नवी आशा जगण्याची... भाग 37

आदित्य सीमा यांनी कपल डान्सला सुरुवात केली, आदित्य सीमा एकदम जवळ होते, सीमा I love you, सीमा खाली बघत होती

नवी आशा जगण्याची... भाग 37

©️®️शिल्पा सुतार
........

मीनाताई सीमा घरी आल्या,.. "त्या लोकांनी खुपच दागिने घेतले",..

"हो ना मी पण तेच बघत होती, पण चांगली झाली खरेदी, साड्या घेताना त्यांनी असंच केलं होत, तुझ्यासाठी खूप साड्या घेतल्या",.. मीना ताई

सीमा आणि मीनाताई ही खूप खूष होत्या, छान खरेदी झाली,

"आई आपल्यालाही द्यायला घ्यायला साड्या घ्याव्या लागतील",..

" हो मी पण तोच विचार करत होती, तुझ्या सासू बाई, अनघा, आजी, आजूबाजूच्या बायका, नेहा सगळ्यांना साड्या घेऊन टाकू चांगल्यातल्या ",.. मीना ताई

"हो आई",..

राजा ऑफिस मधून आला,.. "काय चालल आहे, झाली का खरेदी?, काय काय आणलं तुम्ही दोघींनी? कुठे कुठे गेले होते",.. राजा

मीनाताईंनी नेकलेस आणि मंगळसूत्र दाखवलं,

" तुझ्यासाठी काही नाही आणलं का आई? ",.. राजा

" माझ्यासाठी काय गरज आहे",.. मीना ताई

"असं कसं आणायला पाहिजे होत, आपण असं करू उद्या दोघं जाऊ आणि तुझ्यासाठी सुद्धा एखादा नेकलेस सेट घेवू ",.. राजा

" नाही मला नको आहे ते काही",.. मीना ताई

"सॉरी मला ही लक्ष्यात आल नाही तिकडे दुकानात, आई मी लक्ष द्यायला हव होत, आपण जाऊ उद्या ",.. सीमा

" त्यात काय एवढं सीमा एवढी काळजी करू नकोस माझ्या कडे आहे नेकलेस ",.. मीना ताई

" आम्ही ऐकणार नाही, माझ्या कडून आणि राजाकडून घे तो नेकलेस सेट ",.. सीमा

"हो चालेल, आपण दोघे पैसे एकत्र करू आणि आईसाठी नेकलेस सेट घेऊ",... राजा

" इतर खर्च नाही पण आहेर देण्यासाठी साड्या लागतील, त्या आणायच्या आहेत" ,... सीमा

" हो जावू... तस तर आदित्य साहेब सगळा खर्च करता आहेत, पैसे द्यायचा प्रयत्न केला तर त्या आजी खूप राग रागवतात ",.. राजा

" नको काढू तू परत पैशाचा विषय राजा जाऊ दे, करत आहे तर करू दे खर्च, नंतर पुढे काही प्रसंग आले तर परतफेड करता येईल, आता उगाच मन नको दुखायला",.. सीमा

दोन दिवसांनी कार्यक्रम सुरू होणार होते, उत्साहाच वातावरण होत

आदित्य मित्रांसोबत फार्म हाऊसला पोहोचला, घरातुन निघतांना त्याने आबांना सांगितल होतं की त्याची आज बॅचलर्स पार्टी आहे, यायला थोडा उशीर होईल,

" ड्रायव्हरला सोबत असू दे, बॉडीगार्ड सोबत असू दे",.. आबा

" हो आहेत ते दोघं सोबत ",.. आदित्य

सचिन अजून बरेच मित्र आलेले होते, येतानाच ते सगळे जेवण घेऊन आले होते, खूप गप्पा रंगल्या कॉलेजचे किस्से एकमेकांना सांगून सगळे हसत होते, चला आता आपल्यातला एक मित्र तर लग्नाच्या बेडीत अडकला,

"आता तुम्ही सगळ्यांनी पटापट नंबर लावा आता ",.. आदित्य

" आम्हाला आमच स्वातंत्र प्रिय आहे ",..

