नवी आशा जगण्याची... भाग 33

त्याचा रिझल्ट बघ ना तू जर आदित्य ही केस हरला तर किती फायदा आहेत, ही करोडची जमीन आमची होऊ शकते, थोडं पोसावं लागेल लोकांना


नवी आशा जगण्याची... भाग 33

©️®️शिल्पा सुतार
........

"लग्न साध्या पद्धतीने म्हणजे कस आदित्य? ",.. आक्का

"आई खूप लोक नको, शांत पणे पूजा विधी अस हव",... आदित्य

"हो हे छान आहे, गोंधळ गोंगाट नको",.. आबा

"मला एक बोलायच होत",.. आजी

"बोला ना",..आबा

" लग्न साध असो या वाजत गाजत, लग्नाचा खर्च मी करणार आहे सगळा",.. आजी

"आजी पण नको तू ऐक ना ",.. आदित्य

"नाही मी ऐकणार नाही",.. आजी

"हो ना आजी आम्ही करतो आमचा खर्च ",.. मीना ताई

"मीना ताई ठरल आहे माझ आधीच यात आता बदल नका करू ",.. आजी

"आजी मला मीना बोला",... मीना ताई

"ठीक आहे मीना तुझ्या सीमाचा लग्नाचा खर्च मी करणार आहे, काय हव नको ते मला सांगायच, राजा तुझा फोन नंबर दे बेटा, माझ्याशी बिनधास्त बोलत जा तुम्ही",... आजी

सीमा मीना ताई कडे बघत होतो

" आजी आहो आमचा खर्च आम्ही करू",.. मीना ताई

" सीमा तू आई कडे बघु नकोस, नाही मी करणार आहे, मला कोणी काहीही सांगायचं नाही मी ऐकणार नाही",.. आजी

रस्त्यात आदित्य आणि आजीचं बोलणं झालं होतं, आदित्यने सुचवलं होतं मी जर बोललो मी खर्च करतो ते लोक ऐकणार नाही, त्यापेक्षा आजी तू खर्च करते आहे असं सांग

"हो चालेल, मी करू शकते खर्च तुझ्यासाठी आदित्य तुला माहिती आहे",.. आजी

"हो आजी तु बिग बॉस आहे, तुझ्याकडे खूप पैसे आहेत मला देना थोडे",.. आदित्य

"नाही मी माझ्या नात सुनेला देईल",.. आजी

" अरे अजून तिला बघितलं नाही तिची बाजू घेते आहेस तू? ",.. आदित्य

" अरे ती खुष राहिली म्हणजे तू खुश राहशील ना, म्हणून हे सगळं चाललं आहे",.. आजी

बरोबर आहे...

सगळी बोलणी झाली होती,

" चला आता आम्हाला निघाव लागेल ",.. आबा

मीनाताई सीमा आता आल्या,... " आता काय करावे एकच साडी आहे",..

" आई घरात आहे का एखादी नवीन साडी",.. सीमा

" हो आहे कॉटनची आहे, ती देऊया का मग आजींना, बघून घ्या एकदा तुम्ही दोघी निशा सीमा, साडी बरी आहे का? ",.. मीना ताईंनी कपाटातून साडी बाहेर काढली

" हो छान आहे, चालेल दे ही ",.. मीनाताईंनी दोघी साड्या बाहेर काढल्या, हळद कुंकू घेऊन त्या बाहेर गेल्या

"हे बघा मीनाताई आम्ही काहीही घेणार नाही",.. आक्का

" मी तुमचं काहीही ऐकणार नाही, साड्या तुम्हाला घ्याव्याच लागतील",.. मीनाताईंनी बळजबरी आक्का आणि आजींना साड्या दिल्या, सीमाने परत एकदा त्यांच्या पाया पडल्या

अक्कांनी पुढेही होवुन सिमाला गिफ्ट बॉक्स दिला, तसाच एक बॉक्स मीनाताईंना दिला,..." निशा मला तुझ्या बद्दल माहिती नव्हतं तू ही असेल इथे, मी तुला नंतर आदित्य सोबत गिफ्ट पाठवते",...

" नाही मॅडम त्याची काही गरज नाही",.. निशा

"नाही कशाला गरज आहे तू आता आमच्या सीमाची बहीण आहे, करवली आहेस तु ही मिरवायला पाहिजे",.. आक्का

"उद्या सुट्टी आहे, तुम्ही या आमच्या कडे तिकडे उद्या, गुरुजींना बोलवून घेवू मुहूर्त काढून घेवू, तुमच्या सोईच्या तारखा बघून ठेवा तो पर्यंत",... आबा

ठीक आहे...

