नवी आशा जगण्याची... भाग 34

आतून जेवण तयार आहे असा निरोप आला आलं सगळे आत मध्ये गेले, मदतनीस काकू ताट करत होत्या, सगळे बसले, आक्का उभ्या होत्या, त्यामुळे सीमा पण उभी होती


नवी आशा जगण्याची... भाग 34

©️®️शिल्पा सुतार
........

विक्रम घरी आला, काका त्याची वाट बघत होते

"कुठे गेला होता विक्रम? आज उशीर झाला घरी यायला?",.. काका

"शाळे मागच्या प्लॉटवर गेलो होतो, त्या लोकांना सांगितल अजिबात ताबा सोडू नका आणि कोणाला आत मध्ये येऊ देऊ नका",.. विक्रम

"तू कशाला गेला होता तिकडे? कोणी पाहिलं असत म्हणजे परत आबांना सांगीतल असत , म्हणजे ते परत मोकळे आपल्या नावाने खडी फोडायला ",.. काका

"म्हणूनच रात्रीच गेलो होतो तिकडे, नाही बघितलं कोणी",.. विक्रम

" भेटला का तिथला तो त्यांच्या मेन माणूस ",.. काका

" हो भेटला त्यांना सांगितल ताबा सोडू नका, पण फार पैसे मागतो तो ",.. विक्रम

" कश्याला महीन्याच्या महीन्याला देतो ना आपण त्यांना पैसे, जास्तीचे द्यायचे नाही ",... काका

" हो ना इथे आपण आपल कस करतो आपल्याला माहिती",.. विक्रम

" तुला समजलं का आणि शेजारी उद्या लग्न जमवण्याचा कार्यक्रम आहे ",... काका

"हो का",.. काकू येऊन बसल्या

" आपल्याला तयारी करावी लागेल मग, उद्या लवकर आटपा ",... काकू

"कसली आणि कशासाठी? बोलवलं का त्यांनी आपल्याला? आजही ते मुलगी बघायला गेले होते त्यांचे त्यांचे, त्या वहिनींना त्यांच्या माहेरची माणसं लागतात, आपली आठवण नाही आली आबांना",.. काका

" जाऊद्या ना बाबा नाहीतर कुठे गेलो असतो आपण त्या सीमा कडे, एवढंसं घर आहे तिच असं ऐकल आहे, आणि तिकडे जावून काय फायदा, उलट तोटा झाला आहे, आदित्यला मामाच्या मुलीशी लग्न करायला हव होत ",... विक्रम

"काय अशी मुलगी पसंत केली आदित्यने",.. काकू

"मुद्दाम करतात ते, लोकांना दाखवायला की आम्ही कशी गरीबाची मुलगी सून करून घेतली, यात त्या आबांच अजून नाव होईल, आता इलेक्शनला उभ राहता आहेत ना ते साखर कारखान्यावर",.. काका

"आहेत का काही जिंकण्याचे चान्सेस",.. विक्रम

"काही माहिती नाही मी बोललो नाही त्यांच्याशी, कदम साहेब सपोर्ट करत आहेत त्यांना",.. काका

" विक्रम तू कधी विचार करतोस लग्नाचा",.. काकू

" आई जरा जम बसू दे ",.. विक्रम

" आजही मामाचा फोन आला होता तो विचारात होता ",.. काकू

विक्रम काही बोलला नाही

सीमा सकाळी लवकर उठली, आज आदित्य कडे जायचं आहे, पटापट आवरलं तिने, राजा मीना ताई रेडी होत होत्या, चल सीमा नाश्ता करून घे, सीमा तिच्या विचारात होती

सीमाच्या फोन बर आदित्यचा मेसेज आलेला होता,.. "तुझीच वाट बघतो आहे मी, गाडी पाठवतो घ्यायला",

" केव्हा जायचं आहे आपल्याला आदित्य कडे?",. सीमा

तसे मीनाताई आणि राजा हसायला लागले

"अरे यात काय हसण्यासारखं आहे, आदित्यचा मेसेज आला आहे की तो गाडी पाठवतो आहे म्हणून विचारलं आहे",.. सीमा

"आपल्याला दुपारी जायचं आहे त्यांच्याकडे जेवायला, सकाळीच आक्कांचा फोन येऊन गेला ",.. मीना ताई

" जेवायचा घाट कशाला घातला आता? ते कसे आले होते आपल्याकडे नाश्त्याला तसं आपण फक्त चहाला गेलो असतो तिकडे ",.. सीमा

" अग पण त्यांनी आग्रह करून दुपारीच बोलवलं आहे, आणि त्याच वेळा गुरुजी येणार आहे ",.. मीना ताई

" अग पण आपण काय करणार आहोत इतका वेळ तिथे? जेवण जाईन का मला?",.. सिमाला टेन्शन आल होत

"थोडे दिवसांनी तुला कायम तिकडे रहायला जायच आहे सीमा, काय सुरु आहे तुझ? अस मला समजेल का?, काही टेंशन आहे का? ",.. मीना ताई

"नाही काही नाही ",.. सीमा

आटोप मग..

