नवी आशा जगण्याची... भाग 32

चहाचा ट्रे थरथरत होता तिचा, बापरे हा आदित्य माहिती नाही काय करणार आहे मला? , कस काय होणार आहे माझ काय माहिती? , मला नाही करायच लग्न.


नवी आशा जगण्याची... भाग 32

©️®️शिल्पा सुतार
........

आदित्य आज सकाळ पासून खूप खुश होता, कधी एकदा लग्न होत सीमा इकडे येते अस झाल होत त्याला, सीमा सोबत रहायचे गोड स्वप्न तो बघत होता, सीमाला आवडेल तशी रूम तयार करून घेवू आपण, आज आधी तो ऑफिसला जाणार होता, मग घरी येवून तयार होवुन सीमा कडे जाणार होते ते सगळे , सीमाच साध सुंदर रूप त्याच्या डोळ्यासमोर येत होत, अगदी एक महिना आधी वाटत नव्हत की कोणी येईल आयुष्यात, सीमा तू काळजी करू नकोस मी आहे तुझ्या साठी, खूप सुखी ठेवेल मी तुला,

आदित्य नाश्त्याला खाली आला, आक्का खूप खुश होवुन गप्पा मारत होत्या, एवढ्या सकाळी कोण आल?, आदित्य पुढे गेला तर आजी आलेली होती, आदित्यने पळत जावून आजीला मिठी मारली.

" आजी तू कशी काय सकाळी सकाळी आलीस?, सरप्राईज दिल मला",.. आदित्य खूप खुश होता

आजीने आदित्यच्या कपाळावर आपले बोट फिरवले, कसा आहेस तू? एकदम खुश ना आता, ..

हो आजी

"अरे आबांनी गाडी पाठवली होती" ,... आजी

दोन तासावर मामा राहतो, पण ते लोक नंतर येणार होते लग्नाला, आजी आधी आली

"मी तुझ्या आजीला बोलवून घेतल" ,..आक्का

"आई लव यु आणि आजी तू तर डार्लिंग आहेस",... आदित्य

आबा आले, आक्का डायनिंग टेबल कडे गेल्या, चला नाश्ता करून घ्या

"मी थोडे दिवस इथे नव्हती आदित्य तर तू मुलगी पसंत केलीस? कोण आहे? कशी आहे?, पण लक्ष्यात ठेव तुझ पाहिल प्रेम मी आहे ",... आजी

" हो आजी लव यू, तू सगळ्यात आवडती आहेस , आजी आज जाऊ दुपारी आपण सीमा कडे",.. आदित्य

"कधी आहे सीमा?,.. आजी

" खूप सुंदर आणि साधी आहे सीमा, पण तरी तूच सगळ्यात गोड आहेस आजी",... आदित्य

"लग्नानंतर बोल अस मग मानेने तुला",... आजी

आदित्य लाजला होता..

नाश्ता करून आदित्य ऑफिसला आला, काम सुरू झाले,
......

शाळा सुटली, सीमा निशा घरी आल्या , मीना ताई येवून निशाला भेटल्या, राजा आला सामान घेवून, मीना ताईंना भांडी आवडली,

" सीमा निशा काम राहू द्या आधी तयार हो सीमा, निशा बघ जरा",.. मीना ताई

हो काकू..

आदित्य घरी आला, आक्का आजी आबा तयार होते, आदित्य तयार होवुन आला, आदित्य आजीच्या आजुबाजूला होता,.. "कसा दिसतो आहे मी आजी?",..

"तू खूप छान दिसतो आहे बेटा",.. आजी

"नीट सांग आजी",.. आदित्य

"अरे तू खरच छान दिसतो आहेस आदित्य, कसल टेंशन आहे का आदित्य?",.. आजी

"सांगेन आजी नंतर",.. आदित्य

"अरे काय झाल?" ,... आदित्यने बघितल आबा आक्का आजुबाजूला नव्हते, आजी सीमाने मनापासून मला होकार दिला नाही अजून.

"काय कारण आहे?, माझ्या एवढ्या हुशार मुलाला होकार देत नाही म्हणजे काय? ",... आजी

" ती आधी हो नाही करत होती, त्यात विक्रमने तिला धमकी दिली, माझ लग्न विक्रमच्या मामे बहिणीशी ठरलं आहे अस सांगितल तिला, त्यामुळे ती नकार देत होती",.. आदित्य

\"मग आता झाला का तो प्रॉब्लेम ठीक?, विक्रमला सरळ कर जरा, त्याची हिम्मत कशी झाली सीमाशी बोलायची? ", ... आजी

हो ना आजी..

