नवी आशा जगण्याची... भाग 38

मांडवातील सगळ्यांनी सीमाला एकेक घास भरवला, अरे किती गोड खाणार आहे मी, कुणीतरी भाजी पोळीचा घास खाऊ घाला, सगळे हसत होते


नवी आशा जगण्याची... भाग 38

©️®️शिल्पा सुतार
........

आदित्य सोबत डान्स करतांना सीमा खूप खुश होती, ते आदित्यला जाणवत होत, चला थोडी तरी ठीक आहे सीमा मी मनवेन तिला बरोबर,

कपल डान्स झाल्यानंतर सगळ्यांनीच डान्स करायला सुरुवात केली, आबा आक्का एन्जॉय करत होते,

"अहो विक्रम काका काकू कोणी आल नाही",.. आक्का

"हो ना माझ ही ते लक्ष्यात आल होत, जावू दे त्यांनी कडवट पणा घ्यायचा ठरवला आहे आता, तू काळजी करू नकोस ",... आबा

आता सगळे दमले होते, सगळ्यांचा मोर्चा जेवणाकडे गेला

जेवणाला एकदम वेगळा मेनू होता तरुणाईला आवडेल असा पावभाजी, नूडल्स, पाणीपुरी, पुलाव, मसाले डोसा आणि आईस्क्रीम हा प्रकार सगळ्यांनाच खूप आवडला, नाहीतरी आता चार-पाच दिवस कार्यक्रम होते, तेव्हा ट्रॅडिशनल जेवण होतं,

सीमा आदित्य अनघा शरद निशा सचिन राजा सगळे सोबत बसले होते जेवायला, सगळ्यांनाच काय हवं नको ते आदित्य स्वतः बघत होता, मोठ्यांना जागेवर वाढून दिल होत, टेबल खुर्चीची अरेंज मेंटही होती, सुमीत सीमाच्या सोबत होता, कितीतरी वेळा अनघाने त्याला जवळ बोलावलं तरीसुद्धा सुमिती येत नव्हता, मी मामी सोबतच थांबणार,

"राहू द्या हो ताई माझ्यासोबत सुमितला, खूप गोड आहे तो ",.. सीमाला ही तो खूप आवडला होता

"दोन चार दिवसानी कळेल तुला सीमा त्रास देतो तो खूप",.. अनघा

आदित्य बघत होता की सीमा खूप प्रेमळ आणि सगळ सांभाळून घेणारी आहे

जेवण झालं बराच वेळ झाला होता,

चला आता निघायला हवं, उद्या परत मेहंदीचा कार्यक्रम आहे, सगळे निघाले, आदित्य सीमाच्या मागे-मागे करत होता, ती जिथे जाईल तिथे तो सोबत होता, सगळ्यांच्या चेहऱ्यावर छान हसू होतं

"आदित्य तू मला काही सूचु देणार आहे का? असं का मागेमागे येतो आहे, सगळे बघत आहेत",.. सीमा

"बघू दे मला काही फरक पडत नाही, मी माझ्या बायकोच्या मागे मागे आहे, काही प्रॉब्लेम आहे का? ",.. आदित्य

"आदित्य तू जातो आहे का सीमाच्या घरी? ",... शरदने बरोबर टोमणा मारला, सगळे हसत होते

" अहो जिजू आता आमची भेट दोन दिवसांनी होणार आहे, सरळ लग्नात , मला बोलु द्या सीमाशी",.. आदित्य

सीमा, मीना ताई, राजा, निशा घरी आले,

"छान झाला प्रोग्राम आजचा आणि सरप्राईज ही मिळाल आई ",... सीमाने मीना ताईंना मिठी मारली, आई love you,

"पुरे आता चला आवरुन झोपा आता ",... मीना ताई

मीना ताईंना माहिती होतं की खूप बोलत बसलो तर सीमा रडायला लागेल, त्यापेक्षा इथेच थांबवलेल बर

सीमाला झोप येत नव्हती, आजचा संगीतचा प्रोग्राम किती छान झाला, आदित्य किती काळजी घेतो माझी, न ठरवता आमच्या डान्स स्टेप्स जुळत होत्या, आदित्य किती जवळ होता माझ्या, त्याच्या कडे बघायची हिम्मत होत नव्हती माझी, आणि तो किती मागे मागे करत होता माझ्या, सीमाला खूप हसू येत होत

निशा तिच्या घरी फोन वर बोलत होती, ती आत आली,... "सीमा मस्त झाला आजचा प्रोग्राम, अंगठी छान आहे तुझी" ,

"निशा एक विचारू का?",.. सीमा

हो..