" आई मी कुठला ड्रेस घालू? ",.. सीमा

"तो काल प्रेझेंट मिळालेला घाल, छान रंग आहे लाईट पिवळा",.. मीना ताई

" ठीक आहे",.. सीमा आवरायला आत गेली

मीना ताई काळजीने राजा कडे बघत होत्या

"होईल सगळ नीट आई",.. राजा

"काय आहे या मुलीच्या मनात काय माहिती?",.. मीना ताई

"काही नाहिये, आपल्यावर ती खूप प्रेम करते एवढच",.. राजा
.....

आदित्य सकाळी नाष्ट्याला आला,.. "कोणाशी बोलत होती तू आई?",

"अरे मी सीमाच्या आईला फोन केला होता, त्यांना दुपारी जेवायला आपल्याकडेच बोलवलं आहे, गुरुजींचा फोन आला होता सकाळी की ते बारा वाजता येणार आहेत, हे लोक बारा वाजता येतील तर मग जेवून जातील",.. आक्का

"काय करते आहेस मग तू",.. आदित्य

" मी स्वयंपाकाच सांगत होती मावशींना, दोन भाज्या, बासुंदी, वरण भात, मसालेभात सांगते, चालेल ना",.. आक्का

"हो चालेल",.. आदित्य

"अरे वा आदित्य आता किचनकडे पण थोडं लक्ष देत आहे म्हणजे बरोबर सुरू आहे त्याचं",.. आबा उगीच चिडवत होते

" तसं नाही आबा मला वाटलं आई कोणाशी बोलते आहे",.. बाबा नाश्त्याला डायनिंग टेबल कडे गेले

" आजी कुठे आहे?" ,.. आदित्य

" ही काय आली मी",.. आजी

" तू नंतर माझ्यासोबत माझ्या रूम मध्ये चल, मी काय घालू ते बघायला",.. आदित्य

" हो येईन मी",.. आजी

सीमा मीनाताई राजा आवरून रेडी होते, राजाने आदित्यला मेसेज केला, आदित्यने गाडी पाठवली होती,

"येईलच आता गाडी पाच मिनिटात गाडी ",...

गाडी आली ते निघाले, ते गाव आलं, शाळा आली, आई ही बघ माझी शाळा, हा तो बस स्टॉप आहे ज्यावर मी उतरते

"खूप छान मोठी शाळा आहे, तुझ ऑफिस कुठे आहे राजा?",.. मीना ताई

" माझं ऑफिस अजून लांब आहे, त्या साईडला आहे",.. राजा

शाळेपासून बरच आत आदित्यचं घर होतं, मोठं शेत होते रस्त्यात, हे सगळ साहेबांचे शेत आहे, ड्रायव्हर काकांनी सांगितलं, समोर मोठा गेट आल, गाडी आत मध्ये गेली, आत मध्ये सुंदर बाग होती, गाडी बंगल्या समोर उभी राहिली, यांचं घर खूपच मोठ दिसतं आहे,

हो ना छान आहे

आबा आक्का आजी आदित्याची बाहेर आले

सगळे आत गेले,

"बरं झालं तुम्ही लवकर आलात गुरुजी आलेले आहेत, ते तुमची वाट बघत आहेत" ,... आक्का

सगळे घरात गेले, समोरच मोठा हॉल होता, दोन तीन सोफे एकत्र जोडून बसायची व्यवस्था केली होती, मदतनीस मावशी पाणी घेऊन आल्या, सगळ्यांना पाणी दिलं, गुरुजींनी चार-पाच मुहूर्त काढलेले होते, आक्का आणि मीनाताई बसून गुरुजींशी बोलत होत्या, आजी बाबा आदित्य सीमा तिथे बाजूला बसले,

"हे बघा एका महिन्यांनंतरचे दे दोन मुहूर्त चांगले आहेत",.. गुरुजी

आदित्य सीमा कडे बघत होता तीच लक्ष नव्हत

"एक मिनिट मला सीमाशी थोड बोलायच आहे मग आपण मुहूर्त काढू",.. आदित्य

सगळे त्या दोघांकडे बघत होते

ठीक आहे,

सीमा विचार करत होती, काय बोलायच असेल आता याला माझ्याशी?

