमा साडी बदल, जरा वेळाने लगेच पूजा आहे",..

खूप सुंदर अशी हिरवी साडी सीमा नेसली होती, अनघाने तिची तयारी करून दिली, दोघीजणी खाली आल्या, आदित्य शरद राव आबा सोफ्यावर बसलेले होते

काय करावं आता काही समजत नव्हतं सीमाला, सगळे सीमा कडे बघत होते, आक्का आजी डायनिंग टेबलवर बसलेल्या होत्या, तिकडे सीमा आणि अनघा गेल्या, किचनमध्ये स्वयंपाक सुरू होता, चहा घेतला सगळ्यांनी,

लगेच गुरुजी आले, अनघा पूजेसाठी सामान देत होती, आदित्य सीमाला पूजेला बोलवलं, दोघ येवून समोर बसले, आदित्य सीमाशी बोलत नव्हता, सीमा त्याच्या कडे हसुन बघत होती,.. "अरे काय झाल आदित्य तुला? राग आला आहे का?",

"नाही आला राग, काय काम आहे",... आदित्य

"अरे जरा प्रेमाने बोल माझ्याशी",.. सीमा

आता का...

"सॉरी अरे अस कस येणार तुला भेटायला, मला भिती वाटत होती",... सीमा

"कोणाची माझी भीती का?",.. आदित्य

"नाही घरचे काय म्हणतील याची ",.. सीमा

" अरे आपल लग्न झालं आता, तू माझी बायको आहेस, एवढी काळजी करायची नाही, आज तू खूप सुंदर दिसते आहेस, आणि आज आपण बोलणार आहोत अर्धा तास ",.. आदित्य

ठीक आहे...

आदित्यचा मूड ठीक झाला हे बघून सीमाला बर वाटल

पूजेला सुरुवात झाली झाली...

🎭 Series Post

View all