"कस ग अस एक अनोळखी व्यक्ती आपल्याला एकदम एवढी जवळची वाटते ",.. सीमा

"अस असत ते, खूप मनापासून आपण सगळे नाते स्विकारतो, सीमा मी खूप खुश आहे तुझ्या साठी, आदित्य चांगला मुलगा आहे, आवडायला लागला वाटत नवरा",...निशा

"हो चांगला आहे तो, त्याच्या घरचे चांगले आहेत, पण तू लगेच त्याला रीपोर्ट करू नको",... सीमा

"नाही सांगणार ही स्पेशल गोष्ट आहे तूच सांग आदित्य ला",... निशा

"निशा मला जमेल का आदित्य सोबत रहाण? म्हणजे ते लोक श्रीमंत मी साधी",.. सीमा

"तसे ते लोक साधे वाटले ग मला, तुझी नणंद किती काम करत होती",... निशा

हो ना..

"झोपा मुलींनो काय गडबड सुरू आहे",.. मीना ताई

"आई तू ही ये ना आमच्यात",.. सीमा

"नको उद्या खूप काम आहेत झोपा आता, लाइट बंद करा",.. मीना ताई
........

आदित्य कडे मेहेंदीची तयारी सुरू होती, आता पर्यंत झालेल्या प्रोग्रामला काका काकू विक्रम आले नव्हते, आज काकू आल्या होत्या जरा वेळ,

आक्का अनघा आजी इतर नातलग मेहंदी लावणार होते आणि आदित्यच्या हातावर पण एक टिपका काढणार होते कारण तो ऐकतच सांगत नव्हता, शगुन म्हणून थोडीशी मेहंदी टच करणार होते

आदित्यची फोनवरच गडबड सुरू होती,

"काय चालू आहे आदित्य तुझं सकाळपासून?",.. अनघा

"मी फोटोग्राफरला फोन करतो आहे, आज सीमा कडे मेहेंदीचा मोठा कार्यक्रम आहे तर त्याला तिकडे पाठवतो आहे म्हणजे तो मेहंदीचे फोटो व्हिडिओ शूट करेल",... आदित्य

"तू जातोस का? एक फेरी मारून ये तिकडे ",... शरद

सगळे हसत होते..

" शरद तू सारख चिडवू नकोस आदित्यला",.. अनघा

"हो ना ताई माझी छान आहे",.. आदित्य
.......

सकाळी सीमा आवरुन रेडी होती, नाश्ता झाला, आज मेहंदी... सुंदर असा हिरवा ड्रेस तिने घातला होता, लाल रंगाची टिकली त्याच्यावर खूप छान दिसत होती, आज अगदी साधीच तयार झाली होती सीमा, पण खूपच सुंदर दिसत होती ती, मेहेंदी आर्टिस्ट येणार होत्या थोड्या वेळात, मीना ताई.. निशा रेडी होत्या, सीमा देवाला नमस्कार करून घे,

फोटो ग्राफर मेहंदी काढणाऱ्या ताई सोबतच आल्या, आधी आपण सीमाचे फोटो काढून घेऊ, मग मेहंदी काढायला सुरवात करू, एक एक पोज फोटोग्राफर सांगत होते, सुरेख फोटो निघत होते, निशाने ही दोन-तीन सीमाचे फोटो घेतले लगेच आदित्यला पाठवून दिले

मेहंदी काढायला सुरुवात झाली फोटोग्राफरने सगळ्यांचा व्हिडिओ घेतला, उत्साहाचं वातावरण होतं, दोन तीन मुली अजून आलेल्या होत्या, त्या बाकीच्यांच्या हातावर मेंहेंदी काढत होत्या

मेहंदी है रचने वाली
हातो मे गेहरी लाली
कही सखिया अब कलिया
हाथो मे खिलने वाली है
तेरे मन को जीवन को
नयी खुशिया मिलने वाली है
मेहंदी है रचने वाली

मीनाताईंच्या डोळ्यात पाणी होतं, त्या पटकन किचनमध्ये चालल्या गेल्या, राजाने बघितलं, तोही मागे गेला, मीनाताई त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होत्या, राजाने त्यांना गप्प केलं, प्यायला सरबत दिलं, मीनाताईंनी तोंड धुतलं, त्या फ्रेश होऊन बाहेर आल्या, जसं काही झालंच नाही असं वावरत होत्या त्या

खूप बारीक आणि सुरेख मेहंदी काढली होती, डिझाईन मध्ये आदित्यच नाव होत, सीमा खूष होती, मध्येच आदित्यचा व्हिडिओकॉल घेऊन गेला, त्यांच्या घरचे सगळे कॉल वर होते, खूपच चिडवाचिडवी आणि गप्पा सुरु होत्या