सीमा आदित्य बोलायला बाजूच्या रूम मध्ये गेले

सीमा समोर बसली, आदित्य उभा होता, आज खूप छान दिसते आहे सीमा, मी पसंत केलेला ड्रेस घातला आहे तिने, माझा आवडता कलर, छान कानातले बांगड्या, पण एवढे सुंदर केस बांधुन घेते ती ... केस मोकळे सोड ना सीमा

ह... काय?

"केस खुप सुंदर आहेत, मोकळे सोड ना",.. आदित्य

"हे बोलायला आत आलो का आपण? ",.. सीमा

नाही,

"काय झालं आदित्य सांग मग ",.. सीमा

तो येवून सीमा जवळ बसला

"सीमा मी तुला धमकी दिली की हो बोल नाही तर तुला राजाला नौकरी वरुन काढून टाकेन, मी अस काही करणार नव्हतो, तू हो बोलाव म्हणून मी अस केल, पण मला सारख अस वाटत मी चुकीच केल, बाहेर मुहूर्त काढता आहेत, तू अजून विचार करू शकते",.. आदित्य

आता विचारतो आहे हा, मुद्दाम हीरो बनायला बघतो, मला एवढ महत्व देतो आहे की बास, बाहेर सगळे बसलेले आहेत, आई किती खुश आहे, राजा, आदित्यच्या घरचे या लग्नच स्वप्नं बघत आहेत, मुद्दामून करतो हा, म्हणजे मी बोलेल की अस काही नाही आदित्य माझा होकार आहे, लग्ना नंतर तो बोलायला मोकळा की मी तर तुला विचारल होत, बरोबर कोंडीत पकडतो हा, नकार देवू का? नको गम्मत करायला

"काय विचार सुरू आहे सीमा",.. आदित्य

"आदित्य आता या गोष्टी बोलून काही उपयोग आहे? मी लग्नाला तयार आहे, चल बाहेर जावुन होकार देवू",.. सीमा

"नक्की ना",.. आदित्य

"तुला तेच हव होत ना, तुझ्या मनासारखं होत ना सगळं, तुझी काय अपेक्षा आहे, मग आता काय मी सगळ्यां समोर तुला नकार देवू का",.. सीमा

" आहे का तस तुझ्या मनात? ",.. आदित्य

" माझ्या मनात काही नाही, होकार ही नाही नकार ही नाही आदित्य, मी अजून काहीही विचार केला नाही ",.. सीमा

"म्हणजे काय? \",.. आदित्य

"मला काही सुचत नाही, मी ब्लॅक आहे", .. सीमा

"मी तुझा होकार समजू का हा मग",.. त्या आदित्य

हो..

"एका महिन्या नंतर चालेल ना तारीख",.. आदित्य

हो..

" बघ ह मी तुला विचारल होत, परत बोलू नको ",.. आदित्य मुद्दाम आता सीमाला चिडवत होता

" हे बघ हे अस आहे तुझं",.. सीमा परत चिडली होती त्याच्यावर

"सीमा पण काहीही म्हण तू चिडली की खूप छान दिसतेस",.. आदित्य

"चला आता बाहेर",.. सीमा

" हो ना नाहीतर बाहेरच्यांना वाटेल हे दोघ आत मध्ये काय करता आहेत? ",.. आदित्य

" काहीही ही.. अगदी अशक्य आहेस तू ",.. सीमा हसत होती

दोघ बाहेर आले, परत सगळे त्या दोघांकडे बघत होते

काढा तारीख....

आक्कांनी एक तारीख काढली, सगळ्यांनी संमती दिली बरोबर महिना आहे आता लग्नाला मीनाताई तयारीला लागा, मीनाताई खूप खुश होत्या, त्यांनी सीमा कडे बघितलं सीमा ने मानेने होकार दिला आदित्य आणि राजा एकमेकाला भेटले , आजी आक्का आबा खूप खुश होते

आतून पेढे आले सगळ्यांना दिले, आदित्य सीमा एकमेकाला पेढा भरवा आजीने फर्मान सोडलं, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या

चला मी तुम्हाला आमच घर दाखवते, आक्का मीना ताई पुढे चालत होत्या राजा सीमा आदित्य मागे होते, तू येतेस का आजी?