"आता काय आपण जातो आहोत त्यांच्या कडे ",.. आजी

"केल सीमाला लग्नाला तयार कसतरी, आजी मला ती खूप आवडते" ,... आदित्य

" होईल बेटा नीट सगळ, तू काळजी करू नकोस, मुली जरा वेळ घेतात, देईल ती होकार, खुश राहशील तू मला विश्वास आहे",.. आजी

"होईल ना अस आजी तू म्हणते तस ",.. आदित्य

"हो मग, माझे खूप आशीर्वाद आहेत तुझ्या सोबत ",.. आजी

" आज भेट होईल सीमाशी, मग सांग कशी वाटली ती तुला ",.. आदित्य

" तुझी पसंत चांगली असेल बेटा, मला खूप आनंद झाला आहे",... आजी
......

मीना ताई नाश्ताची तयारी करत होत्या, सीमा तयार होती,.. " आई बघ ठीक आहे ना? ",

मीना ताई डोळे भरून सीमा कडे बघत होत्या,.. "माझी दृष्ट व्हायची तुला, जा बाई काजळ लाव ",

" आई काहीही काय तुझ्या सारखी निर्मळ व्यक्ति मी अजून पहिली नाही, तू अस बोलू नकोस" ,... सीमा मीना ताईंना जावून भेटली

"पुरे आता काकू.. सीमा, आता नाही निघत आहे सीमा तू सासरी, काकू जा तुम्ही आवरा" ,.... निशा

मीना ताई आत गेल्या

" सीमा अग काकूंच्या डोळ्यात पाणी होत",.. निशा

" हो बरोबर बोलते आहेस तू निशा, नको इतक्यात इमोशनल व्हायला, आई उगीच रडत बसेल",.. सीमा

"हो ना म्हणून मी बोलली की पुरे आता ",.. निशा

आदित्यचा फोन आला, ते निघाले, इकडे खूप धावपळ सुरू झाली, सीमा तयार होती, निशा तिच्या सोबत होती, मीना ताईंनी नाश्ता बनवला, त्या ही तयार झाल्या, सीमा गप्प होती

"काय झाल एवढी नको घाबरू सीमा,.. निशा

" अग काय बोलणार आहे मी त्या लोकांशी समजत नाही मला",... सीमा

" होईल बरोबर, ते काही तुला एकटीला प्रश्न नाही विचारणार, सगळे बोलतील एकमेकांना बरोबर आणि आदित्य जिजु काही करू शकणार नाही तुला आज , सगळे असतिल, बिनधास्त रहा ",.निशा

" निशा तू जा बर पुढे, तू माझ टेंशन अजून वाढवते आहेस , जेव्हा चान्स मिळाला तेव्हा चिडवत असते ",... सीमा

" तुला चिडवायला मजा येते, तुझ्या चेहर्‍यावरचा रंग उडतो आदित्यच नाव घेतल की",.. निशा

सीमा हसुन निशा कडे बघत होती

"मी ठीक दिसते आहे ना? एकदम अजागळ नाही दिसत नाही ना" ,... सीमा

"तू खूप सुंदर दिसते आहे, आता बघशील ना आदित्यच्या डोळ्यात",.. निशा

"तुझ तेच सुरू असत निशा, तुझी स्टोरी सांग ना? जिजाजी बघायला आले होते तेव्हा काय झाल होत?, काय बोलले तुम्ही?, पुढे काय काय झाल?" ,.... सीमा

" अग मी तर एवढी कशीतरी तयार झाले होते, तेव्हा साडी कशी तरी नेसली होती, काहीच बोलले नाही मी यांच्याशी एवढे लोक आले होते बघायला, कुठे बोलणार त्यांच्या समोर ",. निशा

" तरी पसंत केल तुला जिजुंनी, म्हणजे तुझ्यावर किती फिदा असतिल जिजु, पुढे काय झाल, सांग",.सीमा

" काही नाही रोज फोन यायचा त्यांचा, तस आमच नात घट्ट झाल ",.. निशा

" बघ बोलल्यावर मोकळ वाटत ना, मी तेच सांगते आदित्यला की थोडा वेळ दे, तो ऐकत नाही ",... सीमा

"हो ना जिजुंना घाई झालेली दिसते आहे, ते कसे फूल फिदा आहेत तुझ्या वर, तुला वेळ मिळणार नाही जिजु कडून बघ",.. निशा

हिला कस समजल काय माहिती? आदित्य अति करतो...

मीना ताई आत आल्या, दोघी गप्प झाल्या

" कुठे पर्यंत आले पाहुणे? ",..

" येतील आई ते आता",.. सीमा

राजाचा फोन वाजला,.."ते लोक आले आहेत, मी बाहेर जावुन घेवून येतो त्यांना ",

सीमा निशा आत जावून बसल्या ..

