नवी आशा जगण्याची... भाग 39

आदित्य सीमा जेवायला बसले, सोबत निशा अनघा होते बाकी घरची मंडळी समोरच्या रांगेत होती, नवरदेव नवरीचे ताट छान सजवले होते, दोघ जेवायला बसले, अस चालणार नाही दोघांनी एकमेकांना घास भरवा,


नवी आशा जगण्याची... भाग 39

©️®️शिल्पा सुतार
........

आज लग्नाचा दिवस... आदित्य सकाळी लवकर उठला, खरं तर त्याला रात्री झोपच आली नव्हती, असं झालं होतं त्याला कधी हॉलवर जाऊ आणि सीमाला भेटू, आज तो दिवस आला ज्याची खूप दिवसापासून वाट बघत होता, सीमा आजपासून माझ्यासोबत या घरात या रूम मध्ये राहील, खूपच आनंदी होता तो, सीमा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू म्हणशील तसंच करू आपण, मी तुला खूप खुश ठेवेन, मी खरच खूप लकी आहे.

आज चहा नाश्ता सगळं हॉल वर होतं, आदित्य आवरून खाली आला, चहा घेतला, सगळे तयार होते

"चल आदित्य इकडे ये देवाची पूजा कर, मोठ्यांच्या आशीर्वाद घे, आपल्याला निघायला हव उशीर होतो आहे",.. आक्कांनी त्याला ओवाळल.

आदित्य देव पूजा करून आला मोठ्यांचा आशीर्वाद घेतला त्याने, बाहेर टॅक्सी आल्या होत्या, आबा आक्का आदित्य अनघा शरद राव आजी सुमित एका मोठ्या गाडीत बसले, सगळे हॉलवर निघाले.

सीमा तयार होती हॉल वर जाण्यासाठी, तिकडेच पार्लेर वाली ताई येणार होती तयारी साठी, तिथे तयारी करायची होती, मीना ताई, निशा, राजा सामानाची लिस्ट चेक करत होते

" सगळ घेतल का निशा?",... मीना ताई

"हो काकू त्या पेटीत घेण्या घेण्याच्या साड्या आहेत, इकडे पूजेच सामान आहे , हे बघा प्रत्येक सामानावर लिस्ट लावली आहे",... निशा

" तुझी खूपच मदत झाली ग निशा, नाहीतर माहिती नाही आम्ही काय केलं असत",.. मीना ताई

"काकू पुरे झाला आता आभार प्रदर्शन, लगेच नको, माझ्या बहिणी साठीच मी सगळ करते आहे",.. निशा

सामान पुढे गेल,

"चला लवकर आपल्याला नवरदेव येण्याआधी जायला पाहिजे हॉल वर, त्या लोकांच स्वागत कराव लागेल ",.... मीना ताई

" सीमा चल आटोप",.. निशा

सीमाने देवाला नमस्कार केला, दोन मिनीट ती नानांच्या फोटो समोर उभी होती , नंतर ती टॅक्सीत बसली, पूर्ण रस्त्यात ती गप्प होती, सगळे हॉल वर आले, सीमा त्यांना दोन रूम मिळाल्या होत्या, निशाने सगळ सामान नीट ठेवल, साड्या दागिने कपाटात ठेवले तिने

सीमा बसली होती, आज तिला काही सुचत नव्हत, आदित्य आला असेल का? , काय माहिती कसा जाईल आजचा दिवस, भरपूर लोक येतील, आज मला दडपण आल आहे.

"काय झालं सीमा? आज अगदी गप्प आहेस सकाळ पासून ?",.. निशा

"काही नाही... काही सुचत नाही",.. सीमा

"एक सांगू का? ",.. निशा

बोल...

"एन्जॉय कर प्रत्येक क्षण सीमा , सगळ विसरुन जा आजुबाजुला कोण आहे, फक्त तू आदित्य तुमच लग्न या कडे लक्ष दे, हे क्षण परत येत नाही, टेंशन घेतल तरी सासरी जायच आहे ना, मग आनंदी रहा ना, खूप भरभरून जग आहे तो क्षण, नंतर तुला वाटेल का लग्नात आपण एवढ्या टेंशन मध्ये होतो ",... निशा

" हो ग निशा मी कधी असा विचार केला नाही, टेंशन घेतलं उगीच ",.. सीमा

" काही टेंशन घ्यायच नाही, काय होणार आहे, काळजी करू नकोस, त्या पेक्षा मस्त रहा",.. निशा

" हो निशा आता मी बघ रीलॅक्स रहाते",.. सीमा

ये हुई ना बात....