सगळ्यांनी मीनाताईंना मेहंदी लावायचा आग्रह केला त्यांनी ही मेहंदी काढली, तिकडे आक्का अनघा आजींनी मेहंदी काढली, आदित्य तर नाही म्हणत असतांना थोडीशी मेहंदी काढली,

"अरे तुम्ही सगळ्यांनी मेहंदी काढली तर आम्हाला जेवायला कोण देणार",.. शरद परत सगळ्यांची गंमत करत होते

"आज तुम्ही लोकांनी वाढायचं आणि आम्ही जेवणार",.. अनघाने बरोबर उत्तर दिलं

"ये इकडे अनघा मी भरवतो तुला ",.. शरद

"शरद अरे काय? सगळे आहेत इथे",.. अनघा लटक्या रागात होती

" वाह जिजु बरोबर आहे, छान सुरु आहे तुमच",... आदित्य

" तू ही शिक जरा माझ्या कडून काही आदित्य ",... शरद

लेकीच छान चालल आहे, जावई बापू नीट काळजी घेता आहेत, आबा आक्कांच्या चेहर्‍यावर समाधान होत
............

सीमा निशा बाकीच्यांची मेहंदी काढून झाली, मीनाताईंच्या एक हात रिकामा होता, त्यांनी एकाच हाताला मेहंदी काढली होती, बाकीच्या सगळ्यांना त्यांनी आणि राजाने मिळून फराळाच्या डिश दिल्या,

मेहंदी काढणार्‍या मुलींना ड्रेस मटेरियल दिले, त्यांनी सुरुवातीला घ्यायला नकार दिला, पण मीनाताईंनी आग्रह केल्याने त्यांनी घेतले,

दुसऱ्या दिवशी हाताला पाणी लावायचं नाही, खोबऱ्याचं तेल लावा, लिंबाचा रस साखर लावा, अशा बर्‍याच सूचना देऊन मेहंदी वाल्या ताई गेल्या,

मीनाताई स्वतःच्या हाताने सीमाला जेवण भरवत होता, निशाला ही खाऊ घालावे लागत होतं,

"काकू मी माझे इथे खूप लाड करून घेते आहे",.. निशा

"मग हे पण तुझं माहेर आहे निशा, जरी सीमा तिकडे राहायला गेली तरी तू इकडे यायचं आहे मला भेटायला",.. मीना ताई

"हो काकू मी नेहमी येईल आपण खूप मज्जा करू",.. निशा

" तू येशील तर मी पण येईल मग आपण सगळेच मिळून मजा करू",.. सीमा

मीना ताई बाजूच्या वहिनी सोबत बोलत होत्या

" आदित्य सोडेल का तुला पण सीमा, तुला नाही येता येणार ",.. निशा

" निशा... आई ऐकेल ",.. सीमा रागवत होती

" नाही काकू गप्पा मध्ये गुंग आहेत",.. निशा

तो दिवस आरामातच गेला हाताला मेहंदी असल्याने काहीही करायचं नव्हतं

दुसऱ्या दिवशी हळद होती आणि लगेच बांगड्या भरायला सगळ्यांना बोलवलं होतं, आक्कांनी सीमाच्या बांगड्या पुढे पाठवल्या होत्या, त्यातच चुडा घालायचा होता, दुपारी चार वाजता हळद होती, त्यानंतर संध्याकाळी सगळे कार्यक्रम होते, आधी आदित्यकडे हळद होती, मग तिकडची उष्टी हळद इकडे येणार होती, मग इकडे सीमाची हळद होती,

आदित्यला अनघा शरद राव यांनी हळद लावली, आबा आक्का आजी खूप खुश होते, आजीने छान गाण ही म्हटलं, अनघा शरद राव हळद घेवून सीमा कडे जाणार होते, सुमित घरी होता आक्कां जवळ

सीमा कडे आजूबाजूच्या सगळ्या येऊन थांबल्या होत्या, पिवळी साडी नेसलेली सीमा खूप छान दिसत होती, आज तिने फुलांचा साज घातला होता, पिवळ्या साडीवर पांढरी फुलं असलेला साज होता, हार, बिंदी, हाताला कंगन..