"कुठे जाणार आहात फिरायला दोघ",..

चिडवा चिडवी सुरू होती, खूप छान गप्पा सुरू होत्या त्यांच्या,

"बर झाला पण हे गेट-टुगेदर ठरवलं बऱ्याच दिवसांनी भेटतो आहोत आपण सगळे खूप छान वेळ गेला ",... आदित्य

हो ना...

रात्री उशिराने आदित्य घरी आला, आज सीमाशी भेट झाली नाही, चुकल्या चुकल्या सारखं वाटत होत , परवापासून सगळे कार्यक्रम सुरू होत आहेत, तेव्हा भेट होईलच सीमाशी, पण विशेष बोलण होणार नाही, सगळे असतिल

आदित्यने बघितलं सीमा ऑनलाईन दिसत होती, त्याने सीमाला फोन लावला, आदित्यचा फोन बघुन सीमाला छान वाटलं ती हळूच पुढच्या खोलीत आली

"आज अजून जागी आहेस तू सीमा ? ",... आदित्य

" हो थोडं महत्वाचं काम सुरू होतं शाळेचं, संध्याकाळी बाहेर गेलो होतो ना, त्यामुळे वेळ मिळाला नाही",.. सीमा

"कुठे गेले होते तुम्ही सगळे",.. आदित्य

"आम्ही ज्वेलरी घ्यायला गेलो होतो",.. सीमा

"मजा आहे तुमची, काय काय आणलं मग",.. आदित्य

" खूप ज्वेलरी घेतली, मंगळसूत्र नेकलेस",.... सीमा ,

" अजून काय घेतलं? माझ्या साठी काही घेतल का? ते नसेल लक्ष्यात तुझ्या",.. आदित्य

" अरे आदित्य मला काय माहीती तुला काय हव ते, आपण दोघ जाऊ मग घेवू तुझ्या साठी काय हव ते ",.. सीमा

" असू दे आता काय मी म्हटल्या वर, मला राग आला आहे आता " ,... आदित्य

" बापरे आता काय करू या ",.. सीमा

" काहीतरी गिफ्ट घे मला ",..

बर...

"तुला माझ्याकडून काय हवं आहे प्रेझेंट",.. आदित्य

"काही नको आत्ताच भरपूर ज्वेलरी घेतली आहे ती कधी घालणार आहे",.. सीमा

" बघ ह लक्ष्यात ठेव, नाही तर नंतर काही घेत नाही म्हणून छळशील मला, किती चांगली बायको मिळाली आहे मला बापरे ",.. आदित्य

सीमा छान हसत होती

मधले दोन दिवस खूप धावपळीत गेले, मीनाताई राजाबरोबर जाऊन द्यायच्या घ्यायच्या साड्या घेवून आल्या, मीना ताईंसाठी सुद्धा नेकलेस आणला, तुम्ही लोक उगाचच खर्च करता आहात,

"साड्या खूप छान मिळाल्या आहेत",.... सीमा

"हो कधी नव्हे तर घ्यायचा तर चांगल्या घेतल्या पाहिजे सगळ्यांना साड्या, त्यांनी वापरल्या पाहिजे ",.. मीना ताई

"आई तुझ्याकडून काही काही गोष्टी खूप शिकण्या सारख्या आहेत ",.. सीमा

"उद्यापासून कार्यक्रम सुरू होत आहे तर तू तुझी बॅग भरून घे सीमा, अजून काही लागत असल्यास मेकअपचे सामान तर जाऊन घेऊन ये ",.. मीना ताई

" हो आई तू आणि राजा पण तुमची बॅग भरून घ्या",.. सीमा

आजपासून सगळे कार्यक्रम सुरु होणार होते, सकाळीच अनघा सीमा कडे आली होती, तिने संगीत, मेंहेंदी हळद साठी कपडे आणि दागिने व्यवस्थित मीनाताईंन कडे दिले मीनाताईंनी सगळं सामान व्यवस्थित ठेवून दिलं, आजपासून निशा इकडेच राहणार होती ती तिची बॅग घेऊनच येणार होती, रिसेप्शन झालं की तिच्या मिस्टरांचा सोबत ती घरी जाणार होती,