नवरदेव आला कोणी तरी सांगायला आल, मीना ताई.. निशा खाली गेले स्वागताला, सीमा बाल्कनीतून बघत होती, बाहेर भरपूर कार थांबल्या होत्या, इतर पाहुणे उतरले मागच्या गाडीतून अनघा, शरद जिजू, आदित्य, आबा आक्का, आजी उतरले,

व्हाइट कुर्ता पायजमा मध्ये आदित्य कमालीचा हॅन्डसम दिसत होता, सीमा त्याच्या कडे बघत राहिली, तिला तीच हसू आल, मला नक्की हव तरी काय? दोन दिवस आदित्य भेटला नाही तर अजिबात करमत नव्हत, आता तो दिसला की घाबरायला होत आहे,

स्वागत झाल सगळे आत गेले, आदित्य इकडे तिकडे बघत होता, वाटत तो मी कुठे आहे हेच शोधतो आहे, सीमा एकटी लाजली होती,

रूम मध्ये नाश्ता आला, आता खाली जाऊन नाष्टा करायला वेळ नव्हता, लगेच पार्लर वाली ताई आली, आजची तयारी मोठी होती, नाष्टा करत असतांनाच अनघा आली, सीमा जावून तिला भेटली, तिच्याबरोबर सीमाचा शालू तिची सगळी ज्वेलरी होती, तिने ते सगळे सामान निशा कडे व्यवस्थित दिलं, निशा नेते स्वतःजवळ ठेवलं,
मलाही तयार व्हायचं आहे आदित्यला तयार करायचं आहे मी निघते सीमा, आदित्यच नाव ऐकुन सीमा खुश होती, अनघा लगेच चालली गेली,

मीनाताई खाली कामातच बिझी होत्या त्यानंतर त्या वरती आवरायला आल्या

आदित्यच्या रूम मध्ये खूप गडबड सुरू होती, आक्का आजी अनघा सगळ्या आवरुन रेडी होत्या, मित्र आदित्यची तयारी करून देत होते,

"चला लवकर खाली वरात काढायची आहे",.. आक्का

आबा खाली आलेल्या पाहुण्यांशी बोलत होते, सचिन राजा त्यांच्या सोबत होते, काका काकू विक्रम आले, ते पूर्ण वेळ खुर्ची वर बसले होते,

आदित्य तयार होऊन खाली आला, लगेच वरात निघणार होती, त्याला अजून सकाळ पासून एकदाही सीमा दिसली नव्हती, तो खूप बैचेन होत होता,

"अनघा ताई इकडे ये सीमा कुठे आहे?, सकाळ पासून दिसली नाही ",.. आदित्य

अनघा हसत होती,... "आहे तुझी सीमा रूम मध्ये, तयार होते आहे, मी भेटून आली तिला आणि आज ती खूप सुंदर दिसते आहे",...

सीमा तयार होत होती, बाहेर बॅन्ड वाजत होता, मीना ताई रेडी होत्या,.. "निशा आवर आपल्या खाली स्वागताला जायच आहे ",

हो काकू...

देवळात जाऊन यायला अर्धा एक तास लागणार होता, बॅंडवर छान गाणे वाजत होते, त्या तालावर लहान मुले नाचत होते, एकदम सुंदर वातावरण तयार झालं होतं, आदित्य मित्रांच्या मदतीने घोड्यावर बसला, बाकी सगळे पुढे चालत होते, पाच मिनिटा वरच मंदिर होतं, तिथे दर्शन घेऊन यायचं होत आणि लगेच लग्न लागणार होतं, मंदिरापर्यंत वरात पटकन गेली, खाली उतरून आदित्यने दर्शन घेतलं, अनघा शरद राव सोबतच होते, वरात हॉल कडे निघाली, आता सगळ्यांची नाचायला सुरूवात केली, सगळे एकमेकाला ओढत होते, आक्का आबा आजी अनघा शरद सगळेच नाचत होते, हॉल जवळ घरात आल्यानंतर त्यात निशा निशाचे मिस्टर, राजा सगळेच नाचण्यात सामील झाले, काका काकू विक्रम लांबून गम्मत बघत होते, अनघा त्यांना बोलवत होती ते आले नाहीत.