मीना ताई पुढे उभ्या होत्या,

आबा आक्का आजी आदित्य चौघे आत आले, मीना ताई भेटल्या त्यांना, सगळे सीमा कुठे ते बघत होते, सीमा बाहेर ये ,

सीमा घाबरली होती, तिने निशाचा हात धरून ठेवला,.. निशा चल ना

हो येते मी, तू पुढे चल, किती हात थंड झाला आहे तुझा, एवढ काय टेंशन घेते तू सीमा

दोघी बाहेर आल्या,

मीना ताईने ओळख करून दिली.. "ही सीमा.. ही निशा" ,

सीमा खूप सुंदर दिसत होती, पांढरा गुलाबी सिम्पल अनारकली सूट खूप छान दिसत होता तिला, त्यात तिने तिच्या सुंदर केसांची सैल वेणी घातली होती, कानात छान इअररींग, हातात आदित्य ने दिलेल्या बांगड्या होत्या , लाईट गुलाबी लिपस्टीक, खूप सुरेख, तिने हळूच वर बघितल, आदित्य तिच्या कडे बघत होता, तिने पटकन दुसरी कडे बघितल.

साडी ड्रेस दोघ खूप छान दिसतात सीमाला, आदित्यची नजर तिच्यावरून हटत नव्हती, घरचे होते म्हणून तो गप्प होता

आदित्यने ओळख करून दिली, सीमाने पुढे होवुन आबा आक्का, आजीच्या पाया पडल्या, सगळ्याना सीमा खूप आवडली होती, मीना ताई आबा आक्कांशी बोलत होते, राजा निशा पाणी द्यायला आत आले, सीमा आजींच्या बाजूला बसली, आजी आदित्य सीमा कडे बघत होते, सीमाला समजत नव्हत हे असे काय बघता आहेत माझ्या कडे?

" आजी कशी आहे सीमा?",... आदित्य

"खरच खूप गोड आहे, एकदम साधी, नीट संसार करेल तुझा",.. आजी

"सीमा बेटा आमचा आदित्य खूप छान काळजी घेणारा मुलगा आहे, तू अजिबात काळजी करू नको, मस्त मोकळी रहा, तो कधी कोणाला दुखवत नाही ",..

सीमा गप्प होती...... दुखवत नाही म्हणे कोणाला?... एवढ काय कौतुक ते.... मला माहिती आहे हा भांडकुदळ आहे....माझ्याशी तर भेटल्या पासून भांडतो आहे हा.. आधी माझ्याकडे कारचे 5000 रुपये मागितले,... नंतर होकार देण्यासाठी दबाव आणला, धमकी दिली ... आता मला वेळ हवा तो ही देत नाही, म्हणे मी तुझ्या कोणत्याही दोन अटी मान्य करेल..... आता पुढे काय करेल काय माहिती,.. दिसायला चांगला दिसतो तो,... मला माहिती कसा आहे तो... त्रास देतो तो

आबा अक्कांनी सीमाला त्यांच्या जवळ बसायला बोलवलं,

"आपली ओळख आहे सीमा म्हणजे मी इंटरव्ह्यू घेतला होता",.. आबा

हो सर..

"अग आबा म्हण मला आणि हिला आक्का",...

आक्का सीमाशी बोलत होत्या, त्यांना आवडला तिचा स्वभाव ,.. "केव्हा शाळेत जॉईन झाली तू सीमा ?",

याच महिन्यात..

"आदित्यशी ओळख कधी झाली तुझी ? ",.. आक्का

याच महिन्यात...

"आहेच तू खूप छान, म्हणून लगेच पसंत केल वाटत तुला आदित्यने, समजून घे आदित्यला, लवकर घरी ये आता" ,... आक्का

सीमा लाजली होती

सगळे छान बोलत बसले होते, सीमा नेहा आत जावून नाश्त्याच्या प्लेट घेवून आल्या, घरघुती पोहे, शिरा, भजी खूप आवडली सगळ्यांना,

"सीमा तू कोणता पदार्थ केला यातला? ",... आबा

" मी तयारी करून दिली, आईने तयार केला नाश्ता ",.. सीमा

" आता तू छान चहा ठेव आमच्या साठी",... आबा

सीमा आत गेली... तिने चहा केला

"निशा अग आजी सोबत येणार आहेत हे माहिती नव्हत, एक साडी आणली आहे दुकानातून, आता काय करू या? राजाला बोलाव ना आत मध्ये ",.. सीमा

निशा बाहेर गेली, राजा आदित्य बोलत होते, निशाने हाक मारली, आदित्य राजा दोघ बघायला लागले,

"राजा आत ये सीमा बोलवते आहे",..