संध्याकाळी कार्यक्रम होता सीमाला तर काही सुचतच नव्हतं, ति नेहा जवळच बसली होती

"काय विचारात आहे सीमा? आदित्यची आठवण येते आहे का? फिरायला वगैरे कुठे जात आहात तुम्ही?, काही ठरलं का? ",..नेहा

" काहीतरी काय ग तुझं निशा, सारख आपल आदित्य आदित्य ",.. सीमा

" माझ्यावर आता कशाला चिडतेस आता, लग्न दोन दिवसावर आल, काहीतरी बोलणं झालं असेल ना तुमचं? माझ्यापासून तू सगळी बातमी लपवून ठेवते आहे, सांग ना ",.. निशा

" पुरे निशा नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही ह, तू उगाच मला आता पासून चिडवू नकोस ",.. सीमा

" मग केव्हा चिडवू तुला? रिसेप्शन झाल्यानंतर तू चालली जाशील पटकन आदित्य सोबत ",.. निशा

सीमाला आता खरच मनातुन टेन्शन आलं होतं की आता मी दोन-तीन दिवस आईसोबत आहे, त्यात सगळे कार्यक्रम सुरू झाले, पण तिने तसं दाखवलं नाही, तिला वाईट वाटत असेल , उगीच आत्ता पासून रड रड नको करायला, आई ला त्रास होईल, राजा ही कसा शांत झाला आहे, दुपारचं जेवण झालं

" चला तयारीला लागा मुलींनो",.. मीना ताई

" आतापासून काय आई? संध्याकाळी पाचला जायचं आहे आपल्याला तिकडे",... सीमा

"तुम्हाला वेळ लागतो मुलींना" ,.. मीना ताई

" एवढ काय वेळ लागणार आहे ? एक वाजेपासून तयारी केली तर कशा दिसू आम्ही पाच वाजेपर्यंत ",...सीमा

"सगळ्या आया कशाच करतात",.. निशा हसत होती

आदित्य कडे ही सकाळपासून धावपळ सुरू होती, बरेच पाहुणे आलेले होते, आबा आक्का कालच जावून शेजारी काका काकूंना आमंत्रण देवून आले होते, विक्रम होता हजर तेव्हा , आज काकू येवून गेल्या सकाळी जरा वेळ, काका विक्रम एकदाही आले नव्हते,

शरद सकाळीच आले होते, त्यांनी आदित्यला चिडवायचं काम कंटिन्यू त्यांच्या हातात ठेवलं होतं,.. "अनघा तुला कशाला पुढे पाठवल होत मी, तू अजून आदित्यला समजवल नाही, आदित्य इकडे ये हे बघ तुला काही विचारायच असेल तर विचार मला, नंतर बोलू नको मी वॉर्निंग दिली नव्हती",..

" पुरे शरद आता, सगळ्यांनी आपले आपले सामान व्यवस्थित ठेवा, आदित्य तुला कोणता ड्रेस घालायचा आहे तो लक्ष्यात आहे ना ",.. अनघा आल्या पासून कामात होती

"तू चल ना ताई माझ्यासोबत, कुठे आहे ड्रेस ",.. आदित्य

"आपलं ठरलं आहे ना त्याप्रमाणे ड्रेस घाल आदित्य, धावपळ होते आहे आवरा ",.. अनघा

" हो आता ताई ताई कमी कर आदित्य , नाही तर तुझी बायको चिडेल ",.शरद

" टॅक्सी बुक केल्या आहेत का? ",.. अनघा

"हो केल्या आहेत",.. सचिन आला

" एवढ्या वेळेवर येतात का सचिन? ",.. अनघा

" मी तिकडे हॉल वर होतो तिकडची सगळी व्यवस्था सांभाळत होतो ",.. सचिन

" जेवण केल का तू नाहीतर जेवून घे ",.. आक्का

"हो झाल आहे ",.. सचिन

"दोन टॅक्सी सीमा कडी पाठवाव्या लागतील चार वाजता त्यांच्या फॅमिली साठी एक टॅक्सी आणि बाजूच्या लोकांसाठी एक टॅक्सी",.. आदित्य