सीमाची तयारी झाली होती, ती खिडकीतून गम्मत बघत होती, खुपच मजा येत होती, खाली बँड वर तिची आवडती गाणी वाजत होती, जशी वरात थोडी पुढे आली तसा तिला आदित्य दिसला घोड्यावर बसलेला, तो खूपच छान दिसत होता, मोती कलरची शेरवानी त्यावर तिच्या शालूला मॅचींग लाल दुपट्टा.. फेटा बांधलेला आदित्य खुपच छान दिसत होतं, ती एकदम मागे झाली नको, उगीच माझी दृष्ट नको लागायला, दारावर वरात आली, मीनाताईंनी आदित्यची नजर काढली, बाजूच्या वहिनींनी त्याला ओवाळले, स्वागत झालं, निशा होती सोबत

आदित्य दरवाजातच सीमाची वाट बघत होता, कधी येते सीमा ये लवकर, सकाळ पासून कुठे आहेस तू?, तुला कधी बघु अस झाल आहे मला,

निशा पळत वरती आली, सीमा रेडी होती, लाल रंगाचा शालू खूप छान दिसत होता, हातात हिरवा चुडा, केसांची छान हेअर स्टाईल, मुंडावळ्या, केसात गजरे माळलेले, भरपूर दागिने घातले होते तिने, आज खूपच सुंदर दिसत होती सीमा, अगदी अप्सरा, डोळ्यात आदित्य विषयी प्रेम भरल होत तिच्या, गालावर वेगळीच लाली होती तिच्या , ऋदयात धड धड होत होती

"सीमा लवकर चल आदित्य वाट बघतो आहे",.. निशा

"आतच जायच का? हॉल मध्ये आला का आदित्य?",... सीमा

"हो आला आहे तो आणि तुलाच शोधतो आहे सारखा, चल लवकर",.. निशा

"निशा मला खूप धड धड होते आहे",.. सीमा

"होत अस आटोप लवकर सगळे दारात उभे आहेत",... निशा

सीमा मागच्या जिन्याने हॉलचा दरवाजा पर्यंत गेली, तिथे सगळे उभे होते, आदित्य गप्पांमध्ये गुंग होता, सीमा आल्यानंतर सगळे शांत बसले, आदित्य सीमा कडे बघत बसला, किती सुंदर दिसते आहे ही आज बापरे, दोन दिवसात काय झाल अस एकदम रूप पालटल हीच, आज तर हद्द झाली, कोणी किती सुंदर दिसावा, आणि हिला पंधरा दिवसाचा वेळ हवा आहे, कस होणार माझ एवढ्या सुंदर मुलीसोबत राहतांना

आदित्यने हात पुढे केला, सीमाने त्याच्या हातात दिला, पुढे फुलाच्या पाकळ्या टाकल्या जात होत्या, सीमा आदित्य स्टेज कडे जात होते

वेगळाच प्रवास सुरू झाला होता तिच्या आयुष्यातला, सीमा भारावुन गेली होती, इतके दिवस ती कोणाची तरी मुलगी म्हणून जगत होती, आता ती कोणाची तरी सहचरणी होणार होती, स्वतःच्या हक्काच्या घरी जाणार होती, त्यादृष्टीने तिचा प्रवास सुरू झाला होता, थोड्या वेळापुरती ती आता मीना ताई निशा राजाची सोबती होती, आता लग्न लागेल आणि ती आदित्यच्या ग्रुप मध्ये चालली जाईल, त्या घरची लक्ष्मी, क्षणात माहेर वासीण होईल ती, सगळ मागचा सोडून पुढचा प्रवास आहे हा, खूपच मन भरुन येत होतं तिचं, पण निशाने सांगितल्याप्रमाणे ती प्रत्येक क्षण एन्जॉय करणार होती,

आदित्यला आता या क्षणाला काही सुचत नव्हत, हातात सीमाचा हात होता, आवडत्या व्यक्ती बरोबर त्याचं आता जीवन सुरू होणार होत, त्यामुळे तो खूप खुश होता