"नाही मी बसते खाली तुम्ही या जाऊन",.. आजी

"खूप मोठ छान घर आहे तुमच",.. मीना ताई

ते वरती गेले ही आमची खोली, ही आदित्यची खोली आहे, सगळ्या रूम छान होत्या, आदित्य ची रूम मस्त मोठी होती त्याला लागून बाल्कनी होती,

"सीमा नीट बघून घे रूम, मी नंतर फोन करेन तुला काही बदलायचा असेल तर सांग",.. आक्का

सीमा लाजली

सगळे खाली आले, मीना ताई आजी बोलत बसल्या होत्या

सीमा राजा चला मी तुम्हाला शेत दाखवतो, ते तिघ बाहेर गेले

खूप छान पीक होत, एका बाजूला भाज्या लावल्या होत्या, आदित्य सगळ छान फिरून दाखवत होता, गार वारा सुटला होता,

आदित्य सीमा कडे बघत होता, कस वाटल घर, शेत

" खूप छान आहे शेत, घरही खूप छान आहे , मोठं आहे, हे बाजूचे घर कोणाचा आहे",.. सीमा

"ते विक्रमच घर आहे",.. आदित्य

सचिन आला, त्याला आदित्यने बोलवुन घेतलं होतं, सीमाशी ओळख झाली, राजा आणि सचिन तिथेच बोलत उभे होते, सीमा आदित्य बोलत बोलत पुढे गेले

" तुला आवडली का आपली रूम? ",.. आदित्य

" आपली म्हणजे?",.. सीमा मुद्दाम त्याला चिडवत होती

"लग्नानंतर तू माझ्या सोबत तिथे राहणार ना?, तुला माहीती आहे ना आपण नंतर सोबत राहू ते ",...आदित्य

"नव्हत माहिती",.. सीमा

"प्लीज सीमा गम्मत पुरे, तुला काही बदल हवे असतिल तर सांग ",.. आदित्य

" हो नंतर सांगेन, अस पाच मिनिट बघितल्यावर कस समजेल मला काय बदलायला हव ते ",... सीमा

" चल मग परत जाऊ या का रूम मध्ये? , नीट बघून घे रूम",.. आदित्य

नको...

"आता का? काय झाल? ",.. आदित्य हसत होता

" मी नंतर सांगेन ",.. सीमा घाबरली होती, माझ काही खरं नाही या आदित्य पुढे, याला खूप घाई झाली आहे,

घर आवडल का?

"हो खूप छान आहे, खूप मोठं आहे घर, आमचे तसे दहा पंधरा घर बसतील यात, हा शेतीचा परिसर मला अजून खूप आवडला",.. सीमा

"तुला शेतीची आवड आहे का?",.. आदित्य

"मला शेती बद्दल काहीही माहिती नाही पण मला निसर्गाच्या सानिध्यात आवडतं, खुपच छान ठेवला आहे तुम्ही सगळं" ,.. सीमा

"सीमा तू खुश आहेस ना मला तेच हव आहे",.. आदित्य

सीमा काही बोलली नाही

आतून जेवण तयार आहे असा निरोप आला, सगळे आत मध्ये गेले, मदतनीस काकू ताट करत होत्या, सगळे बसले, आक्का उभ्या होत्या, त्यामुळे सीमा पण उभी होती

"अग तू उभी कशाला बस तू",.. आक्का

" तुम्ही उभ्या आहात, तुम्ही बसा मी बघते काही हव आहे तर",.. सीमा

" सगळ्यांना नीट वाठलं गेलं का ते बघते आहे मी ",... आक्का

"मी करू का? ",.. सीमा

" नको तू बस मी पण लगेच बसते आहे ",... आक्का

हिला येत का पण काही काम? .... विचार करून आदित्य ला हसू येत होत,

सगळे जेवायला बसले, स्वयंपाक खूप छान झाला होता, वातावरण मोकळ होत, त्यामुळे काही वाटत नव्हत , जेवण झालं

" चला आता आम्हाला निघावं लागेल" ,... मीना ताई

" बस ग जरा वेळ मीना, आजी आग्रह करत होत्या, ते आईस्क्रीम आणल ते द्या ना",...

हो....

मावशी आईस्क्रीम घेवून आल्या, ते आईस्क्रीम खात होते तेवढ्यात काका काकू आत आले.....

🎭 Series Post

View all