" हो याला एवढी काळजी आहे सीमाची की बास",.. शरद

सगळे हसत होते

सगळं व्यवस्थित ठरलं होतं आता, आवरलं कि निघू आता हॉलवर आदित्य खूप खुश होता वरती रूमवर जाऊन तो तयारीला लागला, तयार होवुन खाली आला, आजीने खाली त्याची नजर काढली, आक्का आबा अनघा शरद खुश होते,

साधारण तीन वाजता पार्लर वाली ताई आली, सीमाची तयारी सुरू झाली, मीनाताई, राजा, निशा सगळे तयार होते, खुपच छान दिसत होते सगळे, खूप खुश होते, बाहेर टॅक्सी आली, मीनाताईंनी पुढे होऊन सीमाची नजर काढली, सीमाने पुढे होवुन नानांच्या फोटोला नमस्कार केला, आज तुम्ही हवे होते नाना, मीना ताई, राजा, सीमा, निशाच्या डोळ्यात पाणी होत, आई वडिलांची माया वेगळीच असते,

सगळे टॅक्सीत बसले मीनाताई निशा सीमा मागे राजा पुढे बसला, दुसऱ्या टॅक्सीत बाजूच्या वहिनी अजून एक दोन मीनाताईंच्या मैत्रिणी होत्या, सीमाच्या आधीच ऑफिसमधल्या मैत्रिणीलाही बोलवलं होतं, पण ती लग्नाच्या दिवशीच येणार होती

गाड्या रिसॉर्ट वर आल्या, आदित्य आणि घरची मंडळी यायची होती, खूप सुंदर हॉटेल कम रिसॉर्ट होत ते, सुंदर लॉन होत, कारंजा होता, समोर आदित्य सीमा संगीत समारोह असलेली पाटी होती, त्या हॉल कडे सगळे गेले, आत मध्ये रूम मध्ये जावुन सीमा निशा मीना ताई बाजूच्या सगळ्या बसल्या , राजाने फोन करून आम्ही पोहोचललो ते सांगितल, सुंदर व्यवस्था होती तिकडे

आदित्यला अस झाल होत कधी रिसॉर्ट वर पोहोचू आणि सीमाला बघु

मुलाकडचे आले,.... मीना ताई राजा पुढे गेले स्वागताला, सगळे आत आले, आदित्य बघत होता सीमा कुठे आहे, मीना ताई छान बोलत होत्या सगळ्यांशी,

चल सीमा आपल्याला बाहेर जावे लागेल, सिमाला एकदम धडधड झाल,

"अरे काय झालं सीमा? आता सगळे ओळखीचे आहेत ना तुझ्या, कशाला एवढ टेन्शन घेते",.. निशा

सीमा निशा आणि बाजूच्या वहिनी बाहेर आल्या, मगाशी रिकामा असलेला हॉल आता पाहुण्यांनी भरलेला होता, एका कोपऱ्यात जेवणाची व्यवस्था होती, दुसऱ्या साईडला स्टेज होतं, त्याच्या बाजूला ऑर्केस्ट्राची मंडळी आलेली होती, सीमा निशा जशा बाहेर आल्या तसे सगळे त्या दोघींकडे बघायला लागले

आदित्य तर बघतच राहिला सीमा कडे, अतिशय सुंदर दिसत होती सीमा, निळा मोरपंखी अनारकली एका साईडला दुपट्टा सोडलेला, पार्लर वाली ताईने स्पेशल हेअर स्टाईल करून दिली होती,कानात मॅचिंग इयरिंग्स, हलका मेकअप, बांगड्या अतिशय छान दिसत होती ती, मूळातच शांत संयमी ती, खूप सुंदर दिसत होती

सीमाला आली तस आदित्य पुढे झाला, पुढे होऊन त्याने तिला हात दिला, सीमाने प्रेमाने त्याच्या हातात दिला, दोघ हातात हात घालून समोर आले, सगळे टाळ्या वाजवत होते,