दोघ स्टेजवर आले, अंतरपाट धरला गेला, मंगलाष्टकं सुरू झाली

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।
बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं ||
लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् |
ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मङ्गलं || १ ||

सीमाच मन खूप भरून आलं होतं, एक नवीन जबाबदारी आहे आता ही, मी खूप नीट वागणार आहे आदित्य, मी खूप व्यवस्थित साथ देईन तुझी,

आदित्य सारखा सीमा उभी होती तिकडे बघत होता, अंतरपाटाच्या त्या बाजूला माझी सीमा आहे, तुला खूप सुखी ठेवणार आहे मी, मला माहिती आहे तुझं मन अजून या लग्नाला तयार नाही, पण तुझी समजूत काढेन मी, खूप सुखी राहू आपण,

आदित्यला कल्पना नव्हती कि सीमालाही आता तो आवडू लागला आला होता, सीमा त्याला हे अजुन सांगणार नव्हती, थोडी गम्मत बघणार होती त्याची, थोडा त्रास देणार होती ती त्याला

आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।
गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।।
दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी ।
वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।। ८ ।।

लग्न लागलं अंतर पाठ दूर झाली, आदित्य सीमाने एकमेकाला हार घातले, सगळेजण भारावून गेले होते दोघांनी नि एकमेकांना फुलांचा गुच्छ दिला, लगेच थोड्या वेळात पूजा सुरू होणार होती, दोघ खुर्चीवर बसले, सगळे शुभेच्छा देत होते

गुरुजींनी पूजा सुरू केली, होम झाला, सप्तपदी झाली, आदित्यने सीमाला मंगळसूत्र जोडवे घातले, अनघा निशा पूजेच्या ठिकाणी होत्या, गुरुजींना काय हवं काय नको ते बघत होत्या, मंगळसूत्र खूप छान दिसत होत सीमाला, खूपच छान तेज आलं होत सीमाच्या चेहऱ्यावर,

मीनाताई, राजा तिथेच उभे होते, सगळे कार्यक्रम ते बघत होते

विधी होत असतांना मीनाताई सीमा दोघींच्या डोळ्यात आसू होते पण लगेच दोघींनी सावरलं, आदित्य त्या दोघींकडे लक्ष देऊन होता

एका बाजूला जेवणाच्या पंगती बसत होत्या, आता घरच्यांची पंगत बसली, आजचा मेनू खूप छान होता, ट्रॅडिशनल जेवणासोबत वेगवेगळे प्रकारही होते, ज्याला बुफे हव तो तिकडे जावून पण जेवु शकत होते,

आदित्य सीमा जेवायला बसले, सोबत निशा अनघा होते बाकी घरची मंडळी समोरच्या रांगेत होती, नवरदेव नवरीचे ताट छान सजवले होते, दोघ जेवायला बसले, अस चालणार नाही दोघांनी एकमेकांना घास भरवा,

"मला गोड जास्त आवडत नाही, छोटा घास दे आदित्य",.. सीमा

"अरे बापरे मला गोड खूप आवडत सीमा, आज तुला अख्खा गुलाबजाम खावा लागेल ",.. आदित्य मुद्दाम तिला चिडवत होता

"अरे पण मला नाही आवडत",... सीमा

"नवर्‍याची आवड आता तुझी आवड",... आदित्यने तिला गुलाबजाम भरवला

आदित्य जास्त करतो , काही चांगला वगैरे नाही हा, उगीच सकाळी एवढ प्रेम वाटल त्याच्या विषयी.... सीमा रागात होती

सीमाला मुद्दाम त्रास देणार मी, एक गोष्ट समजली गोड आवडत नाही ते,... आदित्य खुश होता

व्यवस्थित जेवण झालं, आज तिथे संध्याकाळी रिसेप्शन होतं, तेव्हा बरेच आबांच्या ओळखीचे लोक येणार होते, सगळे कार्यक्रम जवळजवळ आटोपले होते,

"आता जरा वेळ आराम करा, अर्ध्या तासाने परत तयारी करावी लागेल",... अनघा

" आदित्य चल तुही आराम कर आता" ,... आक्का

आदित्यला सीमाला सोडून रूम मध्ये जायचं जीवावर आलं होतं, तो जातच नव्हता, सीमा खूप थकली होती आता, सीमा निशा मीनाताई रूम मध्ये आल्या...






🎭 Series Post

View all