फोटोग्राफर आले होते, खूप फोटो काढले सीमाचे,

अनघा शरद राव हळद घेऊन आले, हळदीचा कार्यक्रम सुरू झाला, अनघा शरद राव यांच्या सोबतही फोटो काढले, मीनाताई राजा सोबत फोटो काढले होते, थोडा वेळ थांबून आणि अनघा आणि शरद राव घरी निघाली

मुलीचं कौतुक बघून मीनाताईंना खूपच आनंद झाला होता, रोज त्या सीमाची दृष्ट काढत होत्या,

हळद लावायला सुरुवात झाली बाजूच्या वहिनी आणि त्यांचे मिस्टर यांच्या हातून हळद निघाली होती, त्यांनी सुरुवातीला हळद लावली, नंतर सगळ्यांनीच एकामागून एक हळद लावली, चेष्टा-मस्करी सुरू झाली, एकमेकाला हळद लावायला उधाण आलं होतं,

शेवटी मीना ताई.. राजा हळद लावायला आले, इतक्या वेळ थांबून ठेवलेले आसू आता सीमाची साथ देत नव्हते, सीमा रडायला लागली,

"चूप सीमा अस रडायच नाही अग स्वप्नात खर वाटणार नाही अस सासर मिळाल तुला, आदित्य समजूतदार आहे, सगळ सांभाळेल तो, लांब नाही तुझ सासर अजिबात काळजी करायची नाही आता, मीना ताई तुम्ही रडू नका बर ",... वहिनी

राजा निशा रडत होते,

"पुरे आता रडा रडी आता कोणी रडल तर त्यांना शिक्षा होईल",.. बाजूच्या वहिनींनी माहोल जरा हलका केला, सगळे नॉर्मल झाले, त्यांनी सगळ्यांना सरबत दिलं, आता जर कोणी रडलं तर त्यांना पार्टी द्यावी लागेल, सगळ्यांनी ते मान्य केलं,

मीनाताई हसत होत्या हे बघून राजा आणि सीमाला बरं वाटलं

सीमाला मुंडावळ्या बांधण्यात आल्या, निशाने तिचे खूप फोटो घेतले, आदित्यला पाठवून दिले, तिकडं आदित्यचेही फोटो आले होते, खूप छान दिसत होता तो

ढोलच्या तालावर सगळे नाचत होते, सुंदर असा हिरवा चूडा सीमाच्या हातात भरला, खूप वेगळच तेज आल होत तिच्या चेहर्‍यावर, कलवरी कोण आहे चला पुढे या बांगड्या भरायला, सगळ्यांनी निशाला पुढे केले, निशा सीमा कडे बघत होती

" उठा मॅडम बांगड्या भरून घ्या",. सीमा

निशाने बांगड्या भरल्या, एक एकीने नंबर लावला, सगळे खूप खुश होते, संध्याकाळी आचार्याने जेवण बनवलं होतं, साधा बेत होता, मसालेभात, वांगे बटाट्याची भाजी, जिलेबी पुऱ्या, सीमाला पूर्वीपासून खूप आवडायचा हा बेत म्हणून मुद्दामून हळदीच्या दिवशी हाच स्वयंपाक ठेवला होता

मीनाताईंनी सीमाला भरवायला घेतलं,

"आई अगं मी जेवते माझ्या हाताने",... सीमा

"नको ग मला खाऊ घालू दे तुला",.. मीना ताई

"एका अटीवर अजिबात रडायच नाही",.. सीमा

"नाही रडणार मी, राजा तू ही ये",.. मीना ताई

"माझे लाड कोणी करत नाही, नुसते सीमा ताईचे लाड सुरू आहेत",... राजा

" तू ही लवकर लग्न कर मग राजा, तुझे ही होतील लाड",.. निशा

मांडवातील सगळ्यांनी सीमाला एकेक घास भरवला, अरे किती गोड खाणार आहे मी, कुणीतरी भाजी पोळीचा घास खाऊ घाला, सगळे हसत होते

निशा सीमा बोलत बसले होते, कार्यक्रम छान झाला ना, मीना ताई त्यांच्यात येवून बसल्या,..." उद्या लवकर रिसॉर्ट वर जायचं आहे, आराम करा आता",..

"आई ये ना जरा, एक सांग तुला कस वाटत होत तुझ लग्न होत तेव्हा",.. सीमा

"लहान होते मी तेव्हा, पण तुझ्या आजीने नानांनी खूप छान समजून घेतल मला, कधीच काही बोलले नाहीत ते आज ते दोघ हवे होते",... मीना ताई

हो ना...

मीनाताई जुन्या गोष्टी सांगत होत्या, सगळे रमले होते त्यात, चला आता खूप उशीर झाला आहे, उद्या लग्न आहे झोपा लवकर...

सीमाला नानांची खूप आठवण येत होती, आशिर्वाद द्या नाना मला, माझ्या सोबत रहा, सीमाचे डोळे भरून आले होते, तिला जरा वेळ एकटीला राहायच होत वडलांच्या आठवणीत.....



🎭 Series Post

View all