सगळे निघाले आदित्य बोलायला मागे थांबला , त्या दोघांना बोलता यावे म्हणून मीनाताई, निशा, राजा बाहेर गेले

आदित्य सीमा कडे बघत होता,.. "सीमा ठीक आहे ना? तुला मान्य आहे ना हे जे ठरतय ते , लवकर लग्न करून घेऊ",

सीमाला सुचत नव्हत, आता बरा मला माझ मत विचारतो आहे हा, काही ती खाली बघत होती, काही सुचत नाही, सगळ एवढ पटापट होत ना, तिला वाईट वाटत होत, हे घर सोडून जाव लागेल आता लवकर

"काय झालं सीमा?, काय विचार करते आहेस तू? ",.. आदित्य

"काही नाही आदित्य",... सीमा

"तुला टेंशन आल का लग्नाच?",.. आदित्य

"हो आईच घर सोडून याव लागेल ",.. सीमा

" मग मी येवू का इकडे रहायला ",... आदित्य

सीमा हसत होती आता

आदित्यला बर वाटल

सीमा आदित्य कडे बघत होती,.. थॅंक्यु आदित्य

\" काय झालं आता? ",.. आदित्य

" मला माहिती आहे हे लग्नाच्या खर्चाच तू सांगितलं असेल आजींना",.. सीमा

"नाही मी काहीही सांगितलं नाही, तुला माहिती आहे मी कसा आहे, तुला माझे पाच हजार रुपये द्यायचे आहेत, लक्ष्यात ठेव ",.. आदित्य

" मला माहिती आहे तू सांगितलं आहे हे थँक्यू ",.. सीमा

" आता हे थँक्यू थँक्यू करणार आहेस का? की मला एक छान मिठी मारता येईल का तुला ",.. आदित्य

आदित्य जा ना...

" अरे आता आपल लग्न जवळ आल ना",...आदित्य

आदित्य नाही... सीमा बाहेर गेली, आदित्य तिच्या मागे गेला

काही खरं नाही माझ, ही सीमा काही एवढ सहज माझ काही ऐकेल अस वाटत नाही..

आदित्य आबा आक्का आजी निघाले ,सगळे खुश होते

"कशी वाटली सीमा?",.. आदित्य

"खूप छान आहे सीमा, चांगली आहे तुझी पसंत आदित्य",.. आजी

"हो शांत आहे, गोंगाट नाही",.. आक्का

"चहा ही छान केला होता तिने चव आहे हाताला" ,... आबा

सीमा, निशा, मीना ताई, राजा आत आल्या

" मला नीघव लागेल आता सीमा.. काकू ",.. निशा

" निशा तू आलीस खूप बर वाटल, सीमाच्या लग्नाला आधी ये रहायला, वाटल तर मी घरी येईन तुझ्या सांगायला",.. मीना ताई

"हो काकू नक्की येईन मी" ,.. निशा

निशा गेली सीमा आवरुन आली, मीनाताईं जवळ बसली,,... "आई खुश ना तू? माझ लग्न ठरल आता",.

"हो आईच खूप वर्षाच स्वप्नं होत ",.. राजा

"हो मग आपले मूल आनंदी असावे त्यांच चांगल व्हाव हे प्रत्येक आईला वाटत",.. मीना ताई

राजा सीमा टीव्ही बघत होते, जास्त स्वयंपाक नव्हता, मीना ताई बाहेर वहिनींशी गप्पा मारत होत्या, राजा खुश होता, आदित्य साहेब खूप प्रेम करतात सीमा वर, खूप छान झाल, सीमाची खूप काळजी वाटत होती, आता काही प्रॉब्लेम नाही,

सीमा विचार करत होती लगेच लग्न, आदित्य घाई करतो आहे, आई राजा मला तुमच्या सोबत रहायच आहे, कस असेल त्यांच घर? जमेल का तिकडे मला सगळी कामे? कस काय आवरून शाळेत जाणार मी आणि आदित्य तो मेन प्रश्न आहे? कस काय वागणार मी त्याच्याशी? इथे तो माझ्या घरी मला एवढा त्रास देतो, तिकडे त्याच्या घरी त्याच राज्य असेल, बापरे एकदम सतावुन सोडेल तो मला, आजी आक्का आदित्यच कौतुक करतात, सगळ्याना तोच आवडतो,