आदित्यने सीमाची सगळ्यांशी ओळख करून दिली, अतिशय आनंदाचे वातावरण झालं होतं, ऑर्केस्ट्रा सुरू झाला, गणपतीच्या गाण्याने सुरुवात झाली, नंतर एकेक फर्माईशी येत होत्या, सुंदर सुंदर गाणी म्हणत होते ते लोक, तरी वातावरण शांत होतं,

मीनाताई आणि आक्का बाजूला उभे राहून काहीतरी बोलत होत्या, अचानकच दोघी स्टेजवर गेल्या, सगळे त्यांच्याकडेच बघत होते

तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की आदित्य आणि सिमाचं लगेच लग्न ठरलं आणि एका महिन्याच्या आत कार्यक्रम आहे, साखरपुड्याचा कार्यक्रम त्यांच्या झालाच नाही, तसा आता इथे साखरपुडा नाही पण आता इथे रिंग सेरेमनी होणार आहे, दोघं एकमेकांना अंगठ्या घालतील, ही त्यांची नाही आमच्या दोघींची हौस आहे

आदित्य आणि सिनेमालाही आश्चर्य वाटलं आपल्या लक्षातच नाही की आपला साखरपुडा झाला नाही, आदित्य अनघा स्टेजवर आले...... सीमा निशा पण स्टेज वर आल्या , राजा होता सोबत

"आई पण आपण अंगठी घेतली नाही आदित्यसाठी",.. सीमा

"घेतली आहे ग, माझं आणि तुझ्या सासूबाईंच आधीच ठरलं होतं, मी जाऊन घेऊन आले अंगठी, ही बघ आवडली का",.. मीना ताई

हो..

आधी आदित्यने सीमाला अंगठी घातली, मग सीमाने आदित्यला अंगठी घातली, खूप छान वातावरण तयार झाल होत,

मेरी राहे तेरे तक है
तुझपे ही तो मेरा हक है
इश्क मेरा तू बेशक है
तुझपे ही तो मेरा हक है
साथ छोडूंगा ना तेरा
पीछे आऊंगा छिन लूंगा
ये खुदा से मांग लाऊंगा
तेरे नाल तकदीर लिखवाऊंगा
मै तेरा बन जाऊंगा
मे तेरा बन जाऊंगा

आदित्य सीमा दोघे इमोशनल झाले होते, आदित्य सारखा सीमा कडे बघत होता, दोघे हातात हात घेऊन बसले होते

सगळे टाळ्या वाजवत होते, हे असं चालणार नाही आता छान पैकी डान्स होऊ द्या,... अनघाने आदित्य सीमाला उठवल जागे वरुन

आदित्य सीमा यांनी कपल डान्सला सुरुवात केली, आदित्य सीमा एकदम जवळ होते, सीमा I love you, सीमा खाली बघत होती, आदित्यने तिला डान्स साठी जवळ ओढल तशी ती अजून गडबडली, आदित्यने सांगितल होत प्रोग्राम मध्ये अस जवळ यायला सगळ्यांन समोर नाही बोलायच नाही, त्यामुळे ती गप्प होती,

दोघ छान डान्स करत होते, खूप छान केमिस्ट्री होती त्यांची, या दोघांचं खूप छान पटणार आहे हे यावरून समजत होतं, अगदी एकमेकाला पूरक होते ते

दील का दरिया बह ही गया
इश्क इबादत बन ही गया
खुद को मुझे तू सौप दे
मेरी जरुरत तू बन गया
बात दिल की नजरो ने की
सच कह रहा है तेरी कसम
तेरे बिन अब ना लेंगे एक भी दम
तुझे कितना चाहने लगे हम

त्यानंतर हळूहळू बरेच कपल त्यांना जॉईन झाले, फारच मजा येत होती, शरद अनघा पण खूप मजा करत होते, सुमित सगळ्यांच्या मध्ये मध्ये करत होता, आदित्य सीमा एकमेकांत रमले होते...


🎭 Series Post

View all