राजा आत आला, त्या सोबत आदित्य ही आत आला, त्याला आत यायला चान्स हवा होता, सीमाला ते माहिती नव्हत, राजा आत्ता च्या आत्ता बाजारात जा एक छान साडी घेवून ये आजींसाठी,

"काही गरज नाही त्याची" ,... आदित्य

सीमा दचकली, मागे आदित्य उभा होता,

" काल एक साडी आणली आक्कांसाठी, माहिती नव्हत आम्हाला आजी येणार आहेत ते",.. सीमा

"आजी आजच सकाळी आली, आईने बोलवून घेतल तिला लग्नासाठी, देण घेण नको राजा, अजिबात जायच नाही कुठे",... आदित्य

सीमा आदित्य कडे बघत होती,.. "आदित्य अरे अस चालत नाही, आणू दे ना साडी ",

"नाही धावपळ नको ",. आदित्य

राजा निशा बाजूला उभ राहून बोलत होते

"राजा कप दे ",.. सीमा

राजा आदित्यने कप दिले,

" येतो ना चहा गाळता तुला?, गरम आहे तो ",... आदित्य

सीमा आदित्य कडे रागाने बघत होती

राजा निशा हसत होते, आम्ही बसतो बाहेर

"थांब ना निशा",... सीमाने हाक मारली

"आहे ना आदित्य जिजु ते करतील तुला मदत",.. निशा

ते दोघ बाहेर गेले

"माझ्या सोबत भीती वाटते का तुला सीमा? ",... आदित्य

सीमा काही बोलली नाही

आदित्य हसत होता, जाऊ दे नको चिडवायला उगीच चहा सांडेल

"तुला अस किचन मधे काम करतांना बघून खूप छान वाटत आहे सीमा, तुला स्वयंपाक येतो ना? , मला चमचमीत जेवण आवडत",.. आदित्य

"नाही येत स्वयंपाक, वेळ मिळाला नाही कधी",.. सीमाला सगळ येत असून ती मुद्दाम करत होती, मला त्रास देतो का नंतर बघेन मी याच्या कडे

"ठीक आहे काही हरकत नाही शिकशील हळू हळू ",.. आदित्य

सीमाने आदित्य कडे बघितल,... " तुला येतो का स्वयंपाक?",

" हो थोडा थोडा येतो, माझ्या लाडक्या बायकोला तर मी तिच्या आवडीचे पदार्थ करुन देवू शकतो, बाकीचे शिकेन मी ही हळू हळू , पण आता या वरून तू मला नकार देवू नकोस",.. आदित्य

"माझ्या होकार नकारचा प्रश्न कुठे आहे आता आदित्य? सगळ तुझ्या मनाप्रमाणे होत आहे",.. सीमा

"अच्छा माझ्या मनाप्रमाणे होत का?, चल इकडे ये मग सीमा ",.. आदित्य मुद्दाम सीमा जवळ जात होता , सीमा गडबडली, आदित्य प्लीज, बाहेर जावुन बस,

ओके रीलॅक्स.. गम्मत करत होतो मी

आदित्य प्लीज बाहेर जावुन बस, आदित्य बाहेर गेला

सीमा पूर्ण शांत झाली होती, चहा न्यायचे अवघड काम आहे आता,

सीमा चहा घेवून गेली

चहाचा ट्रे थरथरत होता तिचा, बापरे हा आदित्य माहिती नाही काय करणार आहे मला? , कस काय होणार आहे माझ काय माहिती? , मला नाही करायच लग्न.

निशा पुढे आली, तिने चहाचा ट्रे सीमा कडून घेतला, समोर ठेवला, सीमाने सगळ्यांना चहा दिला

"तुमच्या कडून बोलणी करणारे तुम्ही आहात ना?",.. आबा

हो..

"आमच्या कडून ही आम्ही, मग बोलून घेवू पुढे काय कार्यक्रम करायचे ते",.. आबा

ठीक आहे..

"आता इतर कार्यक्रम न करता डायरेक्ट साखरपुडा लग्न एकत्र करू, चालेल ना",.. आबा

हो चालेल... मीना ताई

"आम्ही गुरुजींना विचारून मुहूर्त काढू आता ",... आबा

चालेल..

"चालेल ना सीमा, आदित्य ",.. आबा

सीमा ने मानेने होकार दिला.

बापरे सीमा किती शांत आहे अस दाखवते आहे, माझ्या समोर किती बोलते, सारख मला दूर ढकलते, थोडे दिवस अजून,... आदित्य खुश होता

" लग्न साध्या पद्धतीने करू ",... आदित्य

हो

🎭 Series Post

View all