मीना ताई आत आल्या, राजा झोपला होता , सीमा जागी होती

"काय ग झोपली नाहीस का सीमा?",... मीना ताई

"आई तुला कस होत तुझ्या लग्ना आधी? कस होईल त्या घरी माझ मला काळजी वाटते आहे",... सीमा

"हो सगळ्यांना तस वाटत बेटा, पण होते हळू हळू सवय तिकडची, मग तुला इकडे नाही आवडणार ",... मीना ताई

" आई मला तू राजा आवडतो, अस नाही होणार ",.. सीमा

" पण आदित्यच्या घरचे खूप छान आहेत, आदित्य चांगला आहे, तू काळजी करू नकोस ",... मीना ताई

हो ना..

"माझ तर टेंशन कमी झाल",.. मीना ताई

"उद्या त्यांच्या घरी जायच आहे? ,",.. सीमा

"जावून येवू गुरुजी येणार आहेत, कार्यक्रमाचा ठरवायच आहे अजून " ,... मीना ताई

" आई लगेच काढणार का मुहूर्त? ",...सीमा

"हो बेटा काय झाल ?",..मीना ताई

काही नाही ..

" तू काळजी करू नकोस चांगले आहेत लोक ते, तू सुखी राहशील, विचार कर सुरेशच्या घरचे कसे होते आणि हे लोक किती काळजी करतात तुझी",.. मीना ताई

"हो आई खरं आहे ",... सीमा

"ते लोक पैसा साठी हपापलेले होते, हे लोक स्वतः सगळा खर्च करायला तयार आहेत ",.. मीना ताई

हो बरोबर..

"आदित्य किती प्रेम करतो तुझ्यावर, दिसत ते त्याच्या वागण्यातून, चांगले आहेत ते लोक ",.. मीना ताई

" आई तू छान समजून सांगते खूप, मी असा विचार कधी केला नव्हता मी खूप नीट वागेन तिकडे, आता मला काही वाटत नाही लग्नाच ",.. सीमा

मीना ताई आता खुश होत्या, चला थोडी तरी मनधरणी केली सीमाची, नाही तर वाटत होत बळजबरीने लग्न लावत आहोत आपण हीच,

सीमा आता विचारात होती खरच चांगले आहेत आदित्यच्या घरचे, किती छान साडी दिली आईला, मला ड्रेस दिला, मी पण नीट वागेन त्यांच्याशी

आदित्य आजी बोलत बसले होते

"तुम्ही दोघ आता जेवायला येणार आहात का? की नुसते दिवस रात्र गप्पा मारत बसतात तुम्ही" ,... आक्का चिडल्या होत्या

"आलो आलो.. चल आजी नाही तर आई चिडेल",... आदित्य

"बघ ना कशी बोलते ती आपल्याला ",... आजी

"उद्या याची बायको येईल आई, हा बोलणार नाही तुझ्याशी पाहिल्या सारख",... आक्का

"नाही आजी मी बोलेन, माझ पाहिल प्रेम तू आहेस" ,... आदित्य

पुरे आता..

"आबा कुठे आहेत?",... आदित्य

" ते काय फोन वर बोलता आहेत ",..आक्का

आबा आले

" अरे इंस्पेक्टर साहेब आज गेले होते आपल्या शाळेमागच्या प्लॉट वर, सगळे गरीब राहतात तिथे, ती जमीन कशी त्यांची असेल, पक्के घर कोणी तरी बांधुन दिले आहेत, तिथे राहतात ते, एक कोणी लीडर आहे त्यांचा",... आबा

"आधी नाही बघितल का तिकडे जावून कधी तुम्ही",.. आजी

"नाही ते लोक येवू देत नाही ",.. आबा

" हो खूप डेंजर आहेत ते भांडतात खूप ",... आदित्य

कठीण आहे

" मला माहिती आहे हे काम काकांच आहे ",.. आदित्य

" हो बरोबर आहे, पण सिद्ध कस करणार ते आपण, म्हणून गप्प बसाव लागत ",... आबा

" मी काढतो आहे मार्ग, एक माणूस सापडला आहे तो एक्स्पर्ट आहे अश्या कामात",... आदित्य

" ठीक आहे त्यांना भेटायला बोलवून घे",..

हो आबा

जेवण झाल जरा वेळ बसुन आदित्य रूम मध्ये आला

उद्या सीमा येणार घरी, गुरुजी येतील, लवकरच तारीख निघेल लग्नाची, आज सीमा किती छान दिसत होती एकदम नाजूक सुंदर आहे ती, मी खूप एक्साईटेड आहे, सीमा आता बर्‍या पैकी बोलते माझ्याशी, हळू हळू करेन मी तिची मनधरणी,
.......

"रात्री च्या अंधारात कुठे चाललो आहोत आपण विक्रम ",... प्रशांत

"शाळे मागच्या प्लॉटवर चाललो आहोत आपण ज्याची केस सुरू आहे तो प्लॉट",... विक्रम

" आता तिथे कशाला",.. प्रशांत

"काम आहे थोडं",.. विक्रम

दोघ तिथे पोहोचले, विक्रमने फोन केला, एक स्ट्रॉंग मुलगा बाहेर आला,

" काय आहे इथला रिपोर्ट? आबा किंवा आदित्य आले होते का इथे? ",.. विक्रम

" नाही ते नव्हते आले, आम्ही येवू देत नाही कोणाला इथे गोंधळ घालतो, पण पोलीस इन्स्पेक्टर आले होते",..

" कशासाठी आले होते ते",... विक्रम

"ते काही माहिती नाही काहीतरी चौकशी होती त्यांची",..

"तू नव्हता का तेव्हा हजर ",.. विक्रम

" नाही मी कामाला गेलो होतो",..

"हे बघ कोणाला आहे या वस्तीवर येऊ द्यायचं नाही, दर महिन्याला मी तुला पैसे काही उगाच देत नाही, काम व्यवस्थित झालं पाहिजे, त्या लोकांना इथे पाय ठेवू देता कामा नये ",.. विक्रम

" ठीक आहे साहेब थोडे पैसे लागत होते ",..

" अरे आत्ताच तर दिले ना तुला पैसे? सारखे कुठून आणणार मी? ",.. विक्रम

" तुम्ही काय श्रीमंत लोक आणि आम्ही जागेवरच कब्जा सोडला नाही तर, आबा केस हरतील, मग तुम्हाला करोडो रुपये मिळतील, आता थोडा खर्च केला तर काय हरकत आहे",...

" आम्ही आमच्या खर्चाचं पाहून घेऊ तू जास्त बोलू नकोस",... विक्रम ने पाकीटातुन पैसे काढून त्या मुलाला दिले

" या लोकांना पोसण म्हणजे अवघडच काम दिसत आहे विक्रम",.. प्रशांत

" काही विचारुच नको खूप खर्च आहे ",.. विक्रम

" मग कशाला करतो आहेस तू हे काम ",.. प्रशांत

" त्याचा रिझल्ट बघ ना तू जर आदित्य ही केस हरला तर किती फायदा आहेत, ही करोडची जमीन आमची होऊ शकते, थोडं पोसावं लागेल लोकांना",... विक्रम

हो...

" तुला जे काम दिलं होतं ते झालं का? ",.. विक्रम

"कोणतं काम? ",.. प्रशांत

" घ्या आता लक्षात नाही तुझ्या?",.. विक्रम

"अरे नीट सांग",.. प्रशांत

"आदित्यच्या कंपनीत कोणी ओळखीच आहे का हे बघायला सांगितलं होतं ना तुला ",... विक्रम

"हो सांगितलं होतं पण तसं कोणी ओळखीचा नाही, आता सगळे नवे लोक भरले आहे त्यांनी, आदित्यचा साला खूपच प्रामाणिक आहे",... प्रशांत

" कोण आहे तो",.. विक्रम

" तो नाही का राजा.. अकाउंट डिपार्टमेंट मध्ये पवार यांच्या हाताखाली काम करतो तो, त्या सीमाचा भाऊ आहे" ,... प्रशांत

"अस आहे का ते त्याला फोडलं तर फार चांगलं काम होईल, त्याच्यावर खूप भरोसा असेल आदित्यचा",.. विक्रम

" पण तो सहजासहजी ऐकणार नाही असं वाटतं आहे",.. प्रशांत

"बोलून बघायला काय हरकत आहे, पैसे दिले की होतात काम बरोबर",.. विक्रम

ठीक आहे करून बघू प्रयत्न.....

🎭 Series Post

View all